विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन


  1. 1) एम पी एस सी म्हणजे काय ?
    =>भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून ती एक स्वायत्त संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य या आयोगातर्फे होते. राज्य सरकारमधील विविध विभागातील शासकीय पदाकरिता ( सैनिकपदे सोडुन) निवडन्याचा अधिकार MPSC ला आहे.

    2) MPSC साठी मेरिट काय असते का? आणि मेरिट किती असते / कसे असत...
    े?
    => MPSC साठी कोणतेही मेरिट ठरलेले नसते. मेरिट दर परीक्षाकारिता भिन्न असते.
    उदा. जर पदसंख्या कमी तेव्हा मेरिट जास्त , आणि
    जर पदसंख्या जास्त तर मेरिट कमी असते.
    MPSC या परिक्षेकरिता फक्त एकच अट असते ती अशी की उमेदवार पदवी परीक्षा पास असावा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असावा मात्र लेखी परीक्षासाठी पदवी परिक्षेचे पास प्रमाणपत्र / निकालपत्र सादर करता आले पाहिजे.

    3) MPSC चा अभ्यास नोकरी करून करता येईल का?
    => अशा वेळेस सर्वप्रथम तुमची नोकरी कोणती, कशी आहे याचा विचार करावा लागतो कारण १०-१२ तास जर नोकरीत जात असतील तर अभ्यासाला किती वेळ देणार? या परीक्षेला एक आव्हान समजून आणि आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अभ्यास केला तर नक्कीच यश लाभेल फक्त तुम्ही दररोज वेळेवर अभ्यास केलाच पाहिजे न चुकता न थकता.......

    अनिवार्य विषयांचा अभ्यास कसा करायचा?
    १)मराठी- मराठीसाठी पुस्तकी ज्ञान घेण्याबरोबरच अवांतर वाचनावर ही भर द्यावा.
    उदा. रोजचे वृत्तपत्र , एखादे मासिक, एखादे पुस्तक......
    यामुळे भाषाशैली विचारशक्ती आकलनक्षमता वाढण्यास मदतच होते.
    २) इंग्रजी- इंग्रजीसाठी व्याकरण(Grammar) महत्वाचे आहे तसेच शब्दसाठा ही उपयोगी ठरतो. उदा. रोजचे इंग्रजी वृत्तपत्र ,मासिक,पुस्तक यामुळे शब्दसाठा वाढण्यास मदतच होते.
    ३) सामान्य अध्ययन -एक व दोन = या विषयांसाठी भूगोल(महाराष्ट्र,भारत,जग),इतिहास,राज्यव्यवस्था, मानव संसाधन विकास, मानवी हक्क परराष्ट्र धोरण,अर्थव्यवस्था, नैसर्गिकसाधनसंपत्ती विकास,विज्ञान तंत्रज्ञान आणि सांख्यिकी असे दहा घटक असतात. या घटकानुसार योग्य संदर्भाच्या आधारे व्यवस्थित अभ्यास करता येतो न त्या बरोबरच जुन्या प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने नवीन प्रश्नपत्रिकेची रुपरेखा ठरवणे. या विषयांचे घटक वाचून जरी अवघड जरी वाटत असले तरी योग्य अभ्यासामुळे हेच विषय सोप्पे वाटायला लागतात.

सामान्य विशेष ज्ञान

गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.

गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.

गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.

गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.

गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.

गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.

कोपरगाव – प्रसिद्ध शिर्डी मंदिर महाराष्ट्रातील या तालुक्यात आहे.

कोयना – महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र.

कोरकू – ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहते.

कोलंबस – अमेरिका खंडाचा शोध लावणारा इटालियन खलाशी.

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी.

कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी.

कोलकाता – भारताचे हे शहर १९१२ पर्यंत केंद्रीय राजधानीचे होते.

कोहिमा – नागालॅंडची राजधानी.

कौशल्या – भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव.

कौस्तुभ – भगवान विष्णुच्या गळ्यातील रत्न.

क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.

क्रांतीसिंह – नाना पाटील यांची उपाधी.

क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.

क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.

क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.

खंडी – २० मणाचे माप.

खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.

खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.

खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.

खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.

खैर – या झाडापासून कात मिळतो.

खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.

खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.

ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.

गंगटोक – सिक्कीमची राजधानी.

गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.

गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा.

गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.

गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.

गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.

गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.

गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.

गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.

गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.

गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.

गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.

गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.

गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.

गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.

गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.

गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.

गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.

गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.

गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.

गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ.

गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार.

गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.

गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.

गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी.

गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा.

गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे.

गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.

गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.

गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु.

गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.

गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.

गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.

गोविंद – बुटक्या तांदळाची जात.

ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.

ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.

ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.

ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.

ज्ञान
सतत दक्ष राहणे हीच स्वातंत्र्याची खरी किंमत आहे.

सत्य आणि न्याय यांहून कोणताही धर्म मोठा नसतो.

सत्याग्रह हा सत्याचा शोध आहे, आणि सत्य हाच ईश्वर आहे.

सदाचरण ही चारित्र्याची शिडी आहे आणि चारित्र्य ही जीवनातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे.

सर्व कलांमध्ये, जीवन जगण्याची कला हीच सर्वश्रेष्ट कला आहे.

सर्व मानवजातीविषयी प्रेम आणि उदारता हीच ख-या धार्मिकतेची कसोटी होय.

सर्व मोहबंधनांपासून मुक्ती मिळविणे हा सत्याचा साक्षात्कार होय.

सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा महान होय.

सर्वांत अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर विजयश्रीही घेऊन येत असतो.

सहानुभूतीच्या हजार शब्दांपेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो.

सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे.

सुखदुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद आहे.

सुखाचा जन्म हा कडवट कर्तव्यापोटीच होतो.

सुखापेक्षा दुःखामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठ दर्जाची असते.

सोने शुद्ध आहे की अशुद्ध याची कसोटी भट्टीतच होते.

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे हीच अज्ञानी माणसाची खरी व्यथा होय.

स्वतःच्या बाजूला न्याय आहे याची खात्री असली की मनुष्य अजिंक्य बनतो.

स्वतंत्र विचार हेच स्वातंत्र्य मिळविण्याचे हुकमी साधन असते.

स्वाध्याय हे ज्ञानसंचय व आत्मविकासाचे सर्वोत्तम साधन आहे.

स्वार्थपरता ही अनीती होय, निःस्वार्थपरता हीच नीती होय.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...