विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

सामान्य प्रश्नोत्तरे

मराठी
  1. 'महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र' ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?
    A. औरंगाबाद
    B. पुणे
    C. नागपूर
    D. मुंबई

    उत्तर - A. औरंगाबाद

    स्पष्टीकरण : उद्योजकता विकास कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्था राज्यातील मुख्य संस्था म्हणून काम पाहते. ऑक्टोबर 1988 मध्ये हिची स्थापना औरंगाबाद येथे झाली.

  2. भारतात कंपन्यांची स्थापना कोणत्या कायद्यांतर्गत होते?
    A. भारत सरकार कायदा,1935
    B. कंपनी कायदा, 1956
    C. आस्थापना (खाजगी आणि सरकारी)कायदा -1951
    D. आयकर कायदा -1961

    उत्तर - B. कंपनी कायदा, 1956
  3. 2012 चे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे ?
    A. आशियान
    B. सार्क
    C. इब्सा
    D. युरोपियन युनियन

    उत्तर - 
    D. युरोपियन युनियन

  4. विश्व व्यापार संघटने(WTO) ची सध्याची सदस्यसंख्या किती आहे ?
    A. 155
    B. 156
    C. 157
    D. 158

    उत्तर - C. 157
  5. जागतिक बँकेत (World Bank) कोणाची मुख्य अर्थशास्त्रज्ञ व बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अलीकडेच नियुक्ती झाली ?
    A. कौशिक बसू
    B. रघुराम राजन
    C. डी.सुब्बाराव
    D. नरेंद्र जाधव

    उत्तर - 
    A. कौशिक बसू

  6. महाराष्ट्र शासनाचा 2012-13 चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
    A. कल्याणजी शहा
    B. आनंदजी शहा
    C. ए.आर.रहेमान
    D. सुलोचना चव्हाण

    उत्तर - B. आनंदजी शहा
  7. 'आंतरराष्ट्रीय परिवार दिवस (International Family Day)' कधी साजरा केला जातो ?
    A. 15 मे
    B. 18 मे
    C. 21 मे
    D. 31 मे

    उत्तर - 
    A. 15 में 

  8. राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार 2012 मध्ये कोणाला देण्यात आला ?
    A. विजयकुमार
    B. योगेश्वर दत्त
    C. सायना नेहवाल
    D. (A)आणि(B)दोन्हीही

    उत्तर - D. (A)आणि(B)दोन्हीही
  9. 2012 ची मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकली ?
    A. जेसिका कहावाटी(ऑस्ट्रेलिया)
    B. सोफी मोल्ड्स(वेल्स)
    C. कि यू वेनशिया(चीन)
    D. कनिष्ठा धनकर(भारत)

    उत्तर - 
    C. कि यू वेनशिया(चीन)

  10. इन्फोसिसचे संस्थापक संचालक एन.आर. नारायणमुर्ती यांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील यशाबद्दल आणि योगदानाबद्दल हूवर मेडल पुरस्कारानी गौरविण्यात आले. यापूर्वी 2008 मध्ये भारताच्या एक पूर्व राष्ट्रपतींना ह्या मेडल ने गौरविण्यात आले आहे. ते राष्ट्रपती कोण ?
    A. श्रीमती प्रतिभाताई पाटील
    B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
    C. के.आर.नारायणन
    D. शंकर दयाळ शर्मा

    उत्तर - 
    B. ए.पी.जे.अब्दुल कलाम


  • 'राष्ट्रीय संकल्प दिन' म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्याची पुण्यतिथी साजरी केली जाते ?
    A. महात्मा गांधी
    B. इंदिरा गांधी
    C. जयप्रकाश नारायण
    D. सरदार पटेल

    उत्तर - 
    B. इंदिरा गांधी


  • 2012 च्या फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण ?
    A. किरण मुजुमदार-शॉ
    B. टीना अंबानी
    C. सुधा मूर्ती
    D. सावित्री जिंदल

    उत्तर - 
    D. सावित्री जिंदल


  • 2012 च्या फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती कोण ?
    A. अनिल अंबानी
    B. मुकेश अंबानी
    C. लक्ष्मी मित्तल
    D. सावित्री जिंदल

    उत्तर - 
    B. मुकेश अंबानी


  • यावर्षी खालीलपैकी कोणत्या मराठी सारस्वतांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे?
    A. बाळशास्त्री जांभेकर
    B. ना. सी. पेंडसे
    C. धनंजय कीर
    D. वरील सर्व

    उत्तर - D. वरील सर्व
  • "सॅंडी" चक्रीवादळ कोणत्या देशासाठी विध्वंसक ठरले ?
    A. भारत
    B. अमेरिका
    C. जपान
    D. मेक्सिको

    उत्तर - 
    B. अमेरिका

  • भारत सरकारला कोणत्या वर्षी स्वतःकडचे सोने 'IMF' आणि 'युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड'कडे तारण ठेवण्याची नामुष्की सहन करावी लागली ?
    A. 2007
    B. 2001
    C. 1995
    D. 1991

    उत्तर - 
    D. 1991


  • 'सर्व शिक्षा अभियान' कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान कार्यान्वीत करण्यात आले?
    A. आठवी
    B. नववी
    C. दहावी
    D. अकरावी

    उत्तर - 
    B. नववी


  • पेन्शन न मिळणार्‍या‍ ज्येष्ठ नागरीकांना अन्नधान्य पुरवठयासाठी मार्च 1999 मध्ये भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरु केली ?
    A. राजराजेश्वरी योजना
    B. स्वावलंबन योजना
    C. अन्नपूर्णा योजना
    D. स्वाधार योजना

    उत्तर - 
    C. अन्नपूर्णा योजना


  • इंग्रजी
    1. Which Indian state would you be in if you were watching birds at Ranganathittu Birds Sanctuary, situated on an island in the Kaveri river ? 
      (A) Karnataka
      (B) Maharashtra
      (C) Tamil Nadu
      (D) Andhra Pradesh

      Ans:- Karnataka

    2. Which Indian freedom fighter was popularly called 'Mahamana' ? 
      (A) Bal Gangadhar Tilak
      (B) Jai Prakash Narain
      (C) Gopal Hari Deshmukh
      (D) Madan Mohan Malaviya

      Ans:- Madan Mohan Malaviya
    1. Which Indian state is the largest producer in the world of the golden coloured 'Muga' silk ? 
      (A) Assam
      (B) Orissa
      (C) West Bengal
      (D) Karnataka

      Ans:- Assam

    PSI

    पोलिस उपनिरीक्षक
    पोलिस उपनिरीक्षक परीक्षेस बसण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप अवगत असणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घेऊया.
    अ) पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा योजना
    परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
    प्रश्नांची संख्या - 150
    एकूण गुण - 300
    परीक्षेचा कालावधी - तास
    परीक्षेचे मानक (दर्जा) - पदवी
    परीक्षेचे माध्यम - मराठी व इंग्रजी
    परीक्षेचे स्वरूप पाहता (बहुपर्यायी) मोजक्या र्शमात उमेदवारांना अभ्यासक्रमाचा डोंगर कसा सर करता येईल यावर भर द्यावा लागणार आहे. आयोगाने नुकतेच विविध पदांसाठी घेतल्या जाणार्‍या मुख्य परीक्षांकरिता असलेल्या अभ्यासक्रमात बदल केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतही बर्‍याच उमेदवारांच्या मनात गोंधळ असेल. परंतु आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा या अभ्यासक्रमात कुठलाही बदल केलेला नसून तो पूर्वीसारखाच आहे. अभ्यासक्रमाचा आवाका समजून घेण्यासाठी आयोगाने या परीक्षेकरिता जाहीर केलेला अभ्यासक्रम पूर्ण नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे संदर्भ पुस्तके वाचताना कोणत्या भागाला किती महत्त्व द्यायचे ते विद्यार्थ्यांना ठरवता येते. (हा अभ्यासक्रम हा आयोगाच्या www.mpsc.gov.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे)
    ब) पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा
    अभ्यासक्रम व गुणविभाजन
    अंकगणित- बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सरासरी दशांश अपूर्णांक (प्रश्न20, गुण 40)
    भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित) - पृथ्वीजगातील विभागहवामानअक्षांक्ष,रेखांशमहाराष्ट्रातील जमिनीचे प्रकारपर्जन्यमानप्रमुख पिकेशहरेनद्याउद्योगधंदे (प्रश्न20, गुण 40)
    भारताचा सामान्य इतिहास (1857 ते 1947) (प्रश्न 20, गुण 40)
    नागरिकशास्त्र - भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यासराज्यव्यवस्थापन (साधारण प्रश्न 15, गुण 30)
    ग्रामव्यवस्थापन - (प्रश्न 08, गुण 16)
    अर्थव्यवस्था - भारतीय पंचवार्षकि योजनांची ठळक वैशिष्टड्ये (प्रश्न 07, गुण 14)
    सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्ररसायनशास्त्रप्राणिशास्त्रवनस्पतिशास्त्रआरोग्यशास्त्र (प्रश्न 20, गुण 40)
    महाराष्ट्रातील समाजसुधारक - गो. ग. आगरकरशाहू महाराजम. फुलेमहर्षी कर्वेडॉ. आंबेडकर (प्रश्न 20, गुण 40)
    चालू घडामोडी - भारतीय व जागतिक (प्रश्न 20, गुण 40)
    या परीक्षांचा अभ्यास म्हणजे दिवसातून किमान 10 ते 12 तास द्यायला पाहिजे असाबहुतेक उमेदवारांचा गैरसमज असतो. पण अधिक तास अभ्यास म्हणजे परीक्षेत यश असा फॉर्म्युला नसून अभ्यासाचे काळजीपूर्व अचूक नियोजन करणे हा खरा फॉर्म्युला आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आगामी परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध वेळ व अभ्यासाचा आवाका याची सांगड कशी घालावी ते पाहूया.
    क) अभ्यासाचे नियोजन व वेळापत्रक
    अभ्यासक्रमातील 9 मुद्दय़ांचा अभ्यास कमी दिवसांत करण्याचे लक्ष्य आता आहे. त्यातीलअंकगणित व चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास सराव व सातत्यावर अवलंबून आहे. हा पाया भक्कम असेल तर हे 80 गुण मिळवणे सहज सोपे होते. त्यासाठी रोज किमान एक तास अंकगणित व तास चालू घडामोडींच्या अभ्यासाला द्यावा. उर्वरित विषयांचा अभ्यास उमेदवाराच्या वाचनग्रहण व आकलनशक्तीवर आधारित असतो. कारण या विषयांसाठी उपलब्ध संदर्भ पुस्तके ही प्रत्येक उमेदवाराने हाताळलेली असतात. परंतु त्यातील प्रत्येक मुद्दय़ाचे सखोल ज्ञान असणे आयोगाला अभिप्रेत असते. संदर्भ पुस्तके व्यवस्थितकाळजीपूर्वक वाचावीत. वाचताना महत्त्वाच्या मुद्दय़ांखाली खूण करून ठेवायची सवय ठेवावी. सर्व मुद्दय़ांचे एका वेगळ्या नोंदवहीत नोंद करून आपल्या मायक्रो नोट्स तयार कराव्यात. जेणेकरून परीक्षेच्या अगोदर एक आठवडा तुम्हाला त्या नोट्स रिव्हिजन करायला उपयोगी पडतील. अखेरच्या काही दिवसांत विषयावर आयोगाने यापूर्वी विचारलेल्या सर्व प्रश्नांचा सराव करावा. वाचनात न आलेले मुद्दे पुन्हा वाचून त्याचासमावेश आपल्या नोट्समध्ये करावा. वेळेत पेपर सोडवून व्हावा यासाठी पोलिसउपनिरीक्षक परीक्षा पेपर संच बाजारात उपलब्ध आहे. त्यातील आयोगाच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवण्याचा सराव करावा.
    ड) अभ्यासक्रमातील विषयांवर उपलब्ध संदर्भ पुस्तके
    सपर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या उमेदवारांसाठी बाजारात संदर्भ पुस्तकांची रेलचेल असते. त्यामुळे या क्षेत्रात नवीन आलेल्या उमेदवारांना सुरुवातीला काय वाचावे आणि कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. उमेदवारांचा सुरुवातीचा अमूल्य वेळ योग्य संदर्भ पुस्तके शोधण्यातच वाया जातो. हे टाळण्यासाठी सर्व विषयांची दर्जेदार संदर्भ पुस्तके आधीच संग्रही असणे आवश्यक आहे. अभ्यास करताना एकाच विषयाची खूप पुस्तके वाचण्यापेक्षा या दर्जेदार पुस्तकांचे वारंवार वाचन करण्यावर भर द्यावा.
    अंकगणित - अंकगणित पंढरीनाथ राणे तसेच वी स्कॉलरशिपची पुस्तके
    भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित) - थी ते 10 वीपर्यंतची भूगोलची क्रमिक पुस्तके,भूगोल : सवदी भूगोल - जयकुमार मगर तसेच सामान्य क्षमता चाचणी स्टडी सर्कल मार्गदर्शनचा आधार घ्यावा.
    भारताचा सामान्य इतिहास (1857 ते 1947) - भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास : जयसिंगराव पवार , 8 वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
    नागरिकशास्त्र - भारतीय राज्यघटना : घांगरेकर राज्यघटना : वर्‍हाडकर
    ग्रामव्यवस्थापन - पंचायत राज : प्रा. यवलमाडभारतीय शासन व राजकारण : पी. बी. पाटील
    अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था (भाग व 2) भोसले व काटेभारतीय अर्थव्यवस्था :रंजन कोळंबेवाणिज्य व अर्थव्यवस्था मार्गदर्शक स्टडी सर्कलभारतीय अर्थव्यवस्था : प्रतियोगिता दर्पणमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी
    सामान्य विज्ञान - विज्ञान व तंत्रज्ञान अशोक जैन व चितानंद जैन : शेठ प्रकाशन,विज्ञान व
    तंत्रज्ञान : जयसिंगराव पवारसा. क्षमता चाचणी विज्ञान विभाग( स्टडी सर्कल)
    महाराष्ट्रातील समाजसुधारक - महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास : भिडे पाटील
    चालू घडामोडी - चालू घडामोडी : दत्ता सांगोलकरतसेच तुम्ही या विषयाचा अभ्यासकरण्यासाठी संगणक तंत्रज्ञानइंटरनेटचा वापर करू शकाता. जसे, www.newshunt.com,www.generalknowledge.com यासारख्या वेबसाइटवरून अद्ययावतमाहिती मिळू शकते.
    ई) परीक्षेला जातानापरीक्षेला जाताना गोंधळून न जाता मन शक्य तेवढे स्थिर,तणावमुक्त ठेवावे. जाताना पोटभर जेवून किंवा काहीच न खाता जाणे चुकीचे आहे. शक्यतो सुस्ती येणार नाही असे हलके पदार्थ खाऊन जावे. काही उमेदवार परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्री जागरण करीत वाचत असतात व त्यामुळे ऐन परीक्षेत गोंधळूनजातात. हे टाळण्यासाठी किमान एक दिवस आधी सर्व अभ्यास पूर्ण झालेला असावा.आदल्या दिवशी पूर्ण झोप घ्या. परीक्षेस जाताना प्रसन्न मनाने व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जा. स्वत:च्या मेहनतीवरजिद्दीवर पूर्ण विश्वास ठेवा व परीक्षेस सामोरे जा म्हणजे यश तुमचेच असेल.

    महाराष्ट्र स्पेशल नॉलेज

    भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के), तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.

    महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.

    महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.

    महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.

    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश

    महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.

    महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.

    महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.

    महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)

    महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर

    प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).

    महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

    महाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा,

    महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी- शेकरू,

    महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन,

    महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी- हरावत,

    महाराष्ट्र राज्याचा राज्य भाषा- मराठी.

    महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.

    महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -
    १) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
    २) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
    ३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
    ४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
    ५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
    ६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
    ७) गोवा- सिंधुदुर्ग.

    भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

    भारताची आर्थिक राजधानी - मुंबई.

    महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

    महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

    महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

    मुंबईची परसबाग - नाशिक

    महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

    मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

    द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

    आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

    महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

    महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

    संत्र्याचा जिल्हा- नागपूर

    महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

    जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

    महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

    साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

    महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

    महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

    कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर

    लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

    बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा.......

    विशेष ज्ञान (३)


    भाग १
    नाशिक – महाराष्ट्रात कुंभमेळा येथे भरतो.

    नाशिक – रामायणकालीन किष्किंधा म्हणजे सध्याचे ...हे शहर.

    नासा – अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था.

    निकोलो पोलो – मार्को पोलो याचे वडील.

    निखील चक्रवर्ती – प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष.

    नील नदी – ही गरम पाणी असलेली नदी आहे.

    नूक – ग्रीनलंडची राजधानी.

    नूरजहान – जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव.

    नेपाळ – एकमेव हिंदूराष्ट्र.

    नेपाळ – जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या देशात आहे.

    नेफा – अरुणाचल प्रदेशचे जुने नाव.

    नेवासा - येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला.

    नैरोबी – केनियाची राजधानी शहर.

    नॉर्वे – जगातील सर्वाधिक कर असलेला देश आहे.

    नोबेल पारीतोषिक – जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार.

    पंजाब – भारतातील सर्वात संपन्न राज्य.

    पंजाब – वाघा बॉर्डर या राज्यात आहे.

    पचमढी – मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी.

    पटना – बिहारची राजधानी.

    पठार – उंच भागातील सपाट प्रदेश.

    पणजी – गोवा या राज्याची राजधानी.

    परम – पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर.

    परमवीरचक्र – भारतातील सर्वात मोठे पदक.

    परळी वैजनाथ –. बारा ज्योतिर्लिंगांपैकी बीड येथील जोतिर्लिंग.

    भाग २
    पराशर – महाभारतकर्ता व्यास यांचा पिता.

    पवनचक्की – वा-यापासून वीज मिळविण्याचा प्रदुषण विरहीत मार्ग.

    पाकोळी – सर्वात वेगवान उडणारा पक्षी.

    पाच – ऑलिंपीक ध्वजावरील कड्यांची संख्या.

    पाच – महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांची संख्या.

    पाटलीपुत्र – सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव.

    पारसी – नवरोज सन हा या धर्माच्या नविन वर्षात येतो.

    पारा – एकमेव द्रवरुप धातू.

    पारा – थर्मामीटर मध्ये चमकणारा पदार्थ.

    पाली – गौतम बुद्धाने आपले तत्त्वज्ञान या भाषेत सांगितले आहे.

    पावसाळा – कोकणातील शेतक-यांसाठी महत्वाचा ऋतु.

    पास्कल – दाबाचे एकक.

    पितळखोरा – भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांचा समुह (जि.औरंगाबाद).

    पुणे – देशातील पहिले क्रीडा साहित्य संमेलनाचे स्थळ.

    पुर्णा – अकोला जिल्ह्याची मुख्य नदी.

    पृथ्वी – सुर्यमालेतील तिसरा ग्रह.

    पृथ्वी – सुर्यमालेतील सुर्यापासुनचा तिसरा ग्रह.

    पॅरिस – आंतरराष्ट्रीय वाईन संघटनेचे मुख्यालय येथे आहे.

    पॅरिस – फ्रान्सची राजधानी.

    पॅरीस – आयफेल टॉवर या शहरात आहे.

    पॅसिफिक – सर्वाधिक खोली असणारा महासागर.

    भाग ३
    पेसेटा – स्पेनचे चलन.

    पेसो – चिलीचे चलन.

    पोखरण – भारतातील पहिली अणुस्पोट चाचणी.

    पोरबंदर – महात्मा गांधींचे जन्मस्थळ.

    पोर्टब्लेअर – अंदमान-निकोबारची राजधानी

    पोलास्का – पोलंडचे मुळ राष्ट्रीय नाव.

    पोलो – जगातील सर्वात जुना खेळ.

    प्रताप हायस्कुल – साने गुरुजींनी या शिक्षणसंस्थेत अध्यापन केले.

    प्रवरा – नेवासे, संगमनेर ही गावे ... या नदीकाठी वसलेली आहेत.

    प्रशांत महासागर – पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठे महासागर.

    प्रिटोरिया – दक्षिण आफ्रिकेची राजधानी.

    प्रितीसंगम - महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम.

    प्रिस्टले – याने ऑक्सिजन या वायुचा शोध लावला.

    प्रेमसन्यास – राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक.

    प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह.

    प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह.

    फर्डिनंड मॅगेलन – पृथ्वीप्रदक्षिणा घालणारा पहिला शोधक प्रवासी.

    फिनलंड – जगातील सर्वाधिक सरोवरे या देशात आहेत.

    फिनलंड – सरोवरांचा देश.

    फिलीपाईन्स – रॅमन मॅगसेसे पुरस्कार या देशाकडुन दिला जातो.

    फुफ्फुस – क्षय हा रोग या अवयवाचा आहे.

    भाग ४
    बिस्मार्क ऑटो व्हॉन – आधुनिक जर्मनीचा शिल्पकार.

    बिहार – भारतात कोळशाचे उत्पादन सर्वाधिक या राज्यात होते.

    बिहू – आसाममधील लोकनृत्य.

    बी – कवी नारायण मुरलीधर गुप्ते य़ांचे टोपण नाव.

    बुडापेस्ट – हंगेरीची राजधानी.

    बुलढाणा – खा-या पाण्याचे लोणार सरोवर या जिल्ह्यात आहे.

    बॅरिस्टर अंतुले – यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे केले.

    बेंजामिन – जगातील पहिला युरोपियन शोधक प्रवासी.

    बेडुक – एक उभयचर प्राणी.

    बेथलहेम – येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान(पॅलेस्टाइन).

    बेल्जियम – युरोपची रणभूमी.

    बेसाल्ट – महाराष्ट्राचे पठार या खडकांनी बनलेले आहे.

    बैकल – सर्वात खोल सरोवर.

    बॉक्साईट – हा अल्युमिनीअमचा मूळखनिज धातू आहे.

    ब्राझील – दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश.

    भंडारा – महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा.

    भरत – दुष्यंत व शकुंतला याच्या या पुत्राच्या नावावरुन भारताला भारत हे नाव पडले.

    भरतपूर – राजस्थान मधील राष्ट्रीय ( पक्षी ) उद्यान.

    भांगडा – पंजाबमधील लोकनृत्य.

    भानूदास महाराज – कृष्णदेवरायाचे मन परिवर्तन करुन यांनी विठ्ठलाची मुर्ती पंढरपूला आणली.

    भानूदास महाराज – संत एकनाथ यांचे आजोबा.

    भारत – आयुर्वेदाचा उगम या देशात झाला.

    भाग ५
    फुफ्फुस – रक्त शुद्धीकरणाचे काम करणारा अवयव.

    फॅट मॅन – अमेरिकेने १९४५ रोजी नागासाकी या शहरावर (जपान) टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव.

    फॅदम – समुद्राची खोली साधारणतः या परिमाणात मोजतात.

    फॅबियन बेलिंगशॉसेन – अन्टार्क्टिका खंडावर जाणारा सर्वप्रथम दर्यावर्दी.

    फ्रान्सिस बेकन – विगमन तर्कशास्त्राचा जनक.

    फ्रॅंकलिन – आकाशात विज असते हे याने सिद्ध केले.

    बंगळूर – कर्नाटकची राजधानी.
    ब – खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो.

    ब – गाजरामध्ये हे जीवनसत्त्व असते.

    बगदाद – इराकची राजधानी.

    बचेंद्री पाल – माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला.

    बर्थप्लेस – शेक्सपिअरचे जन्मघराचे नाव.

    बर्न – स्वित्झर्लंडची राजधानी.

    बर्लिन – जर्मनीची राजधानी.

    बहत – थायलंडचे चलन.

    बहारिन – मोत्याचे बेट.

    बांग्लादेश – या देशाबरोबर भारताची सीमारेषा सर्वात लांब आहे.

    बांबू – जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती.

    बा – कस्तुरबा गांधीचे टोपण नाव.

    बाबर – याने भारतात मोगल सत्तेची स्थापना केली.

    बाबा आमटे – मानवतेच्या दृष्टीकोनातून कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती.

    बाबाजीराजे भोसले – भोसले राजवंशाचे संस्थापक.

    बामियान – तालिबानने नष्ट केलेल्या बुद्धाचा पुतळा.. येथे आहे.

    बारामती – महाराष्ट्रात कृतिम पावसाचा प्रयोग प्रथम या परिसरात करण्यात आला.

    बार्तोलोमो डायस – आफ्रिकेला वळसा घालणारा सर्वप्रथम पोर्तुगीज दर्यावर्दी.

    बिवा – जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर.

    बिशप रॉक – ब्रिटनजवळ .... हे जगातील सगळ्यात लहान बेट आहे.

    विशेष ज्ञान (२)

    भाग १
    देवदार – भारतातील सर्वात उंच वृक्ष.

    देवदार – हिमालयात आढळणारा हा वृक्ष भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे.

    देवदास गांधी – म. गांधींचे हे पुत्र हिंदूस्थान टाईम्सचे संपादक होते.

    देहू – संत तुकाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आहे.

    दोनाता – मार्को पोलो याच्या पत्नीचे नाव.

    दोहा – कतार या देशाचे सर्वात मोठे शहर.

    दोहा – कतारची राजधानी.

    द्रोणागिरी – हनुमानाने उचललेला पर्वत.

    धर्मराज – पांडवांतील सर्वात जेष्ठ बंधू.

    धीरुभाई अंबानी – रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक.

    धूपगड – सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर.

    धौली – सम्राट अशोकाचा शिलालेख उडिसा राज्यात या ठिकाणी आहे.

    नंद – श्रीकृष्णाचा पालनकर्ता पिता.

    नंदिनी सत्पथी – ओडीसाची पहिली महिला मुख्यमंत्री.

    नकुल – पांडवांपैकी अश्वविद्या जाणणारा.

    नथुराम गोडसे – याने म.गांधीची हत्या केली.

    नयन भडभडे – अभिनेत्री रीमा लागू यांचे मूळ नाव.

    नरेंद्रनाथ – स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव.

    भाग २
    दक्षता – पोलीस खात्यातर्फे चालविले जाणारे मासिक.

    दक्षिण – कन्याकुमारी भारताच्या या दिशेला आहे.

    दमणगंगा – कोकणातील अगदी उत्तरेला असलेली नदी.

    दमयंती – पौराणिककाळातली नल राजाची पत्नी.

    दमागास्कर – जगातील सर्वात प्राचीन शहर.

    दर्पण – मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र.

    दशरथ – कौसल्या, सुमित्र व कैकयी यांचा पती.

    दादाभाई नवरोजी – ब्रिटीश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय.

    दादाभाई नवरोजी – भारताचे पितामह.

    दादासाहेब फाळके – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक.

    दादोबा पांडुरंग – मराठी भाषेचे पाणिनी.

    दापोली – कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.

    दिनार – इराकचे चलन.

    दिल्ली – जंतरमंतर ... येथे आहे.

    दिसपूर – आसामची राजधानी.

    दीक्षाभुमी – जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप.

    दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघटनेचे मुख्यालय येथे आहे.

    दुबई – एसी बस थांबे असणारे जगातील पहिले शहर.

    दुर्गा खोटे – मराठी चित्रपटातील पहिली नायिका.

    धृतराष्ट्र – महाभारतकालीन हस्तीनापुरचा आंधळा राजा. कौरवांचा मोठा भाऊ.

    दुल्टी – भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना.

    देकार्त – जगाच्या यांत्रिक कल्पनेचा जनक.

    देवकी – श्रीकृष्णाची माता.

    भाग ३
    नर्मदा – भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी.

    नल – निषधदेशचा विख्यात राजा, दमयंतीचा पती.

    नवाश्म – चाकाचा शोध या युगात लागला.

    नाईल – जगातील सर्वात लांब नदी.

    नाग – हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे.

    नागपुर – महाराष्ट्राची उपराजधानी.

    नागपूर – महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर.

    नागार्जुनसागर – आंध्रप्रदेश येथे कृष्णा नदीवर जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी बांधलेले प्रसिद्ध धरण.

    नागासाकी – जपानमधील लोखंड व पोलादाच्या कारखाण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण.

    नाणेघाट – देश व कोकण यांना जोडणारा सातवाहनकालीन प्राचीन घाट.

    नाबार्ड – कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था.

    नामिबिया – विंडहॉक हि या देशाची राजधानी आहे.

    नायट्रस ऑक्साइड – मनुष्याला हसविणारा वायू.

    नायडू सी. के. – भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार.

    नालंदा – गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ.

    माहितीचा अधिकार

    मुंबई : महाराष्ट्रात माहितीचा अधिकार कायदयाची प्रभावी अंमलबलजावणी करण्यात येत आहे. या कायदयाच्या अंमलबजावणीला आज दि. 12 ऑक्टोबर रोजी 7 वर्ष पूर्ण होत आहेत.
    केंद्र सरकारचा माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 हा देशामध्ये 12 आक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला. या नागरिकाभिमुख कायद्याने सात वर्ष पूर्ण केली आहेत. हा नागरिकांचा कायदा असल्यामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभाग यांचा त्रिवेणी संगम यामध्ये...
    आहे. प्रत्येक नागरिकाला हा कायदा आपला वाटतो. प्रत्येक वर्षी अर्जांची व तक्रारींची संख्या वाढते आहे. सन 2006 ते 2011 या वर्षात 24 लाख 89 हजार 828 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे 24 लाख अर्ज निकाली काढण्यात आले आहेत हे विशेष.

    माहितीचा अधिकार कायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय असून देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात या कायद्याचा सर्वाधिक वापर केला जात आहे. माहितीचा अधिकार कायद्याच्या वापरात जगात अमेरिकेनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.‍‍ विभागीय माहिती आयुक्त कार्यालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. मुख्य माहिती आयुक्तांसह नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोकण, बृहन्मुंबई, अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालये कार्यरत आहेत.

    राज्य माहिती आयोगाकडे आतापर्यत सर्वाधिक माहिती अधिकाराचे अर्ज नगर विकास खात्याचे असून दुसरा क्रमांक महसूल व तिसरा क्रमांक गृह आणि चौथा क्रमांक ग्रामविकास खात्याचा लागतो. तसेच सर्वाधिक अपिले दाखल होण्यात मुंबई, पुणे व औरंगाबाद हे विभाग अग्रेसर आहेत.

    अपिलांचा वेगाने निपटारा करण्यासाठी आयोग सातत्याने प्रयोगशील व प्रयत्नशील आहे. कायद्याच्या प्रबोधनासाठी यशदामार्फत वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. तसेच विविध स्वयंसेवी संघटनाही यामध्ये पुढाकार घेत आहेत. माहितीचा अधिकार कायद्यास आवश्यक असलेली सार्वजनिक कारभारातील पारदर्शकता जसजशी वाढत जाईल तसे हे अर्जांचे प्रमाण व स्वरूप बदलेल अशी आयोगाची अपेक्षा आहे.

    CSAT E-BOOKS FREE DOWNLOAD


    CSAT E-BOOKS FREE DOWNLOAD

                                               

    MPSC - स्पर्धा परीक्षा.


     महाराष्ट्र लोक सेवा आयोग 
    (MAHARASHTRA PUBLIC SERVICE  COMMISSION- MPSC)

                    महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम  315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.
                  महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.

    महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.

    उदा. १) राज्य सेवा परीक्षा

    २)PSI/STI/ASST.

    ३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा

    ४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा

    ५)महाराष्ट्र  कृषी सेवा परीक्षा

    ६)न्यायालयीन सेवा परीक्षा

    ७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा

    ८)लिपिक -टंकलेखक परीक्षा

    वेबसाईट :-  www.mpsc.gov.in

    ही परीक्षा ३ टप्प्यात घेतली जाते...
    १) राज्य सेवा (पूर्व) परीक्षा -       २०० गुण 
    २) राज्य सेवा (मुख्य) परीक्षा -  ८०० गुण 
    ३) मुलाखत -                           १०० गुण 

    परीक्षेसाठी पात्रता:-
    * शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
    २) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब  पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
    ३) मराठीचे ज्ञान आवश्यक.

    * वयोमर्यादा -
    साधारण प्रवर्गासाठी  किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.  
    कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे
    अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम
    खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.
    अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.

    * शारीरिक पात्रता -
    १) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-
    पुरूष उमेदवारांकरिता :-
    उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
    छाती - न फुगविता ८४ सें .मी.
    फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक 

    महिला उमेदवारांकरिता 
    उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

    २) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-
    पुरूष उमेदवारांकरिता  :-
    उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
    छाती - न फुगविता ८४ सें .मी.
    फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक 

    महिला उमेदवारांकरिता 
    उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

    ३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-
    पुरूष उमेदवारांकरिता  :-
     उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
    छाती - न फुगविता ८४ सें .मी.
    फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक 
    चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा . 

    महिला उमेदवारांकरिता 
    उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
    चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .

    एमपीएससी - मुख्य परीक्षा : नव्या मुख्य परीक्षेची रणनीती

    ‘एमपीएससी’ मुख्य परीक्षा : नव्या मुख्य परीक्षेची रणनीती


    राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व गुणपद्धती पाहता आपल्या तयारीला नवी दिशा देणे गरजेचे बनले आहे. जे विद्यार्थी पूर्वीपासूनच राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांना आपल्या अभ्यासपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत आणि जे विद्यार्थी नव्यानेच या परीक्षेकडे वळणार आहेत त्यांना या नव्या अभ्यासपद्धतीला अनुसरु नच तयारीचा आरंभ करावा लागणार आहे.
    एकंदर बदलांचा आढावा घेतल्यास त्याला पूरक ठरेल अशा अभ्यासपद्धतीचा स्वीकार करणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल. त्यादृष्टीने पाहता प्रत्येकाने अभ्यासाचे धोरण ठरवतांना पुढील मुद्दे लक्षात घेणे उपयुक्त ठरेल.
    सर्वप्रथम आयोगाने स्वीकारलेला अभ्यासक्रम सखोल व सविस्तरपणे अभ्यासावा. मुख्य परीक्षेतील मराठी व इंग्रजी या भाषा विषयांचा विचार करता नवा अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमावरच आधारित आहे आणि त्याची व्याप्ती मोठी नाही, हे लक्षात येईल. त्यामुळे या भाषा विषयांची चिंता करायची आवश्यकता नाही. खरे आव्हान आहे ते सामान्य अध्ययनाच्या संदर्भात! त्यातही पूर्वीच्या सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमातील ५० ते ६०% भाग सामान्य अध्ययनाच्या त्या त्या पेपरमध्ये समाविष्ट केलेला आहे. मात्र उर्वरित ३० ते ४०% अभ्यासक्रम हा पूर्णपणे नवा आहे. त्यामुळे इतिहासापासून ते विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत चारही पेपर्सचा अभ्यासक्रम पाहताना आणि त्याचे विश्लेषण करताना एकूण अभ्यासक्रमाची व्याप्ती किती आहे हे लक्षात घ्यावे लागणार आहे. त्यासाठी निर्धारित अभ्यासक्रम स्वतंत्रपणे स्वयं लिहून काढावा. त्यात एकूण किती प्रकरणे आहेत, त्यातील घटक-उपघटक कोणते आहेत? याचे सूक्ष्म अवलोकन करावे.
    दुसरी बाब म्हणजे त्या त्या घटकांतील चालू घडामोडींचा सातत्यपूर्ण अभ्यास. कारण आयोगाने सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक पेपरमध्ये चालू घडामोडीवरही प्रश्न विचारले जातील हे जाणीवपूर्वक नोंदवले आहे. थोडक्यात, आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आणि त्या त्या घटकातील चालू घडामोडी अशा दोन्हींचा सखोल अभ्यास करणे क्रमप्राप्त बनले आहे. 
    त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाचे विश्लेषण करताना आपल्या सोईसाठी अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचे पुढील साधारण वर्गीकरण लक्षात ठेवावे. यानुसार प्रत्येक घटकातील संकल्पनात्मक भाग; आकडेवारी, माहिती असलेला तांत्रिक भाग आणि तिसरा चालू घडामोडींचा भाग होय. संबंधित विषयाचे उपरोक्त पद्धतीने वर्गीकरण करून प्रकरणनिहाय तयारी केल्यास त्या  त्या विषयावर निश्चितपणे प्रभुत्व मिळवता येईल.
    अभ्यासक्रमाची व्याप्ती ठरवल्यानंतर स्वाभाविकपणे निर्माण होणारा प्रश्न म्हणजे त्या त्या विषयासाठी काय वाचायचे? वस्तुत: बाजारात उपलब्ध असणारे साहित्य हे अपुरे आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे विचारपूर्वक संदर्भाची यादी मिळवणे महत्त्वाचे आहे. त्या त्या घटकांवर प्रचलित असणारी प्रमाणित संदर्भग्रंथाची यादी पहावी. उदा. इतिहासासाठी बिपन चंद्रा व ग्रोवर-ग्रोवर यांचे पुस्तक; भूगोलासाठी एनसीईआरटी आणि सवदी यांचे पुस्तक; राज्यघटनेसाठी भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड १ हे पुस्तक; अर्थव्यवस्थेसाठी मिश्रा व पुरी यांचे पुस्तक इ. त्याचप्रमाणे, द युनिक प्रकाशनाचा ‘महाराष्ट्र वार्षिकी २०१२’ हा संदर्भग्रंथ महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडामोडींसाठी उपयुक्त आहे. याखेरीज मराठी वर्तमानपत्रे; लोकराज्य, योजना ही मासिके आणि परिवर्तनाचा वाटसरु  हे पाक्षिक नियमितपणे वाचावे. या संदर्भपुस्तकांच्या आधारे अभ्यासक्रमातील संकल्पना, माहिती व चालू घडामोडी या तिन्ही आयामांना लक्षात घेऊन सविस्तर नोट्स तयार कराव्यात. अर्थात नोट्स बनवतांना प्रत्येक घटकाचे आकलन करण्यावर जोर द्यावा. पहिल्या वाचनाच्या वेळी संकल्पनात्मक भाग कोणता; आकडेवारी, माहितीचा भाग कोणता, हे अधोरेखित करावे. आणि त्या त्या घटकासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचीही सविस्तर नोंद ठेवावी. थोडक्यात, सर्वसमावेशक अभ्यासपद्धतीवर भर देऊनच आपल्या तयारीची पायाभरणी करावी.
    मुख्य परीक्षेतील प्रत्येक विषयाचे वाचन, त्यावरील नोट्सची तयारी केल्यास उजळणीचेही वेळापत्रक तयार करावे. अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरु पाच्या प्रश्नांचा सराव करण्यावर भर द्यावा. नव्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचे संकलन सद्य:स्थितीत उपलब्ध नसले तरी पूर्व परीक्षेतील अभ्यासपद्धतीचा अवलंब करून प्रारंभी स्वत:च नमुना प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करावा. अशारीतीने अभ्यासक्रमाची व्याप्ती निर्धारित करणे, योग्य संदर्भाची निवड आणि सर्वसमावेशक अभ्यास या धोरणाचा अवलंब करून नव्या परीक्षेला सामोरे जाता येईल

    सौजन्य-तुकाराम जाधव

    अतिशय महत्वाचे...

    विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...