विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम

                                           एम.पी.एस.सी MPSC

राज्य सेवा (पुर्व) परीक्षा अभ्यासक्रम

२८ सप्टेंबर २०१२ रोजी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केला त्यानुसार ही नवी परीक्षा पध्दती युपीएससीच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसारखीच असल्याचे दिसून येतेयापूर्वी अभ्यासक्रम  स्वरूपात १९९४ साली बदल केला होता.राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.



  • पेपर १ (२०० गुण) – एकूण – ७ घटक
  • पेपर २ (२०० गुण) – एकूण - ७ घटक

सामान्य अध्ययन पेपर १
या पेपरमधील घटक पुढीलप्रमाणे 
१  1)    चालू घडामोडी 
 राज्य (महाराष्ट्र)राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्त्वाच्या चालू घडामोडी
२) इतिहास
          भारताचा इतिहास ( महाराष्ट्राचाअ विशेष सदर्भासहित) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ
३) महाराष्ट्रभारत व जगाचा भूगोल 
प्राकृतिकसामाजिकआर्थिक
४) महाराष्ट्र व भारतीय राज्यपध्दती व प्रशासन –
राज्यघटनाराजकीय व्यवस्थापंचायती राजनागरी प्रशासनसार्वजनिक धोरणमानवी हक्कासंबंधीचे मुद्देइत्यादी.
५) आर्थिक आणि सामाजिक विकास 
शास्वत विकासदारिद्र्यसर्वसावेशक धोरणलोकसंख्याशास्त्रसामाजिक क्षेत्रातील पुढाकारइत्यादी.
६) पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्दे 
पारिस्थितीकीजैविक बहुविविधता व वातावरणातील बदल – सदर विषयायील स्पेशलायक्झेशन दर्जाचे ज्ञान आवश्यक नाही.
७) सामान्य विज्ञान 

राज्यसेवा पूर्वपरिक्षा – २०१३

पेपर क्र.
गुण
वेळ
दर्जा
माध्यम
पेपर १ (अनिवार्य)
२००
 तास
पदवी
मराठी व इंग्रजी
पेपर २ (अनिवार्य
२००
 तास
टॉपिक १ ते ५ – पदवी स्तर
टॉपिक ६ – इ. १०वी चा स्तर
टॉपिक ७ – इ. १०वी/१२चा स्तर
मराठी व इंग्रजी
सामान्य अध्ययन पेपर २
या पेपरमधील घटक पुढीलप्रमाणे 
१) आकलन
२) संवादकौशल्यासहित अंतरव्यक्तिगत कौशल्य
३) तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता
४) निर्णय क्षमता आणि समस्येचे निराकरण
५) साधारण बुध्दीमापन चाचणी
६) मूलभूत अंकज्ञान (संख्या आणि त्यातील संबंधऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडइ.) (इयत्त्ता १० वी स्तर) माहिती विश्लेषण (तक्तेग्राफटेबल आणि माहिताचा पुरेपणाइ. – इयत्त्ता १० वी चा स्तर )
७) मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य ( १०वी / १२ वी चा स्तर)
सुचना १ – पेपर २ मधील मराठी आणि इंग्रजी भाषेतील आकलनकौशल्य तपासण्याबाबतचे दहावी / बारावी स्तरावरचे उता-यावरील प्रश्न ( पेपर २ च्या अभ्यासक्रमातील सातवा घटक) हे फक्त्त मराठी
व इंग्रजी लिपीतीलाच असतील व त्यांचे परस्परांतील भाषांतर प्रश्नपुस्तिकेत दिले जाणार नाही.
सूचना २- सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
सूचना ३ – उमेदवाराला राज्यसेवा पूर्वपरीक्षा पात्र ठरण्यासाठीमूल्यमापनाच्या प्रक्रियेसाठीदोन्ही पेपर अनिवार्य आहे. जर एखाद्या उमेदवाराने दोन्हीपैकी एकच पेपर दिला तर तो / ती अपात्र ठरेल.

Add caption




राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

               राज्य लोकसेवा आयोगाने पुढे होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रमाचा मसुदा वेबसाईटवर जाहीर केला आहे. त्यानुसार काही मुख्य बदल

  • यापुढे वैकल्पिक विषय नाहीत. सर्व परीक्षार्थी एकाच पातळीवर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या निर्णयाने  केले.
  • सर्व परीक्षा बहुपर्यायी विकल्प (MCQ)स्वरुपात .अपवाद मराठी आणि इंग्रजीचा : हे दोन पेपर पूर्वीप्रमाणेच दिर्घोत्तरी स्वरुपात असतील. फक्त येथे निगेटिव्ह असेल 2 चुकीच्या उत्तरान्मागे एक गुण .यामुळे दीर्घोत्तरी उत्तरांमधील व्यक्तीसापेक्ष गुणदान पद्धती बदलेल आणि अभ्यासू परीक्षार्यांना याचा  लाभच  होईल. शिवाय निकाल वेळेत लावताना आयोगालाही फारश्या सबबी देता येणार नाहीत.
  • राज्यसेवा मुख्य परीक्षेलाही नकारात्मक गुणपद्धती लागू केली आहे. त्यानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नासाठी निर्धारित केलेल्या गुणांपैकी १/३ गुण प्राप्त गुणसंख्येतून वजा केले जाणार आहेत. 
  • एवढेच नव्हे तर मुख्य परीक्षेत समाविष्ट प्रत्येक विषयात आयोगाने निर्धारित केलेली ‘पात्रता गुणसंख्या’ मिळवणे अनिवार्य झाले आहे. यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांला प्रत्येक विषयात ४५% आणि सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला ४०% गुण प्राप्त करावे लागतील. म्हणजेच अंतिमत: मुख्य परीक्षेत पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयातही किमान गुणांची कमाई करावी लागणार आहे. मगच सर्व विषयांत प्राप्त झालेल्या गुणांची बेरीज करून निकाल घोषित केला जाईल. 
  • एकूण 6  पेपर. एकूण गुण 800 (मराठी, इंग्रजी प्रत्येकी 100 गुण  आणि सामान्य अध्ययन 4 पेपर प्रत्येकी 150 गुण  ) 
  • अर्थात  पूर्वीच्या 1600 लेखी परीक्षेच्या  गुणांवरून 800 गुणांकडे जाताना आयोगाने मुलाखतीचे गुणही 100 केले आहेत.
  • म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी बनवताना 800+100=900 गुण विचारात घेतले जातील.
अ.क्र.                            विषय व पेपर                                                        गुण     
१.                                अनिवार्य मराठी                                                     १००     
२.                                अनिवार्य इंग्रजी                                                     १००
३.                  सामान्य अध्ययन पेपर १ - इतिहास व भूगोल                            १५० 
४.            सामान्य अध्ययन पेपर २ - भारतीय राज्यघटना व राजकारण             १५०
५.          सामान्य अध्ययन पेपर ३ - मानव संसाधन विकास व मानवी हक्क         १५० 
६.             सामान्य अध्ययन पेपर ४ - अर्थव्यवस्था व विज्ञान तंत्रज्ञान                १५०   


सविस्तर अभ्यासक्रम  खालीलप्रमाणे:

पेपर १ (इतिहास व भूगोल) 

इतिहास  
आधुनिक भारताचा इतिहास (विशेषत: महाराष्ट्राचा), ब्रिटीश राज्यसत्तेची भारतातील स्थापना, सामाजिक व सांस्कृतिक बदल, सामाजिक व आथिर्क जागृती,भारतीय राष्ट्रवादाचा उगम व विकास, गांधीकाळातील राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्योत्तर काळातील भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यांची विचारसरणी व कायेर्, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. 
भूगोल
(महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित)- प्राकृतिक भूगोल व भूगर्भरचना, आथिर्क भूगोल, मानवी व सामाजिक भूगोल, हवामान व मृदा, पर्यावरणीय भूगोल लोकसंख्याशास्त्रीय भूगोल, पाणी व्यवस्थापन रिमोट.

पेपर २ 
भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात) व कायदा 

भारताची राज्यघटना, राजकीय व्यवस्था, राज्य शासन व प्रशासन, जिल्हा प्रशासन, शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण व्यवस्था, राजकीय पक्ष व दबाव गट, प्रसार माध्यमे, निवडणूक प्रक्रिया, प्रशासकीय कायदा, कंेद व राज्य सरकारचे विशेषाधिकार, काही महत्त्वाचे कायदे, समाजकल्याण व सामाजिक कायदे, लोकसेवा (प्रशासकीय सेवा, निवड व प्रशिक्षण संस्था), शासकीय खर्चावरील नियंत्रण. 

पेपर ३ (मनुष्यबळ विकास व मानवी हक्क) 

भारतातील मनुष्यबळ विकास, शिक्षण, व्यवसाय शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास. तसंच, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा, बाल विकास, महिला विकास, युवक विकास,आदिवासी विकास, सामाजिकदृष्टया मागासवगीर्य घटकांचा विकास, कामगार कल्याण, वयोवृद्धांचे कल्याण, अपंग व्यक्तींचे कल्याण, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण, मूल्ये व तत्वे. 

पेपर ४ (अर्थशास्त्र व नियोजन आणि विज्ञान व तंत्रज्ञान) 

भारतीय अर्थव्यवस्था, शहरी व ग्रामीण पायाभूत विकास, उद्योग, सहकार, आथिर्क सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल हालचाल, दारिद्य मोजमाप व अंदाज, रोजगार निर्धारित करणारे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. 

विकासाचे अर्थशास्त्र - मॅक्रो अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त व वित्तीय सहकार, भारतीय उद्योग, पायाभूत सेवा व सेवाक्षेत्र. 

विज्ञान व तंत्रज्ञान : ऊर्जा, संगणक व माहिती तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण, आपत्ती व्यवस्थापन. 

लिपीक-टंकलेखक परीक्षा
राज्य शासनाच्या सेवेतील लिपिक टंकलेखक, गट-क संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात
संवर्ग : अराजपत्रित, गट - क, पदे - (एक) लिपिक टंकलेखक - मराठी (दोन)लिपिक टंकलेखक - इंग्रजी
  • महाराष्र्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस. सी.)
  • किंवा महाराष्र्ट शासनाने एस.एस.सी. शी समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता.
  • लिपिक टंकलेखक मराठी या पदासाठी - मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट
  • टंकलेखक इंग्रजी या पदासाठी - इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय
  • वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • उमेदवाराला मराठी लिहिणे, वाचणे, बोलता येणे अत्यावश्यक आहे.


परीक्षा योजना :
१ प्रश्नपत्रिका : एक. प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :-
विषय (संकेतांक 013)माध्यमदर्जाप्रश्नांची संख्याएकूण गुणकालावधीपरीक्षेचे स्वरुप
मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुध्दिमापन आणि अंकगणितइंग्रजी विषयाकिरता इंग्रजी , इंग्रजी वगळता इतर विषयांकिरता मराठीमाध्यमिक शालांत परीक्षेसमान.200400दोन तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

२ अभ्यासक्रम :
(1) मराठी- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर .
(2) इंग्रजी- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
(3) सामान्यज्ञान- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र , सामाजिक व औघोगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या,विशेषकरुन महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
(4) बुध्दिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो, हे आजमावण्यासाठी प्रश्न.
(5) अंकगिणत - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक, सरासरी आणि टक्केवारी.

पोलीस उपनिरीक्षकसहायकविक्रीकर निरीक्षक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पूर्वी पोलीस उपनिरीक्षकसहायक,विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी एकच परीक्षा घेतली जायची. २०११ सालापासून आयोगाने तीन पदांसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. तीनही पदांसाठीचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. परंतु मुख्य परीक्षेतील पेपर २ मध्ये पदांनुसार काही घटकांत बदल केले आहेत.
परीक्षेचे टप्पे : ही परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येते.
१) पूर्व परीक्षा- ३०० गुण
२) मुख्य परीक्षा- ४०० गुण
३) मुलाखत- ५० गुण

पूर्वपरीक्षेचे स्वरूप : प्रश्नपत्रिका एकच असून परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ  बहुपर्यायी असते. प्रश्नांची संख्या १५० असूनएकूण
३०० गुण असतात. परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी माध्यमात असते. परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा  शालांत परीक्षेचा असतो.

पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम :

अंकगणित- बेरीजवजाबाकीगुणाकारभागाकारसरासरीदशांशअपूर्णाक.
भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वीजगातील विभागहवामानअक्षांश-रेखांशमहाराष्ट्रातील जमिनीचे प्रकारपर्जन्यमानप्रमुख पिकेशहरेनद्या-उद्योगधंदे.
भारताचा सामान्य इतिहास- १८५७ ते १९४७
नागरिक शास्त्र व अर्थव्यवस्था- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यासराज्य व्यवस्थापन (प्रशासन)ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)भारतीय पंचवार्षिक योजनेची वैशिष्टय़े.
सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्ररसायनशास्त्रप्राणिशास्त्रवनस्पतिशास्त्रआरोग्यशास्त्र
महाराष्ट्रातील समाजसुधारक- गोपाळ गणेश आगरकरमहात्मा फुलेछत्रपती शाहू महाराज,महर्षी धोंडो केशव कर्वेडॉ. बाबासाहेब आंबेडकर.

चालू घडामोडी - देशविदेशाच्या घडामोडी

मुख्य परीक्षा

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
एकूण गुण-४००
प्रश्नपत्रिकांची संख्या- दोन
कालावधी प्रत्येकी दोन तास.
  • पेपर १ - इंग्रजी व मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रहवाक्यरचनाव्याकरणम्हणी व वाक् प्रचार यांचा अर्थ व उपयोगतसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • पेपर २ - सामान्यज्ञानबुद्धिमापन व विषयाचे ज्ञान- या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.
१) चालू घडामोडी (३० गुण) :- जागतिक तसेच भारतातील.

२) बुद्धिमत्ता चाचणी (४० गुण)- अंकगणितबेरीजवजाबाकीगुणाकारभागाकारसरासरीदशांश व अपूर्णाकतसेच बुद्धय़ांक मापनाशी संबंधित प्रश्न.

३) महाराष्ट्राचा भूगोल (३० गुण) - महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोलमुख्य रचनात्मक (Physiographic) विभागहवामानपर्जन्यमान व तापमानपर्जन्यातील विभागवार बदल,नद्यापर्वत व डोंगरराजकीय विभागप्रशासकीय विभागनैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे,मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्यास्थलांतरित लोकसंख्याव त्याचे स्रोत आणि डेस्टिनेशनवरील परिणामग्रामीण वस्त्या व तांडेझोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न.

४) माहितीचा अधिकार कायदा- २००५- (१५ गुण)

५) महाराष्ट्राचा इतिहास (१५ गुण) - सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७)महत्त्वाच्या व्यक्तीचे कामस्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भागस्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी (सत्यशोधक समाजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळहिंदू महासभामुस्लीम लीगराष्ट्रीय क्रांती चळवळडावी विचारसरणी/कम्युनिस्ट चळवळशेतकरी चळवळआदिवासींचा उठाव.)

६) भारतीय राज्यघटना (२० गुण) - घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वेघटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्टय़ेकेंद्र व राज्य संबंधनिधर्मी राज्यमूलभूत हक्क व कर्तव्येराज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षणयुनिफॉर्म सिव्हील कोडस्वतंत्र न्यायपालिकाराज्यपालमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ- भूमिकाअधिकार व कार्यराज्य विधिमंडळ- विधानसभाविधान परिषद व त्यांचे सदस्यअधिकारकार्य व भूमिकाविधी समित्या.

७) संगणक व माहिती तंत्रज्ञान (५० गुण) - आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका,वेगवेगळ्या क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापरडाटा कम्युनिकेशननेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजीसायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंधनवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोगभारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जाशासनाचे कार्यक्रमजसे मीडिया लॅब एशियाविद्या वाहिनीज्ञान वाहिनीसामूहिक माहिती केंद्र इत्यादीमाहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

वरील माहिती ही दिनेश कुर्हेकर यांच्या www.sarkarinokariaditya.blogspot.in या वेबसाईट वरून घेण्यात आली आहे.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...