विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

व्यावसायिक कौशल्य आणि युक्त्या

यशस्वी व्यावसायिक व्हायचं असेल तर त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांबरोबर आत्मविश्वास जोखीम पेलण्याची तयारी आणि वाटाघाटीचं कौशल्यही हवंच. त्याविषयी थोडंसं... 

व्यवसाय सुरु करून तो यशस्वी करण्यासाठी उद्योजकाकडे बाजारपेठेच्या माहितीबरोबरच आणखी काही कौशल्यं असणं जरुरीचं असते. ही कौशल्य अनुभवातूनच जास्त आत्मलसात करता येतात. 

इंटरपर्सनल स्किल्स 

व्यवसाय म्हटला की लोकांशी संबंध आलाच. त्यामुळे तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडतो की नाही हे तपासा. तुम्ही लोकांशी कशाप्रकारे वागता यावर तुचमं यश अवलंबून असते. स्पर्धेच्या युगात कस्टमर सर्व्हिस हा तुमचा वेगळेपणा ठरू शकतो. पण पेशन्स हवाच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐकून घेण्याची कला असायला हवी. संभाषण म्हणजे फक्त स्वतःचं बोलणं दुसऱ्याला ऐकवणं नव्हे. तर दुसऱ्याचं बोलणं स्वतः ऐकून घेणं असतं. 

अडचणी सोडवण्याची कला 

व्यवसाय उभा करताना रोज लहान-मोठ्या अडचणी येतच असतात. पण यशस्वी व्हायचं तर या साऱ्यावर मात करायला हवी. त्यासाठी आत्मविश्वास आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाणवायला हवी. तुमचे इतरांशी असलेले चांगले-वाइट संबंधही अशावेळी कामाला येतात. 

आर्थिक कौशल्य 

व्यवसाय यशस्वी आहे की नाही हे अंतिमतः गल्ल्यावरच्या रकमेवरुनच मोजलं जातं. आर्थिक बाजू पहिल सांभाळली पाहिजे. दररोजचे व्यवहार व्यवस्थापकीय खर्च बेसिक अकौटिंग टॅक्सेशन आवश्यक सरकारी माहिती आणि ज्या व्यवसायात पडणार त्याची संपूर्ण आणि सखोल माहिती ठेवणं आवश्यक आहे. वेगवेगळे कोर्सेसतज्ज्ञ व्यक्ती आणि इंटरनेटवरूनही अशी माहिती मिळवता येते. 

टेक्निकल स्किल्स 

कुठलाही व्यवसाय करताना त्याची पूर्ण माहिती हवीच. सुरूवातीला तशी नसली तरी नंतर नंतर अनुभवातून आणि तज्ज्ञांकडून किंवा पुस्तक आणि इतर सोर्सेसकडून तुम्ही ती मिळवणं गरजेचंच आहे. विनामाहिती काम करत असलात तर ते तुमच्या ग्राहकासाठी आणि अंतिमतः व्यवसायासाठी फायद्याचं नाही. अपडेटेड टेक्नॉलॉजीची माहितीही ठेवायला हवी. 

सेल्स आणि मार्केटिंग 

जेव्हा एखादा यशस्वी उद्योगपती त्याच्या व्यवसायासंबंधी बोलतो तेव्हा ते आपल्याला ऐकावंसं वाटतं कारण आपण त्या कंपनीच्या सर्वात प्रभावी सेल्समनकडून अर्थात मालकाकडून ते ऐकत असतो. तुमच्या व्यवसायाविषयक काही असे मुद्दे काढून ठेवा की ज्याचा उपयोग कोणत्याही संभाषणाद्वारे उद्योग वाढीसाठी होऊ शकतो. मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नव्हे तर तुमच्या ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांना तुमच्या व्यवसायाविषयक माहिती देण्यासाठी वापरलेले अनेक प्रभावी मार्ग. यासाठी ग्राहकांची व मार्केटची सखोल माहिती हवी. याचबरोबर तुमचे प्रतिस्पर्धी कोणत्या प्रकारे मार्केटिंग करतात ते प्रभावी आहे का याचा अभ्यास करून त्यातील काही मार्ग आपल्या व्यवसायात वापरू शकता. पण कोणाकडेही बाजारात नक्की काय चालेल हे सांगणारी जादूची छडी नाही.

मेधा ताडपत्रीकर

अपंगांसाठी जॉब पोर्टल


 http://www.firstpost.com/wp-content/uploads/2013/12/Jobsite.jpg
अपंगाना रोजगाराची समान संधी मिळवून देणारे  ciispecialabilityjobs.in  हे जॉब पोर्टल 'सीआयआय आणि मॉन्स्टर डॉट कॉम यांनी एकत्रितपणे सुरू केले असून सीएसआर अॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. कुठल्या उद्योगात काम करायचे आहे, कुठे करायचे आहे, अगदी देशाबाहेरही, कुठल्या विभागात काम करायचे याबाबतची वर्गवारी या बेवसाइटवर असून त्यानुसार अपंगांना रोजगार शोधता येईल. रोजगार शोधणाऱ्यांनी आणि त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनी रजिस्टर करणे गरजेचे असून त्याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. 


हि माहिती महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झाली आहे 

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...