विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

MPSC - बुद्धिमत्ता चाचणी - Intelligence Test


दोनशे प्रश्ना पैकी पन्नास प्रश्ना ह्या घटकासाठी असल्याने हा घटक खुप महत्वाचा आहे.हा चाचणी घटक चांगली तयारी केल्यास स्कोरिंग साठी सुद्धा महत्वाचा आहे. ह्या घटकामध्ये सर्व सामान्य विद्यार्थी हि भरपूर सरावाच्या आधारे ५० पैकी ४७ पेक्षाही अधिक गुण मिळवू शकतो.

पूर्व परीक्षेच्या यशामध्ये बुद्धिमापन चाचणी घटक खूपच महत्वाची भूमिका बजावू शकतो. अर्थात या साठी भरपूर सराव आणि वेळेचे काटेकोर व्यवस्थापन खूपच महत्वाचे आहे. कारण पन्नास प्रश्ना कमीतकमी वेळेत आणि अचूकपणे सोद्विण्यावारच यात प्राप्त होणारे गुण अवलंबून आहेत. योग्य सर्व द्वारेच अचूकता आणि वेग वाढविता येतो.
अक्षरमाले वर सहसंबंध, न जुळणारा अक्षरगट यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. अक्षरमाले वर आधारित प्रश्न सोडविताना अक्षराचा क्रम कशा पद्धतीने निश्चित केलेला आहे याचा उदाहरणामधील प्रत्यक्ष संबंध उमेदवाराने समजावून घेणे खूपच आवश्यक आहे. सतत सर्व द्वारे ह्या प्रकारच्या प्रश्नांचे गुण मिळविता येतात. परंतु वेगवेगळे नमुने अभ्यासून विद्यार्थ्याने ह्या उप घटकात पारंगतता मिळविल्यास चांगले गुण प्राप्त करता येवू शकतात.


संख्या श्रेणीवरील प्रश्नांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मूळ संख्या, वर्ग,वर्गमूळ, घन,घनमूळ, त्यांच्या श्रेण्या ह्या बाबी माहिती असणे आवश्यक ठरते. या संदर्भात वर्ग,वर्गमूळ, घन,घनमूळ, या बाबींचे पाठांतर अत्यंत महत्वपूर्ण ठरते. वेगाने गणिती क्रिया करूनच संख्या श्रेणीवरील उदाहरणे सोडविता येतात. सरावा द्वारे विविध नमुन्यावरील उदाहरणे सोडविल्यास अचूकता आणि वेग वाढण्यास खूपच मदद मिळते.

वेन आकृत्या, विसंगती आकृती गट, आक्रूत्यान वरील सहसंबंध, वय ,दिशा ,वेळ , तर्क , आणि अनुमान, टक्केवारी इत्यादी घटकांवर देखील प्रश्न विचारले जातात. अश्या प्रश्नांचा सराव करून यात गती प्राप्त करता येते.
अश्या रीतीने बुद्धिमापन चाचणी घटका बाबत विपुल उदाहरणाचा आणि प्रश्न पत्रिकेचा सराव बुद्धिमत्ता चाचणी घटकाच्या दृष्टीने अचूकता आणि वेळेचे व्यवस्थापन ह्यांच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...