विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

MPSC : PSI/STI/ASST


पोलीस उप- निरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/सहायक

प्रस्तावना

एमपीएससीची दुसरी महत्वाची स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/असिस्टंट ही होय. या तीनही पदांची संख्या मोठी असते बसणार्‍यांची संख्याही खुप मोठी असते. त्याचे कारण म्हणजे पदांची वाढती संख्या आणि प्रश्नपत्रिकांचे सोपे स्वरूप. आणखी एक कारण म्हणजे पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ असतात. शिवाय ती आधिक सोपी अशी असते.

पदसंख्या

यांची पदांची संख्या मागणीनुसार असली तरी तुलनेत तिन्ही पदे मोठया संख्येने भरली जातात. पदांचा तपशील जाहिरातीच्या मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेत देण्यात येतो.
जाहिरात कधी येते-प्रतिवर्षी ही जाहिरात साधारणपणे मे- जून महिन्यात येते. मात्र अलिकडे अशा ठराविक महिन्यात जाहिरात येतेच असे नव्हे,

पात्रता

तिन्ही पदांसाठी पदवी किंवा पदवीस बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. मात्र यासाठी कोणत्याही टक्केवारीचीकवारीची अट नसते.

शारीरिक पात्रता

पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी – पुरूष १) उंची १६२ सेंमी. २) छाती ७९-८४ सेंमीमहिला उंची १५७ सेंमी आणि वजन ४५ कि. ग्रॅ. लागते विक्रीकर निरिक्षक आणि असिस्टंट पदांसाठी. कोणतीही शारीरिक पात्रतेची अट नसते.
वयोमर्यादा १. पोलीस उप- निरीक्षक – जाहिरातीत दिलेल्या तारखेस १९ ते २८ पर्यंत (मागासवर्गाकरिता ३५ पर्यंत) तर २)सहाय्यक/विक्रीकर निरीक्षक- १८-३० पर्यंत (मागासवर्गाकरिता ३५ पर्यंत) लागते. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादाप फक्त ३ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहते. ३) फक्त सहाय्यक/ विक्रीकर निरीक्षक पदांसाठी : अ) दारूबंदी कायद्यामुळे प्रतिकुल परिणाम झालेल्या कुटूंबातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादा लागू नसते. ब) अपंग व्यक्तींच्या बाबतीत दहा वर्षापर्यत शिथिलक्षम असते. क) सैनिकी कारवाईत ठार झालेल्या संरक्षण सेवेतील कर्मचारी वर्गाच्या प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य किंवा जवळच्या नातेवाईक जो अशा कुटूंबाचा भार उचलण्याची हमी देईल अशांच्या बाबतीत ३ वर्षांपर्यंत शिथिलक्षम असते. ड) राष्ट्रीय छात्र सैनिक दलांत किमान सहा महिने सलग सेवा पूर्ण झालेल्या पूर्णवेळ छात्रसैनिक निदेशासाठी राष्ट्रीय छात्रसैनिक दलातून सेवामुक्तं झाल्यावर राष्ट्रीय सैनिक दलात केलेल्या सेवेचा कालावधी इतकाकाळ इतकी सवलत असते. इ) संरक्षण दलाकडून अपंग असल्याबद्दलचा दाखला मिळालेल्या अपंग माजी सैनिकांकरिता ४५ वर्षापर्यंत सवलत असते. ब) संरक्षण दलात अ‍ॅटेस्टेशन झाल्यानंतर किमान ६ महिने सलग सेवा पूर्ण झालेल्या पात्र माजी सैनिकांकरीता संरक्षण दलातील सलग सेवेचा कालावधी अधिक २ वर्षांपर्यंत.

निवड पध्दत

या पदाची निवड पूर्वमुख्य आणि मुलाखत या तीन स्तरावर होते. मात्र पोलीस उपनिरीक्षक या पदाची निवड पूर्व. मुख्य शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत अशा चार स्तरावरून होते.

पूर्व परीक्षा

अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची प्रथम पूर्व परीक्षा घेतली जाते. ही लेखी परीक्षा असून तिन्ही पदांसाठी एकच लेखी परीक्षा असते. ही पूर्व परीक्षा प्रतिवर्षी साधारणपणे ऑगस्ट महिन्यात घेण्यात येते. ( उपवादात्मक प्रसंगी पूर्व परीखेचे वेळापत्रक बदलू शकते.) पूर्व परीक्षेत एकच प्रश्नपत्रिक असते. ही प्रश्नपत्रिका सामान्य अध्ययन या एकाच विषयाची ३०० गुणांची आणि १५० प्रश्नांची असते. प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीतून असते. ती कोणत्याही एका माध्यमातून सोडविता येते. प्रश्नपत्रिकेचा कालावधी दीड तासांचा असून दर्जा १० वीचा असतो.

पूर्वचे गुण

या तिन्ही पदांसाठी सुमारे सव्वा ते दीड लाख उमेदवार अर्ज करतात. पूर्व परीखेत उत्तीर्ण होण्यासाठी कमीतकमी ठराविक गुण मिळाले पाहिजेत. अशी कोणतीही अट नसते मात्र सर्वसाधारणपणे ज्या उमेदवारांना ३०० पैकी २६४-६६ गुण मिळतात अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेत प्रवेश मिळतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. या पूर्व परीखेचे गुण अंतिम यादीत धरले तरी मुख्य परीक्षेसाठी ज्या उमेदवारांना प्रवेश मिळवायचा आहे त्यांना असे गुण मिळणे आवश्यक असते.

पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम – अंकगणित

१) बेरीज२) वजाबाकी३) गुणाकार४) भागाकार५) सरासरी६) दशांश अपूर्णांकभूगोल- (महाराष्ट्र्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह ) पृथ्वीजगातील विभाग हवामानअक्षाश- रेखांशमहाराष्ट्र्रातील जमिनीचे प्रकारपर्जन्यमानप्रमुख पिकेशहरेनद्याउद्योगधंदेभारताचा सामान्य इतिहास – सन १८५७ ते १९४७ नागरिकशास्त्र आणि अर्थ व्यवस्या भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यासराज्य व्यवस्थापन,(पंचायत राजसह) भारतीय पंचवार्षिक योजनांची ठळक वैशिष्ठभ्ये सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्ररसायनशास्त्र,प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्रआरोग्यशास्त्र महाराष्ट्र्रातील समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरमहात्मा फुलेशाहू महाराजधोंडो केशव कर्वेडॉ. बाबासाहेब आंबेडकरचालू घडामेडी – जगातील तसेच भारतातील

परीक्षा शुल्क

उमेदवारांना अर्जासोबत जाहिरातीत दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क जोडावे लागते. उन्नत व प्रगत गट (च्रएम्य् लय्एर) वगळून मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही परीक्षा शुल्क निम्मे असते. हे शुल्क महाराष्ट्र्र राज्याचे कोर्ट फी स्टॅंपच्या स्वरूपात भरणे आवश्यक असते. हे स्टॅंप त्यावर स्वत:चे नाव व ठिकाण लिहून अर्जावर नमूद केलेल्या जागी अर्जावरून निघणार नाहीत अशाप्रकारे घट्ट चिकटवावे लागतात. मात्र महाराष्ट्र्र राज्याच्या बाहेर राहणा-या उमेदवारांच्या बाबतीत किंवा अत्यंत अपवादात्मक प्रकरणी अर्जाचे शुल्क सचिवमहाराष्ट्र्र लोकसेवा आयोगमुंबई’ यांच्या नावाने रेखीत केलेल्या इंडियन पोस्टल ऑर्ंडरच्या स्वरूपात पाठवता येते,माजी सैनिकांना शुल्क भरणे आवश्यक नसते.

पूर्व परीक्षा केंद्रे

अहमदनगरअकोलाअलिबागअमरावतीऔरंगाबादबीडभंडारामुंबई, (मध्य)मुंबई (पश्चिम),बुलढाणा,चुद्रपूरधुळेगडचिरोलीजळगावजालनाकोल्हापूर,कुडाळलातूरनागपूरनांदेडउस्मानाबादपरभणी,पुणेरत्नागिरीसांगलीसातारासोलापूरठाणेवर्धायवतमाळ याप्रमाणे आहेत.

२) मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षेचा निकाल परीक्षेनंतर सुमारे ६० दिवसात संबंधित परीखा केंद्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लागतो. यशस्वी उमेदवारांना निकाल घरीही कळविला जातो. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची मुख्य परीक्षा साधारणपणे ऑक्टोबरमध्ये घेण्यात येते.
मुख्य परीक्षेचे विषय मुख्य परीक्षा ही पूर्णत: वस्तुनिष्ठ वहुपर्यायी पध्दतीची असून मराठी व इंग्रजीचा एक तसेच बुध्दिमत्ता व सामान्य अध्ययनाचा एक असे दोन पेपर्स असतात. प्रत्येक पेपर २०० गुणांचा म्हणजे मुख्यचे एकूण गुण ४०० असतात हे दोन्ही पेपर्स सक्तीचे असतात.दोन्ही पेपर्स वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.

गुण विभागणी

पहिल्या पेपरमधील पहिला विभाग मराठीचा असून त्यास १३० गुण असतातत्याचा स्तर बारावीचा असतो. दुसरा विभाग इंग्रजीचा असून त्यास ७० गुण असतात त्याचा स्तर पदवीचा असतो. सामान्यज्ञान आणि बुध्दिमत्ता यांचे लिहिण्याचे माध्यम इंग्रजी किंवा मराठी असे असते. दोन्ही प्रश्नपत्रिकांचा वेळ प्रत्येकी दोन तासांचा असतो.

प्रश्नपत्रिका १

अ) मराठीचा अभ्यासक्रम – उता-यावरील प्रश्नव्याकरणपत्रलेखनावरी प्रश्न व्याकरणपत्रलेखनावरील प्रश्न,समानार्थी – विरूध्दार्थी शब्दअलंकारम्हणी व वाक्यप्रचारकठीण शब्दांचे अर्थसंधी व समासयोग्य शब्दांचा वापरप्रयोग व विभक्तीशब्द समूहलिंग व वचनस्वर व व्यंजने शब्दांचे एकापेक्षा अधिक अर्थ ब) इंग्रजीचा अभ्यासक्रम- उता-यावरील प्रश्न विरूध्दार्थी- समानार्थी शब्दचुकीचे वाक्यशब्दयोगी अव्यय,अनेक शब्दास एक शब्दवाक्यप्रचार आणि म्हणी मोकळया जागा भराशब्दांच्या जातीकाळपायाभूत व्याकरणचुकीचे स्पेलिंगजवळचा अर्थ इत्यादींवर प्रश्न विचारले जातात.

प्रश्नपत्रिका दोन

अ) सामान्य ज्ञान- १) कला क) भारताचा आधुनिक इतिहास ख) भारताचा विशेषत: महाराष्ट्र्राचा भूगोलग) ग्राम प्रशासन २) विज्ञान शाखा- क) प्राथमिक सांख्यकी आधारसामग्रीची पृथ:करण ख) जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगतीग) वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रमीण जीवनावर झालेला परिणाम.
३) वाणिज्य व अर्थशास्त्र शाखा-क) भारतीय अर्थव्यस्था राष्ट्रीय उत्पन्न शेतीउद्योगपरकीय व्यापार,बॅंकींगलोकसंख्या दारिद्रय व बेरोजगारीमुद्रा आणि राजकोषिय नीती इत्यादीख) पंचवार्षिक योजना- भारताच्या विशेषत: महाराष्ट्र्राच्या ग) शासकीय अर्थव्यवस्था-अर्थसंकल्पलेखालेखापरीक्षण इ. ४) कृषि शाखा- क) जमिनीचा वापरप्रमुख पिके जलसिंचनपशुसंवर्धन व दुग्धव्यवसायफलोत्पादनवनविकास,मत्स्यव्यवसाय ख) कृषि अर्थशास्त्र ५) जागतिक तसेच भारतातील तसेच भारतातील चालू घडामोडी- राजकीय औद्योगिकआर्थिकसामाजिकशैक्षणिकभौगोलीकखगोलशास्त्रीयसांस्कृतिकवैज्ञानिक इत्यादी. ब) बौध्दिक चाचणी बुध्दिमापन चाचणीचा दर्जा उच्च दर्जाचा नसला तरी सर्व साधारणपणे आकलन यावर सर्व गोष्टी केंदि्रभूत असतात. यात आकलन व समान संबंधवर्गीकरण व सांकेतिक भाषाक्रम व वर्ण व संख्याअंकगणित र्तक व अनुमान इसमावेश असतो.

मुख्य परीक्षा केंद्रे

औरंगाबादमुंबईनागपूरपूणे अशी आहेत,

३) शारीरिक चाचणी

मुख्य परीक्षेत उतीर्ण होणा-या उमेदवारांनी पोलीस उपनिरीक्षकासाठी प्राधान्य दिले असेल तर उमेदवारांची मुख्य परीक्षा यशस्वी झाल्यानंतर त्याची शारीरिक चाचणी घेण्यात येते. ही चाचणीमहिला/पुरूष यांच्याकरिता खालीलप्रमाणे वेगवेगळी असते. त्यासाठी एकुण गुण २०० असतात. पुरूष व महिला उमेदवारांना शारीरिक चाचणीत किमान १०० गुण मिळविणे आवश्यक असते. असे गुण मिळविणा-या उमेदवारांच्या ७५ गुणांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी गुणवत्तेनुसार अंतिम निवड होते.

पुरूष उमेदवार

शारीरिक क्षमता चाचणी.

१) गोळाफेक

उमेदवारास १६ पौंड वजनाचा गोळा फेकावा लागतो. या गोळाफेकीची गुणविभागणी पुढीलप्रमाणे असते. १) ७.५० मीटर फेक किंवा जास्त- ३० गुण२) ७.०० मीटर फेक ते ७.५०-२५ गुण. ३) ६.५० मीटर फेक ते ७.२० गुण ४) ६.०० मीटर फेक ते ६.५० १५ गुण५) ५.५० मीटर फेक ते ६.००-१० गुण६) ५.०० मीटर फेक ते ५.५०-५ गुण७) ५.०० मीटर पेक्षा कमी ० गुण)

२) लांब उडी

गुणविभागणी पुढीलप्रमाणे असते. उडीचे अंतर मीटर्समध्ये असते. १) ४.५० मीटर किंवा जास्त ३० गुण२) ४.३५ ते ४.५० मीटर २८ गुण३) ४.२० ते ४.३५ मीटर २४ गुण४) ३.९० ते ४.२० मीटर २० गुण५) ३.६० ते ३.९० मीटर १६ गुण६) ३.३० ते ३.६० मीटर १२ गुण७) ३.०० ते ३.३० मीटर ०८८) २.५० ते ३.०० मीटर ०४ गुण९) २.५० मीटरपेक्षा कमी ०० गुण,

३) धावणे

उमेदवारास ८०० मीटर म्हणजे अर्धा मैल धावावे लागते. गुण विभागणी याप्रमाणे असते. १) २.३० मिनिटे किंवा कमी १०० गुण२) २.३० ते २.४० मिनिटे ८८ गुण३) २.४० त२.३५ मिनिटे७५ गुण४) २.५० ते ३.०० मिनिटे ६२ गुण५) ३.०० ते ३.१० मिनिटे ५० गुण६) ३.१० ते ३.२० मिनिटे ३८ गुण७) ३.२० ते ३.३० मिनिटे २५ गुण८) ३.३० पेक्षा जास्त मिनिटे ०० गुण,

४) पुलअप्स्

क्षितिज समांतर पध्दतीने उमेदवारास आठ पुलअप्स काढावे लागतात. त्यासाठी ४० गुण असतात. याचा अर्थ एका पुलअप्सला ५ गुण असतात. अशा तर्‍हेने शारीरिक चाचणीस गोळाफेक ३० गुण + लांब उडी ३० गुण + धावणे १०० गुण + पुलअप्स ४० गुण = २०० गुण असतात.
महिला उमेदवार – शारीरिक चाचणी १) गोळाफेक (४ कि.ग्रॅ)२) धावणे (२०० मीटर्स)३ चालणे (३ कि.मी)

४) मुलाखत

(सहाय्यकांव्यतिरिक्त) मुख्य परीक्षेस अर्ज करताना प्राधान्य क्रम दिलेला असतो. अ) विक्रीकर निरीक्षक पदांकरिता कोणतीही शारीरिक पात्रता चाचणी नसते. त्यासाठी फक्त मुलाखती घेतल्या जातात. त्यास ५० गुण असतात ब) पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीस ७५ गुण असतात. मात्र सहाय्यक पदाची निवड केवळ लेखी परीक्षेवर होते त्यासाठी मुलाखत नसते. १) पी.एस.आय. मुलाखत : प्राधान्य – मुलाखतीच्या ७५ गुणांपैकी १० गुण अ) क्रीडास्पर्धेत फक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले असेल तरब) एन.सी.सी. बीकिंवा सी’ प्रमाणपत्रधारकक) चार चाकी मोटार. वाहन परवानाधारकड ) चिनीजपानी किंवा आशिया/ युरोपमध्ये/(इंग्रजीव्यतिरिक्त) बोलल्या लिहिल्या जाणा-या भाषा यासाठी दिले जातात.

अंतिम यादी:

अंतिम यादी तयार करताना अ) पोलीस उपनिरीक्षक मुख्यत्वे ४०० गुण+शारीरिक चाचणीचे २०० गुण+मुलाखतीचे ७५ गुण अशा एकूण ६७५ गुणांच्या परीक्षेच्या आधारे निवड केली जाते. ब) विक्रीकर निरीक्षक मुख्यचे ४०० गुण+ मुलाखतीचे ५०० गुण अशा एकूण ४५० गुणांच्या परीक्षेच्या आधारे निवड केली जाते. क) सहाय्यक – मुख्यचे ४०० गुण या आधारेच निवड केली जाते.

पसंती क्रम

उमेदवारांना त्यांच्या मुख्य परीक्षेच्या अर्जात तिन्ही पदांसाठी पसंतीक्रम द्यावा लागतोतो विचारात घेऊन,पदसंख्या व आरक्षणानुसार गुणवत्ता क्रम लावूनतिन्ही पदांपैकी केवळ एकाच पदाच्या शिफारशीसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येते.

वेतनश्रेणी

तिन्ही पदांसाठी एकच वेतनश्रेणी असून ती रू. ५,५००-१७५-९०० अधिक भत्ते अशी असतेयाशिवाय महाराष्ट्र्र शासनाच्या सर्व सोई सवलती भत्ते प्रदान होतात.

अर्ज करण्याची पध्दत

सहाय्यक/विक्रीकर निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी पात्र असलेले पुरूष व महिला उमेदवार एकच अर्ज करू शकतात. अर्जावर दिलेल्या ठिकाणी औळखपत्राच्या आकाराचा फोटो चिकटविणे आवश्यक असते. तसेच अर्जावर दिलेल्या ठिकाणी योग्य ते परीक्षा शुल्क चिकटवलेले असले पाहिजे. अर्ज पाठविताना त्यावरील लिफाफ्यावर सहाय्यक/विक्रीकरनिरीक्षक/पोलीस उपनिरीखक संयुक्त (पूर्व) परीक्षा करिता अर्ज असे स्पष्ट लिहावे लागते.

अर्ज करण्याचा पत्ता

उपसचिव व परीक्षा नियंत्रकमहाराष्ट्र्र लोकसेवा आयोग, (कक्ष क्र ९०४) विक्रीकर भवन९ वा मजला,सरदार बलवंतसिंह दोधी मार्गमाझगावमुंबई- ४०००१०

अर्ज करण्याची अंतिम मुदत

जाहिरात आल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज पाठवावा लागतो.

लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम

लेखी परीक्षेत एकूण ६ विषय असतात. त्यापैकी ४ विषय सक्तीचे तर दोन वैकल्पिक विषय असतात. अ) सक्तीचे विषय – सक्तीच्या प्रत्येक विषयास प्रत्येकी २०० गुण असतील. मराठीइंग्रजीसामान्य अध्ययन १ आणि सामान्य अध्ययन २ असे ते सक्तीचे विषय आहेत. अशा त-हेने सक्तीच्या विषयांना एकूण ८०० गुण झाले आहेत. या प्रत्येकास प्रश्न सोडविण्याचा कालावधी ३ तासांचाच असेल ) वैकल्पिक विषय- खालील विषयापैकी कोणतेही दोन विषय (इंग्रजी वाड्:मयहिंदी वाड्:मयमराठी संस्कृत वाड्:मय यापैकी एकापेक्षा जास्त विषय नसावेत) प्रथ्येक विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका असून प्रत्येक प्रश्नपत्रिकेस आता २०० गुण असतील व प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा कालावधी ३ तासांचा असेल.

वैकल्पिक विषय

पूर्वी एकूण वैकल्पिक विषय २७ इतके होते. आता वैकल्पिक विषयांची संख्या ३४ इतकी झाली आहे. उमेदवार खालील वैकल्पिक विषयापैकी कोणतेही दोन विषय निवडू शकतो.
१) कृषी२) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय३) उद्यान विद्या४) कॉमर्स अ‍ॅंड अकौंटन्सी५) अर्थशास्त्र६) इंग्रजी वाड्:मय७) भूगोल८) हिंदी वाड्:मय ९) इतिहास १०) मराठी वाड्:मय ११) तत्वज्ञाम्प्;ाान१२) पोलिटीकल सायन्स अ‍ॅण्ड इंटरनॅशनल रिलेशन्स१३) मानसशास्त्र१४) संस्कृत वाड्:मय१५) समाजशास्त्र,१६) रसायनशास्त्र१७) उर्दू वाड्:मय१८)विधि१९) वनस्पतीशास्त्र२०)सिव्हील इंजिनियरींग२१) कॉम्प्युटर सायन्स. २२) इलेक्ट्रीकल इंजि. २३) इलेक्ट्रॉनिक्स इंजि. २४) होम सायन्स२५) मॅनेजमेंट. २६) मेकॅनिकल इंजि. २७)मेडिकल सायन्स२८) भूशास्त्र२९) गणित३०) सूक्ष्मजीवशास्त्र ३१) भौतिकशास्त्र ३२) साख्यिकी,३३) प्राणिशास्त्र ३४) अ‍ॅग्रीकल्चरल इंजि.

उत्तरांची भाषा

भाषा विषयक तसेच विज्ञान शाखेचे विषय वगळता उमेदवारांना इतर सर्व विषय मराठी किंवा इंग्रजीमधून लिहिता येतात.

मुख्य परीक्षेचा स्तर

अ) सक्तीचे मराठी दर्जा १० वी परीक्षेचा उमेदवारांची वाचण्याचीसमजून घेण्याचीकल्पना स्पष्टपणे व्यक्त करण्याची क्षमता पाहणे हा उद्देश येथे असतो. ब) सक्तीचे इंग्रजी – दर्जा १२ वी परीखेचा असतो. क) सामान्य अध्ययन – दर्जा पदवी परीक्षेचा असतोड) वैकल्पिक विषय- दर्जा पदवी परीक्षेचा असतो.

मुख्य परीखेचा स्तर

मुख्यचा निकाल परीखा झाल्यानंतर साधारणपणे तीन ते साडेतीन महिन्यात लागतो. यासाठी कमीतकमी टक्केवारीची अट नसते. मागील अनुभव लक्षात घेता ज्यांना ६० टक्के च्या दम्यान गुण मिळतात असे उमेदवार मुलाखतीस पात्र ठरतात असे दिसतेमुख्य परीक्षेचा यशस्वीउमेदवार मुलाखतीस पात्र ठरतात असे दिसते मुख्य परीक्षेचा यशस्वी उमेदवारांचा निकाल त्यांना घरी कळविला जातो. तसेच वैशिष्टय म्हणजे जे उमेदवार मुख्यच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांनाही त्यांच्या गुणांचा गुणतक्ता घरी कळविला जातो. असे उमेदवार आपल्या गुणांचा फेर चाचणीसाठी विशिष्ट मुदतीत आणि विशिष्टि फी भरून आपल्या गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती करू शकतात. मुख्य परीक्षेची वैशिष्टय म्हणजे मराठी इंग्रजीसह सर्व गुण अंतिम गुणवत्त यादीसाठी घेतले जातात.

मुलाखत

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणा-या उमेदवारांना २०० गुणांच्या मुलाखतीसाठी बोलविले जाते. याद्वारे उमेदवारांची योग्यता तपासणेयामध्ये त्यांच्या बौध्दिकसामाजिकनैतिक वैशिष्टयांसह व्यक्तिमत्वाची समीक्षात्मक आत्मसात करण्याची शक्तीस्पष्ट व तार्किक स्पष्टीकरण निर्णयशक्तीहेतूविषयी वैविध्य व सखोलता यांचा समावेश असतो चालू घडामोडी व जनरल नॉलेजसह उमेदवाराचा सर्वसामान्य कलशरिरयष्टीव्यक्तिमत्व यांकडे विशेष लक्ष पुरविण्यात येते. मुलाखतीसाठी उमेदवारांना मुख्यचा निकाल लागतातच लगेचच मार्च एप्रिलमध्ये बोलविले जाते.

शारीरिक पात्रता चाचणी

डीवायएसपी/ असिस्टंट पोलीस कमिशनर गट-अ(महिला) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट-ब (पुरूष) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी-गट ब (महिला)डीवायएसपी/असिस्टंट पोलीस कमिशनर गट-ब (पुरूष व महिला)सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट – अ (पुरूष व महिला)उपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब (महिला) पदांसाठी शारीरिक पात्रता चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागते.

अंतिम निकाल

मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचे गुण एकत्र करून उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. ज्या पदांसाठी शारिरीक पात्रता आवश्यक आहे त्यांची फक्त ती पात्रता तपासली जाते. जितक्या पदांची आवश्यकता आहे तितक्या पदांपर्यंत गुणवत्ता यादी येते.

प्रशिक्षण-

१)डीवायएसपी/असिस्टंट पोलीस कमिशनर

निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर सैनिकी रेजिमेंट केंद्रामध्ये दोन आठवडयांचे प्रशिक्षण दिले जाते. यानंतर त्याला कोणत्याही जिल्हयांमध्ये साडेचौदा महिन्यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी जावे लागते. साधारणपणे दोन वर्ष आणि तीन महिने या कालावधीमध्ये तो प्रोंबेशनवर आहे असे समजण्यात येते या कालावधीत उमेदवारास विहित केलेल्या कायदाभाषाकवायतपोलीस कायदेविषयक नियम पुस्तिका आणि पोलीस विषयक किरकोळ बाबी या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. त्याचप्रमाणे पोलीस महानिरिक्षक यांचे स्थायी आदेशाबाबत तसेच पोलीस महानिरिक्षक यांचेकडून वेळोवेळी विहित केल्या जाणा-या चाचणी परीक्षासुध्दा उमेदवारास उत्तीर्ण कराव्या लागतात. त्यानंतर त्यांची सुयुक्त संवर्गातील पदावर नियुक्ती केली जाते.

२) तहसीलदार गट-अ

निवड झालेल्या उमेदवारास प्रोबेशन काळात शासनाने विहित केलेले प्रशिक्षण घ्यावे लागते.

३) मुख्याधिकारी (चीफ ऑफिसर)

नगरपालिका / परिषद गट-ब-निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. कायम होण्यासाठी शासनाने विहित केलेली परिक्षा उत्तीर्ण होण आवश्यक आहे. प्रोबेशन काळात विहित परीक्षा उतीर्ण होण्यासाठी उमेदवारांना दोन संधी दिल्या जातात.

४) तालुका निरीक्षक भूमि अभिलेख-गट-ब

निवड झालेल्या उमेदवारास प्रोबेशन काळात प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो आणि नियमानुसार भूमि अभिलेख र्अहता परीक्षा परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

५) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब

प्रोबेशनमध्ये शासनाने विहित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रम व चाचणी परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागताततसेच नियुक्तीपासून सहा महिने कालावधीत त्यास स्वखर्चाने जड वाहन चालविण्याचा वैद्य परवाना प्राप्त करावा लागतो.
याशिवाय विक्रीकर अधिकारी गट- अउपमुख्य कार्यकारी अधिकारी गट-अ गटवकास अधिकारी उच्च श्रेणी गट-अ मुख्याधिकारी नगरपालिका/परिषदमहाराष्ट्र्र वित्त व लेखा सेवा गट-अ उपनिबंधक सहकारी संस्था-गट-अगटविकास अधिकारी कनिष्ठ श्रेणी गट-ब सहाय्यक निबंधकसहकारी संस्था गट-बकक्ष अधिकारी-गट-ब महाराष्ट्र्र वित्त व लेखा सेवा गट-बउपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-बपदांनाही वरीलप्रमाणेच विशिष्ट प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
वेतनश्रेणी १) उपजिल्हाधिकारी (डेप्युटी कलेक्टर) श्रेणी-अ परिविक्षाधीन (प्रोबेशन) कालच्या पहिल्या वर्षामध्ये दरमहा रूपये ८.००० आणि तद्नंतर रू. ८.०००-२७५-१३,५०० या वेतनश्रेणीत अधिक महागाई भत्त आणि नियमाप्रमाणे पात्र असतात. हे अधिकारी यथावकाश उपजिल्हाधिका-यांच्या निवड श्रेणीत तसेच भारतीय प्रशासनिक सेवेच्या संवर्गातील राखीव जागांवर पदोन्नतीसाठी पात्र असतात.
२) पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (डीवायएसपी/असिस्टंट पोलीस कमिशनर) श्रेणी-अ-उंचयपरिवीक्षाधीन (प्रोबेशन) कालाच्या पहिल्या वर्षामध्ये रूपये ८,००० आणि तद्नंतर रू. ८०००-२७५-१३-५०० या वेतनश्रेणीत अधिक महागाई भत्ता व नियमांप्रमाणे देय भत्ते हे अधिकारी यथावकाश पोलीस अधीक्षक,पोलीस उपआयुक्त (अ-संवर्गीय) तसेच भारतीय पोलीस सेवेच्या जागांवर पदोन्नतीसाठी पात्र असतात.
३)तहसीलदार उंचयपरिवीक्षाधीन (प्रोबेशन) कालाच्या पहिल्या वर्षामध्ये दरमहा रू. ७.४५० आणि तद्नंतर रू ७.४५०-२२५-११.५०० या वेतनश्रेणीत अधिक महागाई भत्ता आणि नियमांप्रमाणे देय असलेले इतरभत्ते हे अधिकारी यथावकाश उप जिल्हाधिकारी / (निवड श्रेणी) या संवर्गातील पदांवर तसेच भरतीय प्रशासनिक सेवेच्या संवर्गातील राखीव पदांवर पदोन्नती देण्यास पात्र असतात.
४) मुख्याधिकारी (चीफ ऑफिसर)नगरपालिका/नगरपरिषद गट-ब-ंउचयपरिवीक्षाधीन (प्रोबेशन) कालाच्या पहिल्या वर्षामध्ये द. म. ६,५०० आणि रू. ६,५००-२००-१०.५०० ही वेतनश्रेणी+महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय असलेले इतर भत्ते हे अधिकारी यथावकाश मुख्याधिकारीनगरपालिका / परिषद गट-अ या पदावर पदोन्नतीस पात्र असतात.
५) तालुका निरीक्षकभूमि अभिलेख गट-ब- प्रोबेशन कालाच्या पहिल्या वर्षामध्ये दरमहा रू. ५६००-२००-१०.५०० ही वेतनश्रेणी अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय असलेले इतर भत्ते हे अधिकारी यथावकाश गट ’ पदावर पदोन्नती देण्यास पात्र असतात.
६) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब-ंउचयप्रोबेशनमध्ये पहिल्या वर्षात द. म. ६,५०० आणि रू. ५००-२००-१०.५०० या वेतनश्रेणीत अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय असलेले इतरभत्ते हे अधिकारी यथावकाश गट ’ पदावर पदोन्नती देण्यास पात्र असतात.
७) कक्ष अधिकारी-ंउचयप्रोबेशनमध्ये पहिल्या वर्षात द.म.रू ६,५०० आणि रू. ६,५००-२००-१०.५०० ही वेतनश्रेणी+महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय असलेले इतर भत्ते हे अधिकारी यथावकाश अप्परसचिव व उपसचिव या पदावर पदोन्नतीस पात्र असतात.
८) नायबतहसीलदार गट-ब-प्रोबेशनमध्ये हिल्या वर्षात द.म. रू. ५.५०० आणि रू. ५.५००-१७५-९०० ही वेतनश्रेणी+महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय असलेले इतर भत्ते हे अधिकारी यथावकाश तहसीलदार गट ’ पदावर पदोन्नती देण्यास पात्र असतात.
याशिवाय उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट- अ (पुरूष) उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-अ (महिला)उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब-(पुरूष)तहसीलदार गट-ब विक्रीकर अधिकारी गट-अ विक्रीकर अधिकारी गट-ब उपमुख्य कार्यकारी अधिकारी- गट-अउपमुख्य कार्यकारी अधिकारी गट-बगट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट-अउपमुख्य कार्यकारी अधिकारी गट-बमुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद गट-अ. आणि गट-ब. महाराष्ट्र्र वित्त व लेखा सेवा गट-अ आणि ट-बउपनिबंधक सहकारी संस्था गट-अ आणि गट-बतालुका निरिक्षक भूमिक अभिलेख गट-अगटविकास अधिकारी कनिष्ठ श्रेणी गट-बसहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट-ब-ंउचयमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-बउपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब यांना उपरोक्त विशिष्ट वेतन श्रेणी लागू असते.

अर्ज करण्याची पध्दत

उमेदवारांना फक्त विहित नमुन्यातच अर्ज करावा लागतो. सर्व पदांसाठी एकच अर्ज करावा लागतो. अर्जांवर ओळखपत्रावरील छायाचित्राच्या आकाराचे छायाचित्र चिकटवावे लागते. अर्ज पाठविताना लिफाफ्यावर राज्यसेवा (पूर्व) परीक्षा- (परीक्षेचे वर्ष) करिता अर्ज असे लिहावे लागते. मुख्य परीक्षेच्या विस्तृत अभ्यासक्रमाच्या प्रतीसाठी अर्जासोबत २४ॐ१७ सेंमी आकाराचा स्वत:चा पत्ता लिहिलेला योग्य ती पोस्टाची तिकिटे लावलेला लिफाफा पाठवावा लागतो. आपले अर्ज रजिस्ट्रड पोस्टानेही पाठवू शकतात. जे उमेदवार आपले अर्ज साध्या पोस्टाने पाठवतील त्यांनी अर्जासोबत स्वत:चा पत्ता लिहिणे. त्यावर राज्यसेवा पूर्व (परीखेचे वर्ष) करिता अर्ज लिहून आणि योग्य ते तिकीट लावून पोस्ट्कार्ड जोडणे आवश्यक असते. याद्वारे उमेदवारांना एमपीएससी तर्फे अर्जांची पोच दिली जाते. कोर्ट फी स्टॅंपफोटोअर्जाची पोच मिळण्यासाठी जोडले पोस्ट्कार्ड याशिवाय अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे जाडावयाची नसतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उपसचिव व परीक्षा नियंत्रकमहाराष्ट्र्र लोकसेवा आयोगविक्रीकर भवर (जुनी इमारत) ९ वा मजलासरदार बलवंतसिंग दोधी मार्ग (नेसबिट रोड) माझगाव मुंबई ४०००१०अंध उमेदवारांनी अर्ज लेखनिकाच्या मदतीसाठीच्या विनंतीअर्जासहउपसचिव व परीक्षा नियंत्रकमहाराष्ट्र्र लोकसेवा आयोगबॅंक ऑफ इंडिया इमारत३ रा मजलाएम. जी. मार्ग. मुंबई- ४००००१ येथे पाठवावे लागतात.

अर्ज स्वीकारण्याची मुदत

जाहिरात आल्यापासून १ महिना असते.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...