- 1) एम पी एस सी म्हणजे काय ?
=>भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून ती एक स्वायत्त संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य या आयोगातर्फे होते. राज्य सरकारमधील विविध विभागातील शासकीय पदाकरिता ( सैनिकपदे सोडुन) निवडन्याचा अधिकार MPSC ला आहे.
2) MPSC साठी मेरिट काय असते का? आणि मेरिट किती असते / कसे असत...े?
=> MPSC साठी कोणतेही मेरिट ठरलेले नसते. मेरिट दर परीक्षाकारिता भिन्न असते.
उदा. जर पदसंख्या कमी तेव्हा मेरिट जास्त , आणि
जर पदसंख्या जास्त तर मेरिट कमी असते.
MPSC या परिक्षेकरिता फक्त एकच अट असते ती अशी की उमेदवार पदवी परीक्षा पास असावा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असावा मात्र लेखी परीक्षासाठी पदवी परिक्षेचे पास प्रमाणपत्र / निकालपत्र सादर करता आले पाहिजे.
3) MPSC चा अभ्यास नोकरी करून करता येईल का?
=> अशा वेळेस सर्वप्रथम तुमची नोकरी कोणती, कशी आहे याचा विचार करावा लागतो कारण १०-१२ तास जर नोकरीत जात असतील तर अभ्यासाला किती वेळ देणार? या परीक्षेला एक आव्हान समजून आणि आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अभ्यास केला तर नक्कीच यश लाभेल फक्त तुम्ही दररोज वेळेवर अभ्यास केलाच पाहिजे न चुकता न थकता.......
अनिवार्य विषयांचा अभ्यास कसा करायचा?
१)मराठी- मराठीसाठी पुस्तकी ज्ञान घेण्याबरोबरच अवांतर वाचनावर ही भर द्यावा.
उदा. रोजचे वृत्तपत्र , एखादे मासिक, एखादे पुस्तक......
यामुळे भाषाशैली विचारशक्ती आकलनक्षमता वाढण्यास मदतच होते.
२) इंग्रजी- इंग्रजीसाठी व्याकरण(Grammar) महत्वाचे आहे तसेच शब्दसाठा ही उपयोगी ठरतो. उदा. रोजचे इंग्रजी वृत्तपत्र ,मासिक,पुस्तक यामुळे शब्दसाठा वाढण्यास मदतच होते.
३) सामान्य अध्ययन -एक व दोन = या विषयांसाठी भूगोल(महाराष्ट्र,भारत,जग),इतिहास,राज्यव्यवस्था, मानव संसाधन विकास, मानवी हक्क परराष्ट्र धोरण,अर्थव्यवस्था, नैसर्गिकसाधनसंपत्ती विकास,विज्ञान तंत्रज्ञान आणि सांख्यिकी असे दहा घटक असतात. या घटकानुसार योग्य संदर्भाच्या आधारे व्यवस्थित अभ्यास करता येतो न त्या बरोबरच जुन्या प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने नवीन प्रश्नपत्रिकेची रुपरेखा ठरवणे. या विषयांचे घटक वाचून जरी अवघड जरी वाटत असले तरी योग्य अभ्यासामुळे हेच विषय सोप्पे वाटायला लागतात.
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम
मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता
जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
अतिशय महत्वाचे...
विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...