अपंगाना रोजगाराची समान संधी मिळवून देणारे ciispecialabilityjobs.in हे जॉब पोर्टल 'सीआयआय ' आणि ' मॉन्स्टर डॉट कॉम ' यांनी एकत्रितपणे सुरू केले असून सीएसआर अॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. कुठल्या उद्योगात काम करायचे आहे, कुठे करायचे आहे, अगदी देशाबाहेरही, कुठल्या विभागात काम करायचे याबाबतची वर्गवारी या बेवसाइटवर असून त्यानुसार अपंगांना रोजगार शोधता येईल. रोजगार शोधणाऱ्यांनी आणि त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनी रजिस्टर करणे गरजेचे असून त्याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
हि माहिती महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झाली आहे