विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

शब्द ज्ञान (२) विशेष

अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.

अमेरिका – सूर्यास्ताचा देश.

अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.

अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.

अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.

अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.

अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.

अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.

अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.

अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.

अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.

अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.

अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.

अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.

अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.

अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.

अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.

अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर – भारताचे पहिले कायदामंत्री.

आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.

आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)

आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.

आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.

आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.

आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.

आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.

आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील .... या घटका अभावी होतो.

आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.

आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.

आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.

आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.

आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.

आवली – संत तुकारामांची पत्नी.

आशिया – सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड.

आस्थिमज्जा – शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात.

इंग्रजी – या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत.

इंग्लंड – या देशाचे लिखीत संविधान नाही.

अर्थज्ञान

ज्ञान म्हणजे आत्मतत्त्वाचा बोध होणे होय.

ज्ञानाचे श्रेष्ठत्व व मनाचे कर्तृत्व कोणत्याही वस्तूपेक्षाही अधिक असते.

ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे, कलेशिवाय जीवन नीरस आहे.

ज्यांना पराजित व्हायची भीती असते, त्यांचा पराभव निश्चित असतो.

ज्या प्रदेशात वृक्षांचा अभाव आहे, तेथे एरंडाला वृक्षाचा भाव चढतो.

त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगती नाही.

दान हा हाताचा अलंकार आहे तर सत्य हे कंठाचे भूषण आहे.

दारित्र्याची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून ती माणसाच्या विचारात आहे.

दारिद्र्य हे आळसाचे पारितोषिक आहे.

देव, देश आणि मानव यांची सेवा करताना जो सर्वस्व देतो तो कृतार्थ होतो.

धैर्याच्या नौकेत बसून प्रयत्नांची वल्ही मारली असता यशाचा किनारा दिसतो.

ध्येयाचा नंदादीप तेवत ठेवा, म्हणजे कर्तृत्वाचा प्रकाश पडेल.

न बोलता पराक्रम करुन दाखविणे हेच सत्पुरुषाचे व्रत होय.

नास्तिक बरा पण दांभिक वाईट. पहिला प्रामाणिक असतो तर दुसरा प्रामाणिकपणाचे ढोंग आणतो.

निष्ठेने जे आपली कार्ये करतात, ते ईश्वराच्या विकासत्वाला अनुसरुन उन्नती पावतात.

परिस्थिती सुधारत नसते, तर परिस्थितीत बदल घडवून आणल्याने आपण सुधारत असतो.

परिस्थितीचे पिंजरे तोडून टाकल्याशिवाय मानवाची मुक्ती होत नाही.

प्रयत्नहीन इच्छा म्हणजे पंखहीन पाखरु होय.

प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.

बाहेर शोधाशोध करुन माणसाला मोठे होता येत नाहीत. मोठे होण्याची जागा आतच असते.

शब्द ज्ञान

अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.

अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

अक्रा – घाना या देशाची राजधानी.

अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.

अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.

अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.

अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.

अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.

अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.

अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.

अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.

अथेन्स – ग्रीस ची राजधानी.

अदिती – वामनावतारी विष्णुची माता.

अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.

अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.

अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.

अबुजा – नायजेरियाची राजधानी.

अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.

अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.

अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.

अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.

अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.

अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.

अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.

अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.

विशेष

कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते. आपले विचार तिला तसे रुप देतात.

कोणत्याही गोष्टीकडे वरवर पाहू नये. त्या मागची पार्श्वभूमी जाणूनच निर्णय घ्यावा.

कोणाशी शत्रुत्व किंवा वैर करणे म्हणजे आपला विकास थांबवून ठेवणे होय.

क्रांतीचा जन्म करुणामय अंतःकरणात होत असतो.

क्रोध हा असा अग्नी आहे की, ज्या व्यक्तीमध्ये तो उत्पन्न होतो, त्या व्यक्तीलाच तो जाळून टाकतो.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम उपाय नाही.

गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणा-या संधीचे स्वागत करा.

चांगुलपणा जाणायलासुद्धा अंगी चांगुलपणा असावा लागतो.

जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक कराल तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवेल.

जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनाला शांतता अधिक लाभते.

जीवन म्हणजे आव्हाने, साहस आणि पात्रतेची खरी कसोटीच होय.

जीवन हा संघर्ष असला तरी त्याला धैर्याने तोंड देण्यातच पुरुषार्थ आहे.

जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा संगम आहे.

जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

जीवनाचे मुखवटे प्रत्येक पिढीत बदलतात, पण त्यांचा आत्मा एकच असतो.

जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात, तेव्हा आयुष्य ही आनंदयात्रा होते.

जुलमाने विचार मरत नाहीत, तर ते अधिक सुदृढ होतात.

जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते, तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते.

जो चांगल्या वृक्षांचा आश्रय घेतो, त्याला चांगली छाया लाभते.

जो नेहमी सत्याच्या मार्गाने चालतो, तो कधीही मागे पडत नाही.

ज्ञान दाखविण्यापेक्षा अज्ञान लपविणे कठीण असते.

आम आदमी विमा योजना

राज्यात ग्रामीण भागातील भूमीहीन कुटूंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र शासनाची आम आदमी विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी विमा योजनेसंबंधित नोडल एजन्सी अंमलबजावणी यंत्रणा, लाभार्थीचे निकष, विमा हप्त्याची रक्कम...
, निधीची तरतूद, भरपाईची रक्कम, अंमलबजावणीची पध्दती याबाबत तपशील जाणून घेऊया आजच्या आलेख या सदरात...

या योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागातील भूमीहीन कुटूंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक मिळवती व्यक्ती असेल.

• या योजनेअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाला द्यावयाचा विम्याचा हप्ता वार्षिक असून विम्याच्या हप्त्याची रक्कम प्रति सदस्य रूपये २००/- राहील. यापैकी ५० रक्कम म्हणजेच १००/- रूपये राज्य शासन देईल.

• लाभार्थीचे विमा हप्त्याचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

• सदस्यांची संख्या विचारात घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, विमा हप्त्याच्या एकूण रकमेचे प्रदान भारतीय आयुर्विमा महामंडळास करेल.

• विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सदस्याचा मृत्यु झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून वारसास आश्वासित रक्कम रूपये ३०,०००/- मिळेल.

• सदस्याचा अपघाती मृत्यु झाल्यास रूपये ७५,०००/-किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास रूपये ७५,०००/- किंवा अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास रूपये ३७,५००/- भरपाई मिळेल.

• सदस्याच्या ९ वी ते १२ वी इयत्तेस शिकणार्या २ मुलांना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून प्रति तिमाही प्रति मुलास रूपये ३००/- शिष्यवृत्ती मिळेल.

या योजनेची कार्यप्रणाली -

• या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमीहीन कुटूंब प्रमुखांच्या लाभार्थीचे माहिती विहीत विवरणपत्रात (परिशिष्ठ- क) गाव कामगार तलाठी यांनी तयार करून संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडे सादर करावी.

• तहसिलदारांनी लाभार्थीची माहिती जिल्हाधिकार्यांकडे पाठवावी.

• जिल्हाधिका-यांनी सदर माहिती संकलित करून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पी ऍण्ड जी एस युनिटसकडे ( परिशिष्ठ-ब) पाठवावी त्याचप्रमाणे सदरची संकलित माहिती विभागीय महसूल विभागामार्फत शासनाकडेही पाठवावी.

• शासनाकडून विम्याच्या हप्त्याची रक्कम दिल्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल.

• भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नावाने मास्टर पॉलिसी निर्गमित करण्यात येईल.

• या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे भरपाईबाबतचे अर्ज तहसिलदारांनी जिल्हाधिकार्यामार्फत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पी ऍण्ड जी एस युनिटकडे पाठवावेत.

• या संदर्भातील भरपाईचे धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळ संबंधित लाभार्थीचे नावाने निर्गमित करेल.

• शिष्यवृत्ती अनुदेय विद्यार्थ्यांची ओळख तलाठी करतील व ज्या सदस्यांची मुले शिक्षण शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरतील त्यांचे अर्ज भरून तहसिलदाराकडे पाठविण्यात येतील.

• तहसिलदार सदरचे अर्ज संकलित करून जिल्हाधिकार्यांना पाठवतील व जिल्हाधिकारी या अर्जांची यादी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पी ऍन्ड जी एस युनिटकडे पाठवतील.

• या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, सदस्याचे नाव, मास्टर पॉलीसी नंबर आणि सदर सदस्याचा नंबर इ. बाबींचा समावेश असेल.

• भारतीय आयुर्विमा महामंडळ विद्यार्थ्यांच्या यादीसह धनादेश जिल्हाधिकार्यांकडे देईल.

• जिल्हाधिकारी सदरच्या रकमेचे वितरण तहसिलदारमार्फत संबंधित विद्यार्थ्यांना करतील

• या योजनेअंतर्गत सदस्य झालेल्या व्यक्तीस राज्य शासनाकडून राबविल्या जाणार्या अन्य विमा योजनांचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

• राज्यात या योजनेसाठी मंत्रालय स्तरावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नोडेल एजन्सी राहील.

• जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार ही योजना कार्यान्वित करतील.

• यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर संजय गांधी निराधार अनुदान योजना व इंदिरा गांधी निराधार महिला अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणार्या कर्मचारीवृंदाकडून या विमा योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

• या योजनेअंतर्गत लाभार्थीचे शोध संबंधित तलाठयांनी घ्यावयाचा आहे.

• यासाठी फलक लावणे , दवंडी देणे या मार्गांचा अवलंब करावा. लाभार्थी भूमीहीन असल्याबाबत तलाठयांनी खातरजमा करावी.

• सदस्यांच्या वयाची खातरजमा जन्म दाखला, शैक्षणिक दाखला, शिधावाटप कार्ड यांच्या आधारे करावी. ही प्रमाणपत्रे नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र आधार मानावे.

या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी सदस्यांनी / त्याच्या वारसांनी आयुर्विमा महामंडळाच्या संबंधित जिल्हयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

'महान्यूज'

*India Is Great*

"मनुष्यप्राणि प्रथमतः भरतखंडातच जन्माला आला आणि तेथूनच तो सर्व जगभर पसरला" – सर वॉल्टर रॅले"हिंदुस्थान हेच मानव जातीचे व मानव संस्कृतीचे मूळस्थान होय" – कर्नल अलकॉट

"इ,स. पूर्व ६००० वर्षांच्या सुमारास बॅक्ट्रियांत हिंदूरा...
जा राज्य करीत होता" – कौंट जार्नस्ट (थिऑगॉनी ऑफ हिंदूज)

"ग्रीक भाषा संस्कृतपासून निघाली असून ग्रीक लोकांचे मूलस्थान भारतच होय" – पोकॉक (इंडीया इन ग्रीस)

जगातील सर्वात मोठी नदी नाईल (इजिप्त) ला हे नाव सिंधुनदीच्या कालाबाग प्रवाहाला असलेल्या निलांब या नावावरुनच पडले.
नाइल नदीचा शोध स्पेक याने लावला. तो असे म्हणतो की "पूर्व आफ्रिकेतील ह्या भागातले जलाशयासंबधीचे माझे पुर्विचे ज्ञान प्राचीन हिंदूंकडूनच मला प्राप्त झाले."

आज प्रचारात असलेली गणितातील दशमान पद्धती ही भारताचीच जगाला देणगी.

"आर्किमिडीज आणि अपोलोनियस ह्या थोर गणितज्ञांच्या बुद्धीलाही सुचला नाही असा महत्तम दशमान पद्धतीचा शोध ज्या भारतीयांनी लावला त्या भारतियांचे आभार किती मानावेत" – लाप्लास (ज्योतिर्विद)

भारताचा महान वैद्यराज चरक चे नाव अरबी ग्रंथांच्या लॅटिन भाषांतरात आढळते ते उगातत नव्हे.इसवी सन ९५० ते ९६० मध्ये बगदादच्या खलिफांनी जेव्हा हिंदूंच्या वैद्यकशास्त्रीय संस्कृत ग्रंथाचे भाषांतर केले, तेव्हाच अरबी वैद्यक शास्त्राचा पाया घातला गेला. मग अरेबिक वैद्यक ग्रंथांवर युरोपचे वैद्यक शास्त्र उभे राहीले.
योगशास्त्र ही प्राचीन आर्य पूर्वजांनी जगाला दिलेली एक श्रेष्ठ देणगी होय.

हॉट मेलचे संस्थापक सबीर भाटिया हे भारतीय आहेत, संगणकातील पेण्टीयमचे संशोधक- विनोद धाम हे भारतीयच.

गेल्या दहा वर्षात मिस वर्ल्ड व मिस युनिव्हर्स मुकूट धारण करणा-या सहा भारतीय सुंदरी आहेत.

संगणक क्षेत्रात आय.बी.एम.मध्ये २८ टक्के भारतीयच… इंटेल कंपनीत १७ टक्के भारतीय.

सध्या गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन भारत या देशात होते.

खगोल शास्त्राचे गणित पाश्चात्य लोक शिकले ते भारताकडुनच -नोबेल विजेते अल्बर्ट आईनस्टाईन यांचे मत.

श्रीयुत श्रीनिवास रामानुजम, सर सी. व्ही रामन, प्रो. एस चंद्रशेखर, प्रो.सी. एस शेषाद्री, प्रो.जयंत नारळीकर,प्रो.अशोक सेन आणि प्रा.अमर्त्य सेन हे सर्व भारतीय विद्वान पाश्चात्यांपेक्षा सरस ठरतात.

अमेरिकेत असलेल्या डॉक्टरपैकी ३८ टक्के भारतीय आहेत.
नासा(अंतरिक्ष वैज्ञानिक संस्था) मध्ये३६ टक्के भारतीय वैज्ञानिक आहेत.
मायक्रोसॉप्ट (बिल गेट्स यांची कंपनी) मध्ये३४ टक्के भारतीय आहेत
लोह उत्पादनात पहीला क्रमांक पटकावनारे लक्ष्मी मित्तल हे भारतीयच.

आयुर्वेदाचा उगम या देशात झाला- भारत, जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश- भारत, शुन्याचा शोध भारतातच लागला. (शुन्य हा आकडा आर्यभट्टांनी जगाला दिला.)

सामान्य ज्ञान

• अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर.
• अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
• आफ्रिका – काळे खंड.
• आयर्लंड – पाचूंचे बेट.
• इजिप्त – नाईलची देणगी.
• ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश.
• काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

सामान्य शिक्षण - २

*महाराष्ट्र*
सन् २०११ जमगणना आयोगाच्या निष्कर्षानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या-११,२३,७२,९७२ इतकी असुन
सर्वाधिक लोकसंख्या शहरात राहात आहे। (५ कोटी ८लाख)
राज्यात नागरी भागात ५,०८,२७,५३१ (५४.७७%)
तर ग्रामीण भागात ६,१५,४५,४४१ (४५.२३%) असा लोकसं...
ख्येचा सहभाग आहे।
देशात महाराष्ट्राचा नागरीकरणामध्ये तिसरा क्रमांक लागतो.
पहिले तामिळनाडू(४८.४५%) तर दुस-या क्रमांकावर आहे केरळ।(४७.७२%)
महाराष्ट्रात सध्या साक्षरतेचा दर ८२.८१% आहे।
ग्रामीण भागात सर्वात जास्त लोकसंख्येची टक्केवारी असलेला जिल्हा - गडचिरोली।
जेथे नगरपालिका, महानगरपालिका तसेच कॅरॉन बोर्ड असुन तेथिल लोकसंख्या किमान ५०४० व ७५% पुरुषवर्ग शेतीव्यतिरिक्त इतर क्षेत्रात कामे करतो त्याचबरोबर लोकसंख्येची घनता हि ०१ चौ.किमी क्षेत्रात किमान ४०० असेल असे क्षेत्र नागरीकरणात(शहरात) मोडतात।
याशिवाय एखाद्या शहराच्या भोवतालची वाढ झालेली असल्यास ते क्षेत्रही शहरात मोडते।

महासागर
पॅसिफिक  महासागर-( प्रशांत महासागर) या महासागराचा विस्तार १,६५,३८४ हजार चौ.किमी व खोली सरासरी ४,२८० मीटर तर सर्वाधिक खोली ११५२० मीटर (३७,७९५ फुट)-मरियाना गर्ता.
हा सर्वात मोठा तसेच सर्वात खोल असणारा महासागर आहे.

अटलांटिक महासागर - या महासागराचा विस्तार ८२,२१७ हजार चौ.किमी व सरासरी खोली ३९२६ मीटर तर सर्वाधिक खोली ९२१९ मीटर (३०,१८४ फुट) फुर्टोरिको गर्ता. व्यापारी दृष्ट्या हा महत्त्वाचा महासागर आहे.

हिंदी महासागर – या महासागराचा विस्तार ७२,४८१ हजार चौ.किमी व सरासरी खोली ३,९६३ मीटर तर सर्वाधिक खोली ८,०४७ मीटर (२५,३४४ फुट) सुंदा गर्ता
भारताला मिळणारा मान्सुन वा-यांचा पाऊस याच महासागरापासून मिळतो.

आर्क्टिक महासागर - या महासागराचा विस्तार १४,०५६ हजार चौ.किमी सरासरी खोली १,२०५ मीटर तर सर्वाधिक खोली ५,४४१ मीटर- अंगारा डोह
हा जगातील सर्वात लहान महासागर आहे. हा वर्षभर गोठलेल्याच अवस्थेत असतो.

राज्य - केंद्रशासित प्रदेश व त्यांची निर्मीती

राज्य

अरुणाचल प्रदेश- २०फेब्रुवारी१९८७.
आंध्र प्रदेश- ०१ऑक्टोबर १९५३.
आसाम- २६जानेवारी१९५०.
उत्तर प्रदेश- १५ऑगस्ट१९४७.
उत्तरांचल- ०९नोव्हेंबर२०००.
ओरिसा- १५ऑगस्ट१९४७.
कर्नाटक- १५ ऑगस्ट१९४७.
केरळ- ०१ नोव्हेंबर १९५६.
महाराष्ट्र- ०१मे१९६०.
गुजरात- ०१मे१९६०.
गोवा- ३०मे१९८७.
छत्तीसगढ- ०१नोव्हेंबर २०००.
जम्मू काश्मिर- २६ऑक्टोबर १९४७.
झारखंड- १५नोव्हेंबर २०००.
तामिळनाडू- १५ऑगस्ट१९४७.
त्रिपुरा- २१जानेवारी १९७२.
नागालॅंड- ०१डिसेंबर१९६३.
पंजाब- १५ऑगस्ट१९४७.
पश्चिम बंगाल- १५ऑगस्ट१९४७.
बिहार- १५ऑगस्ट१९४७.
मणिपूर- २१जानेवारी १९७२.
मध्य प्रदेश- ०१ऑगस्ट१९५६.
मिजोराम-२०फेब्रुवारी १९८७.
मेघालय- १५एप्रिल१९७०.
राजस्थान- ०१नोव्हेंबर १९५६.
सिक्किम- १६मे१९७५.
हरियाणा- ०१नोव्हेंबर १९६६.
हिमाचल प्रदेश- २५जानेवारी१९७१.

केंद्रशासित प्रदेश

अंदमान आणि निकोबार- ०१नोव्हेंबर १९५६.
चंढीगढ- १९६६
दादरा नगरहवेली- ११ ऑगस्ट१९६१.
दिव दमण- ३०मे१९८७.
पॉंडीचेरी- ०७जानेवारी १९६३.
लक्षद्विप- ०१नोव्हेंबर १९५६.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

जन्मदिनांक – २३ जुलै १८५६.

लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. केशव हे टिळकांचे मूळ नाव. परंतु समाज त्यांना त्यांच्या बाळ या टोपण नावानेच ओळखत असे. परिणामी पुढे बाळ हेच नाव कायमचे संबोधले गेले. टिळकांचे बहुतेक सर्वच शिक्षण पुण्यात झाले. ते १८७२ साली मॅट्रिक झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण डेक्कन कॉलेज मध्ये घेऊन १८७६ साली ते बी.ए.ची परीक्षा फस्ट क्लासने उत्तीर्ण झाले. १८७९ मध्ये एलएल बी ही पदवी प्राप्त केली. एलएल बी. च्या वर्गात त्यांची आगरकर यांच्याशी ओळख झाली. ध्य़ास प्रेरित आगरकरांबरोबरच टिळकांनीही लोकजागृती तसेच राष्ट्रोद्धाराच्या कामी स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय केला. समाज परिवर्तनासाठी राजकीय चळवळ महत्त्वाची या एकमताने सुरवातीस नव्या पिढीला नवे विचार देण्यासाठी टिळक आणि आगरकर यांनी पुण्यात ०१ जानेवारी १८८० रोजी न्यु इंग्लिश स्कूलची स्थापना केली. मग आगरकर- केसरी(मराठी), टिळक- मराठा(इंग्रजी) या वृत्तपत्रांचे संपादकत्व स्वीकारुन ते ख-या अर्थाने राजकारणात सक्रीय झाले. केवळ अर्ज, विनंत्या करुन देशाला स्वातंत्र्य मिळेल हे इतर नेत्यांचे विचार त्यांना पटण्यासारखे नव्हते. उलटपक्षी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी लोकांची चळवळ उभारुन भारतीय जनतेच्या मनात स्व्तंत्र्याविषयीची आकांशा निर्मान केली. २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे या दोघांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ०२ जानेवारी १८८५ रोजी त्यांनी ‘फर्गसन कॉलेज’ सुरु केले. पुढे सामाजिक सुधारणेच्या प्रश्नांवरुन आगरकर आणइ टिळक यांच्यात मतभेद झाल्याने आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी आपल्या केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते पदही टिळकांनाच सांभाळावे लागले. १८९६ च्या दुष्काळाच्या वेळी सरकारने फेमिन कोडप्रमाने शेतक-यांना मदत केली पाहीजे या मागणीकरता टिळकांनी शेतक-यांच्या प्रचंड सभा घेतल्या आणि टिळकांना त्यात यशही आले. १८९७ साली चाफेकर बंधुंनी रॅड या जुलमी लष्करी अधिका-याची हत्या केल्याने इंग्रज सरकारने भयंकर दडपशाही सुरु केली. या बाबत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा अग्रलेख विशेष गाजला आणि पुर्ण भारत त्यांना ‘झुंजार जहाल नेता’ म्हणुन ओळखू लागला. तथापि या अग्रलेखामुळे त्यांना राजद्रोहाखाली दीड वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा झाली. टिळकांचा राजकारणातला जहालमतवादाचा वाढता पुरस्कार पाहून त्यांना १९०८ मध्ये राजद्रोह म्हणुन सहा वर्षाची शिक्षा झाली व त्यांची ब्रम्हदेशातील मंडाळे तुरुंगात रवानगी झाली. १९१४ साली तुरुंगातुन सुटल्यानंतर त्यांनी होमरुलची लीगची स्थापना केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यानी ०१ जून १९१६ रोजी अहमदनगर येथे केली. टिळकांनी गीतीरहस्य, दी आर्क्टिक होम इन दी वेदाज, ओरायन असे अभ्यासपुर्ण ग्रंथ त्यानी लिहीले. अन्याय, जुलूम यांविरोधात उभं राहण्याच्या बीजारोपणामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी मिळाली. या महान नेत्याचा अंत ०१ ऑगस्ट १९२० रोजी झाला.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...