विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

MPSC Prelim Paper घटक ३ जगाचा भूगोल


'जर लोक तुमच्या ध्येयाकडे पाहून तुमच्यावर हसत नसतील तर तुमचे ध्येय अत्यंत छोटे आहे.'
-अझीम प्रेमजी 
mpsc question paper-1:globle geography
स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना ध्येयाने झपाटलेल्या सर्व मित्रांना हे वाक्य तंतोतंत लागू पडते. राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्यासक्रमांत भूगोल या घटकाअंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना अ‍ॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.
                                                    उत्तर अमेरिका - 
उत्तर अमेरिकेतील प्रमुख पर्वतरांगा
*    रॉकीज पर्वत - ही रांग उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातून आलास्कापासून दक्षिणेकडे पसरलेली आहे. ४८३० किमी लांबीची एवढी रांग आहे. रॉकीज पर्वतातील माउंट मॉकिल्ये (६१९४ मीटर) हे सर्वात उंचीचे शिखर आहे. या पर्वतीय भागात कोलेरॅडोचे पठार आहे. कोलेरॅडो या नदीने जगातील सर्वात मोठी घळई ग्रँड कॅन्यॉन निर्माण केली आहे.
*    अपालीचेन पर्वत श्रेणी - ही पर्वतश्रेणी उत्तर अमेरिकेच्या पूर्वेकडे अटलांटिक महासागराला समांतर अशी जाते. माउंट मिटचेल हे येथील सर्वात मोठे शिखर आहे. या पर्वतश्रेणीत लोखंडाचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
*    मिसीसीपी  मिसुरी - ही नदी जवळजवळ अमेरिकेतील २५ राज्यांतून जाते. या नदीने बर्डफूट डेल्टा तयार केला आहे.
*    सेंट लॉरेन्स नदी :- जगप्रसिद्ध नायगरा धबधबा या नदीवर आहे. उत्तर अमेरिकेतील अंतर्गत जलवाहतुकीसाठी ही महत्त्वाची नदी आहे.
*    कोलंबिया नदी ही अमेरिकेतील सर्वात लांब नदी असून, ही नदी पॅसिफिक समुद्रापर्यंत जाते.
*    ग्रॅड कोली हे महत्त्वपूर्ण धरण या नदीवर आहे.
*    रीओ ग्रँडी नदी ही नदी अमेरिका व मेक्सिको यांची सीमा तयार करते.
*    हवामान - हिवाळ्यात उत्तरेस जानेवारी महिन्यात - २८ अंश इतके तापमाण असते तर नर्ऋत्येकडे अ‍ॅरिझोना वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त व पाऊस अतिशय कमी अशी परिस्थिती असते. संयुक्त संस्थांच्या पूर्व किनाऱ्याकडे वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे येथील तापमान उष्ण असते. तर पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोíनया थंड सागरी प्रवाहामुळे येथील तापमान पूर्व किनाऱ्यापेक्षा कमी असते.
*    वनस्पती - हवामानातील फरकामुळे या खंडातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील वनस्पतीमध्ये विविधता आढळून येते. या खंडाच्या उत्तर भागात प्रामुख्याने अलास्का या भागात शेवाळ नेचे इ. टुंड्रा प्रदेशीय वनस्पती आढळून येतात. याच्या दक्षिणेला सूचीपर्णी अरण्य आहेत. जेथे पाईन, स्प्रुस, फर, इ. वनस्पती आढळतात. मध्यवती मदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्यालाच प्रेअरी प्रदेश म्हणतात. तर दक्षिणेकडे वाळवंटी प्रदेशात काटेरी झुडपे आढळतात.
उत्तर अमेरिकेची खनिज संपत्ती
*    खनिज तेल, दगडी कोळसा या उत्पादनाबाबत उत्तर अमेरिका हा जगातील अग्रेसर खंड आहे. जगातील एकूण िझक उत्पादनापकी ३५ % उत्पादन उत्तर अमेरिकेत होते.
*    चांदीच्या उत्पादनासाठी मेक्सिको हा प्रमुख देश आहे.
*    जगातील एकूण उत्पादनापकी ५० % उत्पादन एकटय़ा अमेरिकेत होते.
*    गहू हे या भागातील प्रमुख पीक असल्याने या भागाला गव्हाचे कोठार म्हणतात.
*    न्यूफाउंडलँडजवळ उष्ण पाण्याचा व शीत पाण्याचा
प्रवाह एकत्र आल्याने या ठिकाणी माशांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणातील ग्रँड बँक हा मासेमारीसाठी जगप्रसिद्ध प्रदेश तयार झालेला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
*    अमेरिकेतील सर्वात लहान राज्य - ऱ्होड आयर्लंड
*    अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य - कॅलिफोíनया
*    अमेरिकेतील सर्वात लांब नदी - मिसीसीपी मिसुरी
*    अमेरिका व मेक्सिको यांच्या दरम्यान सीमारेषा तयार करणारी नदी - रीयो ग्रँड
*    संगणक क्षेत्रातील मायक्रोसॉफ्टचे ऑफिस - सियाटेल
*    भूमध्य सागरी हवामान - कॅलिफोíनया
*    जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश -अमेरिका
*    एकूण वीजनिर्मितीत सर्वात जास्त जलविद्युत निर्मितीचा वाटा असणारा देश - कॅनडा
*    अमेरिकेतील सर्वात उष्ण व सर्वात शुष्क ठिकाण - डेथ व्हॅली (Death Valley)
*    कॅनडामध्ये सर्वात मोठे शहर - टोरँटो
*    कॅनडा हा पेपर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
*    वॉिशग्टन डीसी हे पोटोमॅक या नदीकिनारी आहे.
*    प्रसिद्ध वूव्हर धरण हे कोलोरॅडो या नदीवर आहे.
*    पीटस्बर्ग याला लोखंड व स्टील उद्योगाची जगाची राजधानी म्हणतात.
*    अमेरिकेतील सर्वात खोल ठिकाण - डेथ व्हॅली
*    सॅनफ्रॉन्सिस्को या शहराला सिटी ऑफ गोल्डन गेट असे म्हणतात.
*    कापूस उत्पादनासाटी टेक्सास हा प्रांत प्रसिद्ध आहे.
*    हवाई या द्वीपसमूहाची राजधानी होनूलूलू ही आहे
*    न्यूयॉर्क हे शहर हडसन नदीवर आहे. तसेच शिकागो हे शहर शिकागो नदीवर आहे.
                                                                       
                                           दक्षिण अमेरिका
या खंडाचा उत्तर भाग हा उष्ण कटिबंधीय आहे. विषुववृत्तापासून जसजसे दक्षिणेला जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.
*    अ‍ॅमेझॉन नदीचे खोरे - या नदीचा उगम अ‍ॅन्डस् (Andes) पर्वतातून पेरू येथे होतो. ही ६५०० कि.मी. लांब नदी पेरूपासून ब्राझीलमधून अटलांटिक समुद्राला मिळते.
*    नाईल नदीनंतर अ‍ॅमेझॉन ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे.
*    अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात दाट विषुववृत्तीय वने आहेत. त्याला स्थानिक भाषेत सेल्व्हास (selvas) असे म्हटले जाते. या नदीच्या खोऱ्यात जी शेती केली जाते तिला ग्युकास(Guicas) असे म्हणतात.
*    ऑरनोको नदीचा उगम गयानाच्या पठारावरून होतो.
जगातील सर्वात उंच एंजल धबधबा या नदीवर आहे.
*    पराणा नदीचे खोरे : ही नदी पेरॉग्वे अणि ब्राझील या देशांची सीमा निश्चित करते. दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे धरण इतापो धरण या नदीवर आहे.
*    या खंडात तीन ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत. त्यांची नावे लेनॉज, कंपास, पंपास वाळवंट.
*    आटाकामाचे वाळवंट : चिलीच्या किनाऱ्याला असलेले हे जगातील सर्वात शुष्क वाळवंट आहे. येथे सोने, नायट्रेट आणि कॉपर हे सापडतात.
*    ग्रॅन चॅको पेरॉग्वेच्या पश्चिमेला अणि अर्जेटिनाच्या उत्तरेला अणि बोलिव्हियाच्या दक्षिणेला हा गवताळ प्रदेश आहे.
ग्रॅनचॅकोचा स्थानिक भाषेत अर्थ शिकाऱ्यांची भूमी.
अ‍ॅन्दस् पर्वतश्रेणी :
ही पर्वतश्रेणी व्हॅनेझुएला, कोलंबिया, इडोर, बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेटिना या सात देशांतून जाते.
*    सरोवरे - लेक मॅरे कॉबो : हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. ते व्हॅनेझुएलाच्या उत्तरेला आहे. या ठिकाणी तेल सापडते.
*    लेक टिटि काका (Lake Titi caca) बोलेव्हिया आणि पेरू या दरम्यान हे सरोवर आहे.
महत्त्वाचे मुद्दे
*    ओपेक या देशांचा समूहात असणारा दक्षिण अमेरिकेतील देश - व्हॅनेझुएला
*    जगातील मोठे तांबे उत्पादन - चिली
*    दक्षिण अमेरिकेतील भूवेष्टित देश - बोलेव्हिया अणि पॅराग्वे
*    दक्षिण अमेरिकेतील लोकसंख्येत आघाडीवर अनुक्रमे - ब्राझील, कोलंबिया, अर्जेटिना, पेरू.
*    अर्जेंटिनात असणारा गवताळ प्रदेश पंपास नावाने ओळखला जातो.
*    एंजल धबधबा हा व्हॅनेझुएलातील ओरिनॅको (Orinaco) या नदीवर आहे.
*    क्रूड तेलासाठी प्रसिद्ध असलेले मॅराव येबो सरोवर व्हॅनेझुएलात आहे.
*    सोडियम नायट्रेट हे आटाकामा वाळवंटात सापडते.
*    दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखर अ‍ॅकोनकासुआ (Aconcasua) हे आहे.
*    दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे शहर साओपॉलो (Saopaulo) आहे.
*    Chuquicamata याला कॉपर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात.
*    गॅलाकोबस ही बेटे दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला स्थित आहे. ती एक्वेडीअरच्या ताब्यात आहेत. ही बेटे प्रामुख्याने पशुपक्षी व कासव यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत.
                                              आफ्रिका खंड
*    जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
*    प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अ‍ॅटलास पर्वत आहे.
*    अ‍ॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.
*    या खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.
*    या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.
* या खचदरीत टांगानिका, मालावी ही सरोवरे निर्माण झालेली आहे.
* खचदरीच्या भागात पूर्वेस किलिमांजारो व केनिया हे ज्वालामुखीचे पर्वत आहेत.
* किलिमांजारो या शिखरांची उंची ५,८९५ मीटर असून याला क्युबो असेदेखील म्हणतात. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर हेच आहे. हे शिखर विषुववृत्तावर असून ते नेहमी बर्फाच्छादित असते. या पर्वताच्या उतारावर कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
*    आफ्रिका खंडाला खूप लांब सागरकिनारा लाभला आहे.
तरीही तो दंतुर नाही, त्यामुळे येथे नसíगक बंदरे कमी
आहेत.
* हवामान - या खंडातून कर्कवृत्त, मकरवृत्त ही येत असल्याने याचा बराचसा भाग उष्ण कटिबंधात येतो. या खंडातील सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. या खंडाचा मोठा विस्तार अणि भौगोलिक रचनेतील विविधता यामुळे तापमान व पर्जन्यमान यात विविधता दिसते. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कॅनरी व बेंग्युला या शीतप्रवाहांमुळे सहारा व नामेबिया किनारी भागात हवामान सौम्य राहते.
*    नाईल ही जगातील सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते व उत्तरेकडे वाहते. शेवटी ही नदी भूमध्य सरोवराला मिळते.
*    नाईल नदीस दोन उपनद्या आहेत- नील नाईल, श्वोत नाईल
*    नील नाईल व श्व्ोत नाईल या सुदानमधील खारटुम या ठिकाणी एकमेकांस मिळतात. अस्वान डॅम हा नाईल नदीवर बांधलेला आहे.
*    आफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैर नदीचे खोरे आहे. ही नदी बारमाही आहे. ही नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाते. या नदीवर इंगा धरण बांधले आहे.
*    दक्षिणेकडे झांबेझी नदी आहे. जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा झांबेझी नदीवर आहे. ही नदी झांबिया व झिम्बॉम्वे या दोन देशांची नेसíगक सीमारेषा तयार करते.
*    झांबेझी नदीवर करीबा हे धरण बांधलेले आहे.
*    झांबेझी नदीच्या दक्षिणेला िलपोपो नदी आहे.
*आफ्रिकेतील वाळवंटे - सहारा वाळवंट, लिबिया वाळवंट, नामेबियाचे वाळवंट, कलहारा वाळवंट
आफ्रिकेतील महत्त्वाचे देश :
१)    मोरोक्को (राजधानी रबात) : मोरोक्कोतील मर्राकेश हे ऐतिहासिक शहर असून यास लाल शहर असेदेखील म्हणतात, कारण घरबांधणीसाठी लाल दगड व तांबडय़ा मातीचा वापर करण्यात आला आहे.
२)    इजिप्त (राजधनी कैरो) : कैरो या शहराजवळील गीझा येथील पिरॉमिड जगप्रसिद्ध आहे. आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागात दाट लोकसंख्या असलेला हा देश आहे. यालाच मित्र असेदेखील म्हणतात. हा देश उष्णकटिबंधातील हवामानाच्या प्रदेशात येतो. येथे उन्हाळा तीव्र तर हिवाळ सौम्य असतो. उन्हाळ्याच्या काळात नाईल नदीच्या प्रदेशात खमसिन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. ते वारे मोठय़ा प्रमाणात धूळ व वाळू वाहून आणतात.
३)    अलेक्झांड्रिया : हे इजिप्तमधील महत्त्वाचे शहर असून ते नसíगक बंदर आहे.
४)    पोर्ट सद : हे एक उत्तम बंदर आहे. तसेच व्यापारी दृष्टीने ते महत्त्वाचे मानले जाते. सुएझ कालवा मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते.
दक्षिण आफ्रिका :
हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागास असून सोने, हिरे या खनिजांसाठी तसेच प्राणी संपत्तीसाठी हा प्रसिद्ध आहे.
*    हा देश समशीतोष्ण कटिबंधात आल्याने येथील हवामान सौम्य व आल्हाददायक आहे.
*    बेंग्युला हा शीतप्रवाह यांच्या पश्चिम किनाऱ्यावरून जातो.
*    पर्वतीय प्रदेशात रूंदपर्णीय पानझडी वने असून येथील व्हेल्ड पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे.
*    या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हत्ती, सिंह यांसारख्या प्राण्यांची संख्या विपुल आहे.
*    येथील किंबल्रे हे शहर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात हिऱ्यांच्या खाणीसाठी खोदलेली विहीर ही भूतलावरील माणसाने खोदलेली सर्वात खोल विहीर समजली जाते.
*    दक्षिण आफ्रिकेत निग्रो वंशाच्या लोकांमध्ये हौसा, झुलू, स्वाझी, सोथो, आदी प्रमुख जाती अहेत.
*    किनाऱ्याजवळील लोकसंख्या दाट असून पठारी भागात व वाळवंटी भागात लोकसंख्या कमी आहे.
*    या देशातील प्रिटोरिया, जोहोन्सबर्ग, केपटाऊन, दरबान ही प्रमुख शहरे आहेत.
महत्त्वाचे मुद्दे -
१) कलहारी वाळवंट हे ऑरेंज नदी व झांबेझी नदी यांच्या दरम्यान आहे.
२)    कलहारी वाळवंटातून भूमध्यसागराकडे वाहणाऱ्या उष्ण स्थानिक वाऱ्यांना सिरॅको असे म्हणतात.
३)    आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीिमजीरो आहे.
४)    सुएझ कालवा हा १७२ किमी. असून भूमध्यसागराला गल्फ ऑफ सुएझ व तांबडा समुद्र या माग्रे जोडतो.
५)    कांगो नदीच्या खोऱ्यात पिग्मी ही जनजाती राहते.
६)    झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांची नसíगक सीमा झांबेझी ही नदी बनवते.
७)    झांबेझी या नदीवर प्रसिद्ध कोबोरा बासा (Cobora Bassa) हे धरण आहे.
८)    व्हिक्टोरिया सरोवर हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर असून ते युगांडा, केनिया आणि टांझानिया या दरम्यान पसरलेले आहे. श्व्ोत नाईल नदी येथून उगम पावते. हे सरोवर खचदरीत येत नाही. या सरोवरातून विषुववृत्त जाते.
९) व्हिक्टोरिया सरोवर हे जगातील क्रमांक तीनचे सरोवर आहे. १) कॅस्पियन समुद्र
    २) लेकसुपेरीयर (उत्तर अमेरिका)
    ३) व्हिक्टोरिया सरोवर
१०) जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य सागर ते अटलांटिक
समुद्र यांना जोडते, तर युरोप व आफ्रिका यांना वेगळी
करते.
११) तांबडा समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडास वेगळा करतो.
१२) तांबडा समुद्राला लागून असलेले आफ्रिकेचे देश
    इजिप्त, सुदान, इरीट्रीया (Eritrea) जीबौती (Djibouti)
१३)    सोमालिया (Somalia), जीबौती (Djibouti), इर्रिटीया (Eritrea) आणि इथोपिया (Ethopia) यांना आफ्रिकेचे िशग म्हणतात.
१४)    सहारा वाळवंटातील खडकाळ दगडी वाळवंटी भागास हमादा असे म्हणतात. तर लिबियामधल्या दगडी खडकाळ वाळवंटास सेरीर म्हणतात.
१५)    आफ्रिका खंडातील लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा उतरता क्रम -
    १) नायजेरिया
    २) इजिप्त
    ३) इथोपिया
    ४) झेर
१६) सोने हिऱ्यांची भूमी म्हणून दक्षिण आफ्रिकेला ओळखले जाते.
१७)     सिरॅका वाऱ्यांना लिबियात गिब्ली या नावाने ओळखले जाते.
१८)    टांगानिका हे सरोवर टांझानिया, झैर आणि झांबिया देशांदरम्यान आहे

ग्रीन करिअर्स ...

कृषीविषयक विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा
भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे कृषी आणि कृषी-विज्ञान विषयांतर्गत पदवी, पदव्युत्तर व संशोधनपर पात्रता अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश पात्रता परीक्षा-२०१३ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत-
शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांजवळ खालीलप्रमाणे पात्रता असायला हवी-
पदवी अभ्यासक्रम : अर्जदाराने ...१०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कृषी, जीवशास्त्र यासारख्या विषयांसह व कमीत कमी ५०% गुण घेऊन उत्तीर्ण केलेली असावी.
पदव्युत्तर अभ्यासक्रम : अर्जदारांनी कृषी, कृषी-विज्ञान, कृषी-अभियांत्रिकी, दुग्धोत्पादन, मत्स्यविज्ञान, फलोत्पादन, वन-विकास, अन्न प्रक्रिया, सहकार, कृषी विपणन, ग्रामीण वित्त यासारख्या विषयांसह पदवी उत्तीर्ण केलेली असायला हवी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
संशोधनपर पात्रता परीक्षा : अर्जदार विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विषयासह पदव्युत्तर परीक्षा कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
संबंधित अभ्यासक्रमातील गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी पाच टक्क्य़ांनी शिथिलक्षम आहे.
वयोमर्यादा : अर्जदार खालील वयोगटातील असावेत-
* पदवी अभ्यासक्रम : १७ ते २३ वर्षे.
* पदव्युत्तर अभ्यासक्रम : १९ वर्षांपेक्षा अधिक.
* संशोधनपर पात्रता परीक्षा : २१ ते ३० वर्षे.
निवड पद्धती : अर्जदार विद्यार्थ्यांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावले जाईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. निवड परीक्षा खालील तपशिलानुसार घेण्यात येईल -
* पदवी परीक्षा : २० एप्रिल २०१३.
* पदव्युत्तर परीक्षा : २१ एप्रिल २०१३.
* संशोधनपर पात्रता परीक्षा : २१ एप्रिल २०१३.
अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे विविध कृषी विद्यापीठ वा कृषी महाविद्यालयात संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास पदवी अभ्यासक्रमासाठी ५०० रु.चा तर पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधनपर पात्रता परीक्षेसाठी ६०० रु. चा
डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह पाठवावेत.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २९ डिसेंबर २०१२ ते ४ जानेवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय
कृषी संशोधन संस्थेची जाहिरात
पाहावी अथवा संस्थेचा ६६६.्रूं१.१ॠ.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स (एज्युकेशन), रूम नं. २१६, इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च, कृषी अनुसंधान भवन-२, पूसा, नवी दिल्ली ११००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१३.
ज्या विद्यार्थ्यांना कृषी, कृषी विज्ञान वा संबंधित क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर वा संशोधनपर क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर विचार करावा.

एमपीएससी पेपर -१ : जागतिक भूगोल

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्या सक्रमांत भूगोल या घटका अंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना Atlas (नकाशा) सोबत अस...णे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्या पेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशा वाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.
उत्तर अमेरिका -
उत्तर अमेरिकेतील प्रमुख पर्वत रांगा
* रॉकीज पर्वत - ही रांग उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातून आलास्का पासून दक्षिणेकडे पसरलेली आहे. ४८३० किमी लांबीची एवढी रांग आहे. रॉकीज पर्वतातील माउंट मॉकिल्ये (६१९४ मीटर) हे सर्वात उंचीचे शिखर आहे. या पर्वतीय भागात कोलेरॅडोचे पठार आहे. कोलेरॅडो या नदीने जगातील सर्वात मोठी घळई ग्रँड कॅन्यॉन निर्माण केली आहे.
* अपालीचेन पर्वत श्रेणी - ही पर्वतश्रेणी उत्तर अमेरिके च्या पूर्वेकडे अटलांटिक महा सागराला समांतर अशी जाते. माउंट मिटचेल हे येथील सर्वात मोठे शिखर आहे. या पर्वतश्रेणीत लोखंडाचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
* मिसीसीपी मिसुरी - ही नदी जवळजवळ अमेरिकेतील २५ राज्यांतून जाते. या नदीने बर्डफूट डेल्टा तयार केला आहे.
* सेंट लॉरेन्स नदी :- जगप्रसिद्ध नायगरा धबधबा या नदीवर आहे. उत्तर अमेरिकेतील अंतर्गत जलवाहतुकी साठी ही महत्त्वाची नदी आहे.
* कोलंबिया नदी ही अमेरिकेतील सर्वात लांब नदी असून, ही नदी पॅसिफिक समुद्रापर्यंत जाते.
* ग्रॅड कोली हे महत्त्वपूर्ण धरण या नदीवर आहे.
* रीओ ग्रँडी नदी ही नदी अमेरिका व मेक्सिको यांची सीमा तयार करते.
* हवामान - हिवाळ्यात उत्तरेस जानेवारी महिन्यात - २८ अंश इतके तापमाण असते तर नर्ऋत्ये कडे अ‍ॅरिझोना वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त व पाऊस अतिशय कमी अशी परिस्थिती असते. संयुक्त संस्थांच्या पूर्व किनाऱ्याकडे वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे येथील तापमान उष्ण असते. तर पश्चिम किनाऱ्या वरील कॅलिफोíनया थंड सागरी प्रवाहामुळे येथील तापमान पूर्व किनाऱ्यापेक्षा कमी असते.
* वनस्पती - हवामानातील फरकामुळे या खंडातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील वनस्पतीमध्ये विविधता आढळून येते. या खंडाच्या उत्तर भागात प्रामुख्याने अलास्का या भागात शेवाळ नेचे इ. टुंड्रा प्रदेशीय वनस्पती आढळून येतात. याच्या दक्षिणेला सूचीपर्णी अरण्य आहेत. जेथे पाईन, स्प्रुस, फर, इ. वनस्पती आढळतात. मध्यवती मदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्यालाच प्रेअरी प्रदेश म्हणतात. तर दक्षिणेकडे वाळवंटी प्रदेशात काटेरी झुडपे आढळतात.
उत्तर अमेरिकेची खनिज संपत्ती
* खनिज तेल, दगडी कोळसा या उत्पादना बाबत उत्तर अमेरिका हा जगातील अग्रेसर खंड आहे. जगातील एकूण िझक उत्पादनापकी ३५ % उत्पादन उत्तर अमेरिकेत होते.
* चांदीच्या उत्पादना साठी मेक्सिको हा प्रमुख देश आहे.
* जगातील एकूण उत्पादना पकी ५० % उत्पादन एकटय़ा अमेरिकेत होते.
* गहू हे या भागातील प्रमुख पीक असल्याने या भागाला गव्हाचे कोठार म्हणतात.
* न्यूफाउंड लँडजवळ उष्ण पाण्याचा व शीत पाण्याचा
प्रवाह एकत्र आल्याने या ठिकाणी माशांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणातील ग्रँड बँक हा मासेमारी साठी जगप्रसिद्ध प्रदेश तयार झालेला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
* अमेरिकेतील सर्वात लहान राज्य - ऱ्होड आयर्लंड
* अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य - कॅलिफोíनया
* अमेरिकेतील सर्वात लांब नदी - मिसीसीपी मिसुरी
* अमेरिका व मेक्सिको यांच्या दरम्यान सीमारेषा तयार करणारी नदी - रीयो ग्रँड
* संगणक क्षेत्रातील मायक्रो सॉफ्टचे ऑफिस - सियाटेल
* भूमध्य सागरी हवामान - कॅलिफोíनया
* जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश -अमेरिका
* एकूण वीज निर्मितीत सर्वात जास्त जलविद्युत निर्मितीचा वाटा असणारा देश - कॅनडा
* अमेरिकेतील सर्वात उष्ण व सर्वात शुष्क ठिकाण - डेथ व्हॅली (Death Valley)
* कॅनडामध्ये सर्वात मोठे शहर - टोरँटो
* कॅनडा हा पेपर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
* वॉिशग्टन डीसी हे पोटोमॅक या नदीकिनारी आहे.
* प्रसिद्ध वूव्हर धरण हे कोलोरॅडो या नदीवर आहे.
* पीटस्बर्ग याला लोखंड व स्टील उद्योगाची जगाची राजधानी म्हणतात.
* अमेरिकेतील सर्वात खोल ठिकाण - डेथ व्हॅली
* सॅन फ्रॉन्सिस्को या शहराला सिटी ऑफ गोल्डन गेट असे म्हणतात.
* कापूस उत्पादनासाटी टेक्सास हा प्रांत प्रसिद्ध आहे.
* हवाई या द्वीपसमूहाची राजधानी होनूलूलू ही आहे
* न्यूयॉर्क हे शहर हडसन नदीवर आहे. तसेच शिकागो हे शहर शिकागो नदीवर आहे.
दक्षिण अमेरिका
या खंडाचा उत्तर भाग हा उष्ण कटिबंधीय आहे. विषुववृत्ता पासून जसजसे दक्षिणेला जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.
* अ‍ॅमेझॉन नदीचे खोरे - या नदीचा उगम अ‍ॅन्डस् (Andes) पर्वतातून पेरू येथे होतो. ही ६५०० कि.मी. लांब नदी पेरूपासून ब्राझीलमधून अटलांटिक समुद्राला मिळते.
* नाईल नदीनंतर अ‍ॅमेझॉन ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे.
* अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात दाट विषुववृत्तीय वने आहेत. त्याला स्थानिक भाषेत सेल्व्हास (selvas) असे म्हटले जाते. या नदीच्या खोऱ्यात जी शेती केली जाते तिला ग्युकास(Guicas) असे म्हणतात.
* ऑरनोको नदीचा उगम गयानाच्या पठारावरून होतो.
जगातील सर्वात उंच एंजल धबधबा या नदीवर आहे.
* पराणा नदीचे खोरे : ही नदी पेरॉग्वे अणि ब्राझील या देशांची सीमा निश्चित करते. दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे धरण इतापो धरण या नदीवर आहे.
* या खंडात तीन ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत. त्यांची नावे लेनॉज, कंपास, पंपास वाळवंट.
* आटाकामाचे वाळवंट : चिलीच्या किनाऱ्याला असलेले हे जगातील सर्वात शुष्क वाळवंट आहे. येथे सोने, नायट्रेट आणि कॉपर हे सापडतात.
* ग्रॅन चॅको पेरॉग्वेच्या पश्चिमेला अणि अर्जेटिनाच्या उत्तरेला अणि बोलिव्हिया च्या दक्षिणेला हा गवताळ प्रदेश आहे.
ग्रॅनचॅकोचा स्थानिक भाषेत अर्थ शिकाऱ्यांची भूमी.
अ‍ॅन्दस् पर्वतश्रेणी :
ही पर्वतश्रेणी व्हॅनेझुएला, कोलंबिया, इडोर, बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेटिना या सात देशांतून जाते.
* सरोवरे - लेक मॅरे कॉबो : हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. ते व्हॅनेझुएला च्या उत्तरेला आहे. या ठिकाणी तेल सापडते.
* लेक टिटि काका (Lake Titi caca) बोलेव्हिया आणि पेरू या दरम्यान हे सरोवर आहे.
महत्त्वाचे मुद्दे
* ओपेक या देशांचा समूहात असणारा दक्षिण अमेरिकेतील देश - व्हॅनेझुएला
* जगातील मोठे तांबे उत्पादन - चिली
* दक्षिण अमेरिकेतील भूवेष्टित देश - बोलेव्हिया अणि पॅराग्वे
* दक्षिण अमेरिकेतील लोकसंख्येत आघाडीवर अनुक्रमे - ब्राझील, कोलंबिया, अर्जेटिना, पेरू.
* अर्जेंटिनात असणारा गवताळ प्रदेश पंपास नावाने ओळखला जातो.
* एंजल धबधबा हा व्हॅनेझुएलातील ओरिनॅको (Orinaco) या नदीवर आहे.
* क्रूड तेलासाठी प्रसिद्ध असलेले मॅराव येबो सरोवर व्हॅनेझुएलात आहे.
* सोडियम नायट्रेट हे आटाकामा वाळवंटात सापडते.
* दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखर अ‍ॅकोनकासुआ (Aconcasua) हे आहे.
* दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे शहर साओपॉलो (Saopaulo) आहे.
* Chuquicamata याला कॉपर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात.
* गॅलाकोबस ही बेटे दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला स्थित आहे. ती एक्वेडीअरच्या ताब्यात आहेत. ही बेटे प्रामुख्याने पशुपक्षी व कासव यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत.
आफ्रिका खंड
* जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
* प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अ‍ॅटलास पर्वत आहे.
* अ‍ॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.
* या खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.
* या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.
* या खचदरीत टांगानिका, मालावी ही सरोवरे निर्माण झालेली आहे.
* खचदरीच्या भागात पूर्वेस किलि मांजारो व केनिया हे ज्वालामुखीचे पर्वत आहेत.
* किलिमांजारो या शिखरांची उंची ५,८९५ मीटर असून याला क्युबो असेदेखील म्हणतात. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर हेच आहे. हे शिखर विषुववृत्तावर असून ते नेहमी बर्फाच्छादित असते. या पर्वताच्या उतारावर कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
* आफ्रिका खंडाला खूप लांब सागरकिनारा लाभला आहे.
तरीही तो दंतुर नाही, त्यामुळे येथे नसíगक बंदरे कमी
आहेत.
* हवामान - या खंडातून कर्कवृत्त, मकरवृत्त ही येत असल्याने याचा बराचसा भाग उष्ण कटिबंधात येतो. या खंडातील सर्व साधारण हवामान उष्ण आहे. या खंडाचा मोठा विस्तार अणि भौगोलिक रचनेतील विविधता यामुळे तापमान व पर्जन्यमान यात विविधता दिसते. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्या जवळ कॅनरी व बेंग्युला या शीत प्रवाहांमुळे सहारा व नामेबिया किनारी भागात हवामान सौम्य राहते.
* नाईल ही जगातील सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते व उत्तरेकडे वाहते. शेवटी ही नदी भूमध्य सरोवराला मिळते.
* नाईल नदीस दोन उपनद्या आहेत- नील नाईल, श्वोत नाईल
* नील नाईल व श्व्ोत नाईल या सुदान मधील खारटुम या ठिकाणी एकमेकांस मिळतात. अस्वान डॅम हा नाईल नदीवर बांधलेला आहे.
* आफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैर नदीचे खोरे आहे. ही नदी बारमाही आहे. ही नदी विषुव वृत्ताला दोन वेळा छेदून जाते. या नदीवर इंगा धरण बांधले आहे.
* दक्षिणेकडे झांबेझी नदी आहे. जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा झांबेझी नदीवर आहे. ही नदी झांबिया व झिम्बॉम्वे या दोन देशांची नेसíगक सीमारेषा तयार करते.
* झांबेझी नदीवर करीबा हे धरण बांधलेले आहे.
* झांबेझी नदीच्या दक्षिणेला िलपोपो नदी आहे.
*आफ्रिकेतील वाळवंटे - सहारा वाळवंट, लिबिया वाळवंट, नामेबियाचे वाळवंट, कलहारा वाळवंट
आफ्रिकेतील महत्त्वाचे देश :
१) मोरोक्को (राजधानी रबात) : मोरोक्कोतील मर्राकेश हे ऐतिहासिक शहर असून यास लाल शहर असेदेखील म्हणतात, कारण घरबांधणीसाठी लाल दगड व तांबडय़ा मातीचा वापर करण्यात आला आहे.
२) इजिप्त (राजधनी कैरो) : कैरो या शहराजवळील गीझा येथील पिरॉमिड जगप्रसिद्ध आहे. आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागात दाट लोकसंख्या असलेला हा देश आहे. यालाच मित्र असेदेखील म्हणतात. हा देश उष्ण कटिबंधा तील हवामाना च्या प्रदेशात येतो. येथे उन्हाळा तीव्र तर हिवाळ सौम्य असतो. उन्हाळ्या च्या काळात नाईल नदीच्या प्रदेशात खमसिन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. ते वारे मोठय़ा प्रमाणात धूळ व वाळू वाहून आणतात.
३) अलेक्झांड्रिया : हे इजिप्त मधील महत्त्वाचे शहर असून ते नसíगक बंदर आहे.
४) पोर्ट सद : हे एक उत्तम बंदर आहे. तसेच व्यापारी दृष्टीने ते महत्त्वाचे मानले जाते. सुएझ कालवा मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते.
दक्षिण आफ्रिका :
हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागास असून सोने, हिरे या खनिजांसाठी तसेच प्राणी संपत्तीसाठी हा प्रसिद्ध आहे.
* हा देश समशीतोष्ण कटिबंधात आल्याने येथील हवामान सौम्य व आल्हाद दायक आहे.
* बेंग्युला हा शीतप्रवाह यांच्या पश्चिम किनाऱ्या वरून जातो.
* पर्वतीय प्रदेशात रूंदपर्णीय पानझडी वने असून येथील व्हेल्ड पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे.
* या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हत्ती, सिंह यांसारख्या प्राण्यांची संख्या विपुल आहे.
* येथील किंबल्रे हे शहर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात हिऱ्यांच्या खाणीसाठी खोदलेली विहीर ही भूतला वरील माणसाने खोदलेली सर्वात खोल विहीर समजली जाते.
* दक्षिण आफ्रिकेत निग्रो वंशाच्या लोकांमध्ये हौसा, झुलू, स्वाझी, सोथो, आदी प्रमुख जाती अहेत.
* किनाऱ्या जवळील लोकसंख्या दाट असून पठारी भागात व वाळवंटी भागात लोकसंख्या कमी आहे.
* या देशातील प्रिटोरिया, जोहोन्सबर्ग, केपटाऊन, दरबान ही प्रमुख शहरे आहेत.
महत्त्वाचे मुद्दे -
१) कलहारी वाळवंट हे ऑरेंज नदी व झांबेझी नदी यांच्या दरम्यान आहे.
२) कलहारी वाळवंटातून भूमध्य सागराकडे वाहणाऱ्या उष्ण स्थानिक वाऱ्यांना सिरॅको असे म्हणतात.
३) आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीिमजीरो आहे.
४) सुएझ कालवा हा १७२ किमी. असून भूमध्य सागराला गल्फ ऑफ सुएझ व तांबडा समुद्र या माग्रे जोडतो.
५) कांगो नदीच्या खोऱ्यात पिग्मी ही जनजाती राहते.
६) झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांची नसíगक सीमा झांबेझी ही नदी बनवते.
७) झांबेझी या नदीवर प्रसिद्ध कोबोरा बासा (Cobora Bassa) हे धरण आहे.
८) व्हिक्टोरिया सरोवर हे आफ्रिके तील सर्वात मोठे सरोवर असून ते युगांडा, केनिया आणि टांझानिया या दरम्यान पसरलेले आहे. श्व्ोत नाईल नदी येथून उगम पावते. हे सरोवर खचदरीत येत नाही. या सरोवरातून विषुववृत्त जाते.
९) व्हिक्टोरिया सरोवर हे जगातील क्रमांक तीनचे सरोवर आहे. १) कॅस्पियन समुद्र
२) लेकसुपेरीयर (उत्तर अमेरिका)
३) व्हिक्टोरिया सरोवर
१०) जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य सागर ते अटलांटिक
समुद्र यांना जोडते, तर युरोप व आफ्रिका यांना वेगळी
करते.
११) तांबडा समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडास वेगळा करतो.
१२) तांबडा समुद्राला लागून असलेले आफ्रिकेचे देश
इजिप्त, सुदान, इरीट्रीया (Eritrea) जीबौती (Djibouti)
१३) सोमालिया (Somalia), जीबौती (Djibouti), इर्रिटीया (Eritrea) आणि इथोपिया (Ethopia) यांना आफ्रिकेचे िशग म्हणतात.
१४) सहारा वाळवंटा तील खडकाळ दगडी वाळवंटी भागास हमादा असे म्हणतात. तर लिबियामधल्या दगडी खडकाळ वाळवंटास सेरीर म्हणतात.
१५) आफ्रिका खंडातील लोकसंख्ये च्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा उतरता क्रम -
१) नायजेरिया
२) इजिप्त
३) इथोपिया
४) झेर
१६) सोने हिऱ्यांची भूमी म्हणून दक्षिण आफ्रिकेला ओळखले जाते.
१७) सिरॅका वाऱ्यांना लिबियात गिब्ली या नावाने ओळखले जाते.
१८) टांगानिका हे सरोवर टांझानिया, झैर आणि झांबिया देशां दरम्यान आहे.

साभार - लोकसत्ता (२८ जाने २०१३)

MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१३


MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१३

 जाहिरात निघाली.


 जाहिरात  येथे बघा Click HERE for Details.

MPSC राज्यसेवा पुर्वपरिक्षा 2013 जाहिरात आली असून फॉर्म भरण्यासाठीhttp://mpsconline.gov.in/html/index.php या वेबसाएट वर प्रथम registration करा ,त्यामधे तुमची सर्व शैक्षणिक माहिती ,फोटो ,साइन व्यवस्थित update करा .. आणि मग नंतर APPLY EXAM या बटनावर क्लीक करून MPSC राज्यसेवा पुर्वपरिक्षा 2013 साथी apply करावे .

IMP NOTE- *****ज्यानी आधी साईंट वर registration केले आहे त्यानी परत registration करु  नये 


****BEST OF LUCK****

MPSC CSAT 2013




 SOURCE =***WWW.UPSCPORTAL.COM*** 

*********DOWNLOAD FREE EBOOKS HELPFULL FOR MPSC-2013*********               

 Download by click on below links 

UPSC CSAT Previous Years Papers:

Paper - 1

Paper - 2

                                      Syllabus:

                                 Free E-Book:

एमपीएससी पेपर-१ : घटक पर्यावरण

पर्यावरणशास्त्र घटकाची तयारीMPSC paper-1: subject environment
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पीएसआय, एसटीआय, असिस्टन्ट, सरळसेवा भरती तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा यांच्या एकूणच अभ्यासक्रम, परीक्षापद्धती व प्रश्नांचे स्वरूप यांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. तसेच १० जून २०१२ रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता अपेक्षेप्रमाणे २०१३ या वर्षी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर बदलले आहे. यापैकी सामान्य क्षमता चाचणी पेपर १च्या दिलेल्या अभ्यासक्रमातील भाग- ६ म्हणजेच पर्यावरणशास्त्र 
विषयाचे महत्त्व 
गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतात आलेल्या जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम, वनांची तोड, प्रदूषण, त्सुनासी लाटा या पर्यावरणातील अनिष्ट बदलांमुळे तसेच यामुळे झालेल्या जीवितहानी व वित्तहानीमुळे पर्यावरणासंबंधी अभ्यासाचे महत्त्व वाढले आहे. 
रिओ-दि-जिनेरो (ब्राझील) येथे १९९२ साली 
झालेल्या पहिल्या जागतिक वसुंधरा परिषद तसेच जोहान्सबर्ग (द. आफ्रिका) येथे शाश्वत विकासासाठी २००२ साली झालेल्या जागतिक परिषदेने 
पर्यावरणातील होणाऱ्या अनिष्ट बदलांकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. २०१२ मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या 
रिओ-२१ परिषदेत असाच प्रयत्न झाला. त्यामुळे  जागतिक पातळीवर होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला अटकाव करायचा असेल, तसेच पर्यावरण संवर्धन करायचे असेल तर विविध देशांनी पर्यावरणासंबंधी केलेले कायदे व करार यांचे काटेकोर पालन 
करणे आवश्यक आहे. तसेच शाश्वत विकासासाठी देशातील जनतेचा सहभाग मिळविताना अविकसित देश मागे राहणार नाहीत याची काळजी घ्यावयाची आहे. पर्यायाने एक प्रशासकीय अधिकारी म्हणून पर्यावरणासंबंधीच्या सर्व संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप 
हा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या संदर्भात जरी नवीन असला तरी व आयोगाने सध्या तरी या विषयासंदर्भात अभ्यासावयाचे मुद्दे दिले नसले तरी यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा, तसेच राज्यसेवा सामान्य अध्ययन पेपर-१, सरळसेवा भरती परीक्षा आलेल्या प्रश्नांवरून व दिलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधीत मुद्दय़ांचा अभ्यास केल्यास या विषयाची परिपूर्ण तयारी होऊ शकते. वरील परीक्षांच्या संदर्भावरून या विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे-


) परिस्थिती विज्ञान व परिस्थितिक व्यवस्था- ऊर्जा प्रवाह, वस्तू-चक्र, अन्न शृंखला व अन्न जाळे.
२) पर्यावरण अवनती व संवर्धन-जागतिक परिस्थितिक असमतोल प्रदूषण व हरितगृह परिणाम.
३) हरितगृह परिणामातील कार्बन-डाय ऑक्साइड व मिथेनची भूमिका.
४)    जागतिक तापमानातील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा ऱ्हास. 
५)    पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स.
६)    शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र-१ व सागरी संरक्षित क्षेत्र -२.
७)        मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण-पूरकविकास (शाश्वत-विकास).
८)        नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरण आपत्ती. 
९)     पर्यावरणात संवर्धनात कार्यरत असलेल्या जागतिक पातळीवरील राज्य-राष्ट्र संघटना.
१०)    जैविक बहुविविधता व वतावरणातील बदल.
११)    एनर्जी पिरॅमिड, मिलेनिअम युको स्टिस्टीम असेसमेंट, फायटोप्लॅक्टॉन, मँग्रूव्ह अरण्ये, अभयारण्ये, मरीन  अपवेलिंग, बायोस्फीअर रिझव्‍‌र्ह, राष्ट्रीय अभयारण्ये, टर्मिनेटर सीड्स, ओझोन थराची झीज इ.



प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 
२०११ व २०१२ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये या घटकांवर १३-१४ प्रश्न विचारलेले आहेत. तसेच या घटकाला २०० गुणांपैकी २८-३० गुण होते. हेच स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१३ तील पूर्वपरीक्षेत असण्याची दाट शक्यता आहे.
परीक्षाभिमुख तयारी 
संबंधित विषयाच्या तयारीसाठी वरील अभ्यासक्रमाचे मुद्दे अभ्यासताना विद्यार्थ्यांनी संकल्पना स्पष्ट करण्यावर भर द्यावा  तसेच महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा. राज्यसेवा मुख्य  परीक्षा सामान्य अध्ययन-पेपर-१ व सरळसेवा भरती परीक्षा तसेच यूपीएससीची २०११ व २०१२ च्या पूर्वपरीक्षेतील संबंधित विषयावरील प्रश्न अभ्यासले तर नक्कीच फायदा होईल.
संदर्भ साहित्य
१)    पर्यावरणशास्त्र (मराठी):  (Textbook of Environmental (U.G.C. publication) studies By Erach Bharucha (मराठी अनुवाद कॉ. सिद्धिविनायक बर्वे)
२)    पर्यावरणीय भूगोल  (द. मेगास्टेटकार ए. बी. सवदी)
३)    स्टडी सर्कल प्रकाशन (डॉ. आनंद पाटील)
सामान्य क्षमता चाचणी पेपर-१ (नवीन अभ्यासक्रमानुसार)
४) विद्यार्थ्यांनी 'केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालय'च्या वेबसाइटवर वेळोवेळी भेट द्यावी.
वेबसाइट पत्ता -www.enfor.nic.in.



७ एप्रिल २०१३ मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत पेपर १मध्ये पर्यावरण हा स्वतंत्र घटक अंतर्भूत केला आहे. हा विषय यूपीएसीच्या पेपर १च्या अभ्यासक्रमात होताच. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास एक गोष्ट लक्षात येते- हा घटक पास होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जवळजवळ २० ते २५ प्रश्न या घटकावर विचारले गेले आहेत. आपण या घटकातील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबी समजून घेणार आहोत.
पर्यावरण :- पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापी आहे. पर्यावरण या संकल्पनेत जैविक, अजैविक घटकांचा समावेश होतो.
पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना :-
१) संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यावरण कार्यक्रम [United Nations Environment Programme (UNEP)] :-
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात १९७२मध्ये स्टॉकहोम येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत झाली. याचे प्रमुख कार्यालय केनियाची राजधानी नरोबी येथे आहे. याचे प्रमुख कार्य म्हणजे- संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्फत पर्यावरणावर विविध परिषदांचे आयोजन करणे, त्यातून येणाऱ्या शिफारसींना व्यावहारिक रूप देते.
दोहा परिषद :-
कतारची राजधानी दोहा येथे ८ डिसेंबर २०१२ रोजी वातावरण बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण परिषद झाली. यामध्ये क्योटो प्रोटोकॉलच्या जागी जागतिक सहमती असलेल्या करारास २०१५ पर्यंत अंतिम रूप देण्यात येईल हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. ( ही उडढ 18 - उटढ 8 परिषद होती.)
वातावरण बदलासंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी <http://www.unep.org/> हे संकेतस्थळ पाहावे.
२) युनेस्कोचा मानव आणि जिवावरण कार्यक्रम:- (Man and Biosphere Programme)
मानव व जिवावरण (Man and Biosphere) यांच्यात जागतिक स्तरावर सुधारणा करण्यासाठी युनेस्कोद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात १९७० मध्ये करण्यात आली.
३) जागतिक वन्यजीव कोष (World Wildlife Fund) WWF :-
वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या हेतूने १९६१मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली
या संस्थेचे मुख्य कार्यालय स्वित्र्झलड येथे आहे.
पर्यावरण रक्षणाचे कार्य करणाऱ्या भारतातील महत्त्वपूर्ण संस्था :-
१) बॉटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया  (BSI ) :-
या संस्थेची स्थापना १८९० साली कोलकाता येथे करण्यात आली, १९३९ सालानंतर काही वर्षांसाठी ही संस्था बंद होती, मात्र १९५४ साली ही पुन्हा सुरू करण्यात आली.
२) झुलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (ZSI) :-
या संस्थेची स्थापना १९१६ मध्ये करण्यात आली. या संस्थेमार्फत प्राण्यांचे वर्गीकरण व पर्यावरणासंबंधी मूलभूत संशोधन केले जाते.
३) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) :-
ही निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्य व संशोधन करणारी सर्वात पुरातन बिगरशासकीय संस्था ठॅड आहे.
स्थापना १८८३ मुबंई येथे या संस्थेमार्फत 'हॉर्नबिल' हे लोकप्रिय मासिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री' हे संशोधनपर मासिक प्रकाशित होते. याशिवाय इतर महत्त्वपूर्ण संस्था
१. सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हिरॉनमेंट - नवी दिल्ली
२. सेंटर फॉर एन्व्हिरॉनमेंट एज्युकेशन - अहमदाबाद
३. सलीम अली सेंटर फॉर ऑरनिथॉलॉजी अ‍ॅण्ड नॅचरल हिस्ट्री - कोईमतूर
४. वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया - डेहराडून
५. आशिया खंडातील पहिले मगर प्रजनन व संशोधन केंद्र (क्रोकोडाइल बॅक ट्रस्ट)- मद्रास
परिस्थितीकी - सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजे परिस्थितीकी थोडक्यात परिस्थितीकी या शास्त्रात पृथ्वीवरील सर्व सजीव सूक्ष्म जीव व पर्यावरण यांच्या आंतरक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अर्न्‍स हॅकेल या जर्मन जीवशास्त्रज्ञाने परिस्थितीकी शास्त्रासाठी (Ecology) ही संज्ञा सर्वप्रथम वापरली.
परिस्थितीकी शास्त्रात परिसंस्था हे अभ्यासाचे एकक (Unit) मानले जाते.
परिसंस्था -
१९३५ मध्ये ब्रिटिश परिस्थितीकी शास्त्रज्ञ ए. सी. टन्सले यांनी परिस्थितीकी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्यांच्या मते सजीव व त्यांचे वसतिस्थान यांची एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था.
परिस्थितीकी मनोरा (Pyramid) :-
ब्रिटिश शास्त्रज्ञ परिस्थितीकी शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी १९२७ साली परिस्थितीकी मनोऱ्याची संकल्पना मांडली. परिसंस्थेत ऊर्जा ही एका जिवाकडून दुसऱ्या जिवाकडे हस्तांतरीत होत असते. ऊर्जेचे हस्तांतर होत असताना मूळ ऊर्जेचा तीव्रतेने ऱ्हास होत असतो.
अन्नसाखळी (Food Chain) :- प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाला ऊर्जेची गरज असते. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती वाढतात. वनस्पतीवर शाकाहारी प्राणी जगतात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. वनस्पती, शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राणी अन्नासाठी परस्परांवर अवलंबून असतात, यालाच अन्नसाखळी म्हणतात.
ऊर्जाविनिमय स्तर (Tropical Level) :- अन्नसाखळीतील उत्पादकांकडून विविध स्तरांतल्या भक्षकांकडे अन्नऊर्जेच्या विविध पातळ्यांना ऊर्जाविनिमय स्तर असे म्हणतात. १९४२मध्ये िलडमॅन या विचारवंताने या अन्नऊर्जा संक्रमणाच्या विविध पातळ्यांना ऊर्जाविनिमय स्तर Trophical Level असे नाव दिले.
अन्नजाळी (Food Web) :- एकाच परिसंस्थेत एकापेक्षा अधिक अन्नजाळ्या एकमेकांशी संबंधित व आंतरभेदक असतात यांना अन्नजाळी असे म्हणतात.
पारिस्थितिक कार्यस्थळ :- जोसेफ ग्रीनले या वैज्ञानिकाने सर्वप्रथम पक्षांच्या अभ्यासावरून ही संज्ञा मांडली. परिसंस्थेच्या अभ्यासात सजीवांच्या वसतिस्थानाची गुणवैशिष्टय़े समजून घेणे अतिशय आवश्यक असते. कारण वसतिस्थानाच्या गुणवैशिष्टय़ांवरच सजीवांचे अस्तित्व, वितरण व कार्य निश्चित होते. थोडक्यात परिसंस्थेतील सजीवांचे वसतिस्थान व कार्य यांचे वर्णन म्हणजे परिस्थितीकी कार्यस्थळ होय.
जैवविविधता :- पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये विविध प्रकारचे सजीव विविध परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न आकाराचे, आकारमानाचे, संरचनेचे आणि निरनिराळ्या गुणसूत्रांचे कमी अधिक आयुष्यमानाचे व आंतरसंबंध असलेले आढळतात त्यालाच जैवविविधता असे म्हणतात.
१९९२ मध्ये ब्राझिलच्या राजधानीत, रिओडी जानेशे येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत जैवविविधता हा शब्द प्रचलित झाला.
जैवविविधतेचे प्रकार
अनुवंशीय विविधता (Genetic Diversity):-
एकाच जातीच्या प्राण्यांच्या जीनमध्ये दिसून येणारी विविधता म्हणजे अनुवंशीय विविधता. उदा. गाई-म्हशी यांच्या गुणसूत्रात बदल घडून नवीन संकरित जाती निर्माण केल्या जातात. संकरित बियाणे इ.  
प्रजातीची  विविधता (Species Diversity) :-
एकाच अधिवासात विविध प्रकारचे व विविध जातींचे सजीव वेगवेगळ्या संख्येने राहतात त्यालाच प्रजातीय विविधता म्हणतात. प्रजातीय विविधता नसíगक परिसंस्था आणि कृषी परिसंस्थेमध्ये जास्त दिसून येते.
परिसंस्था विविधता (Ecosystem Diversity):-
प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक विघटक हे ठरावीक असतात म्हणून परिसंस्था बदलाबरोबर हे घटकही बदलतात. उदा. गवताळ परिसंस्थेत साप, उंदीर, सरडे इ. विविध प्रकारच्या प्रजाती एकत्र राहतात तर गोडय़ा पाण्याच्या परिसंस्थेत कासव, मासे, पाणवनस्पती एकत्र राहतात.

एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी

डेल कारनेजीचे एक वाक्य खूपच छान आहे. तो म्हणाला होता, 'जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश मिळण्याची अजिबात शक्यता नसतानादेखील यशासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.'
स्पर्धापरीक्षा म्हटली की, यश-अपयश, नराश्य हे आलेच. स्पर्धापरीक्षा हा एक कैफ आहे. यश मिळालं नाही तोपर्यंत किंवा अपयशी होऊन वयोमर्यादा संपत नाही, तोपर्यंत हा कैफ उतरत नाही.
या वर्षांची परीक्षा फारच महत्त्वाची आहे, कारण या वर्षी म्हणजे २०१२ मध्ये जवळजवळ १६ वर्षांनंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आहे. या वर्षांपासून पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. त्यापकी पेपर पहिला हा सामान्य अध्ययनाचा असेल. सामान्य अध्ययनाचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने दिला नाही. मात्र हा अभ्यासक्रम यू.पी.एस.सी.च्या पेपर-१मधील अभ्यासक्रमासारखाच आहे. हा बदल भविष्याच्या दृष्टीने नक्कीच चांगला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तो खालीलप्रमाणे-
१)    महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी
२)    इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ
३)    राज्य पद्धती व प्रशासन
४)    आíथक आणि सामाजिक विकास
५)    पर्यावरण
६)    सामान्य विज्ञान

सन २०११ - २०१२ याच अभ्यासक्रमावर झालेल्या परीक्षेचा विचार केल्यास या अभ्यासक्रमाचा आवाका आपल्या लक्षात येईल.
१) चालू घडामोडी :
कोणत्याही स्पर्धापरीक्षेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. स्पर्धापरीक्षेद्वारे निवड होणाऱ्या परीक्षार्थीना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहेत याचे ज्ञान आवश्यक आहे. स्पर्धापरीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात चालू घडामोडीच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी बाजारात उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांवर फक्त अवलंबून न राहता रोज कमीतकमी एक तास याचा योजनाबद्ध अभ्यास करावा. चालू घडामोडींसाठी एक स्वतंत्र नोटबुक तयार करून रोजच्या रोज टिपण काढल्यास सर्वात जास्त फायदा होतो. त्या वहीचे खालीलप्रमाणे भाग करून नियमित वृत्तपत्रातून (उदा. लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, योजना, कुरुक्षेत्र इ.) टिपणे काढावीत.
१)    आंतरराष्ट्रीय घडामोडी
२) राष्ट्रीय घडामोडी उदा. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी इ.
३) राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी
४) आíथक घडामोडी
५) पर्यावरण क्षेत्रातील घडामोडी
६) वैज्ञानिक घडामोडी
७) कृषी क्षेत्रातील घडामोडी
८) क्रीडा क्षेत्रातील घडामोडी
९) विविध करार, पुरस्कार, समित्या, दिनविशेष इ.
चालू घडामोडीची तयारी रोज करावी. परीक्षेला अवघे काही दिवस राहिले असताना या विषयाची तयारी करण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळ उडण्याची जास्त शक्यता आहे.
२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ
तसे पाहिल्यास या विषयाची व्याप्ती मोठी आहे. कारण जर इतिहास म्हटला तर त्याचे पुढील भाग पडतात. १) प्राचीन भारताचा इतिहास २) मध्ययुगीन भारताचा इतिहास ३) आधुनिक भारताचा इतिहास ४) भारतीय स्वातंत्र्याची चळवळ.
सन २०११-२०१२ च्या संघ लोकसेवा परीक्षेचा आधार घेतल्यास साधारणत: भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीवर जास्त प्रश्न विचारले जातात. आधुनिक भारताचा इतिहास हा कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा विभाग आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेलासुद्धा हा विभाग आहे म्हणून याचा अभ्यास पूर्वपरीक्षेपासून विस्तृत केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
संदर्भ ग्रंथ : बिपिन चंद्रा, बी. एन. ग्रोव्हर व एन.सी. ई.आर.टी.ची इतिहासाची पुस्तके.
याशिवाय प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन अभ्यास करावा. जर इतिहासासाठी स्वतंत्र वही तयार करून त्यात संक्षिप्त स्वरूपात माहिती, सणावळय़ा इत्यादी लिहून ही वही परत परत वाचल्यास निश्चितच फायदा होतो.
३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल
एम.पी.एस.सी.च्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमात 
फक्त महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल होता; मात्र बदलेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागच्या एक वर्षांच्या विविध परीक्षांचा अभ्यास केला, तर भूगोलासंदर्भात एक महत्त्वाचा बदल लक्षात येईल, तो म्हणजे भूगोलावर काही प्रश्न आता विशेषत: नकाशावर विचारले जातात, याचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम परीक्षार्थीना महाराष्ट्राचा व भारत आणि जग याचा अ‍ॅटलास घेणे आवश्यक आहे व अ‍ॅटलास समोर ठेवून अभ्यास करावा. या परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताचा भूगोल व्यवस्थित अभ्यासावा.
संदर्भ ग्रंथ : महाराष्ट्र व भारताचा भूगोल सवदी तसे एन.सी.ए. आर.टी. चे पाचवी  ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचावीत. 
जगाच्या भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील 
वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडाप्रमाणे अभ्यास सुरू करावा, जेणेकरून अभ्यास सोपा होईल. उदा. अमेरिका खंड- उत्तर अमेरिका- कॅनडा- दक्षिण अमेरिका इत्यादी; युरोप खंड, आफ्रिका खंड.
संदर्भ ग्रंथ : जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ यांचे पुस्तक आवश्यक वाचावे.
४) पर्यावरण :
मागच्या दोन वर्षांच्या यूपीएससीच्या पेपरचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की, या घटकावर कमीत कमी २० प्रश्न विचारले गेले आहेत. हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व मनोरंजक असा विभाग आहे. याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी खालील प्रकरणांचा आधार 
घ्यावा.
१) वातावरणातील बदल
२) जैवविविधता
३) परिस्थितिकी
४) ग्लोबल वाìमग
५) कार्बन क्रेडिट
६) बायोस्पेअर रिझव्‍‌र्ह
७) नॅशनल पार्क
८) ओझोन थराचा क्षय
९) बायोडायव्हर्सटिी हॉट स्पॉट
त्याचप्रमाणे वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा उदा. रिओ परिषद, कॅन्कून परिषद इत्यादी.
५) भारतीय व महाराष्ट्रातील राज्यपद्धती व प्रशासन :
यूपीएससीने मागे घेतलेल्या सी-सॅट परीक्षेत जवळजवळ २५ ते ३० प्रश्न या घटकावर विचारले होते. या घटकावर मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. तयारी करताना दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहेत त्यांचादेखील संदर्भ घ्यावा. प्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी, महत्त्वाची कलमे लिहून ती परत परत वाचावीत, निरनिराळय़ा घटना दुरुस्त्या, भारतीय राज्य प्रणाली, पंचायत राज, ७३ वी घटना दुरुस्ती, ७४ वी घटना दुरुस्ती, पंचायत राज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग व त्यांची कार्ये, उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महिला आयोग, निवडणूक आयोग इत्यादी. केंद्रीय व राज्यस्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळय़ा समित्या यांचा अभ्यास करावा. 
संदर्भ ग्रंथ : के. लक्ष्मीकांत, सुभाष कश्यप, भालभोळे, घांगरेकर यांची पुस्तके.
६) आíथक व सामाजिक विकास :
या वर्षी अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्था याऐवजी आíथक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. हा विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. कारण यूपीएससीने गेल्या २ वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत जवळजवळ ३० ते ३५ प्रश्न या घटकावरच विचारलेले आहेत. अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात; त्याचप्रमाणे जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या पंचवार्षकि योजना, बँक प्रणाली, आयात-निर्यात धोरण, करप्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्रय़ निर्मूलन, रोजगारनिर्मिती यांचादेखील अभ्यास करावा. याशिवाय वरील अभ्यासाची सांगड खालील मुद्दय़ांशी घातल्यास तयारी परिपूर्ण होईल.
१) शाश्वत विकास
२) लोकसंख्या
३) सामाजिक क्षेत्र
४) भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार इत्यादी.
संदर्भ ग्रंथ : इंडिया इअर बुक २०१३ अजून बाजारात यायचे आहे.
दत्त आणि सुंदरम् किंवा भारतीय आíथक व्यवस्था (विशेषांक) प्रतियोगिता दर्पण.
७) सामान्य विज्ञान :
सामान्य विज्ञानात प्रश्न १) जीवशास्त्र २) भौतिक शास्त्र ३) रसायन शास्त्र व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांशी संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतची एन.सी.ई.आर.टी.ची पुस्तके यांचा अभ्यास करावा. जीवशास्त्र व भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यातील शास्त्रीय घटकांचा जास्त अभ्यास करू नये. उदा. रसायनशास्त्रातील निरनिराळय़ा अभिक्रिया, जीवशास्त्रातील प्राणी विज्ञान इत्यादी. मात्र जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषधे, व्हिटामिन्स, विटामिन्सच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास व्यवस्थित करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करावा.
मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्पर्धापरीक्षेची तयारी करीत आहात. दरवर्षी जवळजवळ चार ते पाच लाख विद्यार्थी या परीक्षेत आपले नशीब आजमावतात. यशस्वी व्हायचे असेल तर शंभर 
टक्के नव्हे तर एकशे दोन टक्के प्रयत्न करणे आवश्यक आहे

कोणत्याही एकाच घटकावर जास्त वेळ न घालवता सर्व घटक व्यवस्थित समजून त्यांचा अभ्यास करावा. पूर्ण अभ्यासाला चालू घडामोडीचा आधार द्यावा. तयारीदरम्यान कोणत्याही क्षणी नाराज न होता स्वत:चे प्रयत्न सातत्याने चालू ठेवावे, तरच यश प्राप्त होईल.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...