विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

एमपीएससी पेपर-१ : घटक पर्यावरण

पर्यावरणशास्त्र घटकाची तयारीMPSC paper-1: subject environment
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पीएसआय, एसटीआय, असिस्टन्ट, सरळसेवा भरती तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा यांच्या एकूणच अभ्यासक्रम, परीक्षापद्धती व प्रश्नांचे स्वरूप यांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. तसेच १० जून २०१२ रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता अपेक्षेप्रमाणे २०१३ या वर्षी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर बदलले आहे. यापैकी सामान्य क्षमता चाचणी पेपर १च्या दिलेल्या अभ्यासक्रमातील भाग- ६ म्हणजेच पर्यावरणशास्त्र 
विषयाचे महत्त्व 
गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतात आलेल्या जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम, वनांची तोड, प्रदूषण, त्सुनासी लाटा या पर्यावरणातील अनिष्ट बदलांमुळे तसेच यामुळे झालेल्या जीवितहानी व वित्तहानीमुळे पर्यावरणासंबंधी अभ्यासाचे महत्त्व वाढले आहे. 
रिओ-दि-जिनेरो (ब्राझील) येथे १९९२ साली 
झालेल्या पहिल्या जागतिक वसुंधरा परिषद तसेच जोहान्सबर्ग (द. आफ्रिका) येथे शाश्वत विकासासाठी २००२ साली झालेल्या जागतिक परिषदेने 
पर्यावरणातील होणाऱ्या अनिष्ट बदलांकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. २०१२ मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या 
रिओ-२१ परिषदेत असाच प्रयत्न झाला. त्यामुळे  जागतिक पातळीवर होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला अटकाव करायचा असेल, तसेच पर्यावरण संवर्धन करायचे असेल तर विविध देशांनी पर्यावरणासंबंधी केलेले कायदे व करार यांचे काटेकोर पालन 
करणे आवश्यक आहे. तसेच शाश्वत विकासासाठी देशातील जनतेचा सहभाग मिळविताना अविकसित देश मागे राहणार नाहीत याची काळजी घ्यावयाची आहे. पर्यायाने एक प्रशासकीय अधिकारी म्हणून पर्यावरणासंबंधीच्या सर्व संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप 
हा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या संदर्भात जरी नवीन असला तरी व आयोगाने सध्या तरी या विषयासंदर्भात अभ्यासावयाचे मुद्दे दिले नसले तरी यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा, तसेच राज्यसेवा सामान्य अध्ययन पेपर-१, सरळसेवा भरती परीक्षा आलेल्या प्रश्नांवरून व दिलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधीत मुद्दय़ांचा अभ्यास केल्यास या विषयाची परिपूर्ण तयारी होऊ शकते. वरील परीक्षांच्या संदर्भावरून या विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे-


) परिस्थिती विज्ञान व परिस्थितिक व्यवस्था- ऊर्जा प्रवाह, वस्तू-चक्र, अन्न शृंखला व अन्न जाळे.
२) पर्यावरण अवनती व संवर्धन-जागतिक परिस्थितिक असमतोल प्रदूषण व हरितगृह परिणाम.
३) हरितगृह परिणामातील कार्बन-डाय ऑक्साइड व मिथेनची भूमिका.
४)    जागतिक तापमानातील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा ऱ्हास. 
५)    पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स.
६)    शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र-१ व सागरी संरक्षित क्षेत्र -२.
७)        मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण-पूरकविकास (शाश्वत-विकास).
८)        नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरण आपत्ती. 
९)     पर्यावरणात संवर्धनात कार्यरत असलेल्या जागतिक पातळीवरील राज्य-राष्ट्र संघटना.
१०)    जैविक बहुविविधता व वतावरणातील बदल.
११)    एनर्जी पिरॅमिड, मिलेनिअम युको स्टिस्टीम असेसमेंट, फायटोप्लॅक्टॉन, मँग्रूव्ह अरण्ये, अभयारण्ये, मरीन  अपवेलिंग, बायोस्फीअर रिझव्‍‌र्ह, राष्ट्रीय अभयारण्ये, टर्मिनेटर सीड्स, ओझोन थराची झीज इ.



प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 
२०११ व २०१२ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये या घटकांवर १३-१४ प्रश्न विचारलेले आहेत. तसेच या घटकाला २०० गुणांपैकी २८-३० गुण होते. हेच स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१३ तील पूर्वपरीक्षेत असण्याची दाट शक्यता आहे.
परीक्षाभिमुख तयारी 
संबंधित विषयाच्या तयारीसाठी वरील अभ्यासक्रमाचे मुद्दे अभ्यासताना विद्यार्थ्यांनी संकल्पना स्पष्ट करण्यावर भर द्यावा  तसेच महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा. राज्यसेवा मुख्य  परीक्षा सामान्य अध्ययन-पेपर-१ व सरळसेवा भरती परीक्षा तसेच यूपीएससीची २०११ व २०१२ च्या पूर्वपरीक्षेतील संबंधित विषयावरील प्रश्न अभ्यासले तर नक्कीच फायदा होईल.
संदर्भ साहित्य
१)    पर्यावरणशास्त्र (मराठी):  (Textbook of Environmental (U.G.C. publication) studies By Erach Bharucha (मराठी अनुवाद कॉ. सिद्धिविनायक बर्वे)
२)    पर्यावरणीय भूगोल  (द. मेगास्टेटकार ए. बी. सवदी)
३)    स्टडी सर्कल प्रकाशन (डॉ. आनंद पाटील)
सामान्य क्षमता चाचणी पेपर-१ (नवीन अभ्यासक्रमानुसार)
४) विद्यार्थ्यांनी 'केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालय'च्या वेबसाइटवर वेळोवेळी भेट द्यावी.
वेबसाइट पत्ता -www.enfor.nic.in.



७ एप्रिल २०१३ मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत पेपर १मध्ये पर्यावरण हा स्वतंत्र घटक अंतर्भूत केला आहे. हा विषय यूपीएसीच्या पेपर १च्या अभ्यासक्रमात होताच. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास एक गोष्ट लक्षात येते- हा घटक पास होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जवळजवळ २० ते २५ प्रश्न या घटकावर विचारले गेले आहेत. आपण या घटकातील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबी समजून घेणार आहोत.
पर्यावरण :- पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापी आहे. पर्यावरण या संकल्पनेत जैविक, अजैविक घटकांचा समावेश होतो.
पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना :-
१) संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यावरण कार्यक्रम [United Nations Environment Programme (UNEP)] :-
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात १९७२मध्ये स्टॉकहोम येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत झाली. याचे प्रमुख कार्यालय केनियाची राजधानी नरोबी येथे आहे. याचे प्रमुख कार्य म्हणजे- संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्फत पर्यावरणावर विविध परिषदांचे आयोजन करणे, त्यातून येणाऱ्या शिफारसींना व्यावहारिक रूप देते.
दोहा परिषद :-
कतारची राजधानी दोहा येथे ८ डिसेंबर २०१२ रोजी वातावरण बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण परिषद झाली. यामध्ये क्योटो प्रोटोकॉलच्या जागी जागतिक सहमती असलेल्या करारास २०१५ पर्यंत अंतिम रूप देण्यात येईल हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. ( ही उडढ 18 - उटढ 8 परिषद होती.)
वातावरण बदलासंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी <http://www.unep.org/> हे संकेतस्थळ पाहावे.
२) युनेस्कोचा मानव आणि जिवावरण कार्यक्रम:- (Man and Biosphere Programme)
मानव व जिवावरण (Man and Biosphere) यांच्यात जागतिक स्तरावर सुधारणा करण्यासाठी युनेस्कोद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात १९७० मध्ये करण्यात आली.
३) जागतिक वन्यजीव कोष (World Wildlife Fund) WWF :-
वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या हेतूने १९६१मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली
या संस्थेचे मुख्य कार्यालय स्वित्र्झलड येथे आहे.
पर्यावरण रक्षणाचे कार्य करणाऱ्या भारतातील महत्त्वपूर्ण संस्था :-
१) बॉटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया  (BSI ) :-
या संस्थेची स्थापना १८९० साली कोलकाता येथे करण्यात आली, १९३९ सालानंतर काही वर्षांसाठी ही संस्था बंद होती, मात्र १९५४ साली ही पुन्हा सुरू करण्यात आली.
२) झुलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (ZSI) :-
या संस्थेची स्थापना १९१६ मध्ये करण्यात आली. या संस्थेमार्फत प्राण्यांचे वर्गीकरण व पर्यावरणासंबंधी मूलभूत संशोधन केले जाते.
३) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) :-
ही निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्य व संशोधन करणारी सर्वात पुरातन बिगरशासकीय संस्था ठॅड आहे.
स्थापना १८८३ मुबंई येथे या संस्थेमार्फत 'हॉर्नबिल' हे लोकप्रिय मासिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री' हे संशोधनपर मासिक प्रकाशित होते. याशिवाय इतर महत्त्वपूर्ण संस्था
१. सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हिरॉनमेंट - नवी दिल्ली
२. सेंटर फॉर एन्व्हिरॉनमेंट एज्युकेशन - अहमदाबाद
३. सलीम अली सेंटर फॉर ऑरनिथॉलॉजी अ‍ॅण्ड नॅचरल हिस्ट्री - कोईमतूर
४. वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया - डेहराडून
५. आशिया खंडातील पहिले मगर प्रजनन व संशोधन केंद्र (क्रोकोडाइल बॅक ट्रस्ट)- मद्रास
परिस्थितीकी - सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजे परिस्थितीकी थोडक्यात परिस्थितीकी या शास्त्रात पृथ्वीवरील सर्व सजीव सूक्ष्म जीव व पर्यावरण यांच्या आंतरक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अर्न्‍स हॅकेल या जर्मन जीवशास्त्रज्ञाने परिस्थितीकी शास्त्रासाठी (Ecology) ही संज्ञा सर्वप्रथम वापरली.
परिस्थितीकी शास्त्रात परिसंस्था हे अभ्यासाचे एकक (Unit) मानले जाते.
परिसंस्था -
१९३५ मध्ये ब्रिटिश परिस्थितीकी शास्त्रज्ञ ए. सी. टन्सले यांनी परिस्थितीकी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्यांच्या मते सजीव व त्यांचे वसतिस्थान यांची एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था.
परिस्थितीकी मनोरा (Pyramid) :-
ब्रिटिश शास्त्रज्ञ परिस्थितीकी शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी १९२७ साली परिस्थितीकी मनोऱ्याची संकल्पना मांडली. परिसंस्थेत ऊर्जा ही एका जिवाकडून दुसऱ्या जिवाकडे हस्तांतरीत होत असते. ऊर्जेचे हस्तांतर होत असताना मूळ ऊर्जेचा तीव्रतेने ऱ्हास होत असतो.
अन्नसाखळी (Food Chain) :- प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाला ऊर्जेची गरज असते. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती वाढतात. वनस्पतीवर शाकाहारी प्राणी जगतात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. वनस्पती, शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राणी अन्नासाठी परस्परांवर अवलंबून असतात, यालाच अन्नसाखळी म्हणतात.
ऊर्जाविनिमय स्तर (Tropical Level) :- अन्नसाखळीतील उत्पादकांकडून विविध स्तरांतल्या भक्षकांकडे अन्नऊर्जेच्या विविध पातळ्यांना ऊर्जाविनिमय स्तर असे म्हणतात. १९४२मध्ये िलडमॅन या विचारवंताने या अन्नऊर्जा संक्रमणाच्या विविध पातळ्यांना ऊर्जाविनिमय स्तर Trophical Level असे नाव दिले.
अन्नजाळी (Food Web) :- एकाच परिसंस्थेत एकापेक्षा अधिक अन्नजाळ्या एकमेकांशी संबंधित व आंतरभेदक असतात यांना अन्नजाळी असे म्हणतात.
पारिस्थितिक कार्यस्थळ :- जोसेफ ग्रीनले या वैज्ञानिकाने सर्वप्रथम पक्षांच्या अभ्यासावरून ही संज्ञा मांडली. परिसंस्थेच्या अभ्यासात सजीवांच्या वसतिस्थानाची गुणवैशिष्टय़े समजून घेणे अतिशय आवश्यक असते. कारण वसतिस्थानाच्या गुणवैशिष्टय़ांवरच सजीवांचे अस्तित्व, वितरण व कार्य निश्चित होते. थोडक्यात परिसंस्थेतील सजीवांचे वसतिस्थान व कार्य यांचे वर्णन म्हणजे परिस्थितीकी कार्यस्थळ होय.
जैवविविधता :- पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये विविध प्रकारचे सजीव विविध परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न आकाराचे, आकारमानाचे, संरचनेचे आणि निरनिराळ्या गुणसूत्रांचे कमी अधिक आयुष्यमानाचे व आंतरसंबंध असलेले आढळतात त्यालाच जैवविविधता असे म्हणतात.
१९९२ मध्ये ब्राझिलच्या राजधानीत, रिओडी जानेशे येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत जैवविविधता हा शब्द प्रचलित झाला.
जैवविविधतेचे प्रकार
अनुवंशीय विविधता (Genetic Diversity):-
एकाच जातीच्या प्राण्यांच्या जीनमध्ये दिसून येणारी विविधता म्हणजे अनुवंशीय विविधता. उदा. गाई-म्हशी यांच्या गुणसूत्रात बदल घडून नवीन संकरित जाती निर्माण केल्या जातात. संकरित बियाणे इ.  
प्रजातीची  विविधता (Species Diversity) :-
एकाच अधिवासात विविध प्रकारचे व विविध जातींचे सजीव वेगवेगळ्या संख्येने राहतात त्यालाच प्रजातीय विविधता म्हणतात. प्रजातीय विविधता नसíगक परिसंस्था आणि कृषी परिसंस्थेमध्ये जास्त दिसून येते.
परिसंस्था विविधता (Ecosystem Diversity):-
प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक विघटक हे ठरावीक असतात म्हणून परिसंस्था बदलाबरोबर हे घटकही बदलतात. उदा. गवताळ परिसंस्थेत साप, उंदीर, सरडे इ. विविध प्रकारच्या प्रजाती एकत्र राहतात तर गोडय़ा पाण्याच्या परिसंस्थेत कासव, मासे, पाणवनस्पती एकत्र राहतात.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...