विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी

आयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे. करीयरचे सुनियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. हे विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
दहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. गुण चांगले आहेत, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडलेला असतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या. मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत? त्याचे मन त्या विषयात रमेल काय? याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे.
पालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता अक्षरश: त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवरच डगमगतो.
कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी स्वत:चा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.
करीयरची संधी-
विविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळवता येते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान तसे फारसे नसतेच. तसेच त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. त्याच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढली पाहिजे.
करीयरची नवी क्षितीजे-
जाहिरात शास्त्र, बॅकिंग, ब्युटिशियन, बिझनेस मॅनेजमेंट, सिरॅमिक्स, चार्टर्ड अकाऊंटन्सी, रसायन शास्त्र, सिव्हील सव्हिसेस, विमानतळ व्यवस्था, कंपनी सेक्रटरी, स्थापत्यशास्त्र, हवाई दल, भूदल, नौदल, अर्थशास्त्र, शिक्षणाशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, पत्रकारिता, इंजिनिअरिंग, प्रदूषण नियंत्रण, व्यापारशास्त्र, फॅशन डिझायनिंग, फॅशन जर्नालिझम, मॉडेलिंग, फिल्म बनवणे, फायनान्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, फार्मसी, नाट्यशास्त्र, जनसंपर्कशास्त्र, प्रकाशन व्यवस्था , लायब्ररी शास्त्र, कायदा, मानसशास्त्र, इव्हेन्ट मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण या सारख्या अनेक नव्या क्षेत्रात करीयरच्या संधी आहेत.

मेडिकल एंट्रन्सची तयारी

वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवावा असे अनेक विद्यार्थ्यांना वाटत असते. पण त्याची तयारी वा त्याचा विचार आपण 12 वीनंतर करतो. आपण 10 वीचा निकाल लागतो त्या वेळेस ठरवले पाहिजे की आपण बायोलॉजीकडे (वैद्यकीय शाखा व तत्सम विभागाकडे) जायचे आहे की भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र व गणित घेऊन अभियांत्रिकीकडे (इंजिनिअरिंग) जायचे आहे. आपण नुसते बीएस्सी करून नंतर एमएस्सी करून (Oncology/TB) वैद...्यकीय रिसर्च शाखेकडे वळू शकतो. होतं असं की 12वीची परीक्षा (जी आता 5 महिन्यांवर आली आहे) होईपर्यंत किंवा ही परीक्षा देऊन नंतर दोन महिन्यांची NEET होईपर्यंत आपण वैद्यकीय शाखेकडे किंवा अभियांत्रिकीकडे (ISEET) जायचे ठरवत नसल्यामुळे आपणापुढे पेच निर्माण होतो. असे का होते? त्याची कारणे खालीलप्रमाणे वाटतात.
* विद्यार्थ्यांना 9 वी ते 12 वीपर्यंत (परीक्षेआधी) आपले करिअर नक्की कशात करायचे हे माहीत नसते.
* करिअरचा विचार बारावीच्या सीईटीनंतर करू, आता घाई कशाला, असा पालकांचा विचार असतो.
* शिक्षणविषयक माहिती गोळा करण्याची पद्धत आपल्यामध्ये नाही.
* ग्रामीण भागात शिक्षणातील संधीविषयी अनास्था आढळते. तिथे महत्त्व दिले जात नाही.
* वैद्यकीय प्रवेश परीक्षा व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा यांची माहितीच जूनपर्यंत किंवा निकाल लागेपर्यंत पालक करून घेत नाहीत.
* बीएस्सी, एमबीबीएस, बीई, बीटेक या शाखांमधील काय निवडायचे याबद्दल पालक/विद्यार्थी विद्यार्थिनी प्रचंड गोंधळलेले असतात व सीईटी होईपर्यंत पालक विचारच करत नाहीत.
* 12 वीची परीक्षा व सीईटीचे गुण बघितल्यावर पालकांना (अपेक्षा असते 200 पैकी 140 गुण मिळण्याची पण मिळतात 170 गुण ) सुखद धक्का बसतो.
* अपेक्षा असते 200 पैकी 180 गुणांची पण मिळतात 125 म्हणून पालक हाय खातात.
* याचा परिणाम असा होतो की गोंधळलेले पालक प्रवेश फॉर्म भरूच शकत नाहीत.
मग काय करायला हवे?
* 12 वीची परीक्षा देण्याआधीच बीटेक, अभियांत्रिकी, वैद्यकीय, बीएस्सी यापैकी कोणत्या शाखेकडे जायचे आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.
* अभियांत्रिकी शाखेची सविस्तर माहिती घेण्यासाठी इंटरनेटची मदत घ्या. इंटरनेटवर शेकडो साइट अशा आहेत ज्या तुम्हाला अभियांत्रिकी शाखेचा आवाका लक्षात आणून देतील. या शाखेत कालौघात झालेले बदल, या शाखेची सद्य:स्थिती यांची माहिती तुम्हाला इंटरनेटमुळे मिळू शकते. वैद्यकीय शाखेसंदर्भातील प्रवेश परीक्षांची माहितीही वेबसाइटवर जाऊन घ्यावी.
* यूट्यूबच्या माध्यमातून वैद्यकीय शाखेतील दिग्गज डॉक्टरांचे आयुष्य लक्षात येते व वैद्यकीय शाखेचा आवाका कळतो.
* आपणांस बायोलॉजी आवडत नसेल तर मेडिकलला न जाण्याचा निर्णय घ्यावा.
* आपण भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-जीवशास्त्र-बॉटनी वा झुआलॉजीमध्ये बीएस्सी करून नंतर 110 विषयांमध्ये एमएस्सी करू शकता. हे सर्व विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, स्टॅटिस्टिक्सहे विषय सोडून) इतर गटातले मेडिकलशी संबंधित आहेत.
* आपण 8 वी ते 11 वीपर्यंत आपल्या गावातल्या, शहरातल्या इस्पितळांना भेटी देऊन वा अनेक डॉक्टरांशी चर्चा करून मेडिकलला जायचे आहे की नाही हे ठरवू शकता.
मेडिकलला जायचे मार्ग असे...
1. सरकारी प्रवेश परीक्षा ठएएळ पास होणे.
2. प्रायव्हेट प्रवेश परीक्षा पास होणे.
3. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजची प्रवेश परीक्षा पास होऊन सैन्यात डॉक्टर म्हणून रुजू होणे.
4. बीएस्सी करून 110 विषयांत एमएस्सी (ऑन्कॉलॉजी, टीबी, गायनॅक इ. शाखांमध्ये) मेडिकल रिसर्च या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेणे.
5. केईएम हॉस्पिटल (पुणे-मुंबई), नायर हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल वा जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅरामेडिकलला प्रवेश घेऊन व्यवस्थितपणे 4 वर्षात पॅरामेडिकल अभ्यासक्रम पूर्ण करणे.
6. पॅरामेडिकलमध्ये ऑक्युपेशनल थेरपी, र्नसिंग, लॅब (बीएस्सी) इत्यादी असंख्य कोर्सेस आहेत ते सर्वसाधारणपणे 4 वर्षांचे कोर्सेस करूनही आपण पॅरामेडिकलला प्रवेश घेऊ शकता.
7. पण याची सर्व माहिती तुम्हाला 12 वीची परीक्षा होईपर्यंतच असणे गरजेचे आहे.
माहिती कोठे मिळेल?
1. शहरात असणा-या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत.
2. डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, सीएसटी स्टेशनजवळ, मुंबई येथे माहिती मिळते. तसेच इंटरनेटवर गुगल या सर्च इंजिनमध्ये 2013 मध्ये होणा-या मेडिकल परीक्षेची माहिती मिळू शकते.
3. ऑल इंडिया मेडिकल कौन्सिलच्या वेबसाइटवर सर्व माहिती आहे.
4. मुंबईतील जे. जे., नायर, ग्रँट मेडिकल, किंवा पुणे, नागपूर, कोल्हापूर, मिरज, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातही सर्व माहिती मिळू शकते.
5. महाराष्‍ट्र मेडिकल स्टेट सीईटीची सर्व माहिती मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे.
6. मेडिकल कौन्सिलच्या वेबसाइटवर नॅशनल एलिजिबिलिटी अँड एंट्रन्स टेस्टबाबत माहिती मिळू शकते.
अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालये मे ते जुलै या कालावधीत पालकांशी संपर्क साधून 200 पैकी 175 च्या वर गुण मिळाले नसले तरी तुमच्या पाल्याला खासगीरीत्या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देऊ, असे आश्वासन देत असतात. त्यापासून सावध राहावे.

नोकरीसाठी जाताना...

नोकरीसाठी जाताना...

तुमचे व्यक्तिमत्व जितके विकसित तितका तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. कोणतेही काम करताना तुमचे त्या कामातून झळकणारे व्यक्तीमत्वच तुमची खरी ओळख असते. त्यामुळे आजकाल व्यक्तिमत्व विकासासाठी स्पेशल कोर्सही लावले जातात. या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन मिळत असतो. तुम्ही तुमचे शिक्षण पुर्ण करून नोकरी शोधण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की इतरांच्या मानाने तुम्ही के...वळ तुमच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वामुळे मागे पडलात. मग दु:ख करण्यात तुम्ही तुमचे पुढचे आयुष्यही बरबाद करता. त्यापेक्षा नोकरीवर जाण्यापूर्वीच काही गोष्टींची माहिती तुम्हाला होणे गरजेचे आहे. संपूर्ण माहिती घ्या : ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला असेल त्या कंपनीची माहिती आधी जमा करा. त्या कंपनीचा अभ्यास करा. त्या कंपनीचा इतिहास, तिची होणारी वाढ आणि हो नुकसानही कंपनीच्या वरिष्ठांना सांगाल म्हणजे तुम्ही कंपनीचा केलेला अभ्यास त्यांना जाणवेल. तुमच्या आवाजात कोणताही आक्रमकपणा जाणवू देऊ नका. वायफळ बडबड टाळा. एका वाक्यात मुळीच उत्तरे देऊ नका.अधिका-याने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर प्रामाणिकपणे ते कबूल करा. उगाच खोटे उत्तर द्याल तर अडकाल. कंपनीच्या कोणत्याही अधिका-याला ओळखत असाल तरी त्याचे नाव सारखे सारखे इंटव्ह्यूमध्ये सांगू नका. अशाने अधिका-यांचे तुमच्याबद्दलचे मत खराब होईल. काही टेबल प्रोटोकॉल पाळा. तुमच्यासाठी चहा आणला असेल तरी तुम्ही अधिका-यांनी तो चहा घेण्यापूर्वी पिण्याची घाई करु नका. कंपनीच्या आगामी दिशेविषयीच्या तुमच्या काही कल्पना असतील तर त्या अधिका-यांना नुसत्या सांगूच नका तर त्यांना त्या पटवून देण्याचा प्रयत्न करा. या बाबींकडे प्रकर्षाने लक्ष द्या: तुमचे पाय सरळ ठेवा. तुम्ही पाय जर विळखा घातल्यासारखे ठेवले तर याचा अर्थ असा होतो, की तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि तुम्हाला भीती वाटत आहे. इंटरव्ह्यू घेणा-या अधिका-याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुम्ही जर असे केले तर तुमचा आत्मविश्वास त्यातून दिसून येईल आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी ख-या आहेत हे पटेल. तुमच्या खाद्यांना जरासेच पुढच्या बाजुने झुकवत समोरच्या वक्तीशी संवाद साधा. याचा अर्थ असा होतो की तुमचे मन साफ आहे. हो पण जास्त पुढे झुकु नका. त्याने तुम्ही समोरच्याची खुशमस्करी करत असल्याचे दिसून येते. समोरची व्यक्ती किंवा अधिकारी तुम्हाला काही सुचना करत असतील तर त्यांचे वाक्य पुन्हा बोलू नका. तो त्यांचा अपमान समजला जातो. तुम्ही केवळ मानेने होकार देऊ शकता. चेह-यावर तेज दिसण्यासाठी त्या दिवशी मनात सकारात्मक विचार करा. उनाडपणा करणे टाळा. या काही महत्वाच्या टिप्स पाळाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

आपला पासवर्ड कसा असावा ?

आपला पासवर्ड काय असावा हे ज्याने त्याने आपल्या आवडीनुसार ठरवावे.

प्रत्येकाला आपला पासवर्ड योग्य आहे आणि शक्यतो तो कुणाला कळणार नाही असेच वाटते. परंतू आपला पासवर्ड योग्य आहे आणि तो कुणाला कळणार नाही असा गैरसमज कधीच... करुन घेवू नये. थोडावेळ जर तुम्ही तुमच्याच पासवर्डचा विचार केल्यास आपणास कळेल कि तो किती सोपा आहे, कारण आपला पासवर्ड म्हणून आपण हा शक्यतो कुणाचे ना कुणाचे नाव दिलेले असते.

सर्वसाधारणपणे एखादे नाव पासवर्ड म्हणून वापरले जाते. निदान ८०% पासवर्ड तरी कुणाच्या ना कुणाच्या नावाचे असतात.

असे कधीही गृहित धरु नये कि आपला पासवर्ड कधिच कुणी शोधू शकणार नाही. आपण जर आपला पासवर्ड म्हणून असेच एखादे नाव वापरले असेल तर तुमचा पासवर्ड तुमच्या सोबत काम करणारी अथवा जवळची व्यक्ति पटकन तुमचा पासवर्ड शोधून दाखवेल.

याचा अर्थ आपला पासवर्ड म्हणून निरनिराळी अक्षरे आणि अंक तसेच सांकेतिक चिन्ह असलेला असावा असा होत नाही. आपला पासवर्ड म्हणून एखादे नाव देण्यामागचा अर्थचमूळी असा असतो कि तो लगेच लक्ष्यात रहावा. परंतू जर एखाद्याचे नाव जर पासवर्ड नसावा तर मग लगेच लक्ष्यात राहील असा पासवर्ड निवडावा तरी कसा? असा प्रश्न निर्माण होतो.

चांगला पासवर्ड असा द्यावा : - निरनिराळी अक्षरे आणि अंक तसेच सांकेतिक चिन्ह वापरुन किचकट पासवर्ड निवडण्याएवजी आपणास हवे असलेले एखादे नावच पासवर्ड म्हणून वापरावे, परंतू त्याच नावामध्ये ' $ ' किंवा ' # ' चिन्ह वापरावे. उदा. जर तुमचा पासवर्ड ' sachin ' असल्यास ' sac#hin ' किंवा ' sachin$ ' असा पासवर्ड द्यावा. अशाप्रकारे आपला पासवर्ड सोपा आणि सहजासहजी कुणाला न कळण्यासारखा होतो.

टीप : शक्यतो आपला पासवर्ड आठ अंकी असावा, कारण सध्या जवळजवळ सर्वच ठिकाणी किमान आठ अंकी असावा लागतो, म्हणून ऐनवेळी काय पासवर्ड द्यावा हे ठरविण्यापेक्ष्या आपला पासवर्ड आठ अंकी तसेच त्यामध्ये ' $ ' किंवा ' # ' चिन्ह असलेला असावा

स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : एमपीएससी-पेपर-१: भारतीय राज्यपद्धती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन करणारी साप्ताहिक लेखमालिका..
स्प र्धा परीक्षा एमपीएससीची असो किंवा यूपीएससीची भारतीय राज्यपद्धती व प्रशासन हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यूपीएससीच्या दोन सी-सॅट परीक्षेत या घटकावर सुमारे २५ ते ३० प्रश्न विचारले होते. जर राज्यसेवेचा ...विचार केला तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाचा पेपर-२ याच घटकावर आहे.
भारतीय राज्यपद्धतीचा अभ्यास करताना सर्वप्रथम राज्यघटना व्यवस्थित समजून घ्यावी, राज्यघटनेचा अभ्यास करताना ब्रिटिशकालीन महत्त्वाचे कायदे समजून घ्यावेत. उदा. रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट-१७७३, पीट्स कायदा-१७८४, चार्टर अ‍ॅक्ट-१८१७, चार्टर अ‍ॅक्ट-१८५३ इ. याशिवाय १९०९ चा मोल्रे-िमटो, १९१९चा मॉटेग्यू चेम्सफर्ड कायदा, १९३५चा भारत सरकारचा कायदा. याशिवाय भारतीय राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्व, केंद्रीय कायदे मंडळ ज्यात भारतीय संसद, लोकसभा, राज्यसभा, भारतीय संसदेचे अधिकार, तसेच केंद्रीय कायदे मंडळात- राष्ट्रपती त्यांची निवडप्रक्रिया, पात्रता, त्यांचे अधिकार, उपराष्ट्रपती यांचा अभ्यास करावा.
याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळ अभ्यासताना मंत्रिमंडळाचे कार्य, पंतप्रधान, पंतप्रधानांचे अधिकार तसेच महाराष्ट्राचे कायदे मंडळ अभ्यासताना राज्यपाल, विधानसभा, विधानपरिषद यानंतर केंद्रीय न्यायमंडळात- सर्वोच्च न्यायालय, सरन्यायाधीश, त्यांची पात्रता, तसेच महाराष्ट्राच्या न्यायमंडळात उच्च न्यायालय, राज्यातील कनिष्ठ न्यायालय, भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, घटनादुरुस्ती विधेयक त्यासंबंधी चच्रेत असलेले विषय, महत्त्वाचे आयोग उदा. निवडणूक आयोग, वित्त आयोग, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांचा अभ्यास करावा.
भारतातील काही महत्त्वाचे आयोग आणि मंडळे
निवडणूक आयोग
निवडणुका स्वतंत्र व मुक्त वातावरणात होण्यासाठी घटनेच्या ३२४ कलमात स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे.
रचना - निवडणूक आयोगात एक प्रमुख निवडणूक आयुक्त व राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील तितके इतर निवडणूक आयुक्त असतात. त्यांची नियुक्ती, पगार, भत्ते, पात्रता इ. गोष्टी संसदेच्या कायद्यानुसार ठरतात. प्रमुख निवडणूक आयुक्तांची नेमणूक सहा वर्षांसाठी केली जाते किंवा त्यांच्या वयाची ६५ वष्रे पूर्ण होईपर्यंत केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदभ्रष्ट करण्याची पद्धत आहे. तीच पद्धत प्रमुख निवडणूक आयोगाच्या बाबतीत लागू केलेली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जे वेतन, भत्ते व इतर सवलती देण्यात येतात,
तेच वेतन व इतर सवलती मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांना मिळतात. संपूर्ण देशासाठी एकच निवडणूक आयोग आहे. घटकराज्यांसाठी स्वतंत्र निवडणूक आयोग नव्हते. परंतु १९९२ साली झालेल्या ७३व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. त्याकडे स्थानिक शासनाच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविली आहे.
निवडणूक आयोगाची काय्रे
मतदारसंघाची आखणी करणे, मतदारयाद्या तयार करणे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद यांच्या निवडणुका घेणे. तसेच या ठिकाणी काही कारणांमुळे रिकाम्या झालेल्या जागांवर पोटनिवडणुका घेणे, निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे. राजकीय पक्षांना मान्यता देऊन निवडणूक चिन्हे देणे. निवडणूक खर्चावर निगराणी ठेवणे. निवडणूक यंत्रणा उभी करुन प्रत्यक्ष निवडणुका घेणे. मतमोजणी करून अधिकृत निकाल जाहीर करणे. निवडणुकीसंदर्भात शासनाला अहवाल देणे. १९९६ पूर्वी निवडणूक सुधारणांसंबंधी काही पावले उचलली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
६१वी घटनादुरुस्ती करून मतदानासाठी वयाची पात्रता २१ वरून १८ वर्षांवर आणली. मतदारांना ओळखपत्रे दिली आणि निवडणूक खर्चावर मर्यादा आणली. निवडणूक सुधारणासंदर्भात शासनाने न्या. तारकुंडे समिती नेमली होती. त्यात पक्षाच्या उत्पन्नाच्या मार्गाचा उल्लेख, जमा-खर्च हिशेब लिहिणे. सर्व राजकीय पक्षांवर बंधनकारक करावे अशी एक महत्त्वाची शिफारस होती.
व्ही. पी. सिंग सरकारने १९९० साली त्या वेळचे कायदामंत्री दिनेश गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक सुधारणा करण्यासाठी समिती नेमली होती. त्यामध्ये उमेदवाराच्या रकमेत वाढ, सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे, प्रचाराचा कालावधी २० दिवसांहून १४ दिवसांचा करणे, निवडणूक मतदानाच्या दिवशी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देणे, मतदान केंद्रात किंवा परिसरात शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करणे, इलेक्शन डय़ुटीसाठी शासकीय कर्मचाऱ्याबरोबरच इतर क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, पोस्टाच्या मतदान पत्रिकेद्वारे मतदान करणे, निवडणूक अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराने शपथेवर काही माहिती देणे त्यांच्यावर बंधनकारक करणे इत्यादी बाबींचा समावेश होता.
संघ लोकसेवा आयोग
भारतीय राज्यघटनेतील ३१५व्या कलमानुसार संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग स्थापनेसंबंधी तरतूद केली आहे. राज्यघटनेने सनदी सेवकांच्या भरतीसाठी लोकसेवा आयोगाची निर्मिती केली आहे. केंद्रीय सेवा व राज्य सेवा या दोन्ही सनदी सेवकांची भरती लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. ही एक घटनात्मक यंत्रणा असून सक्षम व गुणवत्ताधारक उमेदवाराची प्रशासकीय अंतिम निवड करण्याचे महत्त्वाचे काम करते. आयोगाचे अध्यक्ष व इतर सभासदांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. त्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा किंवा वयाच्या ६५व्या वर्षी निवृत्ती यापकी जो आधी पूर्ण होईल तो असतो. नवी दिल्ली येथे संघ लोकसेवा आयोगाचे कार्यालय आहे.
संघ लोकसेवा आयोगाची काय्रे
केंद्रीय सेवांसाठी घेतल्या जाणाऱ्या पदासाठी परीक्षा घेणे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे. आपल्या कामाचा वार्षकि अहवाल राष्ट्रपतीकडे सादर करणे. संघ शासनाला सनदी सेवांसंबंधीच्या काही महत्त्वाच्या प्रश्नाबाबत सल्ला देणे. उदा. सेवकांच्या शिस्तसंदर्भात, बदल्या आणि बढत्यासंदर्भात उमेदवारी योग्यता ठरविणे, सेवकाने विशिष्ट परिस्थितीत केलेली नुकसानभरपाईची किंवा निवृत्तिवेतनाची मागणी इ. उमेदवारांची अंतिम निवड करुन अंतिम निवड यादी शासनाकडे पाठविणे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
१९३५च्या भारत प्रशासन कायद्यानुसार तत्कालीन मुंबई प्रांताकरिता लोकसेवा आयोगाची स्थापना १९३७ साली करण्यात आली. राज्यघटनेच्या कलम ३१५ नुसार राज्यासाठी लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणे दोन किंवा अधिक राज्यांकरिता संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. १९६२ पासून सध्या अस्तित्वात असलेले महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग प्रस्थापित आहे. मुंबईत आयोगाचे कार्यालय आहे.
कलम ३१५ अन्वये राज्य लोकसेवा आयोगात अध्यक्ष आणि इतर सभासद असतात. सभासदांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार राज्यपाल घेतात. कलम ३१६ नुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सभासदांची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते. प्रत्यक्षात या नेमणुका मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार केल्या जातात. कलम ३१६मध्ये ज्या व्यक्तींनी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत किमान १० वष्रे सेवा केली असेल त्यांची नेमणूक करण्याची तरतूद आहे. त्यांची किमान संख्या एकूण सभासदांच्या निम्म्याहून कमी असता कामा नये. अशी घटना तरतूद आहे. अध्यक्षांचा व सभासदांचा कार्यकाल ग्रहण केल्यापासून सहा वर्षांचा असतो. मात्र हा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी जर त्यांच्या वयाची ६२ वष्रे पूर्ण झाल्यास, त्यांचा कार्यकाल आपोआप संपुष्टात येत असतो. तसेच राज्यपालाकडे राजीनामा देऊन ते पदमुक्त होऊ शकतात. अयोग्य वर्तणुकीच्या कारणास्तव राज्यपाल त्यांना अधिकारपदावरून बडतर्फ करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती निर्धारित करण्याचा अधिकार राज्यपालास दिले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची काय्रे
प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजपत्रित श्रेणी १ व २ मधील पदासाठी लेखी परीक्षा व मुलाखत घेऊन अंतिम निवड करणे, राज्य सरकारच्या रिक्त जागांवर कर्मचार्याची नेमणूक करण्याकरिता स्पर्धापरीक्षा आयोजित करणे, त्याच्या आधारे उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करणे व कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसंबंधीच्या शिफारशी करणे. राज्यपालास, सनदी नोकरांच्या भरतीसंबंधीच्या प्रक्रियेबाबत सल्ला देणे. आपल्या कार्याचा वार्षकि अहवाल राज्यपालास सादर करून राज्य सरकारने जर विशिष्ट उमेदवाराबाबत लोकसेवा आयोगाची शिफारस स्वीकारली नसेल तर त्या संबंधीचे स्पष्टीकरण या अहवालात सादर करणे आवश्यक असते. राज्यघटनेनुसार काही प्रशासकीय बाबींसंबंधी निर्णय घेताना राज्य लोकसेवा आयोगाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये नेमणूक पद्धत व प्रस्थापित पद्धतीत बदल आणि एका मुलकी सेवेतून दुसऱ्या मुलकी सेवेत बदली करणे, बढती करणे इ. संबंधी निकष निश्चित करणेविषयक बाबी येतात.
राष्ट्रीय महिला आयोग
समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण व्हावी, स्त्रियांचे स्वत:चे असे स्वतंत्र स्थान निर्माण व्हावे आणि महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून आपल्या देशात १९९० साली संमत केलेल्या कायद्यानुसार ३१ जानेवारी १९९२ रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
रचना - एक अध्यक्षा व इतर पाच सदस्या मिळून हा आयोग तयार झाला आहे. त्यांची नियुक्ती केंद्र शासनाकडून केली जाते. आयोगात अध्यक्षा व इतर सभासदांशिवाय कामकाज सुरळीत चालण्यासाठी एक सचिव नेमला जातो. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
महिला आयोगाची काय्रे
महिलांच्या हक्कांबाबत समाजात जागरुकता वाढविणे. महिलांवरील अन्यायाची व अत्याचाराची चौकशी करणे. अन्यायग्रस्त महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे.
महिलांच्या सुधारणांच्या संदर्भात असलेल्या कायद्यामध्ये शासनास सुधारणा सुचविणे. महिला विकासाचे मूल्यमापन करणे. या आयोगास दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोग
१९९३ साली भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा मंजूर केला. त्यानुसारच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य मानवी हक्क आयोग व मानवी हक्क न्यायालयांची स्थापना करण्याबाबत त्यामध्ये तरतुदी आहेत.
रचना - राष्ट्रीय मानवी हक्क आयोगात अध्यक्षासह इतर चार सभासद असतात. आयोगात एक सचिव असतो. तो आयोगाचा प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करतो. या आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत. अध्यक्ष व इतर सभासद यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेल्या न्यायाधीशाला अध्यक्षपद दिले जाते.
राज्य मानवी हक्क आयोग
१९९३ साली झालेल्या मानव हक्क संरक्षण कायद्यातच राज्य मानवी हक्क आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे. त्यानुसार महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाची स्थापना १९९३ साली झाली. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाप्रमाणेच घटकराज्याच्या पातळीवर मानवी हक्क आयोगाचे कामकाज चालते.
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग
केंद्र शासनाने १९९२ साली अल्पसंख्याक राष्ट्रीय आयोग कायदा केला. यानंतर या कायद्यांतर्गत १९९३ साली राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली. या आयोगात शासनाकडून नेमलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पाच सभासद असतात.
काय्रे : - अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी केलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे. केंद्र व राज्यातील अल्पसंख्याकांच्या विकासाचे मूल्यमापन करणे. अल्पसंख्याकांचा सामाजिक- आíथक- शैक्षणिक- सांस्कृतिक विकास करण्यासाठी शासकीय पातळीवर काही योजना सुरू करण्याची शिफारस करणे. अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी संविधानात असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करता येईल याचे मूल्यमापन करणे.
भारतातील काही घटकराज्यात राज्य अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्रात आहे. त्याचे कार्य राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाप्रमाणे महाराष्ट्रात चालते.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
भारतातील अनुसूचित जातीच्या रक्षणासाठी भारतीय घटनेत ३३८ व्या कलमात काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी एकच आयोग नेमण्याची सुरुवातीला तरतूद होती. परंतु, २००३ साली झालेल्या ८९ व्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जमाती यांच्यासाठी दोन स्वतंत्र आयोग स्थापन केलेले आहेत. या आयोगाला त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत.
रचना - या आयोगात एक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्य असतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.
काय्रे - अनुसूचित जातीच्या रक्षणासाठी राज्यघटनेत असलेल्या तरतुदींची योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देणे. अनुसूचित जातीचे हक्क हिरावून घेण्याच्या घटना घडल्या असल्यास, त्या स्वरूपाच्या तक्रारी आल्या असल्यास त्यांची सविस्तर चौकशी करणे. अनुसूचित जातीच्या विकासासाठी शासनाच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी केंद्र व राज्य पातळीवर कशाप्रकारे चालू आहे, याचा आढावा घेणे. अनुसूचित जातींना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाला विविध कार्यक्रम सुचवणे.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
२००३ साली झालेल्या ८९ व्या घटनादुरुस्तीने कलम ३३८ अ हे नवे कलम राज्यघटनेत जोडले. त्यानुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाची रचना आणि काय्रे राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या आयोगाप्रमाणेच आहेत.
काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या
पहिली घटनादुरुस्ती (इ.स. १९५१) - भारतीय राज्यघटनेत इ.स. १९५१ मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. घटनेतील पहिली दुरुस्ती एवढय़ापुरतेच तिचे महत्त्व मर्यादित नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निकालांमुळे जमीन सुधारणाविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीच्या मार्गात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या दूर करणे हा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता.
पहिल्या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या १९ व्या कलमात बदल करण्यात आले. त्यानुसार भाषण स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर काही नवे र्निबध लादण्यात आले; तसेच या दुरुस्तीने राज्यघटनेत ३१-अ आणि ३१-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.
सातवी घटनादुरुस्ती (इ.स. १९५६) - भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यपुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी इ.स. १९५६ मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली. इ.स. १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याबरोबरच ही घटनादुरुस्तीही संमत केली गेली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संघराज्यातील राज्यांचे 'अ', 'ब' आणि 'क' अशा तीन प्रकारांत किंवा गटांत वर्गीकरण करण्यात आले होते. या घटनादुरुस्तीने हे वर्गीकरण रद्द ठरविण्यात आले आणि संघराज्यातील सर्व घटकराज्यांना समान दर्जा देण्यात आला. याशिवाय काही केंद्रशासित (संघ)प्रदेश निर्माण करण्यात आले. सातव्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आलेल्या घटकराज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे १४ व ६ इतकी झाली.
या घटनादुरुस्तीने आणखीही काही महत्त्वाचे बदल घडवून आणले. घटकराज्यांच्या विधानसभेची सभासद संख्या जास्तीत जास्त ५०० व कमीत कमी ६० इतकी असेल अशी व्यवस्था करण्यात आली. दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी एकाच राज्यपालाची नियुक्ती करणे, दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी एकाच उच्च न्यायालयाची स्थापना करणे, भाषिक अल्पसंख्यांकाना संरक्षण मिळवून देण्याविषयीची व्यवस्था करणे यांसारख्या तरतुदीही या घटनादुरुस्तीअन्वये करण्यात आल्या.
१७ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९६४) - ही घटनादुरुस्ती राज्यघटनेतील कलम ३१मधील मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे. पहिल्या व चौथ्या घटनादुरुस्तीअन्वये या कलमात काही बदल करण्यात आले होते; परंतु जमीन सुधारणाविषयक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे बदल पुरेसे नाहीत, असे सरकारला वाटले. यानुसार घटनेतील कलम '३१ अ' मधील 'मालमत्ता' या शब्दाचा अर्थ व्यापक बनविण्यात आला. त्याअंतर्गत रयतवारीतील जमिनी आणि ज्यांच्या संदर्भात जमीन सुधारणा कायदे केले आहेत अशा जमिनींचाही त्यात अंतर्भाव करण्यात आला. याशिवाय घटनेच्या नवव्या परिशिष्टात आणखी काही जमीन सुधारणा कायद्यांचा समावेश करण्यात आला.
२४ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९७१) - या घटनादुरुस्तीने असे स्पष्ट करण्यात आले की, घटनेच्या ३६८व्या कलमानुसार केलेल्या दुरुस्तीला १३ व्या कलमातील कोणतीही तरतूद लागू होणार नाही. तसेच या घटनेत काहीही नमूद केलेले असले तरी ३६८व्या कलमात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार सुधारणा, बदल किंवा रद्द करण्याच्या मार्गाने या घटनेतील कोणतीही तरतूद दुरुस्त करण्याचा संसदेला अधिकार असेल याचा पुनरुच्चार करण्यात आला.
या घटनादुरुस्तीने केलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकासंबंधी राष्ट्रपतीला नकाराधिकार असणार नाही हे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना स्वाक्षरी करावीच लागेल, अशी तरतूद करण्यात आली.
४२ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९७६) - प्रामुख्याने सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आली. देशाच्या इतिहासात अत्यंत खळबळजनक ठरलेली ४२वी घटनादुरुस्ती आहे.
त्यातील प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे होत्या - १) राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नव्याने समाविष्ट केले.
२) मूलभूत कर्तव्याचे कलम ५१ए येथे घटनेत प्रथमच समावेश करण्यात आले.
३) लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाल पाच वर्षांवरून सहा वर्षांपर्यंत वाढविण्यात आला.
४) मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक केला.
५) मूलभूत हक्कापेक्षा मार्गदर्शक तत्त्वांना अधिक महत्त्व दिले.
६) घटनेच्या ३६८ व्या कलमात दुरुस्ती केली. घटनादुरुस्तीच्या संदर्भात संसदेचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यात आले.
४४ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९७८) - १) ४२ व्या घटनादुरुस्तीमधील वादग्रस्त भाग दूर करणे हा या घटनादुरुस्तीचा उद्देश होता.
२) संपत्तीचा हक्का हा मूलभूत हक्कांतून वगळण्यात आला.
३) लोकसभेचा व विधानसभेचा कार्यकाल पुन्हा पाच वर्षांचा करण्यात आला.
४) ३५२ कलमात अंतर्गत गोंधळ हा शब्द काढून टाकून त्याऐवजी सशस्त्र उठाव, युद्ध किंवा बाह्य आक्रमणे यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.
५२ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९८५) - पक्षांतराच्या वाढत्या प्रमाणावर बंधने घालण्याच्या दृष्टीने ही घटनादुरुस्ती केली. पक्षांतरबंदी विधेयक संमत झाले. राजकारणातील पक्षांतराच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान राजीव गांधी सत्तेवर आल्याबरोबर ही घटनादुरुस्ती झाली. याच घटनादुरुस्तीने घटनेला दहावे परिशिष्ट जोडले.
६१ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९८९) - या घटनादुरुस्तीन्वये घटनेच्या ३२६ व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी पूर्ण करावयाच्या वयोमर्यादेच्या अटीबाबत होती. राज्य घटनेतील मूळ तरतुदीनुसार वयाची २१ वष्रे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लोकसभा व राज्य विधानसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदानाचा हक्क देण्यात आला होता. या घटनादुरुस्तीने वयोमर्यादेची अट २१ वर्षांवरून १८ वर्षांपर्यंत खाली आणली; त्यामुळे आता वयाची १८ वष्रे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
७३ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९९३) - अलीकडील काळातील बहुचíचत घटनादुरुस्त्यांपकी ही एक घटनादुरुस्ती होय. पंचायत राज संस्थांना किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्याचे कार्य तिने केले आहे. ७३ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेत 'पंचायती' या शीर्षकाखाली भाग ९ या नव्या भागाचा अंतर्भाव करण्यात आला; तसेच कलम २४३ ते २४३-ओ अशी सोळा नवी कलमे समाविष्ट करण्यात आली. याशिवाय परिशिष्ट ११ हे नवे परिशिष्टही जोडण्यात आले. या घटनादुरुस्तीने पंचायत राजची स्थापना ही आता राज्यांची 'घटनात्मक जबाबदारी' बनली आहे. घटनेच्या ११व्या परिशिष्टात पंचायतीच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या २९ विषयांचा तपशील दिला आहे.
७४ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९९३) - ७४ वी घटनादुरुस्ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित आहे. त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीप्रमाणेच या घटनादुरुस्तीचा उद्देशही स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम बनविणे आणि त्यांना आणखी अधिकार प्रदान करणे हा आहे. चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीअन्वये 'नगरपालिका' या शीर्षकाखाली भाग ९-अ हा नवा भाग समाविष्ट करण्यात आला. त्यामध्ये २४३-पी ते २४३-झेड जी अशी कलमे आहेत. याखेरीज घटनेस नवे १२ वे परिशिष्टही जोडण्यात आले आहे.
या घटनादुरुस्ती कायद्यात नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा तीन प्रकारच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्याबाबतची तरतूद आहे. तसेच राज्यांनी या संस्थांची स्थापना करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. नगरपालिकांची रचना, त्यांचा कार्यकाल, निवडणुका, जागांचे आरक्षण, अधिकार व काय्रे, वित्त आयोगाची स्थापना इत्यादी तरतुदी या भागात करण्यात आल्या आहेत. याशिवाय घटनेच्या बाराव्या परिशिष्टात नगरपालिकांच्या अखत्यारित येणाऱ्या १८ विषयांची माहिती देण्यात आली आहे.
८६ वी घटनादुरुस्ती (इ.स. २००२) - या घटनादुरुस्तीने घटनेच्या २१व्या कलमात २१-अ हे नवे कलम जोडण्यात आले. त्यानुसार सहा ते १४ या वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आला; त्यामुळे वरील वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी बनली आहे.
९२ वी घटनादुरुस्ती (इ.स. २००३) - या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टात बदल करण्यात आला. या परिशिष्टात घटनेने मान्यता दिलेल्या अधिकृत भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या घटनादुरुस्तीने बोडो, डोग्री, मथिली व संथाली या आणखी चार भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली; त्यामुळे आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता २२ इतकी झाली आहे.
९३ वी घटनादुरुस्ती (इ.स. २००६) - या घटनादुरुस्तीअन्वये अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी अनुदानित किंवा विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी खासगी शिक्षण संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्याची तरतूद करण्यास राज्यास आडकाठी करता येणार नाही.
११० वी घटनादुरुस्ती (इ.स. २००९) - २६ नोव्हेंबर २००९ रोजी ११० घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकान्वये घटनेतील कलम २४३ ड मध्ये दुरुस्ती प्रस्तावित असून पंचायत संस्थांमध्ये स्त्री-प्रतिनिधींसाठी असलेले एकतृतीयांश आरक्षण आता किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढवणे नियोजित आहे. 

MPSC Prelim PAPER I घटक ३- भारतीय राज्यपद्धती

.mpsc-paper-1:indian constituancy policy.

स्पर्धा परीक्षा एमपीएससीची असो किंवा यूपीएससीची भारतीय राज्यपद्धती व प्रशासन हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यूपीएससीच्या दोन सी-सॅट परीक्षेत या घटकावर सुमारे २५ ते ३० प्रश्न विचारले होते. जर राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाचा पेपर-२ याच घटकावर आहे.

MPSC PRI.. USEFULL BOOKS

MPSC PRI.. USEFULL BOOKS
-
-
-
अ. क्र. पुस्तकाचे नाव प्रकाशन विषय किमंत आवृती वर्ष

1 आधुनिक जगाचा इतिहास के[dot]सागर पब्लीकेशन, पुणे[dot] एम.पी.एस.सी. प्रिलीम्स १२०/- >२००५

2 एम.पी.एस.सी. मनोप्रभा पब्लीकेशन एम.पी.एस.सी. प्रिलीम्स ९०/- >२००६

3 एम.पी.एस.सी. पूर्व परीक्षा श्री[dot]र[dot]घ[dot]वराडकर एम.पी.एस.सी. प्रिलीम्स ८५/- >२००५

4 एम.पी.एस.सी.पूर्व परीक्षा चाणक्य मंडल परीवार,१५५७ सदाशिव पेठ,पुणे:४११०३०, फोन ०२०-२४३३८५४२,२४३२११७७[dot]ई-मेल: chantank[at]pn2[dot]vsnl[dot]net[dot]in एम.पी.एस.सी. प्रिलीम्स ४५/- >२००६

5 एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा के[dot]सागर पब्लीकेशन एम.पी.एस.सी. प्रिलीम्स ८५/- >२००५

6 चालू घडामोडी के[dot]सागर पब्लिकेशन एम.पी.एस.सी. प्रिलीम्स १००/- >२००६

7 चालू घडामोडी व सामान्य ज्ञान विद्या पब्लिकेशन एम.पी.एस.सी. प्रिलीम्स २०/- >२००६

8 चालू घडामोडी व सामान्य ज्ञान निकिता प्रकाशन एम.पी.एस.सी. प्रिलीम्स २२/- >२००५

9 पंचायत राज व नागरी प्रकाशन कैलास पब्लीकेशन एम.पी.एस.सी. प्रिलीम्स १२५/- >२००५

10 बुद्धीमापन चाचणी मार्गदर्शक स्टडी सर्कल, पुणे[dot] एम.पी.एस.सी. प्रिलीम्स १५०/- >२००५

11 भूगोल संपूर्ण मार्गदर्शक स्टडी सर्कल, पुणे[dot] एम.पी.एस.सी. प्रिलीम्स १५०/- >२००५

12 राज्यशास्त्र संपूर्ण मार्गदर्शक स्टडी सर्कल, पुणे[dot] एम.पी.एस.सी. प्रिलीम्स १५०/- >२००५

13 राज्यसेवा श्री[dot]व्ही[dot]एस[dot]क्षीरसागर एम.पी.एस.सी. प्रिलीम्स १००/- >२००५

14 राज्यसेवा परीक्षा (एम.पी.एस.सी.) प्रा[dot]नवदीप एम.पी.एस.सी. प्रिलीम्स २५/- >२००५

15 राज्यसेवा पूर्व परिक्षा श्री[dot] विद्याधर कांदे पाटील एम.पी.एस.सी. प्रिलीम्स ५५०/- >२००३

महाराष्ट्र - भूगोल

भूगोल
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले राज्य आहे. हे उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य असून क्षेत्रफळानुसार देशातले तिसरे मोठे राज्य आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा २५ % वाटा आहे तसेच २०१०-११ या वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा २३.२ % वाटा आहे.

308,000 किमी2 (119,000mi2) क्षेत्रावर महाराष्ट्राचा विस्तार असून क्षेत्रफळानुसार महाराष्ट्...र हे भारतातले तिस-या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगढ, आग्नेय दिशेला आंध्र प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक, तर नैऋत्य दिशेला गोवा राज्य आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्य असून दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश या दोघांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किना-याला अरबी सुमद्राचे सान्निध्य लाभले आहे.

समुद्रकिना-याला समांतर असणारा पश्चिमी घाट, सह्याद्री म्हणून प्रसिध्द आहे. या सह्यकड्यांमध्ये नाशिक शहराजवळ असणारे कळसुबाई हे 1200 मी. (4000 फूट) उंचीचे महाराष्ट्रातले अत्युच्च शिखर आहे. या सह्यकड्यांच्या पश्चिमेला 50 ते 80 किलोमीटर रूंदीचा कोकण किनारा आहे. या पश्चिम घाटामधून अनेक नद्या उगम पावतात. त्यापैकी गोदावरी आणि कृष्णा या दक्षिण भारतातील प्रमुख नद्या बंगालच्या खाडीपर्यंत प्रवास करतात. या नद्यांनी देशातले एक मोठे खोरे तयार केले आहे.
महाराष्ट्रात 35 जिल्हे असून प्रशासकीय हेतूने त्यांची विभागणी सहा महसूली विभागांत (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर) आणि आठ शैक्षणिक विभागांत (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, आणि लातूर) करण्यात आली आहे. या 35 जिल्ह्यांची विभागणी 109 उपविभाग आणि 355 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक अथवा जिल्हा स्तरावर नियोजनाच्या सक्षम यंत्रणांची दीर्घ परंपरा आहे. ग्रामीण भागात स्वयं-प्रशासनासाठी 33 जिल्हा परिषदा, 355 पंचायत समित्या आणि 27,993 ग्राम पंचायती कार्यरत आहेत. शहरी भागात 23 महानगर पालिका, 222 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायती कार्यरत आहेत.
भू शास्त्रीय रूपरेखा

हवामान
महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण मान्सूनसह उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू अनुभवता येतात. उन्हाळा - (मार्च ते मे), पावसाळा - (मान्सून), (जून ते सप्टेंबर), मान्सूनोत्तर (ऑक्टोबर ते नोव्हेंबर), हिवाळा (जानेवारी ते मार्च)

नैसर्गिक साधनसंपत्ती
मॅगेनीज, कोळसा, लोह, चुनखडी, तांबे, बॉक्साईट, सिलिका, वाळू आणि मीठ अशी अनेक खनिजे महाराष्ट्रात सापडतात. यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर हे जिल्हे कोळशाच्या खाणींनी समृध्द आहेत. 1970 साली बॉम्बे हाय या तेल क्षेत्राजवळ समुद्राखाली तेलाच्या साठ्याचा शोध लागला.

भौगोलिक वैशिष्टये
दख्खनचे पठार, कोकणचा समुद्रकिनारा आणि घाट अशा विभिन्न भौगोलिक स्थिती महाराष्ट्रात आढळतात. घाट म्हणजे उंचावरील टेकड्यांचा विस्तार असून ते चिंचोळ्या रस्त्यांनी विभागले गेले आहेत. सह्याद्रीच्या रांगा समुद्रसपाटीपासून 1000 मी. उंचीवर असून, तिथल्या पठारांसाठी प्रसिध्द आहे. कोकण हा समुद्रकिनारी भागात वसलेला अरूंद भूभाग आहे. त्याची रूंदी 50 किमी असून, हा भाग समुद्रसपाटीखाली 200 मी वर वसलेला आहे. उत्तरेकडे सीमेवरील सातपुडा पर्वतरांगा हा आणखी एक महत्वाचा भूभाग. या भागात पूर्व सीमेवरील भामरागड-चिरोली-गायखुरी रांगांनी एक अभेद्य तटबंदीच उभी केली आहे. या रांगाही राज्यासाठी नैसर्गिक संरक्षक ठरल्या आहेत.

मुख्य नद्या
गोदावरी, कृष्णा आणि तापी या राज्यातल्या महत्वाच्या अशा तीन नद्या आहेत.

वनस्पती सृष्टी
राज्यातील वने ही प्रामुख्याने सदाहरित, पानझडी प्रकारातील आहेत. यापैकी बहुतेक वने पूर्व आणि सह्याद्रीच्या परिसरात आहेत.

महाराष्ट्रात पाच राष्ट्रीय उद्याने, तीन अभयवने आणि वन्यजीव/ पक्ष्यांसाठी 24 अभयारण्ये आहेत. वाघ, चित्ते, गवे, हरीणे, काळवीटे, रानडुक्करे, अस्वले तसेच नीलगायी आढळून येतात..

स्रोत – भारत सरकार, महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण 2010-11

देशातील रस्त्यांचे सर्वात विस्तृत जाळे महाराष्ट्रात (एकूण भारतीय रस्ते जाळ्यापैकी 7%) असून या भागातील 97.5% गावे परस्परांशी चांगल्या रस्त्यांनी तर 2% उत्तम रस्त्यांनी जोडली गेली आहेत. राज्यात मध्य आणि देशातील रेल्वे विभागाची 2 मुख्यालये आहेत. देशातील एकूण रेल्वे जाळ्यापैकी महाराष्ट्रात 9.2% रेल्वे जाळे पसरलेले आहे. अमेरीका, युरोप, आशिया तसेच भारतातील प्रमुख शहरांशी, राज्य हवाई मार्गानेही जोडलेले आहे. देशात सर्वाधिक विमानतळांची संख्याही (6%) महाराष्ट्रात आहे. 

नोकरीच्या संधींची कवाडे खुली :

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आता मोठ्या संधी खुल्या होणार आहेत . त्यामुळेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आता सज्ज व्हायला हवे . येत्या काही महिन्यांत केंद्रीय व राज्य स्तरावरील सरकारी विभ...ाग वा आस्थापनांमध्ये अधिकारी तसेच अन्य कर्मचारी वर्गाची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे .

मार्च महिन्यात २० राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ' स्पेशालिस्ट ऑफिसर्स ' या पदासाठी परीक्षा होणार आहे . यात माहिती तंत्रज्ञान अधिकारी , कृषी अधिकारी , हिंदी भाषा अधिकारी , विधी अधिकारी , तांत्रिक अधिकारी , चार्टर्ड अकाउंटन्ट , फायनान्स एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांचा समावेश आहे . २० बँकात मिळून ७ ते ८ हजार पदे याद्वारे भरली जाणार आहेत . डिसेंबर २०१२ मध्ये राष्ट्रीयकृत बँकात साधारणत : ५० , ००० लिपिकपदासाठी लेखी परीक्षा झाली . प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया यावर्षी होईल .

२८ एप्रिल रोजी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे . यात १५०० अधिकाऱ्यांची भरती होणार आहे . बँकांप्रमाणेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्याही जाहिराती प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आहे . ७ एप्रिल रोजी एमपीएससी . २६१ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे . याशिवाय पोलिस उपनिरीक्षक , विक्रीकर निरीक्षक , सहायक या महत्त्वाच्या पदांसाठी एप्रिल , मे , जून या कालावधी पूर्वपरीक्षा होणार आहेत .

केंद्रीय स्तरावर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे १९ मे रोजी ' नागरी सेवा परीक्षा ' ( आयएएस / आयपीएस वगैरे पदांसाठी परीक्षा ) घेण्यात येणार आहे . यावेळी जवळपास १००० जागा यावेळी उपलब्ध असतील , अशी अपेक्षा आहे .

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे पदवीधरांसाठी घेण्यात येणाऱ्या ' कम्बाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम ' मधून २०१२ साली १९००० जागांसाठी भरती झाली . इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर , टॅक्स असिस्टंट , स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर , इन्फोर्समेंट ऑफिसर , सीबीआय सब इन्स्पेक्टर , कॅगमध्ये ऑडिटर व अकाउंटंट इ . विविध पदांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते . यावर्षी १४ व २१ एप्रिल रोजी ही परीक्षा घेण्यात येत आहे .

MPSC Prelim PAPER I घटक ७ - सामान्य विज्ञान

स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने सामान्य विज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यूपीएससीच्या गेल्या दोन सीसॅट परीक्षांतील घटकांचा विचार केल्यास या घटकावर सुमारे ३० ते ३५ प्रश्न विचारले गेले आहेत. खरंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या घटकाचा आवाकाच लक्षात येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करताना मानवी आरोग्य, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अणुतंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा अभ्यास करायला हवा.
विज्ञानाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो, यासंबंधित प्रश्न या घटकांवर विचारले जातात. यूपीएससी व एमपीएससी या परीक्षेच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी खालील घटकांवर भर द्यावा-
१) भौतिकशास्त्र - ध्वनी, प्रकाश, उष्णता, विद्युत चुंबकत्व, लेझर, नॅनो टेक्नॉलॉजी, ऊर्जा इत्यादी.
२) रसायनशास्त्र - अणुरचना, कार्बन संयुगे, पेट्रोलियम पदार्थ, दैनंदिन जीवनात वापरत असलेली विविध संयुगे.
३) आरोग्यशास्त्र - आहारविज्ञान, मानवाला होणारे रोग, मानवाच्या शरीरातील कार्यपद्धती.
४) भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती - यात भारताचे अवकाश तंत्रज्ञान, भारताचे अण्वस्त्र धोरण, भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम, जैवतंत्रज्ञान इ.
मानवाचे आजार
रोगांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत -
अ) संसर्गजन्य रोग- हे रोग जीवाणूंमुळे, विषाणूंमुळे, एकपेशीय आदिजीवांमुळे, कवकांमुळे आणि कृमींमुळे होऊ शकतात.
ब) असंसर्गजन्य रोग - हे रोग शरीराच्या एखाद्या अवयवाच्या बिघाडामुळे होतात.
संसर्गजन्य रोग : 
१) जीवाणूजन्य रोग  (Bacterial Diseases)-
१. विषमज्वर (Typhoid) - हा रोग Salmonella typhi या जीवाणूंमुळे होतो. या रोगात आतडे (आतडे व प्लीहा) यांना प्रादुर्भाव होतो. हा रोग पाण्यातून पसरणारा असल्यामुळे मुख्यत: पावसाळ्यात होतो. 
 लक्षणे : ताप, खूप डोकेदुखी, प्लीहाचा आकार खूप मोठा होतो. मळमळ इ.
२. पटकी (Cholera) : हा रोग vibro choler या जीवाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार पाण्याद्वारे होतो. या रोगामुळे अन्ननलिकेच्या पचनपट्टय़ास प्रादुर्भाव होतो.
लक्षणे - प्रचंड मळमळ, डायरिया, डिहायड्रेशन इ.
३. डिफ्थेरिया  (Dyptheria) : हा रोग Corynebacterium Diphtheriae  या जीवाणूंमुळे होतो. हा पाच वर्षांखालील मुलांचा रोग आहे. या रोगामुळे श्वासनलिकेस प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे घशात हळूहळू करडय़ा रंगाचा पडदा तयार होतो. उपचार न केल्यास श्वास कोंडून मुलाचा मृत्यू होऊ शकतो.
लस : या रोगाविरुद्ध ऊढळ नावाची लस दिली जाते. DPT  म्हणजे Diphtheria, Pertussis U Tetanus होय. या लसीमुळे दीर्घकालीन संरक्षण प्राप्त होते.
४. धनुर्वात (Tetanus) : हा रोग Clostridium Tetani या जीवाणूंमुळे होतो. हा जीवाणू फक्त ओल्या जखमेतूनच प्रवेश करू शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होतो. लस : DPT.
५. डांग्या खोकला (Pertusis / Whopping Cough) : हा रोग Hemophilus pertusis या जीवाणूंमुळे होतो. हा लहान मुलांचा धोकादायक नसलेला रोग आहे. या रोगामुळे श्वासनलिकेस प्रादुर्भाव होतो. लस - DPT.
६. क्षयरोग (Tuberculosis) : हा रोग Mycobacterium Tuberculosis  या जीवाणूंमुळे होतो. संसर्गजन्य रोगांपकी हा सर्वाधिक संसर्गजन्य रोग आहे. या जीवाणूंचा प्रसार हवेतून होतो. रोगाच्या खोकल्यामुळे, त्याच्या कपडय़ामुळे तसेच त्याच्या सान्निध्यात जास्त वेळ राहिल्यास या रोगाचा संसर्ग होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: फुप्फुसांना होतो. क्षयाचे जीवाणू माणसाच्या श्वासनलिकेत नेहमी असतातच. मात्र शरीराच्या रोगप्रतिकारक व्यवस्थेमुळे ते नियंत्रणाखाली असतात. लक्षणे : खोकला, संध्याकाळी ताप, वजन कमी इ., औषधे : Streptomycin.., लस : क्षय रोगावर BCG (Bacillus Calmette Guerin) ही लस वापरली जाते.
७. कुष्ठरोग (Leprosy / Hansenls Disease [HD]) :
हा रोग Mycobacterium Laprae या दंडाकृती जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूचा Incubation Period खूप मोठा असतो. हा रोग संसर्गजन्य रोगांपकी सर्वात कमी संसर्गजन्य आहे. त्याचा शोध नॉर्वेच्या डॉ. आर्मर हॅन्सन यांनी लावला. लक्षणे: त्वचेवर चट्टे, त्वचा कोरडी, त्वचा संवेदनशील, त्वचेवर छोटय़ा गाठी, शेवटच्या टप्प्यात हातापायांची बोटे झडून जातात. कुष्ठरोगाच्या तीन अवस्था असतात. त्यापकी दुसऱ्या अवस्थेत रोग्याच्या शरीरात सर्वाधिक लेप्रा जीवाणू असल्याने तो सर्वाधिक संक्रामक असतो. तिसऱ्या अवस्थेत मात्र जीवाणूंची संख्या फारच कमी राहिल्याने रोगी कमी धोकादायक असतो.
कुष्ठरोगावर सध्या (MDT- Multi Drug Therapy)  ही उपचारपद्धती वापरली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने Dapsone, इतर रसायने एकत्रित असतात.  (DDS)जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातून या रोगाचे जवळजवळ निर्मूलन होत आले आहे.
८. न्यूमोनिया (Pneumonia): हा रोग Diplococcus Pneumoniae या जीवाणूंमुळे होतो. या रोगामध्ये फुप्फुसांना प्रादुर्भाव होऊन त्यांचा दाह होत असतो. हा रोग मुख्यत जीवाणूंमुळे होतो. मात्र तो विषाणूंमुळेसुद्धा होऊ शकतो. (उदा.SARS हा न्यूमोनियासारखा रोग विषाणूजन्य आहे.) लक्षणे : ताप, श्वासासाठी त्रास, छातीत दुखणे इ., लस उपलब्ध नाही.
९. प्लेग (Plague) : हा रोग Yersinia pestis या जीवाणूंमुळे होतो. हा रोग मुख्यत: उंदरांचा आहे. उंदरांना तो पिसवांमुळे होतो. उंदराच्या शरीरावरील पिसू माणसाला चावल्यास तो माणसांना होतो.
प्लेगचे तीन टप्पे : १. Bubonic Stage - लसिका ग्रंथीचा दाह, २. Pneumonic Stage या फुप्फुसांचा दाह, ३. Septicaemic Stage : संसर्ग रक्तामध्ये पसरतो.
 विषाणूजन्य रोग 
१. देवी (Small Pox) : हा रोग Variola  या विषाणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो. लक्षणे : ताप, संसर्गानंतर तीन ते चार दिवस अंगावर पुळ्या येतात. लस : देवीची लस.  भारतातून देवीचे समूळ उच्चाटन झाले आहे. १९७५ पासून देवीची लस देण्यात येत नाही.
२. कांजिण्या (Chicken Pox) - हा रोग Vericella-zoster या विषाणूंमुळे होतो. हा रोग मुख्यत: लहान मुलांचा आहे. मात्र तो तरुणांनासुद्धा होऊ शकतो. हा रोग धोकादायक नाही. ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ. लस : उपलब्ध नाही. मात्र एकदा होऊन गेल्यानंतर आयुष्यभर संरक्षण प्राप्त होते व पुन्हा येण्याची शक्यता कमी असते.
३. गोवर (measles) : हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो. हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यत: पाच वर्षांखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते. लक्षणे : ताप, कोरडा घसा. तिसऱ्या दिवशी तोंडात पांढरा ठिपका. चौथ्या दिवशी पुरळ. लस : गोवरविरोधी लस आयुष्यभर संरक्षण.
४. रुबेला (Rubella  किंवा German measles) : हा रोग Myxovirus  या विषाणूंमुळे होतो.
लस : रुबेलाविरोधी लस. जीवनभर संरक्षण.
५. गालगुंड (Mumps) : हा रोग Paramyxo virus या विषाणूंमुळे होतो. लस : गालगुंडविरोधी लस.
६. पोलिओ (Poliomyelitis) : हा रोग Entero virus या विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो. 
लस : पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो. 
१. Self V शरीरात इंजेक्शनद्वारे दिली जाते. २Sebine  तोंडाद्वारे दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतासाठी Sebine  या लसीची शिफारस केली आहे. नोव्हेंबर १९९५ पासून भारताने पल्स पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine)दिले जाते.
७. इन्फ्ल्युएन्झा (Influenza) : हा रोग Orthomyxo virus या विषाणूंमुळे होतो. हा रोग हवेतून पसरणारा आहे. या रोगाचा प्रादुर्भाव श्वसन संस्था, मज्जासंस्था आणि यकृत आतडे संस्था यावर होतो.
८. रॅबीज (Rabbies / Hydrophobia): हा रोग Rhabdo virus या विषाणूंमुळे होतो. हा विषाणू ओल्या जखमेतूनच प्रवेश करतो. या रोगाचा प्रादुर्भाव पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो. लस : रॅबीजविरोधी लस.
९. हेपॅटिटिस :  हेपॅटिटिस ही यकृताची रोगग्रस्त स्थिती आहे.  हेपॅटिटिस अ - हा HAV मुळे होणारा तीव्र सांसíगक रोग आहे. या रोगाचे संक्रमण दूषित पाणी व अन्नाद्वारे होते. या रोगावर निश्चित उपचार नाहीत. परंतु झोपून विश्रांतीची शिफारस केली जाते. हेपॅटिटिस बी - हा HBV मुळे होणारा तीव्र सांसíगक रोग आहे. त्यामुळे यकृताचा कॅन्सरही होऊ शकतो. या विषाणूचा प्रादुर्भाव पुढीलप्रमाणे होतो - रक्त पराधन (Blood Transfusion) र्निजतुक न केलेल्या सुया व सिरिंजचा वापर, एकमेकांचे रेझर, टुथब्रश, अनतिक लंगिक संबंध, आईकडून अर्भकाकडे इ., 
लस - Shanvac - B  .भारताने जनुकीयदृष्टय़ा उन्नत केलेली पहिली लस आहे. हैदराबादच्या शांधा बायोटेक या संस्थेने या लसीची निर्मिती केली आहे.
१०. एड्स : एड्स म्हणजे Acquired Immuno Deficiency Syndrome होय. हा रोग Human Immuno Deficiency Virus या विषाणूंमुळे होतो. - HIV हा एक वैशिष्टय़पूर्ण विषाणू असून त्याचा जनुकीय घटक हा DNA  च्या ऐवजी RNA  असतो. हा विषाणू पांढऱ्या रक्तपेशींपकी T-4 Lymphocytes प्रकारच्या रक्तपेशींवर हल्ला करत असतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. ती कमी झाल्यामुळे इतर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. एड्सग्रस्त व्यक्तीचे दूषित रक्त, रक्तपेशी, रक्तपट्टिका यांमार्फत प्रसार. उदा. अशा रक्ताने दूषित इंजेक्शनचा वापर.
एड्सच्या चाचण्या : HIV चे अस्तित्व शोधण्यासाठी पुढील चाचण्या केल्या जातात. ELISA : Enzyme linked immumosorbent assay, s.Western Blot Technique, t. HIV Dipstick Test.
लस : एड्सविरोधी कोणतीही प्रभावी लस आतापर्यंत निर्माण करण्यात आलेली नाही. कारण एचआयव्ही या विषाणूमध्ये जलद गतीने जनुकीय उत्परिवर्तन (Genetic Mutation) घडून येत असते.
एकपेशीय आदिजीवांमुळे होणारे रोग
१. हिवताप (Maleria) :
हा रोग प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स नावाच्या आदिजीवामुळे होतो. त्याचा प्रसार अ‍ॅनोफीलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. लक्षणे ठरावीक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लीहा मोठय़ा होणे, अ‍ॅनिमियाची कमीअधिक तीव्रता इत्यादी. हिवतापावर उपचार क्लोरोक्वीन क्विनाइन यासारखी हिवतापविरोधी औषधी देऊन केला जातो. पाण्यात गॅम्बुशिया किंवा गप्पी मासे सोडून डासांच्या अळ्यांचे जैविकरीत्या नियंत्रण करता येते.
२. अमिबिअ‍ॅसिस (Amoebiasis):
हा रोग अमिबा या आदिजीवामुळे होतो. प्रसार पाण्यामार्फत होतो. संसर्ग मोठय़ा आतडय़ांना होतो. डायरिया, पोटदुखी इ. यांची लक्षणे आहेत.
३. स्लििपग सिकनेस (Sleeping Sickness) 
आदिजीव - Trypanosoma., प्रसार त्सेत्से (tsetse) नावाची माशी चावल्याने होतो. संसर्ग लाल रक्तपेशींना, कालांतराने रक्तातून मेंदूला होतो. या रोगाच्या लक्षणे : यकृत व प्लीहा मोठी होणे, पुढच्या टप्प्यामध्ये व्यक्तीला दिवसभर झोपावेसे वाटते. त्यापुढील टप्प्यात तो कोमात जाऊ शकतो.
४. काला आजार (Kala-Azar / Dum dum fever) : 
आदिजीव -  Leishmania Donovani, प्रसार - सॅड फ्लाय नावाची माशी चावल्यास. लक्षणे - नाकातून व हिरडय़ांमधून रक्तस्त्राव. साध्यांमधून वेदना.
४. कवकांमुळे होणारे रोग (Fungal Diseases):
१. गजकर्ण / नायटा (Ringworm) : प्रसार - अस्वच्छ कुत्रे व मांजरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क तसेच प्रादुर्भाव झालेल्या माणसांच्या वस्तू वापरल्यास. लक्षणे : त्वचेवर लालसर चट्टे पडतात.
कृमींमुळे होणारे रोग
१. अ‍ॅस्कॅरिआसिस(Ascariasis)- सामान्यपणे लहान मुलांमध्ये आढळणारा हा रोग अ‍ॅस्कॅरिस लुब्रिकॉयडीय (Ascaris Lubricoidis)या आंत्रकृमी परजीवीमुळे होतो. यालाच जंत असे म्हणतात. या कृमीच्या अळ्या तसेच प्रौढ या दोहोंमुळे शरीरावर परिणाम होतो. या कृमीचा प्रसार दूषित पाणी व अन्नाद्वारे होतो.
लक्षणे - अळ्यांमुळे यकृत, हृदय, फुप्फुसे यांमध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो. स्नायूंचे अचानक आकुंचन, ताप, अ‍ॅनिमिया इ. लक्षणे दिसतात. प्रौढ जंतांमुळे आंत्रांचा क्षोभ, मोठय़ा आतडय़ांमध्ये वेदना, ताप, जठर व्रण, वांत्या होतात. तसेच अपचन, पोट फुगणे यांसारखा त्रास होऊन 'अ' जीवनसत्त्वाचा नाश होतो.
२. हत्तीपाय रोग : हा रोग व्युचेरेरिआ या कृमीमुळे होतो. या कृमीचा प्रसार क्युलेक्स (Culex) डासाची मादी चावल्यामुळे होतो. हे कृमी साधारणत: शरीराच्या पायातील लसिका वाहिन्यांमध्ये राहून त्यांचा दाह घडवून आणतात. यामध्ये शरीराच्या खालच्या भागाचे पूर्ण विरुपण घडवून आणतात व पायावर सूज येते.
लंगिकरीत्या पारेषित रोग : लंगिकरीत्या पारेषित रोग (STDs)  हा एक सांसíगक रोगांचा असा एक गट आहे, ज्यांचे पारेषण लंगिक संबंधांमुळे होते. उदा. १. एड्स, २. सिफीलिस, ३. गोनोरीया इ.
असंसर्गजन्य रोग
हृदय आणि रक्ताभिसरणाचे रोग -
१. उच्च रक्तदाब (Hypertension) : व्यक्तीचे वय, अनुवांशिक कारणे, अतिलठ्ठपणा, क्षारांचे/ मिठाचे सेवन (प्रतिदिनी पाच गॅ्रमहून जास्त), संतृप्त मेद, मधुमेह, वृक्क रोग यांसारख्या कारणांमुळे उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो.  साधारणत: १३०/८० mm of Hg  पेक्षा जास्त रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजला जातो.
२. कमी रक्तदाब (Hypotension): १००/६०  mm of Hg पेक्षा कमी रक्तदाब म्हणजे कमी रक्तदाब होय. यालाच आपण Low B.P.  असे म्हणतो. जास्त रक्तदाबापेक्षा कमी रक्तदाब ही अवस्था व्यक्तीसाठी जास्त घातक समजली जाते.
अस्थि व स्नायूंचे रोग 
१. सांधेदुखी- सांध्यांमध्ये वेदना होतात. गुडघे, बोटाचे शेवटचे सांधे, खांदे इत्यादीमध्ये वेदना होते.
२. संधिवात- सांध्यांचा दाह. बोटांचे मधले सांधे, हाताचे मनगट, गुडघे, कोपर इत्यादी दाह.
३. संधिरोग / वातरक्ताचा रोग - रक्तात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास ते सांध्यांमध्ये जाऊन साचते. त्यामुळे सांधे सुजतात व खूप वेदना होतात.
मधुमेह 
 हा रोग काबरेदकांच्या अनियमित चयापचयामुळे, तसेच स्वादुिपडाच्या अयोग्य कार्यामुळे निर्माण होतो. कबरेदकांच्या चयापचयामुळे निर्माण झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये योग्य प्रमाणात न शोषली गेल्यास तिचे रक्तातील प्रमाण वाढते. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वादुिपडातून स्रवणाऱ्या इन्सुलिनमार्फत केले जात असते. हे इन्सुलिन स्वादुिपडातील  islets of Langerhans नावाच्या ग्रंथींपकी बीटा पेशींमधून स्रवत असते. या ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यास इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
लक्षणे : मधुमेहाची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे 3स्र्२ म्हणजे पॉलियुरिया (बहुमूत्रता), पॉलिडिप्सीया (खूप तहान लागणे) आणि पॉलिफेजिया (वजन खूप कमी होणे.)
कर्करोग
शरीराच्या कोणत्याही भागात पेशींची अमर्याद होणारी वाढ म्हणजेच कॅन्सर होय. त्यामुळे पेशींच्या गाठी तयार होतात. हे टय़ुमर्स निरुपद्रवी किंवा घातक असू शकतात. कॅन्सर कोणत्याही अवयवाचा होऊ शकतो. मात्र तोंडाचा, स्तनांचा कॅन्सर व रक्ताचा कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात होत असतो. कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा रक्ताद्वारे सर्व शरीरभर पसरतात तेव्हा त्या स्थितीला metastatis  असे म्हणतात. कॅन्सर घडवून आणणाऱ्या विषाणूंचे जनुकीय द्रव्य म्हणून एकतर DNA किंवा RNA  असतात. कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांचा कर्करोग जनुक म्हणतात. उदा. राऊस सार्कोमा विषाणु RSV मधील कर्करोग जनुके.
इतर कारणे : धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनलिका, स्वादुिपड इत्यादीचा कर्करोग होतो. अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो. अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांना कर्करोग होतो.
कॅन्सरची चाचणी : कॅन्सरच्या चाचणीसाठी बऱ्याच मार्गाचा वापर केला जातो. मात्र त्यापकी सर्वाधिक वापरात येणारी चाचणी म्हणजे बायोप्सी होय. यामध्ये शंकास्पद ऊतींचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण केले जाते.
कॅन्सरचा उपचार 
कॅन्सरकारी पेशी व ऊती पूर्णपणे काढून टाकणे. मात्र त्यामध्ये जीवास धोका असतो.
रेडिओ थेरपी : अ. शरीराच्या आतील कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट- ६० चा वापर. ब. थायरॉइड ग्रंथींच्या उपचारासाठी किरणोत्सारी आयोडिनचा वापर. क. जीभ आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी किरणोत्सारी सुयांचा वापर केला जातो.
केमोथेरपी- कॅन्सरविरोधी औषधांचा वापर प्रामुख्याने रक्ताच्या कॅन्सरच्या उपचारासाठी.
जन्मजात रोग 
जन्माच्या आधी किंवा जन्मादरम्यान जडलेले रोग म्हणजे जन्मजात रोग होय. आनुवंशिक / जनुकीय रोग,  गुणसूत्रांमधील रैणवीय बदलांमुळे जनुकीय रोग निर्माण होतात. त्यामध्ये पुढील रोगांचा समावेश होतो.
डाऊन सिंड्रोम : यास मंगोलता तसेच एकाधिक द्विगुणता २१ (Trisomy 21) असेही म्हणतात. यामध्ये २१ गुणसूत्रांच्या जोडीमध्ये दोनऐवजी तीन सारखे गुणसूत्र असतात. त्यामुळे गुणसूत्र रचनेमध्ये एकूण ४७ (४६+१) गुणसूत्रे दिसतात. मानसिक वाढ खुंटणे हे याचे सर्वात ठळक वैशिष्टय़ आहे.
िलग गुणसूत्रांशी संबंधित विकार - टर्नर सिंड्रोम (Turnerls Syndrome): या विकारांमध्ये दोन िलग गुणसूत्रांपकी (X & Y) केवळ एकच  हे गुणसूत्र अस्तित्वात असते. ही गुणसूत्र रचना ४४ + ड अशी दर्शविली जाते. म्हणजेच या विकारांत केवळ ४५ गुणसूत्रे असतात.
लक्षणे - कमी उंची, पसरट मान, कमी केस, दुय्यम लंगिक वैशिष्टय़ांचा विकास होत नाही.
सिकल सेल अ‍ॅनिमिया (Sickle Cell Anamia)
- यास दात्रपेशी पांडुरोग असेही म्हणतात. हिमोग्लोबिन हे तांबडय़ा रक्तपेशींमधील प्रथिन आहे. जर सहाव्या अमायनो आम्लाची (ग्लुटामिक आम्ल) जागा वॅलिन (Valine) ने घेतली तर हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. या विकारास सिकल सेल अ‍ॅनिमिया असे म्हणतात. यामध्ये हिमोग्लोबिनची रक्त वाहून नेण्याची क्षमता कमी होते. अनेकदा तांबडय़ा रक्तपेशींच्या गुठळ्या तयार होतात व त्या नाश पावतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्ताभिसरण संस्था मेंदू, फुप्फुसे, किडनी यांना धोका पोहोचतो. ही स्थिती आनुवंशिक असते.
Source-Dainik Loksatta

अतिशय महत्वाचे...