विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

MPSC Prelim PAPER I घटक ७ - सामान्य विज्ञान

स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने सामान्य विज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यूपीएससीच्या गेल्या दोन सीसॅट परीक्षांतील घटकांचा विचार केल्यास या घटकावर सुमारे ३० ते ३५ प्रश्न विचारले गेले आहेत. खरंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या घटकाचा आवाकाच लक्षात येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करताना मानवी आरोग्य, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अणुतंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा अभ्यास करायला हवा.
विज्ञानाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो, यासंबंधित प्रश्न या घटकांवर विचारले जातात. यूपीएससी व एमपीएससी या परीक्षेच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी खालील घटकांवर भर द्यावा-
१) भौतिकशास्त्र - ध्वनी, प्रकाश, उष्णता, विद्युत चुंबकत्व, लेझर, नॅनो टेक्नॉलॉजी, ऊर्जा इत्यादी.
२) रसायनशास्त्र - अणुरचना, कार्बन संयुगे, पेट्रोलियम पदार्थ, दैनंदिन जीवनात वापरत असलेली विविध संयुगे.
३) आरोग्यशास्त्र - आहारविज्ञान, मानवाला होणारे रोग, मानवाच्या शरीरातील कार्यपद्धती.
४) भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती - यात भारताचे अवकाश तंत्रज्ञान, भारताचे अण्वस्त्र धोरण, भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम, जैवतंत्रज्ञान इ.
मानवाचे आजार
रोगांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत -
अ) संसर्गजन्य रोग- हे रोग जीवाणूंमुळे, विषाणूंमुळे, एकपेशीय आदिजीवांमुळे, कवकांमुळे आणि कृमींमुळे होऊ शकतात.
ब) असंसर्गजन्य रोग - हे रोग शरीराच्या एखाद्या अवयवाच्या बिघाडामुळे होतात.
संसर्गजन्य रोग : 
१) जीवाणूजन्य रोग  (Bacterial Diseases)-
१. विषमज्वर (Typhoid) - हा रोग Salmonella typhi या जीवाणूंमुळे होतो. या रोगात आतडे (आतडे व प्लीहा) यांना प्रादुर्भाव होतो. हा रोग पाण्यातून पसरणारा असल्यामुळे मुख्यत: पावसाळ्यात होतो. 
 लक्षणे : ताप, खूप डोकेदुखी, प्लीहाचा आकार खूप मोठा होतो. मळमळ इ.
२. पटकी (Cholera) : हा रोग vibro choler या जीवाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार पाण्याद्वारे होतो. या रोगामुळे अन्ननलिकेच्या पचनपट्टय़ास प्रादुर्भाव होतो.
लक्षणे - प्रचंड मळमळ, डायरिया, डिहायड्रेशन इ.
३. डिफ्थेरिया  (Dyptheria) : हा रोग Corynebacterium Diphtheriae  या जीवाणूंमुळे होतो. हा पाच वर्षांखालील मुलांचा रोग आहे. या रोगामुळे श्वासनलिकेस प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे घशात हळूहळू करडय़ा रंगाचा पडदा तयार होतो. उपचार न केल्यास श्वास कोंडून मुलाचा मृत्यू होऊ शकतो.
लस : या रोगाविरुद्ध ऊढळ नावाची लस दिली जाते. DPT  म्हणजे Diphtheria, Pertussis U Tetanus होय. या लसीमुळे दीर्घकालीन संरक्षण प्राप्त होते.
४. धनुर्वात (Tetanus) : हा रोग Clostridium Tetani या जीवाणूंमुळे होतो. हा जीवाणू फक्त ओल्या जखमेतूनच प्रवेश करू शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होतो. लस : DPT.
५. डांग्या खोकला (Pertusis / Whopping Cough) : हा रोग Hemophilus pertusis या जीवाणूंमुळे होतो. हा लहान मुलांचा धोकादायक नसलेला रोग आहे. या रोगामुळे श्वासनलिकेस प्रादुर्भाव होतो. लस - DPT.
६. क्षयरोग (Tuberculosis) : हा रोग Mycobacterium Tuberculosis  या जीवाणूंमुळे होतो. संसर्गजन्य रोगांपकी हा सर्वाधिक संसर्गजन्य रोग आहे. या जीवाणूंचा प्रसार हवेतून होतो. रोगाच्या खोकल्यामुळे, त्याच्या कपडय़ामुळे तसेच त्याच्या सान्निध्यात जास्त वेळ राहिल्यास या रोगाचा संसर्ग होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: फुप्फुसांना होतो. क्षयाचे जीवाणू माणसाच्या श्वासनलिकेत नेहमी असतातच. मात्र शरीराच्या रोगप्रतिकारक व्यवस्थेमुळे ते नियंत्रणाखाली असतात. लक्षणे : खोकला, संध्याकाळी ताप, वजन कमी इ., औषधे : Streptomycin.., लस : क्षय रोगावर BCG (Bacillus Calmette Guerin) ही लस वापरली जाते.
७. कुष्ठरोग (Leprosy / Hansenls Disease [HD]) :
हा रोग Mycobacterium Laprae या दंडाकृती जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूचा Incubation Period खूप मोठा असतो. हा रोग संसर्गजन्य रोगांपकी सर्वात कमी संसर्गजन्य आहे. त्याचा शोध नॉर्वेच्या डॉ. आर्मर हॅन्सन यांनी लावला. लक्षणे: त्वचेवर चट्टे, त्वचा कोरडी, त्वचा संवेदनशील, त्वचेवर छोटय़ा गाठी, शेवटच्या टप्प्यात हातापायांची बोटे झडून जातात. कुष्ठरोगाच्या तीन अवस्था असतात. त्यापकी दुसऱ्या अवस्थेत रोग्याच्या शरीरात सर्वाधिक लेप्रा जीवाणू असल्याने तो सर्वाधिक संक्रामक असतो. तिसऱ्या अवस्थेत मात्र जीवाणूंची संख्या फारच कमी राहिल्याने रोगी कमी धोकादायक असतो.
कुष्ठरोगावर सध्या (MDT- Multi Drug Therapy)  ही उपचारपद्धती वापरली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने Dapsone, इतर रसायने एकत्रित असतात.  (DDS)जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातून या रोगाचे जवळजवळ निर्मूलन होत आले आहे.
८. न्यूमोनिया (Pneumonia): हा रोग Diplococcus Pneumoniae या जीवाणूंमुळे होतो. या रोगामध्ये फुप्फुसांना प्रादुर्भाव होऊन त्यांचा दाह होत असतो. हा रोग मुख्यत जीवाणूंमुळे होतो. मात्र तो विषाणूंमुळेसुद्धा होऊ शकतो. (उदा.SARS हा न्यूमोनियासारखा रोग विषाणूजन्य आहे.) लक्षणे : ताप, श्वासासाठी त्रास, छातीत दुखणे इ., लस उपलब्ध नाही.
९. प्लेग (Plague) : हा रोग Yersinia pestis या जीवाणूंमुळे होतो. हा रोग मुख्यत: उंदरांचा आहे. उंदरांना तो पिसवांमुळे होतो. उंदराच्या शरीरावरील पिसू माणसाला चावल्यास तो माणसांना होतो.
प्लेगचे तीन टप्पे : १. Bubonic Stage - लसिका ग्रंथीचा दाह, २. Pneumonic Stage या फुप्फुसांचा दाह, ३. Septicaemic Stage : संसर्ग रक्तामध्ये पसरतो.
 विषाणूजन्य रोग 
१. देवी (Small Pox) : हा रोग Variola  या विषाणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो. लक्षणे : ताप, संसर्गानंतर तीन ते चार दिवस अंगावर पुळ्या येतात. लस : देवीची लस.  भारतातून देवीचे समूळ उच्चाटन झाले आहे. १९७५ पासून देवीची लस देण्यात येत नाही.
२. कांजिण्या (Chicken Pox) - हा रोग Vericella-zoster या विषाणूंमुळे होतो. हा रोग मुख्यत: लहान मुलांचा आहे. मात्र तो तरुणांनासुद्धा होऊ शकतो. हा रोग धोकादायक नाही. ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ. लस : उपलब्ध नाही. मात्र एकदा होऊन गेल्यानंतर आयुष्यभर संरक्षण प्राप्त होते व पुन्हा येण्याची शक्यता कमी असते.
३. गोवर (measles) : हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो. हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यत: पाच वर्षांखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते. लक्षणे : ताप, कोरडा घसा. तिसऱ्या दिवशी तोंडात पांढरा ठिपका. चौथ्या दिवशी पुरळ. लस : गोवरविरोधी लस आयुष्यभर संरक्षण.
४. रुबेला (Rubella  किंवा German measles) : हा रोग Myxovirus  या विषाणूंमुळे होतो.
लस : रुबेलाविरोधी लस. जीवनभर संरक्षण.
५. गालगुंड (Mumps) : हा रोग Paramyxo virus या विषाणूंमुळे होतो. लस : गालगुंडविरोधी लस.
६. पोलिओ (Poliomyelitis) : हा रोग Entero virus या विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो. 
लस : पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो. 
१. Self V शरीरात इंजेक्शनद्वारे दिली जाते. २Sebine  तोंडाद्वारे दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतासाठी Sebine  या लसीची शिफारस केली आहे. नोव्हेंबर १९९५ पासून भारताने पल्स पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine)दिले जाते.
७. इन्फ्ल्युएन्झा (Influenza) : हा रोग Orthomyxo virus या विषाणूंमुळे होतो. हा रोग हवेतून पसरणारा आहे. या रोगाचा प्रादुर्भाव श्वसन संस्था, मज्जासंस्था आणि यकृत आतडे संस्था यावर होतो.
८. रॅबीज (Rabbies / Hydrophobia): हा रोग Rhabdo virus या विषाणूंमुळे होतो. हा विषाणू ओल्या जखमेतूनच प्रवेश करतो. या रोगाचा प्रादुर्भाव पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो. लस : रॅबीजविरोधी लस.
९. हेपॅटिटिस :  हेपॅटिटिस ही यकृताची रोगग्रस्त स्थिती आहे.  हेपॅटिटिस अ - हा HAV मुळे होणारा तीव्र सांसíगक रोग आहे. या रोगाचे संक्रमण दूषित पाणी व अन्नाद्वारे होते. या रोगावर निश्चित उपचार नाहीत. परंतु झोपून विश्रांतीची शिफारस केली जाते. हेपॅटिटिस बी - हा HBV मुळे होणारा तीव्र सांसíगक रोग आहे. त्यामुळे यकृताचा कॅन्सरही होऊ शकतो. या विषाणूचा प्रादुर्भाव पुढीलप्रमाणे होतो - रक्त पराधन (Blood Transfusion) र्निजतुक न केलेल्या सुया व सिरिंजचा वापर, एकमेकांचे रेझर, टुथब्रश, अनतिक लंगिक संबंध, आईकडून अर्भकाकडे इ., 
लस - Shanvac - B  .भारताने जनुकीयदृष्टय़ा उन्नत केलेली पहिली लस आहे. हैदराबादच्या शांधा बायोटेक या संस्थेने या लसीची निर्मिती केली आहे.
१०. एड्स : एड्स म्हणजे Acquired Immuno Deficiency Syndrome होय. हा रोग Human Immuno Deficiency Virus या विषाणूंमुळे होतो. - HIV हा एक वैशिष्टय़पूर्ण विषाणू असून त्याचा जनुकीय घटक हा DNA  च्या ऐवजी RNA  असतो. हा विषाणू पांढऱ्या रक्तपेशींपकी T-4 Lymphocytes प्रकारच्या रक्तपेशींवर हल्ला करत असतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. ती कमी झाल्यामुळे इतर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. एड्सग्रस्त व्यक्तीचे दूषित रक्त, रक्तपेशी, रक्तपट्टिका यांमार्फत प्रसार. उदा. अशा रक्ताने दूषित इंजेक्शनचा वापर.
एड्सच्या चाचण्या : HIV चे अस्तित्व शोधण्यासाठी पुढील चाचण्या केल्या जातात. ELISA : Enzyme linked immumosorbent assay, s.Western Blot Technique, t. HIV Dipstick Test.
लस : एड्सविरोधी कोणतीही प्रभावी लस आतापर्यंत निर्माण करण्यात आलेली नाही. कारण एचआयव्ही या विषाणूमध्ये जलद गतीने जनुकीय उत्परिवर्तन (Genetic Mutation) घडून येत असते.
एकपेशीय आदिजीवांमुळे होणारे रोग
१. हिवताप (Maleria) :
हा रोग प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स नावाच्या आदिजीवामुळे होतो. त्याचा प्रसार अ‍ॅनोफीलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. लक्षणे ठरावीक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लीहा मोठय़ा होणे, अ‍ॅनिमियाची कमीअधिक तीव्रता इत्यादी. हिवतापावर उपचार क्लोरोक्वीन क्विनाइन यासारखी हिवतापविरोधी औषधी देऊन केला जातो. पाण्यात गॅम्बुशिया किंवा गप्पी मासे सोडून डासांच्या अळ्यांचे जैविकरीत्या नियंत्रण करता येते.
२. अमिबिअ‍ॅसिस (Amoebiasis):
हा रोग अमिबा या आदिजीवामुळे होतो. प्रसार पाण्यामार्फत होतो. संसर्ग मोठय़ा आतडय़ांना होतो. डायरिया, पोटदुखी इ. यांची लक्षणे आहेत.
३. स्लििपग सिकनेस (Sleeping Sickness) 
आदिजीव - Trypanosoma., प्रसार त्सेत्से (tsetse) नावाची माशी चावल्याने होतो. संसर्ग लाल रक्तपेशींना, कालांतराने रक्तातून मेंदूला होतो. या रोगाच्या लक्षणे : यकृत व प्लीहा मोठी होणे, पुढच्या टप्प्यामध्ये व्यक्तीला दिवसभर झोपावेसे वाटते. त्यापुढील टप्प्यात तो कोमात जाऊ शकतो.
४. काला आजार (Kala-Azar / Dum dum fever) : 
आदिजीव -  Leishmania Donovani, प्रसार - सॅड फ्लाय नावाची माशी चावल्यास. लक्षणे - नाकातून व हिरडय़ांमधून रक्तस्त्राव. साध्यांमधून वेदना.
४. कवकांमुळे होणारे रोग (Fungal Diseases):
१. गजकर्ण / नायटा (Ringworm) : प्रसार - अस्वच्छ कुत्रे व मांजरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क तसेच प्रादुर्भाव झालेल्या माणसांच्या वस्तू वापरल्यास. लक्षणे : त्वचेवर लालसर चट्टे पडतात.
कृमींमुळे होणारे रोग
१. अ‍ॅस्कॅरिआसिस(Ascariasis)- सामान्यपणे लहान मुलांमध्ये आढळणारा हा रोग अ‍ॅस्कॅरिस लुब्रिकॉयडीय (Ascaris Lubricoidis)या आंत्रकृमी परजीवीमुळे होतो. यालाच जंत असे म्हणतात. या कृमीच्या अळ्या तसेच प्रौढ या दोहोंमुळे शरीरावर परिणाम होतो. या कृमीचा प्रसार दूषित पाणी व अन्नाद्वारे होतो.
लक्षणे - अळ्यांमुळे यकृत, हृदय, फुप्फुसे यांमध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो. स्नायूंचे अचानक आकुंचन, ताप, अ‍ॅनिमिया इ. लक्षणे दिसतात. प्रौढ जंतांमुळे आंत्रांचा क्षोभ, मोठय़ा आतडय़ांमध्ये वेदना, ताप, जठर व्रण, वांत्या होतात. तसेच अपचन, पोट फुगणे यांसारखा त्रास होऊन 'अ' जीवनसत्त्वाचा नाश होतो.
२. हत्तीपाय रोग : हा रोग व्युचेरेरिआ या कृमीमुळे होतो. या कृमीचा प्रसार क्युलेक्स (Culex) डासाची मादी चावल्यामुळे होतो. हे कृमी साधारणत: शरीराच्या पायातील लसिका वाहिन्यांमध्ये राहून त्यांचा दाह घडवून आणतात. यामध्ये शरीराच्या खालच्या भागाचे पूर्ण विरुपण घडवून आणतात व पायावर सूज येते.
लंगिकरीत्या पारेषित रोग : लंगिकरीत्या पारेषित रोग (STDs)  हा एक सांसíगक रोगांचा असा एक गट आहे, ज्यांचे पारेषण लंगिक संबंधांमुळे होते. उदा. १. एड्स, २. सिफीलिस, ३. गोनोरीया इ.
असंसर्गजन्य रोग
हृदय आणि रक्ताभिसरणाचे रोग -
१. उच्च रक्तदाब (Hypertension) : व्यक्तीचे वय, अनुवांशिक कारणे, अतिलठ्ठपणा, क्षारांचे/ मिठाचे सेवन (प्रतिदिनी पाच गॅ्रमहून जास्त), संतृप्त मेद, मधुमेह, वृक्क रोग यांसारख्या कारणांमुळे उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो.  साधारणत: १३०/८० mm of Hg  पेक्षा जास्त रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजला जातो.
२. कमी रक्तदाब (Hypotension): १००/६०  mm of Hg पेक्षा कमी रक्तदाब म्हणजे कमी रक्तदाब होय. यालाच आपण Low B.P.  असे म्हणतो. जास्त रक्तदाबापेक्षा कमी रक्तदाब ही अवस्था व्यक्तीसाठी जास्त घातक समजली जाते.
अस्थि व स्नायूंचे रोग 
१. सांधेदुखी- सांध्यांमध्ये वेदना होतात. गुडघे, बोटाचे शेवटचे सांधे, खांदे इत्यादीमध्ये वेदना होते.
२. संधिवात- सांध्यांचा दाह. बोटांचे मधले सांधे, हाताचे मनगट, गुडघे, कोपर इत्यादी दाह.
३. संधिरोग / वातरक्ताचा रोग - रक्तात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास ते सांध्यांमध्ये जाऊन साचते. त्यामुळे सांधे सुजतात व खूप वेदना होतात.
मधुमेह 
 हा रोग काबरेदकांच्या अनियमित चयापचयामुळे, तसेच स्वादुिपडाच्या अयोग्य कार्यामुळे निर्माण होतो. कबरेदकांच्या चयापचयामुळे निर्माण झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये योग्य प्रमाणात न शोषली गेल्यास तिचे रक्तातील प्रमाण वाढते. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वादुिपडातून स्रवणाऱ्या इन्सुलिनमार्फत केले जात असते. हे इन्सुलिन स्वादुिपडातील  islets of Langerhans नावाच्या ग्रंथींपकी बीटा पेशींमधून स्रवत असते. या ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यास इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
लक्षणे : मधुमेहाची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे 3स्र्२ म्हणजे पॉलियुरिया (बहुमूत्रता), पॉलिडिप्सीया (खूप तहान लागणे) आणि पॉलिफेजिया (वजन खूप कमी होणे.)
कर्करोग
शरीराच्या कोणत्याही भागात पेशींची अमर्याद होणारी वाढ म्हणजेच कॅन्सर होय. त्यामुळे पेशींच्या गाठी तयार होतात. हे टय़ुमर्स निरुपद्रवी किंवा घातक असू शकतात. कॅन्सर कोणत्याही अवयवाचा होऊ शकतो. मात्र तोंडाचा, स्तनांचा कॅन्सर व रक्ताचा कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात होत असतो. कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा रक्ताद्वारे सर्व शरीरभर पसरतात तेव्हा त्या स्थितीला metastatis  असे म्हणतात. कॅन्सर घडवून आणणाऱ्या विषाणूंचे जनुकीय द्रव्य म्हणून एकतर DNA किंवा RNA  असतात. कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांचा कर्करोग जनुक म्हणतात. उदा. राऊस सार्कोमा विषाणु RSV मधील कर्करोग जनुके.
इतर कारणे : धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनलिका, स्वादुिपड इत्यादीचा कर्करोग होतो. अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो. अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांना कर्करोग होतो.
कॅन्सरची चाचणी : कॅन्सरच्या चाचणीसाठी बऱ्याच मार्गाचा वापर केला जातो. मात्र त्यापकी सर्वाधिक वापरात येणारी चाचणी म्हणजे बायोप्सी होय. यामध्ये शंकास्पद ऊतींचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण केले जाते.
कॅन्सरचा उपचार 
कॅन्सरकारी पेशी व ऊती पूर्णपणे काढून टाकणे. मात्र त्यामध्ये जीवास धोका असतो.
रेडिओ थेरपी : अ. शरीराच्या आतील कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट- ६० चा वापर. ब. थायरॉइड ग्रंथींच्या उपचारासाठी किरणोत्सारी आयोडिनचा वापर. क. जीभ आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी किरणोत्सारी सुयांचा वापर केला जातो.
केमोथेरपी- कॅन्सरविरोधी औषधांचा वापर प्रामुख्याने रक्ताच्या कॅन्सरच्या उपचारासाठी.
जन्मजात रोग 
जन्माच्या आधी किंवा जन्मादरम्यान जडलेले रोग म्हणजे जन्मजात रोग होय. आनुवंशिक / जनुकीय रोग,  गुणसूत्रांमधील रैणवीय बदलांमुळे जनुकीय रोग निर्माण होतात. त्यामध्ये पुढील रोगांचा समावेश होतो.
डाऊन सिंड्रोम : यास मंगोलता तसेच एकाधिक द्विगुणता २१ (Trisomy 21) असेही म्हणतात. यामध्ये २१ गुणसूत्रांच्या जोडीमध्ये दोनऐवजी तीन सारखे गुणसूत्र असतात. त्यामुळे गुणसूत्र रचनेमध्ये एकूण ४७ (४६+१) गुणसूत्रे दिसतात. मानसिक वाढ खुंटणे हे याचे सर्वात ठळक वैशिष्टय़ आहे.
िलग गुणसूत्रांशी संबंधित विकार - टर्नर सिंड्रोम (Turnerls Syndrome): या विकारांमध्ये दोन िलग गुणसूत्रांपकी (X & Y) केवळ एकच  हे गुणसूत्र अस्तित्वात असते. ही गुणसूत्र रचना ४४ + ड अशी दर्शविली जाते. म्हणजेच या विकारांत केवळ ४५ गुणसूत्रे असतात.
लक्षणे - कमी उंची, पसरट मान, कमी केस, दुय्यम लंगिक वैशिष्टय़ांचा विकास होत नाही.
सिकल सेल अ‍ॅनिमिया (Sickle Cell Anamia)
- यास दात्रपेशी पांडुरोग असेही म्हणतात. हिमोग्लोबिन हे तांबडय़ा रक्तपेशींमधील प्रथिन आहे. जर सहाव्या अमायनो आम्लाची (ग्लुटामिक आम्ल) जागा वॅलिन (Valine) ने घेतली तर हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. या विकारास सिकल सेल अ‍ॅनिमिया असे म्हणतात. यामध्ये हिमोग्लोबिनची रक्त वाहून नेण्याची क्षमता कमी होते. अनेकदा तांबडय़ा रक्तपेशींच्या गुठळ्या तयार होतात व त्या नाश पावतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्ताभिसरण संस्था मेंदू, फुप्फुसे, किडनी यांना धोका पोहोचतो. ही स्थिती आनुवंशिक असते.
Source-Dainik Loksatta

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...