विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

एन. डी. ए. परीक्षेच्या तयारीसाठी...


राज्य सरकारच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतर्फे एन. डी. ए.च्या लेखी परीक्षेची तसेच मुलाखतीची तयारी करून घेण्यात येते. या संस्थेच्या प्रवेशपरीक्षेची माहिती-
महाराष्ट्रातील तरुणांना राष्ट्रीय संरक्षण ...प्रबोधिनीमध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी (एन.डी.ए.) मध्ये मोठय़ा संख्येने प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने १९७७ साली सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (एस.पी.आय.) स्थापना केली. या संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक युवकांनी एन.डी.ए.मध्ये प्रवेश मिळवला आणि ते लष्करातील तिन्ही दलांमध्ये अधिकारी म्हणून वेगवेगळ्या हुद्दय़ांवर कार्यरत झाले.
या संस्थेत प्रवेश मिळविणाऱ्या तरुणांची एन.डी.ए.च्या लेखी परीक्षेची तयारी तसेच सर्वागीण विकासाकडे लक्ष पुरवतानाच एस.एस.बी. मुलाखतीची तयारी करून घेण्यात येते. या संस्थेत विद्यार्थ्यांसाठी निवासाची तसेच जेवण्याची उत्तम सुविधा असून दररोज पी.टी. तसेच क्रीडाप्रकार घेतले जातात. प्रवेशाबरोबर अकरावी - बारावीसाठी सी.बी.एस.ई. धर्तीवर चालणाऱ्या 'स्टेपिंग स्टोन' या
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात येतो. या ठिकाणी प्रशिक्षणार्थीची अकरावी-बारावी शास्त्र विद्याशाखेची तयारी करून घेण्यात येते. अकरावी-बारावीच्या उपक्रमांव्यतिरिक्त असलेले इतर सर्व उपक्रम एस.पी.आय.च्या आवारात घेतले जातात. या संस्थेत केवळ
४० ते ५० इच्छुक तरुणांना प्रवेश देण्यात येतो. संस्थेच्या यशाच्या देदिप्यमान परंपरेमुळे या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी चांगलीच चढाओढ आहे.
प्रवेश पात्रता : राज्यातील रहिवासी असलेली तरुण मुले या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत. प्रवेश देतेवेळी साडेचौदा ते १६ वर्षे वय असलेले तरुण- जे दहावीची परीक्षा यंदा देत आहेत किंवा उत्तीर्ण झालेले आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत. दहावी बोर्डाच्या परीक्षेत त्यांना ६० टक्के गुणांहून अधिक गुण मिळणे आवश्यक असते. तसेच सातवी, आठवी आणि नववीमध्येदेखील ६० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळणे आवश्यक ठरते.
प्रवेश अर्ज : प्रवेश अर्ज तसेच संस्थेचे माहितीपत्रक मागविण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रचा रु. ४००/- (रुपये चारशे फक्त)चा डिमांड ड्राफ्ट 'सव्‍‌र्हिसेस प्रेपरेटरी इन्स्टिटय़ूट, औरंगाबाद'च्या नावे काढावा व त्यांच्या नावे सिडको, एन-१२ सेक्टर, औरंगाबाद-४३१००३
येथे पाठवावा. भरलेला फॉर्म संस्थेत जमा करण्याची शेवटची
तारीख १५ फेब्रुवारी असते. वेळ कमी असल्यास www.spiaurangabad.com या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज डाऊनलोड करावा व तो भरून त्याबरोबर रु. ४००/- चा ड्राफ्ट पाठवावा. शंका असल्यास संस्थेत ०२४०-२३८१३७० या दूरध्वनीवर संपर्क साधून शंकानिरसन करता येते.
प्रवेश परीक्षा : पात्र विद्यार्थ्यांना एप्रिल २०१३ मध्ये घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेसाठी आमंत्रित केले जाते. परीक्षा नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या केंद्रांवर घेतली जाते. लेखी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. या परीक्षेत ६० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची 'आय.क्यू. टेस्ट' घेतली जाते. तसेच व्यक्तिगत मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीत तोंडी प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामान्य ज्ञान तसेच ताज्या घडामोडींशी संबंधित प्रश्न इंग्रजीत विचारले जातात.
परीक्षेचा निकाल : निवड झालेल्या मुलांना दूरध्वनीवरून तसेच पत्राद्वारे निवडीविषयी कळविण्यात येते. प्रवेश निश्चितीच्या दृष्टीने मे महिन्याच्या पहिल्या / दुसऱ्या आठवडय़ात अ‍ॅडव्हान्स फी जमा करावी लागते. दहावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर ६० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळालेल्या मुलांचा प्रवेश निश्चित होतो.
एस.पी.आय.मधील प्रशिक्षण : अकरावी-बारावी शैक्षणिक
प्रशिक्षण सी.बी.एस.ई. आधारित 'स्टेपिंग स्टोन' या औरंगाबादमधील उत्तम संस्थेत होते तर एन.डी.ए. लेखी परीक्षेची तयारी एस.पी.आय. संस्थेत होते. प्रशिक्षणा दरम्यान वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी
होणे अनिवार्य असून इंग्रजी संभाषणकौशल्य, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, समूहचर्चादेखील घेतली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीण
विकास होतो. एस.एस.बी. मुलाखतीची तयारीदेखील येथे करण्यात येते. ज्यासाठी काही निवृत्त अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करतात.
एस.पी.आय. औरंगाबाद ही राज्य सरकारची एकमेव संस्था असून त्यात प्रवेश मिळणे विद्यार्थ्यांच्या करिअरला उभारी देणारे ठरते. या संस्थेच्या नावाचा वापर किंवा त्यांच्यासारखी संस्था म्हणवल्या जाणाऱ्या अनेक संस्था औरंगाबाद तसेच राज्यातील काही शहरांत फोफावत आहेत. अशा संस्थांपासून सावध राहणे आवश्यक आहे. वृत्तपत्रात मोठय़ा जाहिराती तसेच आकर्षित करणारे हॅण्डबिल्स आणि प्रॉस्पेक्ट्स छापून याच नावाशी साधम्र्य असणाऱ्या संस्थांची प्रवेशाआधी सविस्तर माहिती घेणे म्हणूनच अत्यावश्यक ठरते.

८ ८ लेफ्टनन्ट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...