यूपीएससी ‘मेन’च्या अभ्यासक्रमात बदल
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. मुख्य परीक्षेत एक वैकल्पिक विषय काढून घेण्यात आला असून पूर्वपरीक्षा एक आठवडा पुढे (26 मे) ढकलण्यात आली आहे.
आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, यानंतरच्या काळात ही परीक्षा 2300 ऐवजी 2075 गुणांची करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेतील सामान्यज्ञानाच्या 600 गुणांच्या पेपरची विभागणी चार भागांत... झाली असून हे चार पेपर 1000 गुणांचे असतील. यात आता नीतिमूल्ये, एकात्मता व अभिक्षमता (अॅप्टिट्यूड), सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, पर्यावरण, तंत्रज्ञान व आर्थिक विकास या वाढीव उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या परीक्षा पद्धतीत दोन वैकल्पिक विषय घेता येत होते. त्यांचे मूल्यांकन 1200 गुणांचे होते. नवीन बदलानुसार आता एकच वैकल्पिक विषय निवडता येणार असून तो 500 गुणांचा असेल. सामान्य अध्ययन पेपर-एकमध्ये दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागात 200 गुणांचा निबंध अणि दुस-यामध्ये इंग्रजी आकलन अणि सारांश यांचा 100 गुणांसाठी समावेश करण्यात आला आहे.
मुलाखत 275 गुणांची
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत 300 ऐवजी 275 गुणांची असणार आहे. नवीन बदलानुसार मुख्य परीक्षेसाठी विविध भाषांमधील साहित्याचा विषय आता फक्त ज्यांची पदवी संबंधित साहित्यामध्ये झालेली आहे, त्यांनाच निवडता येईल. पूर्वीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये इंग्रजी अनिवार्य पेपर वगळता इतर पेपर राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात नमूद केलेल्या विविध भाषांमध्ये देता येत होते. परंतु यापुढील काळात मुख्य परीक्षा प्रादेशिक भाषेतून देण्याकरिता किमान 25 विद्यार्थ्यांनी प्रादेशिक भाषेची मागणी करावी लागेल. (या 25 विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.)