विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

२४ डिसेंबर हा येशुख्रिस्ताचा जन्मदिवस।

याच दिवशी १८९९ रोजी सानेगुरुजींचा जन्म कोकणात पालगड या गावी झाला। गुरुजींचे वडील सदाशिव (भाऊ) हे वडवली गावचे खोत होते। यांच्या लहानपणातच घरच्या वैभवाला लागलेल्या ओहोटीमुळे बहुतेक सर्वच जीवन दारिद्र्या...
तच गेले। मात्र तरीही परिस्थितीपुढे हतबल न होता त्यांनी एम.ए. पर्यन्तचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर शिक्षकी पेशा पत्करुन ०६ वर्ष अमळनेरच्या शाळेत नोकरी केली। १९३० मध्ये नोकरी सोडून त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले।

इ.स. १९३२ मध्ये साने गुरुजींनी श्यामची आई ही सामाजिक कादंबरी लिहीली. हिच गुरुजींची पहिली कादंबरी होय. ‘मृत्युचे चुंबन घेणारा महाकवी’ अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींचे वर्णन केले आहे.
साने गुरुजींची पहिली नाटिका – ‘ते आपले घर’ – ०९ ऑगस्ट १९३९ ला प्रसिद्ध.पहिली कादंबरी – श्यामची आई(१९३५). श्यामची आई हे पुस्तक गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात (३६+09 रात्री-प्रकरणे) गुरुवार ०९ ०२ १९३३ ते १२ ०२ १९३३ या पाच दिवसात शब्दबद्ध केले.

साने गुरुजींचा जीवनालेख-

२४ डिसेंबर १८९९ जन्म.

१९०५-०६ पालगड येथिल शाळेत दाखल.

११ जून १९०६ पालगड येथील प्राथमिक शाळेतील नोंदीनुसार पांडुरंग सदाशिव साने दोन महिन्यांची फी येणे बाकी सबब नाव कमी (संदर्भ: ‘बालविकास’ मुंबई १४,अंक ११. पृ.०९. नोव्हेंबर १९७१)

१९१२-१९१५ हि चार वर्ष दापोलीच्या शाळेत आत्याच्या घरी इंग्रजी दुसरी ते पाचवी पर्यंत.

१९१६-१७- औंधच्या शाळेतील काही महीने नंतर उत्तरार्धात पुण्याच्या नूतन मराठी शाळेत आगमन. तेथे परीक्षा, वरच्या वर्गात बसण्यास अनुमती.

१९१७-१८- मॅट्रिकची परीक्षा

१९२०- इंटर आर्टस् ची परीक्षा पास- ३३८ गुण मिळाले होते. (तर्कशास्त्र विषय)

१९१८-२२-न्यु पूना कॉलेज.

१९२२- बी.ए. परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण (संस्कृत ऑनर्स, मराठी विषय)

१९२२-२३- पुणे

१९२३-२४- अमळनेर, तत्वज्ञान मंदिर

१९२४- एम.ए. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण (संस्कृत वेदांत, मराठी विषय़)

जून १९२४ ते मार्च १९३०- शिक्षक, (प्रताप हायस्कुल अमळनेर).

१९३०- स्वातंत्र्य लढ्यात सहभागी

साने गुरुजींचा तुरुंगावास-

१७ मे १९३०- पहिला तुरुंगवास १५ महिन्यांची शिक्षा (धुळे व त्रिचनापल्ली तुरुंग)

२३ मार्च १९३१- तुरुंगातून सुटका

१९३२- धुळे तुरुंग, विनोबांचा सहवास. विनोबांची गीतीप्रवचने शब्दांकित केली. पुढे नाशिक तुरुगात रवानगी.

१९३८- कॉंग्रेस साप्ताहिकाची स्थापना.

१९४०- चांदवडच्या युवक परिषदेच्या संदर्भात अटक (नाशिक तुरुंग)

१० ऑगस्ट १९४२- सुटका.

२० एप्रिल १९४३- मुंबईला भूषक महाल मध्ये अटक, येरवड्याच्या तुरुंगात रवानगी.

१९४५- तुरुंगातुन सुटका.

२४ डिसेंबर १९४६- कुमार साहित्य संमेलनाचे (पुणे) अध्यक्ष,

०१ मे १९४७- पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुल् व्हावे या करिता आमरण उपोषण.

१० मे १९४७- मंदिर खुले झाले व उपोषण सुटले.

१५ ऑगस्ट १९४८- साधना या साप्ताहिकाची स्थापना.

११जून १९५०- देहांतवास (पहाटे ०४ वाजून ०५मिनीटींनी)


For More Information & Literature About Sane Guruji
Visit Below Website

http://saneguruji.net/

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...