विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

राज्यात होणार शिक्षक भरती

पटपडताणळीमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना इतरत्र समाविष्ट करुन घेईपर्यत शिक्षक भरतीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या मुद्यावर विरोधकांनी सरकारवर टीका केल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे लवकरात... लवकर भरण्याचे गुरुवारी विधान परिषदेत आश्वासन दिले.
विद्यार्थ्याँचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची तातडीने भरती करा. अशी मागणी विरोधकांनी केली. रामनाथ मोते, विनोद तावडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. बंद होणा-या शाळांमधील अतिरीक्त शिक्षक इतर शाळात समाविष्ठ केले जाणार आहेत, पण ही प्रक्रीया सुरु झाली नसल्याने विद्यार्थ्याँचे नुकसान होत आहे. शाळा बंद होईल तेव्हा होईल, पण भरती तर सुरु करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी ताबडतोब शिक्षक भरती झाली पाहिजे हे मान्य केले, पण सरकारच्याच अध्यादेशानुसार समायोजन होईपर्यँत भरती करता येत नसल्याचे सांगितले. तरीही कँबिनेटसमोर हा विषय मांडून निर्णय घेऊ, असे आश्वासन खान यांनी दिले.
त्यावर विक्रम काळे यांनी कुठलीही शाळा तातडीने रद्द करता येत नाही. मग तोपर्यँत शिक्षक भरती होणार नाही का ?
आज अनेक शाळांत माध्यमिक शिक्षक नाहीत, असे सांगितले. त्यावर चर्चेत हस्तक्षेप करीत शिक्षणमंत्र्यांनी समायोजनाचे काम खोळंबल्याचे मान्य केले आणि समायोजनाच्या नोटिसा देण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...