मुख्य परिक्षेची तयारी कशी करावी?
मुख्य परिक्षेची तयारी : कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असतांना, खालील बाबी लक्षात असू द्या:
- सर्वात आधी कोणता टॉपिक वाचायचा/अध्ययन करायचा ते ठरवून घ्या.
- हेडिंग, सब-हेडिंग पाहून घ्या
- इंट्रोडक्षण व कन्क्लूजन परिच्छेद मध्ये काय आहे ते पाहून घ्या
- मध्ये काही चार्ट वगेरे, नकाशे, टेबल्स वगेरे आहेत का ते पाहून घ्या व ते कशाशी संबंधित आहेत ते पाहून घ्या.
- मागील काही वर्षांच्या प्रश्न पत्रिका बघा व त्या टॉपिक वर कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ते बघून घ्या व त्या टॉपिक वर कोणते प्रश्न येवू शकतात ते ठरवायचा प्रयत्न करा.
- त्यानंतर स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला ह्या टॉपिक बद्दल काय माहिती आहे?
- टॉपिक वाचायला सुरुवात करा – 1st रीडिंग (ह्या वेळेस काहीच समजून घ्यायचा प्रयत्न करू नका.)
- दुसऱ्यांदा टॉपिक वाचायला सुरुवात करा – 2nd रीडिंग (ह्या वेळेस समजून घ्यायचा प्रयत्न करा.)
- एकाच वेळी छोटे छोटे परिच्छेद वाचा, समजलं नसेल तर परत परत वाचून काढा. मुख्य शब्दांना अंडरलाईन करा.
- तुम्ही काय वाचलं त्याचं पठन करा, स्वतालाच विचारा की तुम्ही जे वाचलं ते समजलं का, तुमच्या स्वताच्या शब्दात ते लिहून काढा.
- तिसऱ्यांदा टॉपिक वाचायला सुरुवात करा – 3rd रीडिंग (ह्या वेळेस नोट्स लिहून काढा.)
- नोट्स लिहितांना, स्वताच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करा.