विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

MPSC चे स्वरूप : बदल व सातत्य


विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, 
altaltराज्यातील प्रशासनात सनदीसेवा पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था नियमितपणे स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते हे आपण जाणून आहात. या परीक्षेलाच एमपीएससी अथवा राज्यसेवा परीक्षा असे संबोधले जाते. अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा व मुलाखत या दोन टप्प्यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या परीक्षांची तयारी करणाऱ्या व तयारीची सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाने या बदलत्या स्वरूपाचे यथायोग्य आकलन करणे गरजेचे आहे.
तत्पूर्वी या परीक्षेचे एकंदर स्वरूप त्यातील सातत्य व बदलांसकट लक्षात घेणे ही पायाभूत बाब ठरते.
राज्यसेवा परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी) अशा तीन भिन्न टप्प्यात आयोजित केली जाते. यातील पूर्वपरीक्षा हा पहिला टप्पा होय. आयोगाने या टप्प्यात सामान्य अध्ययनाचा ‘सामान्य क्षमता चाचणी’ हा एकच पेपर निर्धारित केला आहे. याचा सविस्तर अभ्यासक्रमही नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार कलाशाखा, वाणिज्य- अर्थव्यवस्था, कृषी, विज्ञान-अभियांत्रिकी, बुद्धिमापन चाचणी आणि चालू घडामोडी अशा व्यापक सहा घटकांत हा अभ्यासक्रम विभागण्यात आला आहे. पूर्वपरीक्षेतील सामान्य क्षमता चाचणीस २०० गुण निर्धारित केले असून अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाला पुढील तक्त्यात दिल्याप्रमाणे गुणविभागणी केली आहे.
पूर्वपरीक्षेचे स्वरूप पाहता पुढील महत्त्वपूर्ण बाबी लक्षात येतात. एक म्हणजे पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या व बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असलेली असते. म्हणजे प्रश्न व प्रश्नाखालील पर्यायाचे अवलोकन करून अचूक पर्यायाचे वर्तुळ छायांकित करावयाचे असते. दुसरी बाब म्हणजे या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धतीचा स्वीकार केलेला आहे. याचा अर्थ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पेनल्टी म्हणून त्या प्रश्नाला असलेल्या गुणापकी १/४ गुण वजा केले जातात. तिसरी बाब म्हणजे ही परीक्षा पात्रता चाचणीच्या स्वरूपाची आहे. याचाच अर्थ हा अडथळा पार करायचा आणि नव्याने पुढच्या टप्प्यांच्या तयारीला आरंभ करायचा. पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांला देखील त्याचे गुण कळविले जात नाहीत. शिवाय हे गुण त्याच्या पुढील प्रवासात मोजले जात नाहीत. थोडक्यात ‘पूर्व परीक्षेचा अडथळा यशस्वीरीत्या पार करा आणि नव्या जोमाने पुढील तयारीला सुरुवात करा’ अशी परिस्थिती असते. म्हणूनच पुढील टप्प्यांसाठी निर्धारित केलेली पात्रता चाचणी असेच पूर्वपरीक्षेचे स्वरूप आहे.
पूर्वपरीक्षेत पात्र ठरल्यानंतर येणारा दुसरा टप्पा म्हणजे मुख्यपरीक्षा होय. २०११ पर्यंत राज्यसेवामुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि गुणसंख्या वेगळ्या स्वरूपाची होती. परंतु एमपीएससीने २०१२ मध्ये मुख्यपरीक्षा तसेच मुलाखतीच्या गुणसंख्येत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार राज्यसेवा मुख्यपरीक्षेत आता वैकल्पिक विषय असणार नाहीत. नव्या प्रारूपाप्रमाणे मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे दोन अनिवार्य भाषा पेपर; इतिहास-भूगोल, राज्यघटना-राजकारण, मानवसंसाधन विकास-मानवी हक्क आणि अर्थव्यवस्था-विज्ञान तंत्रज्ञान असे सामान्य अध्ययनाचे अनुक्रमे १, २, ३, व ४ असे पेपर्स समाविष्ट केले आहेत. सामान्य अध्ययनाच्या या प्रत्येक पेपरला १५० गुण निर्धारित केले आहेत. आयोगाने या प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम प्रकरण व त्याअंतर्गत येणारे अभ्यासघटक अशा रीतीने सविस्तरपणे निर्धारित केलेला आहे.
मुख्य परीक्षेच्या स्वरूपात केलेला मूलगामी बदल म्हणजे ही परीक्षा देखील पूर्वपरीक्षेप्रमाणे वस्तुनिष्ठ स्वरूपाची केली आहे. मुख्य परीक्षेतील अनिवार्य मराठी व इंग्रजी अपवाद वगळता सामान्य अध्ययनाचे चारही पेपर वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असतील. तथापि, आयोगाने सामान्य अध्ययनातील या १५० गुणांच्या प्रत्येक पेपरमध्ये एकूण किती प्रश्न विचारले जातील हे मात्र जाहीर केले नाही. थोडक्यात पूर्वीप्रमाणे लघुउत्तरी-दीघरेत्तरी स्वरूपाला बाजूला सारून ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची करण्यात आली आहे. केवळ भाषेचे दोन पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे ठेवण्यात आले आहेत.
नव्या मुख्यपरीक्षेबाबत आयोगाने ठरवलेल्या दोन महत्त्वपूर्ण बाबीही लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. त्यातील पहिली म्हणजे आता मुख्यपरीक्षेतही नकारात्मक गुणपद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार चुकीच्या उत्तराला पेनल्टी म्हणून त्या प्रश्नाला निर्धारित केलेल्या गुणापकी १/३ गुण वजा केले जातील. सोप्या भाषेत ३ प्रश्नांची उत्तरे चुकीची ठरल्यास एका प्रश्नाचे गुण कपात करणे होय. दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांला या टप्प्यात पात्र होण्यासाठी मुख्य परीक्षेतील प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. यासाठी आयोगाने निर्धारित केलेली किमान गुणमर्यादा प्राप्त करावी लागणार आहे. यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांला ४५% आणि सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला ४०% गुण प्राप्त करावे लागतील. थोडक्यात मुख्यपरीक्षेला बसलेल्या ज्या विद्यार्थानी उपरोक्त सहा पेपर्समध्ये निर्धारित गुण प्राप्त केले आहेत, त्यांचाच पात्रतेसाठी विचार केला जाईल. यात अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांला मुख्य परीक्षेत अपात्र ठरविले जाईल.
मुख्य परीक्षेच्या स्वरूपात विषय, अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या अनुषंगाने केलेल्या बदलांना लक्षात घेतल्यास पुढील आणखी एक बदल अधोरेखित करता येतो, तो म्हणजे गुणसंख्येत झालेला बदल होय. पूर्वी एकूण १६०० गुणांची असलेल्या मुख्य परीक्षेसाठी आता ८०० गुण निर्धारित केलेले आहेत. मुख्य परीक्षेत करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बदलाचे सर्वागीण स्वरूप लक्षात घेतल्याशिवाय आपल्या तयारीची अर्थपूर्ण सुरुवात होणार नाही.
मुलाखत अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणी हा तिसरा व अंतिम टप्पा होय. यासाठी आता १०० गुण निर्धारित केले आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावले जाते. विद्यार्थ्यांने मुख्य परीक्षेत प्राप्त केलेले गुण आणि मुलाखतीत संपादित केलेले गुण यांची बेरीज केली जाते आणि विद्यार्थ्यांची गुणसंख्या, त्याचा/तिचा प्रवर्ग आणि त्याने/तिने पदाला दिलेला पसंतीक्रम याआधारे पात्र अथवा अपात्र ठरविल्या जाते. मुलाखतीचे स्वरूप हे तोंडी असते. यात ५-६ सदस्यांचे मुलाखत मंडळ प्रत्येक विद्यार्थ्यांची साधारणत १५ ते २५ मिनिटे कालावधीची मुलाखत घेते. विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती, परीक्षेच्या अभ्यासक्रमातील घटक, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पाश्र्वभूमी, त्याचा शिक्षणबाह्य़ बाबीतील रस, प्रशासकीय सेवापदविषयक माहिती आणि चालू घडामोडी या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. मुलाखतीच्या संदर्भात आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही घटकांना महत्त्व असते. थोडक्यात सनदी सेवा पदाची जबाबदारी यशस्वी रीत्या सांभाळण्यासाठी आवश्यक गुणवैशिष्टय़े व क्षमता विद्यार्थ्यांकडे आहे की नाही याची तपासणी म्हणजेच मुलाखत होय. पूर्वी मुलाखतीस २०० गुण निर्धारित केलेले होते. आता मात्र ही गुणसंख्या १०० एवढी निर्धारित केली आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांचे स्वरूप लक्षात घेणे ही या परीक्षेच्या तयारीतील प्रारंभिक पायरीच ठरते. या स्वरूपानुसारच प्रत्येक टप्प्याच्या तयारीची विशिष्ट अभ्यासपद्धती स्वीकारणे गरजेचे ठरते. परीक्षेच्या वेळापत्रकाला अनुसरून त्या-त्या टप्प्याची स्वतंत्र व वेगळी तयारी करण्याबरोबरच समग्र तयारीवरही भर द्यावा लागतो. कारण या तिन्ही टप्प्यात काही अभ्यासघटक समान व परस्परव्याप्त आहेत. त्यामुळे अशा अभ्यासविषयांची पूर्वपरीक्षेतील तयारी मुख्यपरीक्षेलाही उपयुक्त ठरते आणि या दोन्ही टप्प्याची तयारी करताना त्या-त्या अभ्यासघटकात समाविष्ट होणाऱ्या संकल्पना, विचार व सिद्धांताचे नेमके सुस्पष्ट आकलन मुलाखतीसाठीही उपयुक्त ठरते. त्यामुळे परीक्षेतील प्रत्येक टप्प्याचा सुटा सुटा (स्वातंत्र) अभ्यास करतांना त्यातील समान अभ्यासघटक व आंतरसंबंध लक्षात घेऊन आवश्यक तेथे समग्र दृष्टिकोनाचाही अवलंब करावा. या आधारेच या परीक्षेचे शिखर यशस्वी रीत्या सर करणे शक्य होते.

अभ्यासक्रमातील घटकनिहाय गुणविभागणी
अ.क्र.    घटक                           गुण
(१)    कलाशाखा                       ३०
(२)    वाणिज्य-अर्थव्यवस्था           ३०
(३)    कृषी                             ३०
(४)    विज्ञान-अभियांत्रिकी             ३०
(५)    चालू घडामोडी                    ३०
(६)    बुद्धिमापन क्षमता                ५०
एकूण गुण :                             २००

अ.क्र.  परीक्षेचा टप्पा      विषय व पेपर                                                  गुण          एकुण गुण
(१) पूर्व परीक्षा: सामान्य क्षमता चाचणी (सामान्य अध्ययन)              २००          
(२) मुख्य परीक्षा (नवा आराखडा):अनिवार्य मराठी                                १००
:अनिवार्य इंग्रजी :                                                                                    १००
:सामान्य अध्ययन पेपर १ - इतिहास व भूगोल                                      १५०
:सामान्य अध्ययन पेपर २ - भारतीय राज्यघटना व राजकारण              १५०
:सामान्य अध्ययन पेपर ३ - मानव संसाधन विकास व मानवी हक्क      १५०
:सामान्य अध्ययन पेपर ४ - अर्थव्यवस्था व विज्ञान तंत्रज्ञान                   १५०             ८००
(३)    मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी)                                                      १००            १००
सौजन्याने-तुकाराम जाधव

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...