विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

मुलाखत म्हणजे व्यक्तिमत्त्व कसोटी

स्पर्धा परीक्षेतील अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत. मुलाखत म्हणजे काय याबाबत निरनिराळ्या विचारवंतांनी वेगवेगळे मत मांडले आहेत. मात्र, मुलाखत म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा. ती माहिती व ज्ञानाची परीक्षा नाही. कारण तुमचे ज्ञान अनुक्रमे पूर्व व मुख्य परीक्षेत तपासले गेलेले असते. मुलाखत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा टप्पा. कारण तो अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेत असे बरेच विद्यार्थी हुशार असतात, पण ते मुलाखतीत त्यांना अंतिम यादीत स्थान मिळत नाही. स्पर्धा परीक्षा म्हणजे सापशिडीचा खेळ. 99 वर आऊट झाला म्हणजे पुन्हा शून्यावरून सुरुवात करावी लागते. या जगात जो जिता वही सिकंदरअसतो. ज्याचे नाव अंतिम यादीत येते तोच विजयी ठरतो. मुलाखत एक शस्त्र आहे, ती एक कला आहे. आपण जसे आहोत तसेच मुलाखतीच्या पॅनलसमोर जाणे, कोणत्याही खोटारडेपणाचा आव न आणता, कोणतीही कृत्रिमता न आणता सहजपणे, आत्मविश्वासाने मुलाखत देणे. हाच मुलाखतीचा योग्य मार्ग आहे.



मुलाखतीला कमी मार्क्स येण्याची कारणे

1.
    उत्तर माहीत नसतानादेखील मी सांगतो तेच उत्तर बरोबर आहे या आविर्भावात उत्तर देणे.

2.
    काहीच न बोलणे.

3.
    एखाद्या मुद्द्यावर विनाकारण वाद घालणे.

4.
    रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुलाखतीस जाणे. 

5.
    मुलाखत चालू असताना मध्येच जांभई देणे.

मुलाखतीला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

1.
    मुलाखतीत विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे एकदम फाडफाड देणे आवश्यक आहे, ही मुलाखतीबाबत सर्वात मोठी चुकीची कल्पना आहे.

2.
    मुलाखतीत कोणत्याही अगदी कोणत्याही विषयावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात ठेवूनच मुलाखतीची तयारी करावी.

3.
    काही प्रश्न व्यक्तिगत माहितीवर विचारले जातात. त्यामुळे वर आधारित जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची लिस्ट तयार करावी व उत्तरे लिहून काढावीत. ती पाठ करू नयेत.

उदा. जर उमेदवाराचे नाव - अमर पांडुरंग पाटील असेल व शाळेचे नाव साने गुरुजी महाविद्यालय असेल तर खालीलप्रमाणे प्रश्न तयार होऊ शकतात.

1.
    अमर म्हणजे काय?

2.
    तुमच्या मुख्य परीक्षेचा आसन क्रमांक सांगा?

3.
    साने गुरुजी कोण होते?

4.
   श्यामची आईहे पुस्तक कोणी लिहिले? ते आपण वाचले आहे काय? इ.

3)
    जगात कोणीही परिपूर्ण नसतो. त्यामुळे आपणास एखादी गोष्ट माहीत नसेल तर प्रामाणिकपणे माफ करा सर, मला माहीत नाही,’ असे सांगावे. विनाकारण आपले अज्ञान झाकण्यासाठी खोटे बोलू नये.

4)
    प्रश्नांची उत्तरे देताना त्यात प्रामाणिकपणा असावा, नम्रता असावी, खोटी दांभिकता, गर्व नसावा. विषय सोडून विनाकारण बडबड करू नये.

5)
    एखाद्या प्रश्नाचे आपण दिलेले उत्तर आणि प्रश्नकर्त्याचे मत वेगळे असू शकते. त्या वेळी विनाकारण   वादविवाद न करता जर तुम्हाला मत मांडावयाचे असेल तर याप्रमाणे उत्तर द्यावे. माफ करा सर, आपण म्हणता ते बरोबर असेल, परंतु या विषयावर माझे जरा वेगळे मत आहे,’ असे सांगून आपले विचार स्पष्ट करावेत. माझ्या मते हाच मुलाखतीचा टर्निंग पॉइंट असतो. अत्यंत नम्रपणे, प्रामाणिकरीत्या तुम्ही तुमचा विचार पटवून दिला तर तुम्ही जिंकलाच समजा.

मुलाखतीस जाण्यापूर्वी-

1)
    मुलाखतीला जाण्यापूर्वी मुलाखतपत्र, त्याच्या झेरॉक्स प्रती, पदवी प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्रे यांच्या मूळ प्रती व झेरॉक्स यांची फाइल तयार करून त्यावर स्वत:चे नाव व पत्ता लिहून बरोबर ठेवावे.

मुलाखतीचे ठिकाण

2)
    मुलाखतीचे ठिकाण शक्यतोे एक दिवस आधी पाहून यावे, म्हणजे वेळेवर होणारी धावपळ टाळता येते.

3)
    भारतीय रस्ते व ट्रॅफिकची समस्या पाहता आपण पाऊण तास आधीच मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचू असे नियोजन करावे.

4)
    मुलाखतीला जाण्यापूर्वी भरपेट जेवण करून जाऊ नये.

5)
    मुलाखत जर दुपारच्या सत्रात होण्याची शक्यता असेन व आपणास दुपारी झोपण्याची सवय असेन तर मुलाखतीपूर्वी 15 दिवस आधी ती सवय बंद करावी. (खरं तर दुपारी झोपणे योग्य नाही)

6)
    मुलाखतीच्या ठिकाणी जरा लवकर जाऊन शांतपणे बसा.

प्रत्यक्ष मुलाखतीला जाताना

1)
    दरवाजा पूर्ण बंद असेल तर हळूच टकटक करून परवानगी घेऊनच आत प्रवेश करा.

2)
    मुलाखत हॉलमध्ये प्रवेश करताना सर किंवा मॅडम- मी आत येऊ का? असे नम्रपणे विचारून प्रवेश करावा.

3)
    मुलाखत कक्षेत चालताना बुटांचा जोरजोरात आवाज न करता अगदी सहजपणे चेहºयावर प्रसन्न भाव ठेवून ताठ शरीराने चालत जावे.

4)
    आत गेल्यानंतर सर्वांना थोडेसे वाकून सर्वांकडे पाहत अभिवादन करावे.

5)
    जर मुख्य प्रश्नकर्त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केले असतील तर न संकोचता हस्तांदोलन करावे.

हस्तांदोलन करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा- ब
ºयाच वेळी भीतीमुळे हातांच्या तळव्यांना घाम आलेला असतो. अशा वेळी तळवे जास्त ओले राहणार नाहीत, स्वच्छ राहतील याची काळजी घ्या. हस्तांदोलन करताना हात थरथरणार नाहीत याची काळजी घ्या. जर चेअरमनची इच्छा नसेल तर मुद्दाम हस्तांदोलन करू नये.

6)
    खुर्चीवर बसताना ताठ बसावे.

7)
    बायोडाटा किंवा प्रमाणपत्र असणारी फाइल हळूच व्यवस्थित टेबलावर ठेवा.

8)
    हात टेबलावर ठेवून बोलू नका. शक्यतो दोन्ही हात टेबलाखाली मांडीवर असू द्या.

9)
    बोलताना जास्त हातवारे करून बोलू नका.

10) जर चेअरमन किंवा पॅनलमधील इतर व्यक्ती तुम्ही देत असलेल्या उत्तरांकडे लक्ष देत नसतील तर तुम्ही विचलित होऊ नका. कदाचित पॅनल तुमची सहनशीलता तपासत असेन.

11)
    तुमच्या मुलाखतीदरम्यान मुलाखत पॅनलसाठी चहा आला असेल व तुम्हाला चहासाठी विचारले तर प्रामाणिकपणे त्यास नकार द्या.

12) मुलाखतीदरम्यान एखादा राजकीय प्रश्न विचारला असेल तर कोणत्याही एका राजकीय पक्षाची बाजू घेऊन किंवा कोणत्याही एका पक्षाबद्दल भरभरून बोलू नका. निरपेक्ष उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

13) कोणत्याही एकाच व्यक्तीकडे पाहून उत्तरे देऊ नका. उत्तरे देताना सर्वांकडे सारखेच लक्ष जाईल असा प्रयत्न करा.

मुलाखत संपल्यानंतर

1)
    खूर्ची सोडण्याची अत्यंत घाई करू नका किंवा विनाकारण जास्त वेळ मुलाखत कक्षेत बसण्याचा प्रयत्न करू नका.

2)
    अध्यक्षांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केले तरच हात पुढे करावा.

3)
    विनाकारण मागे वळून पाहू नका.

4)
    अत्यंत शांत व नम्रपणे सर्वांचे आभार मानत मुलाखत कक्ष सोडा.


अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...