विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

MPSC Prelim Study Plan


MPSC Prelim Study Plan


  राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप- ही एक चाळणी परीक्षा आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे सहा घटक व २२ उपघटकांमध्ये विभाजन केलेले आहे.
उदा.
१) कला शाखेतील घटक.
२) विज्ञान व आभियांत्रिकी शाखेतील घटक
३) वाणिज्य व अर्थव्यवस्था या विषयाचे घटक
४) कृषिविषयक घटक.
५) जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी.
६) बुद्धिमापन विषयक घटक

पूर्व परीक्षेसाठी एक पेपर असतो (सामान्य क्षमता चाचणी) या पेपरमध्ये २०० प्रश्न असतात व ते २ तासांत सोडवावे लागतात. पेपरचे माध्यम मराठी व इंग्रजी आहे. पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते हे लक्ष्यात घ्यावे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर मिळते. मुख्य परीक्षा १६०० गुणांची असते. यामध्ये सहा विषय आहेत. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर २०० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. त्यानंतर मेरिटनुसार निवड यादी तयार करतात.


STUDY MATERIAL FOR PRELIM
Topic
Marathi
Economics
Ranjan Kolambe'Books

Arts(Hist,Geog,Polity,Civics,PR,Social Reformers)
K'Sagar,NCERT Books From 5th to 10th
Agriculture

Ranjan Kolambe'S books
Mental Ability

R S Agrawal
Science & Tech
Ranjan Kolambe's Books

Current Affairs
 Daily News Paper,Agrovan, Lokrajya,Chanakya Mandal
Question Bank
K Sagar,Study Circle
Other Important books
 Agrovan, Lokrajya,Chanakya Mandal
Newspapers
Lokmat,Sakaal,Loksatta


परीक्षेसाठी उपयुक्त प्रकाशने-
१) निराली प्रकाशन व प्रगती प्रकाशनाची पुस्तके,
२) के. सागर प्रकाशन,
३) स्टडी सर्कल, 
४) युनिक प्रकाशन, 
५) किरण बुक्स प्रकाशन, 
६) चाणक्य मंडल प्रकाशन,
६) एनसीआरटी प्रकाशन,
७) इतर सरकारी प्रकाशने.

उमेदवारांनी या परीक्षेसाठी अवश्य प्रयत्न करावा. ही परीक्षा वर्षांतून एकदाच येते. प्रशासनात डायरेक्ट सहायक पोलीस आयुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी पदे मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, कठोर परिश्रम, जिद्द, वेळेचे नियोजन, चांगले मार्गदर्शन, चांगले स्टडी मटेरियल व पुस्तकांचे वाचन, मनन, केल्यास या परीक्षेत निश्चितच यश मिळेल.


1) कला शाखा घटक 

अभ्यासक्रम 


अ.    आधुनिक भारताचा - विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास 
ब.    महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य
क.    भारताचा -विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल
ड.    भारतीय राज्यपद्धती 
इ.    ग्राम प्रशासन  

अ. इतिहास
इतिहासात विचारले जाणारे प्रश्न मुख्यत्वेकरून पाठांतर किंवा स्मरणावर आधारित असतात; परंतु अलीकडे प्रश्नपत्रिकेच्या बदलता प्रवाह पाहिल्यास लक्षात येते की, विश्लेषणात्मक प्रश्नही विचारले जात आहेत. उदाहणादाखल या वेळच्या एस. टी. आय. च्या परीक्षेत विचारलेले इतिहासाचे प्रश्न तपासून पाहा. 

म्हणूनच केवळ पाठांतर किंवा स्मरणावर भर न देता ऐतिहासिक घटनांमधील कार्यकारण भावही समजून घेण्याचा प्रयत्न करा. उदा. एखाद्या घटनेचा परिणाम म्हणून पुढे कोणती घटना घडली. एखादी विशिष्ट चळवळ लोकप्रिय का झाली नाही? इ. म्हणजे 1857 ते 1947 पर्यंत घडलेल्या घटनाक्रमांचे ठळक टप्पे तयार करा व प्रत्येक टप्प्यातील प्रमुख घटनांची एकमेकांशी सांगड घालून लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही 1857 ते 1885, 1885 ते 1920, 1920 ते 1940, 1940 ते 1947 असे टप्पे पाडून त्याचा तक्ता तयार केल्यास इतिहासाचा अभ्यास अजूनच सोपा होईल. 

ब. समाजसुधारक
पूर्वपरीक्षेत या घटकांवर सरासरी 6 ते 8 प्रश्न विचारले जातात. खरे तर या घटकाचा अभ्यास करताना पाठांतर खूपच महत्त्वाचे ठरते. कारण समाजसुधारकांचे जीवन, कार्य यांच्याविषयी अत्यंत बारीक तपशिलात जाऊन प्रश्न विचारले जातात. 

मात्र, आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास लक्षात येते की, काही निवडक समाजसुधारकांवरच मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. उदा. महात्मा फुले, आंबेडकर, आगरकर, न्यायमूर्ती रानडे इ. अशा निवडक महत्त्वाच्या समाजसुधारकांची माहिती अगदी बारीक-सारीक तपशिलासह पाठ करणे व इतर समाजसुधारकांनी केलेली ठळक कार्ये पाठ करून ठेवणे. समाजसुधारकांची माहिती जर 3-4 पानांत तक्ता स्वरूपात जमवून ठेवल्यास परीक्षेच्या वेळी उजळणी करणे सोपे जाते. 

क. भूगोल
मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता लक्षात येते की, 10 वीपर्यंतच्या शालेय क्रमिक अभ्यासक्रमावरच बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. मात्र, यातही राज्यसेवा पूर्वपरीक्षेत भारताच्या भूगोलाच्या तुलनेत महाराष्टÑाच्या भूगोलावर अधिक भर दिलेला दिसतो. 
या विषयातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे की, बरेचसे प्रश्न ठळक बाबींवर आधारित असतात. त्यामुळे सूक्ष्म माहिती दोन-तीनदा वाचून ठेवावी आणि ठळक बाबींचे चांगल्या प्रकारे पाठांतर करावे. 

ड. भारतीय राज्यपद्धती
याही घटकावर पूर्वपरीक्षेत सरासरी 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. या घटकाचा विचारल्या जाणाºया प्रश्नांची संख्या पाहता खूपच जास्त अभ्यास करावा लागतो; परंतु पूर्वपरीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, याचा एकदा अंदाज आला की, पूर्ण गुण मिळविण्यासाठी त्याचा फायदा होतो. तसेच या घटकाकडे थोडे जागरूकपणे, सजगपणे पाहिल्यास लक्षात येते की, या घटकाच्या अभ्यासाचा उपयोग आपल्या दैनंदिन राजकीय घडामोडी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास होतो. तसेच इतिहास या विषयातील महत्त्वाचे कायदे व घटना तयार करण्याचे कार्य यांच्याशी सांगड घातल्यासही पाठांतराचे काम सोपे होऊ शकते. 

इ. ग्राम प्रशासन
ग्राम प्रशासन या विषयाची व्याप्ती फार मोठी नाही, तसेच आकलन, पाठांतरासही हा विषय सोपा असल्याने कला शाखा घटकातील पूर्ण गुण मिळवून देणारा हा घटक आहे. ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचे स्वरूप, रचना, भूमिका कार्ये इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. आकलनात्मक प्रश्न अपवादानेच विचारले जातात. त्यामुळे माहितीचे पुरेपूर पाठांतर केल्यास थोड्याफार कालावधीत गुणवत्तापूर्ण अभ्यास वेगाने होऊ शकतो. 

2) कृषी

भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी-आधारित आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचे दूरगामी परिणाम भारतातील विविध क्षेत्रांत दिसून येतात. म्हणूनच उमेदवाराला प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कृषीविषयक घटकांचे किमान ज्ञान व्हावे, यासाठी या घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. ही प्रस्तावना सांगण्याचे कारण म्हणजे बहुसंख्य उमेदवारांना हा विषय नकोसा व कठीण वाटतो. मात्र, ग्रामीण भागात काम करताना याचा व्यावहारिक उपयोग लक्षात येतो.
कृषी विद्यापीठांतर्फे प्रकाशित केल्या गेलेल्या कृषी डायरीचादेखील वापर अनेक विद्यार्थी करतात. मात्र, त्यात नक्की काय व कसे वाचावे? याविषयी निवड झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधल्यास बरे होईल. 

या अंतर्गत प्रश्न विचारले जाणारे प्रमुख घटक :

जमिनीचा वापर व प्रमुख पिके
> जलसिंचन 
> पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
> फलोत्पादन
> वनोत्पादन व वनविकास
> मत्स्य व्यवसाय
> कृषी अर्थव्यवसाय इ. 

या विषयीचा अभ्यास करताना लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे की, निवड झालेल्या उमेदवारांनी सुचवलेली निवडक 2-3 पुस्तकेच पुन्हा-पुन्हा वाचावीत. कारण कितीही अभ्यास केला तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांना न सुटणारे असे काही प्रश्न या घटकांत असतातच. त्यामुळे गुणांची एक सरासरी पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा;   अन्यथा नाहक वेळ वाया जाऊन त्याचा परिणाम इतर घटकांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. 

3) चालू घडामोडी

या घटकांवर पूर्वपरीक्षेत सरासरी 25 ते 30 गुणांचे प्रश्न विचारले जातात. या घटकांच्या अभ्यासाचा उपयोग केवळ पूर्वपरीक्षेपुरता न राहता तो मुख्य परीक्षेत तसेच मुलाखतीमध्येही मोठ्या प्रमाणात होतो. किंबहुना तुम्ही या विषयाचा अभ्यास न करण्याचा विचारच करू शकत नाही. अनेक विद्यार्थी वर्षभर आधीपासून वर्तमानपत्रांचे वाचन व त्याच्या छोट्या टिपा तयर करून ठेवात, तर काही विद्यार्थी वर्षभर वर्तमानपत्रे न वाचता शेवटच्या तीन- एक महिन्यांत बाजारात चालू घडामोडींवर आधारित जी पुस्तके येतात, त्यांचा अभ्यास करतात. यापैकी ज्यांना जी पद्धत योग्य वाटते ती ते अवलंबू शकतात. यातील कोणतीही पद्धत चुकीची नाही. 

कृषी, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला शाखा या प्रत्येक घटकाच्या बाबतीत काहीतरी नवीन घडत असते. अशा अनेक घटकनिहाय चालू घडामोडी असतात. ज्या हमखास गुण मिळवून देणा-या असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास व उजळणी करणे फायद्याचे ठरते.


4)बुद्धिमापन चाचणी 
***एकूण 200 गुणांच्या प्रश्नपत्रिकेत या विभागाला 50 गुण असतातम्हणजेच एकूणात या विषयाचे25% प्रश्न असतातयावरून पुढील गोष्टी लक्षात येतात. 
-
उत्तीर्ण होण्यासाठी या विषयाची असलेली निर्णायकता. 
-
सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता. 


***
म्हणूनच खाली दिलेले सर्वसाधारण अभ्यासतंत्र किंवा स्टेप्स वापरल्यास तुम्ही हा निर्णायक टप्पागाठू शकता.

**
सर्वप्रथम बुद्धिमापनासाठी असणाºया मूलभूत पुस्तकांमधून सर्व प्रकारची उदाहरणे समजावूनघ्यावीतमागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून गणितांचा नियमित सराव करावायावरून कोणत्याकाठिण्य पातळीवरचे प्रश्न विचारले जातातयाचा अंदाज येतो. वेग  अचूकता वाढवता येतेपुरेसासराव झाल्यानंतर रोजच्या रोज वेळ लावून एकेक प्रश्नपत्रिका सोडवणे. 

**
प्रत्यक्ष पेपर सोडवतानाचे नियोजन : सर्वसाधारणपणे नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी गुणांचाएक ठराविक टप्पा सहज गाठतातपरंतु निवड होण्यासाठी आवश्यक गुणांमधील शेवटचे निर्णायक 5 ते10 गुण बुद्धिमापन चाचणी या विषयाच्या आधारे मिळवून यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत तुम्ही येऊ शकता. 

**
प्रत्यक्ष परीक्षेत जेव्हा बुद्धिमापन हा विभाग सोडवताना विद्यार्थी अनेकदा गोंधळून जातातएखाद्याप्रश्नातच अडकून पडल्यानेउत्तर लवकर काढता  आल्याने असे होतेºयाचदा काही प्रश्नांची उत्तरेपर्यायावरूनही काढता येतातहे काहींना लक्षात येत नाही किंवा त्याकडे फारसे लक्ष  दिले जात नाही.अशा काही युक्त्यांचा वापर करता येतो. 

******
पेपर सोडवताना बुद्धिमापन हा विभाग सर्वप्रथम सोडवावा की, सर्वात शेवटी याबाबतही संभ्रमअसतोमात्रही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असू शकतेज्यांना जसे सोयीस्कर वाटेल तशाच क्रमानेपेपर सोडवावाप्रश्नपत्रिका सोडवल्याचा सराव करत असताना तुम्हाला कोणती पद्धती सोयीस्कर ठरते,याचा तुम्ही पडताळा घेऊ शकता. 
5)विज्ञान  तंत्रज्ञान 
वैज्ञानिक विचारसरणी  दृष्टिकोन
आधुनिकीकरण  विज्ञान. 
जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक  अभियांत्रिकी प्रगती. 
वैज्ञानिक प्रगतीचे शहरी  ग्रामीण जीवनावर झालेले परिणाम. 
भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय. 

***
राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारल्या जाणाºया विविध घटकांपैकी सर्वसाधारणपणे 25 ते 30 प्रश्नविज्ञानविषयक घटकांवर विचारले जातातत्यामुळे हा घटक दुर्लक्षून चालणार नाही. 

***
विषयाचा बाऊ करून घेण्याचे कारण नाही - प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे कीकोणतीही पदवीअसणाºया विद्यार्थ्याला विज्ञानविषयक अभ्यासक्रमाशी संबंधित जे साधारण ज्ञान अपेक्षित असतेत्याअनुषंगाने प्रश्न विचारले जातातत्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात पदवी नाहीत्यांना याविषयाचा बाऊ करून घेण्याचे कारण नाही. 
प्रश्न विचारण्याचा बदलता कल : विज्ञान तंत्रज्ञान विषयाबाबत अप्लाईड सायन्सपेक्षा प्युअर सायन्सचेप्रश्न विचारण्याकडे कल वाढला आहेत्यानुसार या विषयातील मूलभूत संकल्पना समजावून घेणेमहत्त्वाचे आहे. 
***
संदर्भ साहित्य : यासाठी ते 10 वीपर्यंतच्या शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यासअत्यंत मूलभूतपातळीवर करावायाशिवाय बाजारात उपलब्ध केसागर विज्ञानविषयक घटक पुस्तक  रंजन कोळंबीयांचे विज्ञान-तंत्रज्ञान ही पुस्तके पुरेशी ठरतातएवढे करूनही दरवर्षी काही प्रश्न असे विचारले असतात,की त्याची आपण तयारी केलेली नसते किंवा त्यांचा माहिती स्रोत आपणांस सापडत नाहीत्यामुळे जेवढीतयारी करणे शक्य आहेतेवढी पूर्ण  व्यवस्थित करणे आवश्यक आहेएवढ्या तयारीने 30 पैकी 23/24गुण मिळवता येतात. 
6)वाणिज्य  अर्थव्यवस्था :
भारतीय आयात  निर्यात
राष्ट्रीय विकासात सरकारीसहकारीग्रामीण बँकांची भूमिका. 
शासकीय अर्थव्यवस्थाअर्थसंकल्प लेखालेखा परीक्षण . 
पंचवार्षिक योजना. 
किमती वाढवण्याची कारणे  उपाय. 

***
याही घटकांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षेत सरासरी 30 गुणांचे प्रश्न विचारले जातातºयाच विद्यार्थ्यांचाअसा समज असतो कीवाणिज्य हा केवळ आकड्यांचा विषय आहेपण वस्तुतया विषयाकडे   एक चक्रम्हणूनच पहायला हवेआपल्या देशाची अर्थव्यवस्था नक्की कशी फिरतेत्यांचे आपल्यावर नेमके कायपरिणाम होतातयाबद्दल कुतहल वाटणे साहजिकच आहेतेव्हा या गोष्टी जाणून घेण्याच्यादृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. 

***
अलीकडे प्रश्नपत्रिकेमध्ये झालेले बदलही नीट समजून घेतले पाहिजेतअलीकडे अर्थशास्त्रीयसिद्धांतावरचे प्रश्न कमी झालेले आहेतअसे काही बदल ध्यानात घेऊनच मगच त्या विषयाच्याअभ्यासाला सुरुवात करावीसंदर्भ साहित्य :के-सागरचे वाणिज्य  अर्थव्यवस्था.महाराष्टाची आर्थिक पाहणी. (इकॉनॉमिक सर्व्हे)
अर्थशास्त्राचा अभ्यास करताना त्याचा मूलभूत संकल्पना एसएलआररेपो रेटबँक दररोखे बाजारआहेएखाद्या बेसिक पुस्तकातून किंवा मार्गदर्शकाच्या साहाय्याने समजून घेतल्यास अर्थशास्त्राचाअभ्यास अत्यंत सोपा होतो. 


How much time is required for the preparation of MPSC Rajyaseva Exam?

Let me first put some eye-opening truths before we go ahead any further.
  • Today, situation in Maharashtra is such that a lot of candidates do not know what is MPSC Rajyaseva exam and how to even apply for it.
  • They keep asking people on some websites to send them the examination form; they do not know that the form is available at the post office in their own city.
  • They do not know how to fill-up the examination form properly.
  • They do not know what is the syllabus.
  • They do not know what books should be referred.
  • They do not know what method should be applied to the study; they simply study as per their golden habit of studying for the degree examination. Alas ! they do not know that this exam is much more different than school/college exams.
  • Even after appearing in the exam, some candidates ask for results to some website owners who have no connection with the exams. How ignorant are these candidates!
  • I am 100% sure that even a candidate with third division in graduation can clear this exam, if he works hard and makes use of the time, good study material, with a well-laid study plan for one year.
Yes….One Year!!!
For a serious candidate who wants to clear the MPSC State Services (Rajyaseva) Examination in the 1st attempt itself, an year’s serious preparation is more than sufficient.
But proper guidance is much more needed all through the year so that you do not loose tempo of the preparation.
Simply spending an year on the studies of this exam will not do any good to you. You need constant efforts, coupled with a good study material. If your efforts are not sincerely put together then it may take longer to clear this exam.

Well, why do you need one year for the preparation?
First of all, please understand that the MPSC exam is too tough and is aimed at finding only the best candidates. So do you think that you can study one or two books, read them and you can clear this exam? No, simply no.
The syllabus of this exam is so vast that you need to study a lot of books. You have to study many books to cover each and every topic in the compulsory subjects, optional subjects. You need to study for the Interview, too.
When should you start the preparation? There is also Preliminary exam, so what should you do?
This is why you need one year for the complete study. Before you start the preparation, you need to understand the nature of the exam, its structure and process, various other factors that go with the preparation of the exam.
Initially, for few months, you need to study for the Main exam; then for few months, you have to study only for the Preliminary exam; and then after the Prelims exam is over, you have to shift to the Main exam preparation for few months, and at last, you need to prepare for the Interview.   Now, don’t say “Ooof..my God…so much to do!!! Now I understand why I need one year!!!”
To become successful at this exam, you need to plan your studies. Prepare a daily study plan, weekly study plan, monthly study plan, quarterly study plan,  and  study plan for the whole year….and you need to stick to these study plans!!!
Once that is done, you need to start the preparation with full devotion and dedication.

MPSC EXAM PATTERN & SYLLABUS


 The MPSC examinations are conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) to recruit officers in the state services.

Educational Qualifications: Any Graduation or those appearing in final year of graduation can also appear.
Age : Minimum age 19 years, the maximum age 33 years. Maximum age relaxable OBC candidates (Max. 35yrs.) and SC/ST/NT candidates (Max. 38yrs)
Attempts at the exam: No Limit
How to apply: Register at MPSC website through Online Application System at this location: http://www.mpsconline.gov.in/

MPSC recruits for the following posts:
  • Deputy Collector (DC)
  • Deputy Superintendent of Police (Dy. S. P.)
  • District Deputy Registrar (DDR)
  • Sales Tax Officer (STO)
  • Tahsildar
  • Deputy CEO
  • Nayab Tahsildar etc

 The notification regarding this examination appears in leading newspapers. The examination is conducted in following three steps :
                i) Preliminary Examination(200 marks)
            ii) Main/ Written Examination(800 marks)
            iii) Interview/ Personality Test(100 marks)
Preliminary Examination : One question paper of 200 marks known as General Ability Test is set. The candidates have to solve 200 multiple choice type questions within two hours. Questions are set in English and Marathi medium. The break-up of the marks of this question paper is given below.
     The Preliminary Examination is supposed to be held at most of the district places in Maharashtra. After the result of the Preliminary Examination is  declared, the successful candidates are called to appear for Main Examination. The marks scored in the Preliminary Examination are not counted for the final selection of the candidates.
Preliminary Examination :
Arts / Social Sciences               
30 marks
Intelligence Test                       
50 marks
Current Affairs                            
30 marks
Science and Technology           
30 marks
Commerce and Economics        
30 marks
Agriculture   
30 marks
Total
200 marks

Main Examination(Revised Pattern) : 

Revised Pattern of MPSC Exam:

MPSC has done some major changes in the pattern of exam as well as distribution of marks. One of the major changes is that there won’t be any optional subjects any more even for the Mains. There shall be 4 papers of General Studies with different components.
Following is the distribution of marks for Mains:
SubjectMarks
Compulsory Marathi100
Compulsory English100
GS Paper 1 (History and Geography)150
GS Paper 2 (Indian Constitution and Politics)150
GS Paper 3 (Human Resource Development and Human Rights)150
GS Paper 4 (Economics and Science & Technology) 150150
                                                                                                                               Total-800 marks
Only the language papers i.e. Marathi and English are descriptive in nature. All- other papers i.e. G. S. papers are objective in nature. Moreover, the Commission has introduced negative marking system and individual cut-off for each G.S. paper, which is 45% for the General category students and 40% for all the reserved categories.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...