राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कृषिविषयक घटकावर सर्व साधारणपणे ३० प्रश्न विचारले जातात.ह्या प्रश्नांची काठीण्यपातळी देखील मागील दोन -तीन वर्षात वाढलेली दिसून येते. कृषी घटकामध्ये आकडेवारीवर आधारित प्रश्नांची संख्या वाढली असून अत्यंत नेमकी , अचूक आणि अद्यावत माहिती संकलित करूनच ह्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
पिक पद्धती , विविध पिके,पिकांचे वाण, पिकांच्या वाणांची उत्पादकता विविध पिकांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर हेक्टरी उत्पादन ह्या स्वरूपाचे प्रश्न पीकपद्धती ह्या उप घटकामध्ये विचारले जातात. त्याच बरोबर ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संशोधनात्मक संस्थांच्या बाबत देखील प्रश्न विचारले जातात. मशागत तंत्र बाबतच्या पद्धती आणि त्या मध्ये आधुनिक सुधारणा ह्यांची तयारीदेखील फायदेशीर ठरते.
पशुसंवर्धनाच्या बाबतीत विविध संकरीत जाती , त्यांची दुग्धोत्पादन क्षमता, कुक्कुट पालन ह्या बाबींची तयारी सुद्धा करणे आवश्यक आहे. फलोद्यान विकास , मत्स्य विकास , या संदर्भात सिद्ध सखोल तयारी करणे गरजेचे आहे.कृषी अर्थ व्यवस्था ह्या घटकावर संकल्पना बरोबरच आकडेवारीवर देखील प्रश्न विचारले जातात.
आकडेवारीची तयारी करताना नेमकेपणाने आणि अद्यावत आकडेवारी संकलित करून लक्षात ठेवण्यासाठी देखील विशेष प्रयत्नांची गरज आहे .