विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

संधी रोजगाराची खात्री नोकरीची

उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 32 जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयातील प्राध्यापक (8 जागा), सहयोगी प्राध्यापक (16 जागा), सहाय्यक प्राध्यापक (7 जागा), प्रोड्युसर टेक्निकल (1 जागा), प्रॉडक्शन असिस्टंट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 34 जागा
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत स्पीच थेरपिस्ट (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (1 जागा), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (1 जागा), प्रकल्प अभियंता (1 जागा), समन्वयक अपंग समावेशित शिक्षण (1 जागा), विषय तज्ज्ञ अपंग समावेशित शिक्षण (4 जागा), अंध विशेष शिक्षक (8 जागा), मूकबधीर विशेष शिक्षक (8 जागा), मतिमंद विशेष शिक्षक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 20 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 31 जागा
पुणे येथील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक (6 जागा), लिपिक टंकलेखक (8 जागा), भांडारपाल (3 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये 18 जागा
एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये कार्यालय प्रमुख (2 जागा), विशेषज्ञ -वैद्यकीय (4 जागा), वैद्यकीय अधिकारी (5 जागा), डेंटल ऑफिसर (1 जागा), नर्सिंग असिस्टंट (5 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये 6 जागा
मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये स्टोअर किपर (2 जागा), लेबर (3 जागा), सफाईवाला (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज 21 दिवसाच्या आत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 7 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

रोजगार व नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईटला भेट द्या.

जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - पोलीस भरती (सामान्यज्ञान)

प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख :
पक्ष अध्यक्ष

* काँग्रेस (आय) - श्रीमती सोनिया गांधी
* भारतीय जनता पार्टी नितीन गडकरी
* बहुजन समाजवादी पक्ष मायावती
* समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव
* लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान
* मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रकाश करात
* शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (कार्य. अध्यक्ष)
* महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे
* तेलगू देसम एन. चंद्राबाबू नायडू
* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
* आसाम गण परिषद वृंदावन गोस्वामी
* तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी
* झारखंड मुक्ती मोर्चा शिबू सोरेन
* अकाली दल प्रकाशसिंग बादल
* राष्ट्रीय लोकदल ओमप्रकाश चौताला
* नॅशनल कॉन्फरन्स डॉ. फारुख अब्दुल्ला
* राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव
* जनता दल (संयुक्त) शरद यादव
* प्रजाराज्यम चिरंजीवी
* अण्णा द्रमुक जयललिता

प्रमुख संघटना, स्थापना वर्ष व मुख्यालय
संघटना स्थापना वर्ष मुख्यालय

* नाटो १९४९ ब्रुसेल्स
* ओपेक १९६० व्हिएन्ना
* सार्क १९८५ काठमांडू
* अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल १९६१ लंडन
* युनेस्को १९४६ पॅरिस
* इंटरपोल १९५६ पॅरिस
* रेडक्रॉस १८३३ जिनिव्हा
* युनो १९४५ न्यूयॉर्क
* आसियान १९६७ जकार्ता
* युनिसेफ - १९४६ न्यूयॉर्क
भारतातील सात आश्चर्ये
* ताजमहाल - आग्रा
* गोलघुमट - विजापूर
* मीनाक्षी मंदिर - मदुराई
* गोमटेश्वराचा पुतळा - श्रावण बेळगोळा
* वेरुळ - औरंगाबाद
* कुतुबमिनार - दिल्ली
* जयस्तंभ - चितोडगड
महत्त्वाचे राष्ट्रीय दिवस
* १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन
* २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
* ५ एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन
* २१ मे आतंकवादी विरोधी दिन
* २९ जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन
* २६ जुलै कारगिल दिवस
* २० ऑगस्ट सद्भावना दिवस
* ५ सप्टेंबर शिक्षक दिवस
* १२ नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन
* २३ डिसेंबर किसान दिवस

प्रमुख शहरांच्या नावातील बदल
* बॉम्बे - मुंबई
* मद्रास - चेन्नई
* बंगलोर - बंगळूरू
* त्रिवेंद्रम - तिरुअनंतपूरम
* कलकत्ता - कोलकाता
* गोहत्ती - गुवाहाटी
प्रमुख संस्था, संग्रहालये व मुख्यालय
संस्था/ संग्रहालय मुख्यालय

* हाफकिन इन्स्टिय़ूट मुंबई
* नॅशनल म्युझियम कोलकाता
* स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली (नाशिक)
* राजा केळकर वस्तूसंग्रहालय पुणे
* इंडियन पॅराशूट ट्रेनिंग कॉलेज आग्रा
* सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद
* सालारजंग म्युझियम हैदराबाद
* इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून
* जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई
* छत्रपती शिवाजी म्युझियम मुंबई
* नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी खडकवासला, पुणे
महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
* ८ मार्च जागतिक महिला दिन
* १५ मार्च जागतिक ग्राहक दिन
* २१ मार्च जागतिक वनदिवस
* २२ मार्च जागतिक जल दिवस
* ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस
* २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
* ५ जून जागतिक पर्यावरण दिवस
* ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस
* ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
* १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
* २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन
* १ डिसेंबर जागतिक एड्स दिन
बहुचर्चित पुस्तके व लेखक
पुस्तकाचे नाव लेखक

* थ्री इडियटस चेतन भगत
* लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन
* माय कंट्री, माय लाइफ लालकृष्ण अडवाणी
* ड्रिम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा
* लज्जा तसलीमा नसरीन
* हेडस अँड टेल्स मेनका गांधी
* यशवंतराव ते विलासराव - विश्वास मेहेंदळे
* बाळ ठाकरे : ए फोटोबायोग्राफी राज ठाकरे
* आय डेअर किरण बेदी
* रोमान्सिंग विथ लाइफ देव आनंद
* आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
* मिडनाईट चिल्ड्रेन्स सलमान रश्दी
* लिव्हिंग विथ ऑनर्स शिव खेरा
* स्पीकर्स डायरी मनोहर जोशी
* माझी परदेशी डायरी सुशीलकुमार शिंदे
शोध व संशोधक
शास्त्रज्ञ शोध

* एडवर्ड जेन्नर - देवीची लस
* रॉबर्ट कॉक - क्षयरोगावरील लस
* रोनाल्ड रॉस - मलेरियाचे जंतू
* सॅम्युएल हायनेमन - होमिओपॅथी
* लॅडस्टायनर - रक्त संक्रमण
(रक्त बदलणे)
* फ्रेडरिक बेटिंग - इन्शुलिन
* डॉ. साल्क - पोलिओ लस
* रॉटेनजन - क्ष-किरण टय़ूब
* ख्रिश्चन बनार्ड - कृत्रिम हृदयरोपणाची शस्त्रक्रिया
* विल्यम हार्वे - रक्ताभिसरणाची प्रक्रिया

महत्त्वाचे नृत्यप्रकार व संबंधित राज्य
* लावणी महाराष्ट्र
* कथक उत्तर प्रदेश
* मोहिनी अट्टम केरळ
* कुचीपुडी आंध्र प्रदेश
* झुमर राजस्थान
* बिहू आसाम
* कथकली केरळ
* गरबा गुजरात
* भरतनाटय़म तामिळनाडू
* यक्षगान कर्नाटक
* नौटंकी उत्तर प्रदेश
* भांगडा पंजाब
महत्त्वाच्या व्यक्तींची सुधारित वेतनश्रेणी
पद वेतन

* राष्ट्रपती - १ लाख ५० हजार रु.
* उपराष्ट्रपती - १ लाख २५ हजार रु.
* राज्यपाल - १ लाख १० हजार रु.
* नायब राज्यपाल - ८० हजार रु.
* मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय १ लाख रु.
* न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय - ९० हजार रु.
* मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय - ९० हजार रु.
* न्यायाधीश, उच्च न्यायालय - ८० हजार रु.
* अध्यक्ष, संघ लोकसेवा आयोग - ९० हजार
समाधीस्थळ व संबंधित व्यक्ती
* शक्तिस्थळ - इंदिरा गांधी
* शांतीघाट - संजय गांधी
* राजघाट - महात्मा गांधी
* किसानघाट - चरणसिंग
* चैत्यभूमी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* शांतिवन - पंडित नेहरू
* वीरभूमी - राजीव गांधी
* विजयघाट - लालबहाद्दूर शास्त्री
* प्रीतीसंगम - यशवंतराव चव्हाण
* अक्षयघाट - मोरारजी देसाई
प्रमुख रोग व प्रभावीत ठिकाण
* मलेरिया प्लीहा
* मोतीबिंदू डोळे
* गलगंड थॉयराईड ग्लँडस
* ल्युकेमिया रक्त
* न्यूमोनिया फुफ्फुसे
* क्षयरोग फुफ्फुसे
* कावीळ यकृत
* टॉयफाईड मोठे आतडे
* एक्झिमा त्वचा
* रक्तदाब धमनी काठिण्य

बिल गेट्स यांचे 11 नियम :-

नियम 1. जीवन चांगले असेलच असे नाही.त्याचा चांगला वापर करायला शिका.
नियम 2.जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही.त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.
नियम 3.शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला कोणीच जास्त पगार देणार नाही किंवा तु्म्हाला कार व मोबाईल अशा सेवाही देणार नाही. यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत करावी लागेल व उच्च पदापर्यंत ...
स्वत: उडी घ्यावी लागेल.
नियम 4. तुमचे शिक्षक कडक आहेत, असा तुम्ही जर विचार करत असाल तर थोडे थांबा. तुम्हाला वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
नियम 5. मोठा बर्गर तुमच्या पुढे काहीच नाही. परंतु त्यासाठी तुमचे वडिल बर्गर लिपिंगसाठी दुसर्या अर्थाचा शब्द वापरतात तर त्याला चांगली संधी म्हणावी लागेल.
नियम 6 तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही. तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत.त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.
नियम 7 तुमच्या जन्मानंतर तुमचे आई-वडिल तुमच्याकडे जास्त लक्ष देत नसतील. पण आता ते तुमच्याविषयी अधिक जागरूकता दाखवित
असतील. तुम्हाला त्यांची परिक्षा घ्यावीशी वाटत असेल तर रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवा.
नियम 8 तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. काही शाळांमध्ये असे दिसून आले आहे
की, 'नापास' हा शब्दच त्याच्या शब्दकोशातून पुसुन टाकला आहे.त्यामुळे जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास
धरली पाहिजे.
नियम 9 जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.
नियम 10 टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन काय
आहे ते कळते.
नियम 11 आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

नावाचा उगम

महाराष्ट्र नावाचा उगम आणि इतिहास

क्षेत्रफळ ३०७,७१३ km² (११८,८०९ sq mi)[१]
राजधानी मुंबई
मोठे शहर मुंबई
जिल्हे ३५
लोकसंख्या
घनता ९६,७५२,२४७ (२रा) (२००१)
३१४.४२/km² (८१४/sq mi)

भाषा मराठी
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

इतिहास
पहिले शेतकरी
मध्यपाषाण कालीन ४००० इस पुर्व धान्याची लागवड तापी नदीच्या खोर्‍यात सुरु झाले. जोर्वे येथे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमः सापडले जे १५०० इ.पु. चे आहेत. या संस्कृतीचे नामकरण गावाच्या नावाहुन करण्यात आले आहे. त्यात मुख्यतः रंगवलेले भांडी व तांब्यापासुन बनवलेले भांडी आणि शस्त्रे सापडली. येथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली आहे. ते विविध पिके पिकवत होते. येथील घरे मोठे चौकोनी, चट्टे व माती पासुन बनवलेली असत. धान्य कोठारांत व कनगीत साठवलेली आढळते. स्वयंपाक दोन कोन्याच्या चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.

मौर्य ते यादव
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)
मौर्य साम्राज्याचा काळ
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचूरींचा काळ
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालूक्य आणि कल्याणी चालूक्यांचा काळ
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

राष्ट्रकुटाचा काळ
दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ
महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.

यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

अजिंठ्यातील लेणी

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.

त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.

मराठा व पेशवे
छत्रपती शिवाजी महाराज
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.

शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.

ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.

महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
हुतात्मा स्मारक,मुंबई

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.

अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी...

मुख्यमंत्री खाती
पृथ्वीराजदाजीसाहेबचव्हाण नगरविकास, गृहनिर्माण, सामान्यप्रशासन, माहिती व जनसंपर्क, गलिच्छ वस्ती सुधारणा, घरदुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी कमाल जमीन धारणा, परिवहन, खनिकर्म, मराठी भाषा, विधी व न्याय, माजी सैनिकांचेकल्याण व अन्य कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विषय

उपमुख्यमंत्री खाती
अजित पवार अर्थ व नियोजन, ऊर्जा

कॅबिनेट मंत्री खाती
नारायण राणे उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार
आर. आर. पाटील गृह
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम, पर्यटन
पतंगराव कदम वने, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती व अन्य मागासवर्गीय कल्याण,व्यसनमुक्ती कार्ये
राधाकृष्ण विखे-पाटील कृषी आणि पणन
जयंत पाटील ग्रामीण विकास
हर्षवर्धन पाटील सहकार, विधिमंडळ कामकाज
गणेश नाईक उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जा
बाळासाहेब थोरात महसूल, खारजमीन
लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा व स्वच्छता
जयदत्त क्षीरसागर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
मनोहरराव नाईक अन्न व औषध प्रशासन
डॉ. विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन
सुनील तटकरे जलसंपदा (कृष्णा खोरे वगळून)
रामराजे नाईक-निंबाळकर जलसंपदा (कृष्णा खोरे)
बबनराव पाचपुते आदिवासी विकास
राजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण
राजेंद्र दर्डा शालेय शिक्षण
नसीम खान वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक कल्याण आणि औकाफ
सुरेश शेट्टी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राजशिष्टाचार
हसन मुश्रीफ कामगार आणि विशेष सहाय्य
नितीन राऊत रोजगार हमी योजना, जलसंधारण
मधुकर चव्हाण पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय
पद्माकर वळवी क्रीडा व युवक कल्याण, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य
वर्षा गायकवाड महिला व बालकल्याण

राज्यमंत्री खाती
रणजीतकांबळे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, पर्यटन, सार्वजनिकबांधकाम
भास्करजाधव नगरविकास, वने, बंदरे, खारजमीन, संसदीय कार्य, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिकांचे कल्याण, विधी व न्याय
प्रकाशसोळंके महसूल, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन, वस्त्रोद्योग
सचिनअहिर गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधारणा, घरदुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी कमाल जमीन धारणा,उद्योग, खनिकर्म, सामाजिक न्याय, पर्यावरण, विमुक्त भटक्या जाती व अन्य मागासवर्गीयांचे कल्याण, व्यसनमुक्ती कार्य
फौजियाखान सामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण,महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि अल्पसंख्याक विकास (औकाफसह)
गुलाबरावदेवकर कृषी, पदुम, जलसंधारण, रोजगार व स्वयंरोजगार, परिवहन
सतेजपाटील गृह (शहरे व ग्रामीण), ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन
राजेंद्रमुळक अर्थ व नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, विधिमंडळ कामकाज, उत्पादनशुल्क
राजेंद्र गावित आदिवासी विकास, कामगार, पाणलोट क्षेत्र विकास, फलोत्पादन
डी पीसावंत वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, विशेष सहाय्य, अपारंपरिक ऊर्जा

गाडगे महाराज

Photo: गाडगे महाराज 

"देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे व गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज."
गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या रहाणीमुळे त्यांना ‘गोधडी महाराज’, ‘चिंधेबुवा’, ‘बट्टीसाधू’ इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडालेलं एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याच रूपात बाबा सर्वत्र वावरत असत. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणून लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला. आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरूद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारित तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी अनेकवेळा आपली ओंजळ रिकामी केली होती. त्यांनी स्वतःचे आयुष्य म्हणजेच ‘लोकसंस्कारपीठ’ बनविले होते. 
सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
संक्षिप्त चरित्र
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
१९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.
गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.
गाडगे महाराज 

"देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे व गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज."
गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या रहाणीमुळे त्यांना ‘गोधडी महाराज’, ‘चिंधेबुवा’, ‘बट्टीसाधू’ इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडालेलं एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याच रूपात बाबा सर्वत्र वावरत असत. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणून लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला. आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरूद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारित तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी अनेकवेळा आपली ओंजळ रिकामी केली होती. त्यांनी स्वतःचे आयुष्य म्हणजेच ‘लोकसंस्कारपीठ’ बनविले होते.
सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
संक्षिप्त चरित्र
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
१९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.
गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

पत्रकार बना, लेखणीची ताकद दाखवा

आज नवनवीन वृत्तपत्र, टीव्ही न्यूज चॅनल, न्यूज वेबसाइटस आदी आपल्यासमोर येत आहेत. या सर्वांना चांगल्या तरुण पत्रकारांची गरज आहे. तुम्ही मास कम्युनिकेशनचा कोर्स केला असेल तर तुम्हाला रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. मास कम्युनिकेशनचा कोर्स करून नोकरी शोधत असलेल्या तरुणांची संख्याही कमी नाही. अनेक लोक तर असे आहेत ज्यांना फील्डमध्ये नोकरी मिळतच नाही. मीडिया हाउस त्यांना घेत नाही कारण त्यांना हवी ती योग्यता या तरुणांकडे नाही. तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर आधी हे निश्चित करा की प्रशिक्षणासाठी अशा संस्थेची निवड करा जिचा लाभ तुम्हाला जॉब मिळण्यास आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. येथे काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे, ज्याकडे विद्याथ्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. मल्टी पर्पज ट्रेनिंग आता मीडियाच्या क्षेत्रात मोठा बदल झालेला पहावयास मिळतो. सर्व लहान मोठ्या ग्रुप्सना मल्टीपर्पज लोकांची गरज आहे. असे अनेक लोक विविध ग्रुपमध्ये करताना दिसतील जे केवळ चांगले लिहितच नाही तर, एडिट करणे, समीक्षा करणे यात कुशल आहेत. तसेच डिजाइनिंग, लेआउट आणि प्रोडक्शनशी संबंधीत कामांचीही त्यांना ब-यापैकी माहिती असते. या बदलाचे श्रेय या क्षेत्रात प्रशिक्षण देणा-या चांगल्या संस्थांना जाते. ज्या आपल्याकडे ट्रेनिंगदरम्यान राइटिंग स्किलबरोबरच डिजाइनिंग, प्रॉडक्भ्शन, मार्केटिंग आदिशी संबंधित आवश्यक गोष्टींची माहिती उपलब्ध करून देतात. अशा संस्थांतून बाहेर पडलेले विद्यार्थी मल्टी टॅलेंटेड असल्याने जॉब सहज मिळतो. तसेच नोकरीदरम्यान प्रगती करण्यात त्यांना प्राधान्य मिळते. इंस्टीटयूट निवडण्याआधी हे ’ रवा की, जी संस्था तुमच्या नजरेसमोर आहे तेथे तुम्हाला हे सर्व मिळू शकते की नाही. चांगल्या मार्गदर्शकामुळे तुमचा मार्ग सुकर होऊ शकतो. चांगला मार्गदर्शक कोणाला मिळाला तर तो त्याचे लक्ष्य गाठण्यास सफल होतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात संस्थेची चांगली फॅकल्टी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या क्षेत्रात जायचे असेल तर प्रवेशासाठी अशा संस्थेची निवड करा जिथे चांगले आणि अनुभवी शिक्षक असतील. ते तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आपल्या अनुभवातून बरेच काही देऊ शकतात. मीडिया सेक्टरमध्ये वरिष्ठ पत्रकारांच्या अनुभवातून खूप चांगले शिकायला मिळते. प्रशिक्षण देणा-या अशा अनेक संस्था आहेत, जिथे मीडिया फील्डमध्ये प्रसिद्ध असलेले टीचिंग स्टाफमध्ये काम करतात. अशा संस्था वेळप्रसंगी प्रसिद्ध पत्रकाराना गेस्ट फॅकल्टीच्या रूपाने आपल्याकडे बोलावतात. प्रोजेक्ट वर्क पत्रकारितेच्या क्षेत्रात सैद्धांतिक ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानाचा फायदा होतो. मॉस कामचे प्रशिक्षण देणा-या जेवढ्या चांगल्या संस्था असतील तेथे याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांचे विद्यार्थी या क्षेत्रातील प्रॅक्टिकल नॉलेजही मिळवतात. यासाठी ते आपल्या विद्याथ्र्यांना प्रोजेक्ट वर्क देतात. हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी विद्याथ्र्यांना फील्डवर जावे लागते. विविध लोकांना भेटावे लागते. इंटरनेट अथवा पुस्तकालयात बसून त्या विषयाचे बारकाईने अध्ययन करावे लागते. अशाप्रकारची प्रक्रिया कोर्स करणा-यांत स्वाभाविक शोधवृत्तीला चालना देते. ही बाब पत्रकारासाठी खूप महत्त्वाची आहे. साधेसरळ किंवा सोप्या विषयांवर दिलेले प्रोजेक्ट वर्क तुमच्यातील दडलेली शोधवृत्ती जागृत करू शकत नाही. इंस्टीट्यूट निवडण्याआधी हेही पाहणे आवश्यक आहे की तेथे गेल्या वर्षीच्या विद्याथ्र्यांना कशाप्रकारचे प्रोजेक्ट दिले गेले होते.वाचन आवश्यकएका पत्रकाराकडून ही अपेक्षा केली जाते की, त्याकडे विविध विषयाशी संबंधित पुरेशी माहिती असेल. लोकांच्या या अपेक्षाच्या कसोटीला उतरण्यासाठी मीडिया जगताशी संबंधीत लोक नेहमी नवनवीन विषयांची माहिती मिळवीत असतात. त्यासाठी चांगली पुस्तके वाचत असतात.पत्रकारितेच्या क्षेत्रात तुम्हाला नाव कमवायचे असेल तर संस्था निवडण्याआधी हे निश्चित करा की त्यांच्याकडे पुरेशा संख्येत पुस्तके, महत्वाची वृत्तपत्रे आदींचा संग्रह आहे की नाही.

रोबोटिक्समध्ये सृजनात्मक करिअर

आजचे युग हे विज्ञानाचे युग समजले जाते. या युगात ज्याला कॉम्प्यूटर चालवता आले नाही, तो अशिक्षित आहे. मानवाची सगळी कामे आता यंत्र करायला लागले आहे. त्या यंत्राचे कळ मात्र मानवाच्या हातात असते, हे आपल्याला विसर...
ून चालणार नाही. रोबोटिक्स विज्ञानात करियर घडविण्याचा आजच्या युवापिढीला सूवर्ण संधी प्राप्त झाली आहे. जग हे सुपरफास्ट वेगाने धावत आहे. रोबोटिक्स कॉम्प्यूटर विज्ञानाचा झपाट्याने विकास झाला आहे. रोबोटिक्स या मागील मुख्य उद्देश म्हणजे रोबोट्स अर्थात यांत्रिक मानव निर्माण करून त्यात मावनासारखी बुध्दी उतरवून त्याच्याकडून समस्या सोडवून घेणे होय. असे शिक्षण रोबोटिक्स विज्ञानात दिले जाते. रोबोटिक्समध्ये करियर करण्यासाठी उमेदवाराने इंजीनिरिंगमध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. रोबोटिक्समध्ये डिजाइनिंग तसेच नियंत्रणात विशेषज्ज्ञता मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवाराने मॅकेनिकल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. इलेक्टिड्ढकल अथवा इलेक्टड्ढॉनिक्स इंजीनियरिंगमध्ये बी-टेक पदवी प्राप्त केलेले विद्याथ्र्यांनाही प्रवेश मिळू शकतो. विद्याथ्र्यांने गणित या विषयातही प्राविण्य मिळविलेले असतावे. रोबटिक्स विज्ञान विषयात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांमध्ये सृजनात्मकता हा प्रमुख गुण असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. रोबटिक्स विज्ञानात पदवी घेतलेल्या विद्याथ्र्यांना देशात तसेच परदेशात खूप डिमांड आहे. रोबोटिक्स विज्ञान विषय उपलब्ध असणा-या संस्था : इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली.इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी-कानपूर. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी-मुंबई. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स-चेन्नई. यूनिवर्सिटी ऑफ हैदराबाद. बिडला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड सायन्स, पिलानी.

ई-लर्निंगमधून बना कंपनी सेक्रेटरी

आईसीएसआई या नामांकित संस्थेने ई-लर्निंगच्या माध्यमातून अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कंपनी सचिव हा अभ्यासक्रम शिकविणारी एकमात्र संस्था इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेके्रटरीज ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी फाउंडेश...
न कार्यक्रमासाठी विद्याथ्र्यांना विविध सुविधा देण्याच्या हेतूने एक ई-लर्निंग पोर्टल कार्यान्वित केले आहे. कंपनी सेक्रेटरी बनायचे स्वप्न पाहणा-यांसाठी तर ही सुवर्ण संधीच उपलब्ध झाली असून विद्यार्थी चोवीस तास ऑनलाईन अभ्यास करू शकतात. ई-लर्निंग पोर्टल संपूर्ण जगात उपलब्ध असून आता शहरातील विद्याथ्र्यांप्रमाणे ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थी देखील कंपनी सेक्रेटरी पाहण्याचे स्वप्न पुर्ण करू शकता. इंस्टीट्यूटच्या माध्यमातून तत्काळ एक्जीक्यूटिव्ह प्रोग्रॅम व प्रोफेशनल प्रोग्राम घेण्यासाठी ई-लर्निंगच्या सुविधांच्या कक्षा रुंदावण्यात येणार आहेत. ई-लर्निंगमधून विद्यार्थी सतत ऑनलाईन अभ्यास करून संबंधित विषयाचे ज्ञान आत्मसात करतात. त्यातून त्यांना त्यांच्या सवईनुसार अभ्यास करण्यास व विषय निवडण्यास मदत होते . एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी सरळ चर्चासत्रात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी सरळ संबंधित विषयाचे ज्ञान आत्मसात करतात. तसे पाहिले तर विद्याथ्र्यांनी महाविद्यालयात न जाता घर बसल्या-बसल्या ई-लर्र्निंग पोर्टलच्या माध्यमातून कंपनी सेके्रटरी सारखे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अभ्यासक्रमांना अशा पद्धतीने सेट केला आहे की विद्यार्थी व शिक्षक यांच्यात संपर्क टिकून राहील. ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ इच्छुक असणा-यांनी इंस्टीट्यूटने निश्चित केलेले शुल्क जमा करू शकता. चालू वर्षाचे वार्षिक शुल्क अतिरिक्त करासहित २५० रुपये मात्र आहे. विद्यार्थी क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड/ इसीएसच्या माध्यमातून शुल्क भरू शकता किंवा आईसीएसआई गुरुकुल ऑनलाईन या नावाने मुंबई येथे देय असलेला धनादेश पाठवून या अत्याधुनिक शिक्षण प्रणालीत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी एचटीटीपी:फफ ईलर्निंग डॉट आयसीएसआय डॉट ईडीयू या संकेतस्थळावर भेट द्या.

खात्री नोकरीची

खात्री नोकरीची बुधवार, ०७ नोव्हेंबर, २०१२

एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये 18 जागा
एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये कार्यालय प्रमुख (2 जागा), विशेषज्ञ -वैद्यकीय (4 जागा), वैद्यकीय अधिकारी (5 जागा), डेंटल ऑफिसर (1 जागा), नर्सिंग असिस्टंट (5 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये 6 जागा
मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये स्टोअर किपर (2 जागा), लेबर (3 जागा), सफाईवाला (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज 21 दिवसाच्या आत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 7 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञाच्या 360 जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये (महाजनको) तंत्रज्ञ-3 (360 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahagenco.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात अग्निशामकाच्या 129 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवर अग्निशामक (129 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 26 नोव्हेंबर 2012 ते 5 डिसेंबर 2012 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, सामनामध्ये दि. 5 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सहसंचालक तंत्रशिक्षण अमरावती विभागीय कार्यालयात 24 जागा
अमरावती येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात लिपिक नि टंकलेखक (5 जागा), भांडारपाल (1 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), विजतंत्री (1 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-तांत्रिक (10 जागा), सर्वसाधारण यांत्रिक (1 जागा), शिपाई (1 जागा), हमाल/प्रयोग शाळा परिचर (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 4 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jdroamt.orgया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्रबंधक-संशोधन अधिकारी पदाच्या 3 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील सहायक प्रबंधक-संशोधन अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mpsc.gov.inhttp://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारी पदाच्या 5 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mpsc.gov.inhttp://www.mpsconline.gov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवर 5 जागा
नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवर सहायक स्वयंपाकी (1 जागा), न्हावी (1 जागा), सेवक (2 जागा), सफाईगार (1 जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सहसंचालक तंत्रशिक्षण औरंगाबाद विभागीय कार्यालयात 18 जागा
औरंगाबाद येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक (6 जागा), मुद्रण निदेशक (1 जागा), भांडारपाल (3 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 2 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.dteaui.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत 23 जागांसाठी भरती
नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत स्त्रीरोग तज्ञ (1 जागा), बालरोग तज्ञ (1 जागा), अपघात वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (5 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), क्ष किरण तंत्रज्ञ (1 जागा), ऑक्झिलरी नर्स-मिडवाईफ (1 जागा), शस्त्रक्रियागृ सहायक (1 जागा), वायरमन (5 जागा), शिपाई (1 जागा), सहाय्यक प्लंबर (1 जागा), मदतनिस (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी व दै. लोकसत्तामध्ये 2 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात 45 जागा
मुंबई उच्च न्यायालयात महाव्यवस्थापक (4 जागा), वरिष्ठ कोर्ट व्यवस्थापक (6 जागा), कोर्ट व्यवस्थापक (35 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सहसंचालक तंत्रशिक्षण मुंबई विभागीय कार्यालयात 30 जागा
मुंबई येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात लिपिक टंकलेखक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/टिप्पणी सहायक (3 जागा), भांडारपाल (3 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (6 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), कुशल कारागिर (1 जागा), वीजतंत्री (3 जागा), यांत्रिकी/यंत्रकारागिर (2 जागा), लोहार (1 जागा), यंत्रपरिचर (1 जागा), निदेशक –मुद्रण (1 जागा), सहाय्यक रासायनिक-चर्मकला (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jdteromumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमनच्या 184 जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमन (184 जागा) भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत 30 जागा
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत वैद्यकीय सल्लागार (10 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत 20 जागा
ठाणे जिल्हा परिषदेतील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीत लेखापाल नि डाटा एन्ट्री ऑपरेटर (18 जागा), सांख्यिकी अन्वेषक (2 जागा) ही पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 8 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात 29 जागा
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), सुतार (1 जागा), यंत्रपरिचर दर्जा-1 (4 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-स्थापत्य (3 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-यंत्र (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-उत्पादन (2 जागा), स्टुडिओ सहाय्यक (3 जागा), सहाय्यक भांडारपाल (1 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा), डाटा एन्ट्री व मेन्टेनन्स ऑफिसर (1 जागा), लेखा सहाय्यक (1 जागा), ग्रंथालयीन सहाय्यक (1 जागा), सहाय्यक कक्ष अधिकारी (1 जागा), वॉर्डन (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.coep.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत 3 जागा
पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत प्रयोगशाळा व्यवस्थापक (1 जागा), ईएई समन्वयक (1 जागा), क्वालिटी एशुरन्स सुपरवायझर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 20 जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सहायक (3 जागा), संगणकचालक (6 जागा), वाहनचालक (5 जागा), शिपाई (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंत्याच्या 15 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंता (15 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 24 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती बोर्डाच्या www.mahammb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 397 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात संशोधन सहायक (59 जागा), सांख्यिकी सहायक (175 जागा), अन्वेषक (77 जागा), लिपिक टंकलेखक (49 जागा), वाहनचालक (22 जागा), चपराशी (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती ôû http://mahades.maharashtra.gov.in/, www.maharashtra.gov.inhttp://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात 7 जागा
पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (1 जागा), बांधणी साह्यकारी (2 जागा), प्रक्रिया साह्यकारी (1 जागा) आणि मागासवर्गीय अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (2 जागा), बांधणी साह्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात 16 जागा
मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती अंतर्गत परिचर प्रतिरुप (14 जागा), मुल प्रतवाचक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्त्रो हिंदी टंकलेखकाच्या 5 जागा
भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) हिंदी टंकलेखक (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 20-26 ऑक्टोबरच्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये 61 जागा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) परिवहन अभियंता (1 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता (4 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता-विद्युत (2 जागा), लेखा अधिकारी (2 जागा), सहाय्यक लेखा अधिकारी (2 जागा), विकास अधिकारी-सामान्य (2 जागा), सहाय्यक विकास अधिकारी-सामान्य (4 जागा), क्षेत्र अधिकारी (5 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (3 जागा), उद्यानकृषि पर्यवेक्षक (1 जागा), उद्यान कृषि सहाय्यक (3 जागा), सहाय्यक भूमापन अधिकारी (1 जागा), भूमापक (11 जागा), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (2 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (7 जागा), ड्रायव्हर ऑपरेटर-अग्नी (2 जागा), टंकलिपिक (4 जागा), लेखा लिपिक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in किंवा www.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारीची 1 जागा
कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारी (1 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत मदि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये विशेष भरती अंतर्गत बस वाहकाच्या 1170 जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) विशेष भरती अंतर्गत बस वाहक (1170 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात 3 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (1 जागा), सहाय्यक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), एम.आय.एस. समन्वयक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

रोजगार व नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईटला भेट द्या.

अमरावती जिल्हा

१८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वऱ्हाड / विदर्भ) ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपूर्द केला. कंपनीने वहाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले –

१)दक्षिण वऱ्हाड – त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.
२)पूर्व वऱ्हाड – उत्तर वऱ्हाडाचे रुपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले.त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.
१८६४ मध्ये अमरावती मधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला. १९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.(ईस्ट इंडिया कंपनीला तो काही कालावधीसाठीच देण्यात आला होता.) १९०३ मध्ये वऱ्हाड मध्यप्रांताला जोडण्यात आला. आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळा झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा दख्खनच्या पठारावर पूर्णपणे स्थानबद्ध आहे.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात.
अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७ चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.
अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळ, वर्धा , अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत.अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील अग्रगण्य संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.
प्रशासकीय विभाग
जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
१)अमरावती – अमरावती, भातकुली, नांदगाव(खंडेश्वर).
२)दर्यापुर – दर्यापूर, अंजनगाव.
३)अचलपूर – अचलपूर, चांदूर बाजार.
४)मोर्शी- मोर्शी, वरुड.
५)धारणी – धारणी, चिखलदरा.
६)चांदूर(रेल्वे)- चांदूर(रेल्वे),धामनगाव, तिवसा.

पर्यटनस्थळ
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदऱ्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षण आहेत.
विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथीयांचे हे सर्वात प्रमुख तिर्थस्थळ आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
अचलपुर तालुक्यातील बहीरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहीरम (भैरव) या देवाची पुजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांत प्रसिद्ध आहे.
अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानुर नदीवर शहानुर प्रकल्प आहे. अमरावती शहरात वडाळी तलाव व छत्री तलावातून पाणी पुरवठा होतो.
अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले.
पर्यटन :
चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला ‘किचकदरा’ असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरी चे सुद्धा उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ ला घोषित केल्यागेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश चित्ते, अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगलीकुत्रे , मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.
चिखलदऱ्या जवळची काही आकर्षण केंद्रे :
१) मेळघाट व्याघ्रप्रकल्प , कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
२)गावीलगड किल्ला.
३)नर्नाळा किल्ला.
४)पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
५)ट्रायबल म्युझीयम
अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लाईडींगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लाईडींग मोजक्याच ठिकाणी होतं. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.
शिक्षण:-
जिल्ह्यात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
१) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
२)V.Y.W.S. अभियांत्रिकी महाविद्यालय , अमरावती
३)सीपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
वैद्यकीय महाविद्यालये -
१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.
२)विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती.
३)V.Y.W.S. दंतशल्यचिकित्सा महाविद्यालय, अमरावती.
४)श्री वल्लभ तखतमल होमीओपेथी महाविद्यालय, अमरावती.
५)पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपेथीक मेडिकल सायन्सेस, अमरावती.
शारीरिक शिक्षण
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती.
ही शारीरिक शिक्षण क्षेत्रात जागतिक मान्यता असलेली संस्था म्हणजे अमरावतीचं भूषण आहे. जागतिक दर्जाच्या खेळ सुविधा येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. येथे शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम चालवल्या जातो.
शिक्षण:
प्राथमिक शाळा: १७७८ माध्यमिक शाळा: ३६४ महाविद्यालये : ३६ अध्यापक विद्यालये: ८ आदिवासी आश्रमशाळा: ३६ अभियांत्रिकी महाविद्यालये : ३ तंत्रनिकेतन : ६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था: २ वैद्यकीय महाविद्यालये: ५
आरोग्य:
जिल्हा सामान्य रुग्णालय: १ जिल्हा स्त्री रुग्णालय : १ जिल्हा क्षय रुग्णालय : १ प्राथमिक आरोग्य केंद्र : ५६ ग्रामीण कुटुंब केंद्र : १४

अमरावती विद्यापीठ
अमरावती विद्यापीठा ची स्थापना १ मे इ.स. १९८३ मध्ये झाली. Education for Salvation of Soul हे अमरावती विद्यापीठा चे ब्रीद वाक्य आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम हे पाच जिल्हे अमरावती विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर हे आहेत.
पिके
पिका खालील क्षेत्र : ८०१ हजार हेक्टर
ओलीत क्षेत्र : ६२ हजार हेक्टर
जलसिंचन :
मोठे प्रकल्प – १ मध्यम प्रकल्प – २ लाभक्षेत्र : १६ हजार हेक्टर शेती पतसंस्था : ३८१

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार

लोककल्‍याणकारी राज्‍य संकल्‍पनेत लोककेंद्रीत प्रशासन महत्‍त्‍वाचे असते. माहितीचा अधिकार कायद्यामुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग या तीन बाबींना महत्‍त्‍व प्राप्‍त झा...
ले असून लोकशाहीच्‍या सबलीकरणासाठी हा कायदा निश्‍चितच उपयोगी ठरणार आहे.

'माहितीचा अधिकार' हा अष्‍टाक्षरी मंत्र 12 आक्‍टोबर, 2005 रोजी भारतीय जनतेला मिळाला. या मंत्राचा वापर करुन प्रशासनातील दोष, उणिवा, गैरप्रकार उघड करण्‍यात आले. देशातील अनेक कायदे हे जनतेने पाळायचे आणि प्रशासनाने त्‍यावर लक्ष ठेवायचे असे आहेत, माहितीचा अधिकार हा एकमेव कायदा असा आहे की, लोकप्रशासनाने तो पाळावयाचा असून जनतेची त्‍यावर नजर असणार आहे. या कायद्यामुळे भ्रष्‍टाचार पूर्णपणे संपणार नसला तरी त्‍याचे
प्रमाण निश्‍चितच कमी होणार आहे.
लोकप्रशासन केवळ वस्‍तुनिष्‍ठ असून उपयोगाचे नाही तर ते आदर्शवादी असायला हवे. प्रशासनाचा जनतेशी संबंध येतो. जनकल्‍याणाची कामे करतांना प्रशासकीय यंत्रणा समाजाभिमुख असली तरच जनतेला हे प्रशासन आपले वाटेल. गेल्‍या काही वर्षात विविध नागरी संघटना, नागरिकांनी माहिती अधिकाराच्‍या माध्‍यमातून सुप्रशासन निर्मितीचा प्रयत्‍न केला.

शासकीय किंवा निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी, अधिकृत कागदपत्रे मिळावीत या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचा कायदा करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या संदर्भात वेळोवेळी दिलेला लढाही माहितीच्या अधिकारासाठी महत्वाचा ठरला आहे. आज विविध प्रसार माध्यमातून माहिती अधिकार कायद्याचा प्रचार झाला असला तरी ही माहिती नेमकी कोणाकडून आणि कशी मिळवावी, त्याबाबत सर्वसामान्य लोकांना अद्यापही नेमकी माहिती नाही.

माहितीच्या अधिकाराअंतर्गत कोणाकडून,कोणती आणि कशी माहिती मिळवायची, त्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा तसेच राज्यातील मुख्य माहिती आयुक्तांसह सर्व विभागीय माहिती आयुक्तांच्या कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनीही येथे आहेत.

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५
न्यायालये, संसद, विधिमंडळ, महामंडळे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, आर्थिक लाभ घेणार्‍या सहकारी किंवा खाजगी सेवाभावी संस्था, मंत्रालयातील विविध विभाग अशा कार्यालयांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ लागू करण्यात आला आहे. विविध कार्यालयातील कामकाजाची माहिती, कागदपत्रे नागरिकांना मिळवता यावी म्हणून, अशा अधिकाराची व्यवहार्य पद्धत आखून देण्याकरिता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आला आहे. माहिती मिळविण्याची इच्छा असणार्‍या नागरिकांना ती पुरविण्याकरिता तरतूद म्हणून या कायद्याची अंमलबजावणी केली आहे.

माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. - न्यायालयातर्फे आवश्यक त्या निकालाची प्रत घेता येते. विधिमंडळाकडून मंत्रिपरिषदेच्या निर्णयाची प्रत घेता येते. शासकीय कार्यालयाकडून अहवाल, नमुने, प्रसिद्धी पत्रके आदी कागदपत्रांची झेरॉक्स घेता येते. सहकारी संस्थांकडून इतिवृत्त, निर्णयाच्या प्रती, आर्थिक व्यवहाराची माहिती घेता येते.

कोणाकडून घेऊ शकतो माहिती
माहिती देणारी कार्यालये, संस्था यांनी आपल्या कामकाजाची माहिती स्वत:हून प्रसिद्ध करुन सूचना फलकावर लिहायची आहे. अथवा अशा माहितीची संचिका प्रत कार्यालयाच्या बाहेर जनतेसाठी ठेवायची आहे. त्यात कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्‍यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्‍यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत, कर्मचार्‍यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी. ही माहिती पुढील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थामधून घेता येते.

1) न्यायालये (सर्व)2) संसद (लोकसभा व राज्यसभा)3) विधिमंडळ (विधानसभा/विधान परिषद), विविध महामंडळे
4) आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये,5) तहसील कार्यालये, जिल्हा परिषदा (अंतर्गत सर्व कार्यालये),
6) पंचायत समिती (अंतर्गत सर्व विभाग), ग्रामपंचायती 7) महानगरपालिका, नगरपालिका
8) गृह विभाग (पोलीस यंत्रणा)9) मंत्रालयीन विविध विभाग तथा सर्व शासकीय कार्यालये
10) शासकीय अनुदानित सहकारी, खाजगी, सेवाभावी संस्था उदा :- साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संघ, सहकारी बँका.

अशी मिळवा माहिती
माहिती मिळविण्यासाठी अर्जदार हा कोर्‍या कागदावरसुद्धा जनमाहिती अधिकार्‍याकडे अर्ज करु शकतो. त्या अर्जावर १० रु. चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा रोख रक्कम/डिमांड ड्राफ्ट/बँकर्स चेक द्यावा. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागणार नाही.

असा अर्ज सादर करताना पुढील १२ बाबींची पूर्तता करावी
1) कार्यालयाचे नाव 2) कार्यालयाचा पत्ता 3) अर्जदाराचे संपूर्ण नाव 4) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता 5) माहितीचा विषय
6) कोणत्या कालावधीची माहिती हवी? 7) कोणत्या प्रकारची माहिती हवी? 8) माहिती, पोस्टाने की स्पीड पोस्टने हवी?
9) अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय? (असल्यास रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी)10) अर्ज केल्याची तारीख 11) अर्ज केल्याचे ठिकाण 12) अर्जदाराची सही वा अंगठा
संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर तो जनमाहिती अधिकार्‍याकडे सादर करावा. पोच घ्यावी. ३० दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

माहिती मिळण्याचा व अपिलाचा कालावधी
जनमहिती अधिकार्‍याकडे अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती मिळते. जनमाहिती अधिकार्‍याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास अपील करण्याचा कालावधी ३० दिवसांचा आहे.

अपिलीय अधिकार्‍याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास ९० दिवसांत राज्य माहिती आयुक्ताकडे द्वितीय अपील करता येते.

माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च
दस्तऐवजाचे वर्णन खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु. २
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी ५ रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.

अपील का, कसे करावे?
१)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध अपिलीय अधिकार्‍यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्‍यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो.

२) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा. अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे. शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. अर्जाची पोच घ्यावी.

३) अपिलीय अधिकार्‍याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

दुसरे अपील का, कसे करावे?
१) अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्‍याकडूनही न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो.

२) दुसरे अपील करताना पुन्हा पहिल्या अपिलाच्या अर्जाप्रमाणे कृती करावी. अर्जावर २० रुपयांचा मुद्रांक चिकटवून नांव, पत्ता अपिलीय अधिकार्‍याचा तपशील, प्रारंभीच्या जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकार्‍याकडून मिळालेली माहिती व अर्जदाराला अपेक्षित असलेल्या माहितीचा तपशील स्पष्टपणे लिहावा.

३) राज्य माहिती आयुक्त अशा अर्जाची तपासणी करतात. गरज वाटल्यास संबंधित कार्यालयाच्या अधिकार्‍यांना समक्ष बोलावतात किंवा गरज वाटल्यास अर्जदारालाही बोलावतात. त्यानंतर राज्य माहिती आयुक्त निर्णय देतात. त्यांनी दिलेला निर्णय मात्र संबंधितांवर बंधनकारक असतो.

माहिती नाकारल्यास दंड
१) जनमाहिती अधिकार्‍याने वेळेत माहिती दिली नाही. जाणीवपूर्वक नाकारली, किंवा चुकीची, अपूर्ण, दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा माहितीच नष्ट केली तर, व असे आयोगाचे मत झाल्यास, गुन्हा करणार्‍या माहिती अधिकार्‍यास २५० रु. दंड प्रत्येक दिवसाला केला जातो. मात्र एकूण दंडाची रक्कम २५ हजारांपेक्षा अधिक लादता येत नाही.

२) राज्य माहिती आयोगामार्फत जेव्हा गुन्हा केलेल्या जन माहिती अधिकार्‍याला दंड केला जातो तत्पूर्वी त्याला आपले म्हणणे पुराव्यासह मांडण्याची संधी दिली जाते. अशावेळी आयोग दंडाबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतो.

माहिती आयुक्तांचे पत्ते

महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त -
डॉ. श्री. सुरेश जोशी
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (मुंबई व मुंबई उपनगर विभाग)
श्री. रामानंद तिवारी
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (कोकण विभाग)
श्री. नवीनकुमार
१ ला मजला, कोकणभवन, नवी मुंबई-४००६१४
दुरध्वनी क्रमांक-०२२-२७५७१३२४

राज्य माहिती आयुक्त (पुणे विभाग)
श्री. विजय कुवळेकर
४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे-१
दुरध्वनी क्रमांक- ०२०-२६०५०६३३/२६०५०५८०

राज्य माहिती आयुक्त (औरंगाबाद/नाशिक विभाग)
श्री. विजय बाबूराव बोरगे
सुभेदारी गेस्ट हाऊस, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ,
औरंगाबाद-४३१ ००१
दूरध्वनी क्रमांक- ०२४०-२३५२५४४ फॉक्स क्र. २३५२१३३

राज्य माहिती आयुक्त (नागपूर/अमरावती विभाग)
श्री. विलास भागवत पाटील
रवीभवन, दालन क्र.१७, नागपूर.
दूरध्वनी क्रमांक-०७१२-२५६६८१६

महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने दिनांक 16 -1-2012 ला ह्या कायद्यामध्ये खालील अटीँचा समावेश केला.
ह्या कायद्याखालील माहीती मागवण्यासाठीचा अर्ज 150 शब्दांमधेच मांडावा.याचा अर्थ हा की फक्त जाणकार किँवा वकिलांच्या माध्यमातूनच अर्ज करता यावा. सामान्य अल्पशिक्षीत माणसांची याहून कुचंबणा व्हावी यासाठीच.
एका वेळी एका अर्जात एकाच विषया संबंधीत किँवा एकाच खात्याविषयक माहीती मागवता येईल.याचा अर्थ असा की ही प्रक्रीया अधीक किचकट बनवून अर्जदारास हे सव्यापसव्य त्रासदायक ठरावे.
माहीतीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावर पेन्सिलीशीवाय काहीही लिहू नये.

माहितीचा अधिकार अर्ज नमुना

महत्वाच्या वेबसाईट

महान्यूज http://mahanews.gov.in/
माहिती जनसंपर्क महासंचालनालय http://dgipr.maharashtra.gov.in/dgiprweb/Main.aspx
राज्य माहिती आयोग http://sic.maharashtra.gov.in/
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ http://www.msebindia.com/
महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ http://www.midcindia.org/
सी.ई.ओ. http://ceo.maharashtra.gov.in/
मुंबई पोलीस http://www.mumbaipolice.org/
सायबर क्राईम http://www.cybercellmumbai.com/
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ http://mpcb.mah.nic.in/
एम.एस.आर.टी.सी. http://www.msrtc.gov.in/
अर्थवाहिनी https://arthwahini.mahakosh.gov.in/
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग http://www.mahawssd.gov.in/
राज्य उत्पादन शुल्क http://stateexcise.maharashtra.gov.in/index.html
सी.आय.ङी http://mahacid.com/
एम.एस.आर.डी.सी. http://www.msrdc.org/
पी.डब्लू.डी. http://www.mahapwd.com/
महिला व बाल विकास विभाग http://womenchild.maharashtra.gov.in/index.php
एम.एम.आर.डी.ए http://www.mmrdamumbai.org/index.htm
वाहतूक पोलीस मुंबई http://www.trafficpolicemumbai.org/
कोषवाहिनी http://koshwahini.mahakosh.gov.in/
राज्य उत्पादन शुल्क http://www.mahaexcise.com/
विक्रीकर http://www.mahavat.gov.in/
पत्र सूचना कार्यालय http://pib.nic.in/
भारतीय रेल्वे http://www.indianrail.gov.in/
दूरसंचार विभाग http://www.ccamaharashtra.gov.in/
एम टी एन एल http://mumbai.mtnl.net.in/directory/index.html
नाबार्ड http://www.nabard.org/
टपाल विभाग http://indiapost.gov.in/
सुप्रीम कोर्ट http://www.supremecourtofindia.nic.in/
राष्ट्रपती सचिवालय http://presidentofindia.nic.in/

स्पर्धा परीक्षा MPSC अभ्यासक्रम

राज्य सेवा (पुर्व) परीक्षा अभ्यासक्रम
२८ सप्टेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केला त्यानुसार ही नवी परीक्षा पध्दती युपीएससीच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसारखीच असल्याचे द...
िसून येते. यापूर्वी अभ्यासक्रम व स्वरूपात १९९४ साली बदल केला होता.राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

पेपर १ (२०० गुण) – एकूण – ७ घटक
पेपर २ (२०० गुण) – एकूण - ७ घटक

सामान्य अध्ययन पेपर १
या पेपरमधील घटक पुढीलप्रमाणे –
१ 1) चालू घडामोडी –
राज्य (महाराष्ट्र), राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्त्वाच्या चालू घडामोडी
२) इतिहास
भारताचा इतिहास ( महाराष्ट्राचाअ विशेष सदर्भासहित) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ
३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल –
प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक
४) महाराष्ट्र व भारतीय राज्यपध्दती व प्रशासन –
राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, नागरी प्रशासन, सार्वजनिक धोरण, मानवी हक्कासंबंधीचे मुद्दे, इत्यादी.
५) आर्थिक आणि सामाजिक विकास –
शास्वत विकास, दारिद्र्य, सर्वसावेशक धोरण, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, इत्यादी.
६) पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्दे –
पारिस्थितीकी, जैविक बहुविविधता व वातावरणातील बदल – सदर विषयायील स्पेशलायक्झेशन दर्जाचे ज्ञान आवश्यक नाही.
७) सामान्य विज्ञान –

राज्यसेवा पूर्वपरिक्षा – २०१३पेपर क्र. गुण वेळ दर्जा माध्यम
पेपर १ (अनिवार्य) २०० २ तास पदवी मराठी व इंग्रजी
पेपर २ (अनिवार्य २०० २ तास टॉपिक १ ते ५ – पदवी स्तर
टॉपिक ६ – इ. १०वी चा स्तर
टॉपिक ७ – इ. १०वी/१२चा स्तर मराठी व इंग्रजी

सामान्य अध्ययन पेपर २
या पेपरमधील घटक पुढीलप्रमाणे –
१) आकलन
२) संवादकौशल्यासहित अंतरव्यक्तिगत कौशल्य
३) तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता
४) निर्णय क्षमता आणि समस्येचे निराकरण
५) साधारण बुध्दीमापन चाचणी
६) मूलभूत अंकज्ञान (संख्या आणि त्यातील संबंध, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, इ.) (इयत्त्ता १० वी स्तर) – माहिती विश्लेषण (तक्ते, ग्राफ, टेबल आणि माहिताचा पुरेपणा, इ. – इयत्त्ता १० वी चा स्तर )
७) मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य ( १०वी / १२ वी चा स्तर)
सुचना १ – पेपर २ मधील मराठी आणि इंग्रजी भाषेतील आकलनकौशल्य तपासण्याबाबतचे दहावी / बारावी स्तरावरचे उता-यावरील प्रश्न ( पेपर २ च्या अभ्यासक्रमातील सातवा घटक) हे फक्त्त मराठी
व इंग्रजी लिपीतीलाच असतील व त्यांचे परस्परांतील भाषांतर प्रश्नपुस्तिकेत दिले जाणार नाही.
सूचना २- सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
सूचना ३ – उमेदवाराला राज्यसेवा पूर्वपरीक्षा पात्र ठरण्यासाठी, मूल्यमापनाच्या प्रक्रियेसाठी, दोन्ही पेपर अनिवार्य आहे. जर एखाद्या उमेदवाराने दोन्हीपैकी एकच पेपर दिला तर तो / ती अपात्र ठरेल.

राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

राज्य लोकसेवा आयोगाने पुढे होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रमाचा मसुदा वेबसाईटवर जाहीर केला आहे. त्यानुसार काही मुख्य बदल

यापुढे वैकल्पिक विषय नाहीत. सर्व परीक्षार्थी एकाच पातळीवर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या निर्णयाने केले.
सर्व परीक्षा बहुपर्यायी विकल्प (MCQ)स्वरुपात .अपवाद मराठी आणि इंग्रजीचा : हे दोन पेपर पूर्वीप्रमाणेच दिर्घोत्तरी स्वरुपात असतील. फक्त येथे निगेटिव्ह असेल 2 चुकीच्या उत्तरान्मागे एक गुण .यामुळे दीर्घोत्तरी उत्तरांमधील व्यक्तीसापेक्ष गुणदान पद्धती बदलेल आणि अभ्यासू परीक्षार्यांना याचा लाभच होईल. शिवाय निकाल वेळेत लावताना आयोगालाही फारश्या सबबी देता येणार नाहीत.
राज्यसेवा मुख्य परीक्षेलाही नकारात्मक गुणपद्धती लागू केली आहे. त्यानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नासाठी निर्धारित केलेल्या गुणांपैकी १/३ गुण प्राप्त गुणसंख्येतून वजा केले जाणार आहेत.
एवढेच नव्हे तर मुख्य परीक्षेत समाविष्ट प्रत्येक विषयात आयोगाने निर्धारित केलेली ‘पात्रता गुणसंख्या’ मिळवणे अनिवार्य झाले आहे. यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांला प्रत्येक विषयात ४५% आणि सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला ४०% गुण प्राप्त करावे लागतील. म्हणजेच अंतिमत: मुख्य परीक्षेत पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयातही किमान गुणांची कमाई करावी लागणार आहे. मगच सर्व विषयांत प्राप्त झालेल्या गुणांची बेरीज करून निकाल घोषित केला जाईल.
एकूण 6 पेपर. एकूण गुण 800 (मराठी, इंग्रजी प्रत्येकी 100 गुण आणि सामान्य अध्ययन 4 पेपर प्रत्येकी 150 गुण )
अर्थात पूर्वीच्या 1600 लेखी परीक्षेच्या गुणांवरून 800 गुणांकडे जाताना आयोगाने मुलाखतीचे गुणही 100 केले आहेत.
म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी बनवताना 800+100=900 गुण विचारात घेतले जातील.
अ.क्र. विषय व पेपर गुण
१. अनिवार्य मराठी १००
२. अनिवार्य इंग्रजी १००
३. सामान्य अध्ययन पेपर १ - इतिहास व भूगोल १५०
४. सामान्य अध्ययन पेपर २ - भारतीय राज्यघटना व राजकारण १५०
५. सामान्य अध्ययन पेपर ३ - मानव संसाधन विकास व मानवी हक्क १५०
६. सामान्य अध्ययन पेपर ४ - अर्थव्यवस्था व विज्ञान तंत्रज्ञान १५०


सविस्तर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे:

पेपर १ (इतिहास व भूगोल)

इतिहास
आधुनिक भारताचा इतिहास (विशेषत: महाराष्ट्राचा), ब्रिटीश राज्यसत्तेची भारतातील स्थापना, सामाजिक व सांस्कृतिक बदल, सामाजिक व आथिर्क जागृती,भारतीय राष्ट्रवादाचा उगम व विकास, गांधीकाळातील राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्योत्तर काळातील भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यांची विचारसरणी व कायेर्, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा.
भूगोल
(महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित)- प्राकृतिक भूगोल व भूगर्भरचना, आथिर्क भूगोल, मानवी व सामाजिक भूगोल, हवामान व मृदा, पर्यावरणीय भूगोल लोकसंख्याशास्त्रीय भूगोल, पाणी व्यवस्थापन रिमोट.

पेपर २
भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात) व कायदा

भारताची राज्यघटना, राजकीय व्यवस्था, राज्य शासन व प्रशासन, जिल्हा प्रशासन, शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण व्यवस्था, राजकीय पक्ष व दबाव गट, प्रसार माध्यमे, निवडणूक प्रक्रिया, प्रशासकीय कायदा, कंेद व राज्य सरकारचे विशेषाधिकार, काही महत्त्वाचे कायदे, समाजकल्याण व सामाजिक कायदे, लोकसेवा (प्रशासकीय सेवा, निवड व प्रशिक्षण संस्था), शासकीय खर्चावरील नियंत्रण.

पेपर ३ (मनुष्यबळ विकास व मानवी हक्क)

भारतातील मनुष्यबळ विकास, शिक्षण, व्यवसाय शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास. तसंच, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा, बाल विकास, महिला विकास, युवक विकास,आदिवासी विकास, सामाजिकदृष्टया मागासवगीर्य घटकांचा विकास, कामगार कल्याण, वयोवृद्धांचे कल्याण, अपंग व्यक्तींचे कल्याण, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण, मूल्ये व तत्वे.

पेपर ४ (अर्थशास्त्र व नियोजन आणि विज्ञान व तंत्रज्ञान)

भारतीय अर्थव्यवस्था, शहरी व ग्रामीण पायाभूत विकास, उद्योग, सहकार, आथिर्क सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल हालचाल, दारिद्य मोजमाप व अंदाज, रोजगार निर्धारित करणारे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था.

विकासाचे अर्थशास्त्र - मॅक्रो अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त व वित्तीय सहकार, भारतीय उद्योग, पायाभूत सेवा व सेवाक्षेत्र.

विज्ञान व तंत्रज्ञान : ऊर्जा, संगणक व माहिती तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण, आपत्ती व्यवस्थापन.


लिपीक-टंकलेखक परीक्षा
राज्य शासनाच्या सेवेतील लिपिक टंकलेखक, गट-क संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात
संवर्ग : अराजपत्रित, गट - क, पदे - (एक) लिपिक टंकलेखक - मराठी (दोन)लिपिक टंकलेखक - इंग्रजी
महाराष्र्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस. सी.)
किंवा महाराष्र्ट शासनाने एस.एस.सी. शी समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता.
लिपिक टंकलेखक मराठी या पदासाठी - मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट
टंकलेखक इंग्रजी या पदासाठी - इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय
वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
उमेदवाराला मराठी लिहिणे, वाचणे, बोलता येणे अत्यावश्यक आहे.



परीक्षा योजना :
१ प्रश्नपत्रिका : एक. प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :-विषय (संकेतांक 013) माध्यम दर्जा प्रश्नांची संख्या एकूण गुण कालावधी परीक्षेचे स्वरुप
मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुध्दिमापन आणि अंकगणित इंग्रजी विषयाकिरता इंग्रजी , इंग्रजी वगळता इतर विषयांकिरता मराठी माध्यमिक शालांत परीक्षेसमान. 200 400 दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी



२ अभ्यासक्रम :
(1) मराठी- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर .
(2) इंग्रजी- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
(3) सामान्यज्ञान- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र , सामाजिक व औघोगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या,विशेषकरुन महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
(4) बुध्दिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो, हे आजमावण्यासाठी प्रश्न.
(5) अंकगिणत - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक, सरासरी आणि टक्केवारी.


पोलीस उपनिरीक्षक, सहायक, विक्रीकर निरीक्षक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पूर्वी पोलीस उपनिरीक्षक, सहायक, विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी एकच परीक्षा घेतली जायची. २०११ सालापासून आयोगाने तीन पदांसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. तीनही पदांसाठीचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. परंतु मुख्य परीक्षेतील पेपर २ मध्ये पदांनुसार काही घटकांत बदल केले आहेत.

परीक्षेचे टप्पे : ही परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येते.
१) पूर्व परीक्षा- ३०० गुण
२) मुख्य परीक्षा- ४०० गुण
३) मुलाखत- ५० गुण
पूर्वपरीक्षेचे स्वरूप : प्रश्नपत्रिका एकच असून परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. प्रश्नांची संख्या १५० असून, एकूण
३०० गुण असतात. परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी माध्यमात असते. परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा शालांत परीक्षेचा असतो.

पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम :

- अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश, अपूर्णाक.
- भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या-उद्योगधंदे.
- भारताचा सामान्य इतिहास- १८५७ ते १९४७
- नागरिक शास्त्र व अर्थव्यवस्था- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), भारतीय पंचवार्षिक योजनेची वैशिष्टय़े.
- सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र
- महाराष्ट्रातील समाजसुधारक- गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
- चालू घडामोडी - देशविदेशाच्या घडामोडी


मुख्य परीक्षा


प्रश्नपत्रिकेचे स्वरूप- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
एकूण गुण-४००
प्रश्नपत्रिकांची संख्या- दोन
कालावधी प्रत्येकी दोन तास.

पेपर १ - इंग्रजी व मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक् प्रचार यांचा अर्थ व उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
पेपर २ - सामान्यज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान- या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.
१) चालू घडामोडी (३० गुण) :- जागतिक तसेच भारतातील.

२) बुद्धिमत्ता चाचणी (४० गुण)- अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णाक, तसेच बुद्धय़ांक मापनाशी संबंधित प्रश्न.

३) महाराष्ट्राचा भूगोल (३० गुण) - महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या, स्थलांतरित लोकसंख्या, व त्याचे स्रोत आणि डेस्टिनेशनवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न.

४) माहितीचा अधिकार कायदा- २००५- (१५ गुण)

५) महाराष्ट्राचा इतिहास (१५ गुण) - सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी (सत्यशोधक समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, हिंदू महासभा, मुस्लीम लीग, राष्ट्रीय क्रांती चळवळ, डावी विचारसरणी/कम्युनिस्ट चळवळ, शेतकरी चळवळ, आदिवासींचा उठाव.)

६) भारतीय राज्यघटना (२० गुण) - घटना कशी तयार
झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ- भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ- विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.

७) संगणक व माहिती तंत्रज्ञान (५० गुण) - आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...