आजचे युग हे विज्ञानाचे युग समजले जाते. या युगात ज्याला कॉम्प्यूटर चालवता आले नाही, तो अशिक्षित आहे. मानवाची सगळी कामे आता यंत्र करायला लागले आहे. त्या यंत्राचे कळ मात्र मानवाच्या हातात असते, हे आपल्याला विसर...
ून चालणार नाही. रोबोटिक्स विज्ञानात करियर घडविण्याचा आजच्या युवापिढीला सूवर्ण संधी प्राप्त झाली आहे. जग हे सुपरफास्ट वेगाने धावत आहे. रोबोटिक्स कॉम्प्यूटर विज्ञानाचा झपाट्याने विकास झाला आहे. रोबोटिक्स या मागील मुख्य उद्देश म्हणजे रोबोट्स अर्थात यांत्रिक मानव निर्माण करून त्यात मावनासारखी बुध्दी उतरवून त्याच्याकडून समस्या सोडवून घेणे होय. असे शिक्षण रोबोटिक्स विज्ञानात दिले जाते. रोबोटिक्समध्ये करियर करण्यासाठी उमेदवाराने इंजीनिरिंगमध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. रोबोटिक्समध्ये डिजाइनिंग तसेच नियंत्रणात विशेषज्ज्ञता मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवाराने मॅकेनिकल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. इलेक्टिड्ढकल अथवा इलेक्टड्ढॉनिक्स इंजीनियरिंगमध्ये बी-टेक पदवी प्राप्त केलेले विद्याथ्र्यांनाही प्रवेश मिळू शकतो. विद्याथ्र्यांने गणित या विषयातही प्राविण्य मिळविलेले असतावे. रोबटिक्स विज्ञान विषयात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांमध्ये सृजनात्मकता हा प्रमुख गुण असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. रोबटिक्स विज्ञानात पदवी घेतलेल्या विद्याथ्र्यांना देशात तसेच परदेशात खूप डिमांड आहे. रोबोटिक्स विज्ञान विषय उपलब्ध असणा-या संस्था : इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली.इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी-कानपूर. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी-मुंबई. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स-चेन्नई. यूनिवर्सिटी ऑफ हैदराबाद. बिडला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड सायन्स, पिलानी.