आईसीएसआई या नामांकित संस्थेने ई-लर्निंगच्या माध्यमातून अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कंपनी सचिव हा अभ्यासक्रम शिकविणारी एकमात्र संस्था इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेके्रटरीज ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी फाउंडेश...
न कार्यक्रमासाठी विद्याथ्र्यांना विविध सुविधा देण्याच्या हेतूने एक ई-लर्निंग पोर्टल कार्यान्वित केले आहे. कंपनी सेक्रेटरी बनायचे स्वप्न पाहणा-यांसाठी तर ही सुवर्ण संधीच उपलब्ध झाली असून विद्यार्थी चोवीस तास ऑनलाईन अभ्यास करू शकतात. ई-लर्निंग पोर्टल संपूर्ण जगात उपलब्ध असून आता शहरातील विद्याथ्र्यांप्रमाणे ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थी देखील कंपनी सेक्रेटरी पाहण्याचे स्वप्न पुर्ण करू शकता. इंस्टीट्यूटच्या माध्यमातून तत्काळ एक्जीक्यूटिव्ह प्रोग्रॅम व प्रोफेशनल प्रोग्राम घेण्यासाठी ई-लर्निंगच्या सुविधांच्या कक्षा रुंदावण्यात येणार आहेत. ई-लर्निंगमधून विद्यार्थी सतत ऑनलाईन अभ्यास करून संबंधित विषयाचे ज्ञान आत्मसात करतात. त्यातून त्यांना त्यांच्या सवईनुसार अभ्यास करण्यास व विषय निवडण्यास मदत होते . एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी सरळ चर्चासत्रात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी सरळ संबंधित विषयाचे ज्ञान आत्मसात करतात. तसे पाहिले तर विद्याथ्र्यांनी महाविद्यालयात न जाता घर बसल्या-बसल्या ई-लर्र्निंग पोर्टलच्या माध्यमातून कंपनी सेके्रटरी सारखे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अभ्यासक्रमांना अशा पद्धतीने सेट केला आहे की विद्यार्थी व शिक्षक यांच्यात संपर्क टिकून राहील. ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ इच्छुक असणा-यांनी इंस्टीट्यूटने निश्चित केलेले शुल्क जमा करू शकता. चालू वर्षाचे वार्षिक शुल्क अतिरिक्त करासहित २५० रुपये मात्र आहे. विद्यार्थी क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड/ इसीएसच्या माध्यमातून शुल्क भरू शकता किंवा आईसीएसआई गुरुकुल ऑनलाईन या नावाने मुंबई येथे देय असलेला धनादेश पाठवून या अत्याधुनिक शिक्षण प्रणालीत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी एचटीटीपी:फफ ईलर्निंग डॉट आयसीएसआय डॉट ईडीयू या संकेतस्थळावर भेट द्या.