आज नवनवीन वृत्तपत्र, टीव्ही न्यूज चॅनल, न्यूज वेबसाइटस आदी आपल्यासमोर येत आहेत. या सर्वांना चांगल्या तरुण पत्रकारांची गरज आहे. तुम्ही मास कम्युनिकेशनचा कोर्स केला असेल तर तुम्हाला रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. मास कम्युनिकेशनचा कोर्स करून नोकरी शोधत असलेल्या तरुणांची संख्याही कमी नाही. अनेक लोक तर असे आहेत ज्यांना फील्डमध्ये नोकरी मिळतच नाही. मीडिया हाउस त्यांना घेत नाही कारण त्यांना हवी ती योग्यता या तरुणांकडे नाही. तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर आधी हे निश्चित करा की प्रशिक्षणासाठी अशा संस्थेची निवड करा जिचा लाभ तुम्हाला जॉब मिळण्यास आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. येथे काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे, ज्याकडे विद्याथ्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. मल्टी पर्पज ट्रेनिंग आता मीडियाच्या क्षेत्रात मोठा बदल झालेला पहावयास मिळतो. सर्व लहान मोठ्या ग्रुप्सना मल्टीपर्पज लोकांची गरज आहे. असे अनेक लोक विविध ग्रुपमध्ये करताना दिसतील जे केवळ चांगले लिहितच नाही तर, एडिट करणे, समीक्षा करणे यात कुशल आहेत. तसेच डिजाइनिंग, लेआउट आणि प्रोडक्शनशी संबंधीत कामांचीही त्यांना ब-यापैकी माहिती असते. या बदलाचे श्रेय या क्षेत्रात प्रशिक्षण देणा-या चांगल्या संस्थांना जाते. ज्या आपल्याकडे ट्रेनिंगदरम्यान राइटिंग स्किलबरोबरच डिजाइनिंग, प्रॉडक्भ्शन, मार्केटिंग आदिशी संबंधित आवश्यक गोष्टींची माहिती उपलब्ध करून देतात. अशा संस्थांतून बाहेर पडलेले विद्यार्थी मल्टी टॅलेंटेड असल्याने जॉब सहज मिळतो. तसेच नोकरीदरम्यान प्रगती करण्यात त्यांना प्राधान्य मिळते. इंस्टीटयूट निवडण्याआधी हे ’ रवा की, जी संस्था तुमच्या नजरेसमोर आहे तेथे तुम्हाला हे सर्व मिळू शकते की नाही. चांगल्या मार्गदर्शकामुळे तुमचा मार्ग सुकर होऊ शकतो. चांगला मार्गदर्शक कोणाला मिळाला तर तो त्याचे लक्ष्य गाठण्यास सफल होतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात संस्थेची चांगली फॅकल्टी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या क्षेत्रात जायचे असेल तर प्रवेशासाठी अशा संस्थेची निवड करा जिथे चांगले आणि अनुभवी शिक्षक असतील. ते तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आपल्या अनुभवातून बरेच काही देऊ शकतात. मीडिया सेक्टरमध्ये वरिष्ठ पत्रकारांच्या अनुभवातून खूप चांगले शिकायला मिळते. प्रशिक्षण देणा-या अशा अनेक संस्था आहेत, जिथे मीडिया फील्डमध्ये प्रसिद्ध असलेले टीचिंग स्टाफमध्ये काम करतात. अशा संस्था वेळप्रसंगी प्रसिद्ध पत्रकाराना गेस्ट फॅकल्टीच्या रूपाने आपल्याकडे बोलावतात. प्रोजेक्ट वर्क पत्रकारितेच्या क्षेत्रात सैद्धांतिक ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानाचा फायदा होतो. मॉस कामचे प्रशिक्षण देणा-या जेवढ्या चांगल्या संस्था असतील तेथे याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांचे विद्यार्थी या क्षेत्रातील प्रॅक्टिकल नॉलेजही मिळवतात. यासाठी ते आपल्या विद्याथ्र्यांना प्रोजेक्ट वर्क देतात. हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी विद्याथ्र्यांना फील्डवर जावे लागते. विविध लोकांना भेटावे लागते. इंटरनेट अथवा पुस्तकालयात बसून त्या विषयाचे बारकाईने अध्ययन करावे लागते. अशाप्रकारची प्रक्रिया कोर्स करणा-यांत स्वाभाविक शोधवृत्तीला चालना देते. ही बाब पत्रकारासाठी खूप महत्त्वाची आहे. साधेसरळ किंवा सोप्या विषयांवर दिलेले प्रोजेक्ट वर्क तुमच्यातील दडलेली शोधवृत्ती जागृत करू शकत नाही. इंस्टीट्यूट निवडण्याआधी हेही पाहणे आवश्यक आहे की तेथे गेल्या वर्षीच्या विद्याथ्र्यांना कशाप्रकारचे प्रोजेक्ट दिले गेले होते.वाचन आवश्यकएका पत्रकाराकडून ही अपेक्षा केली जाते की, त्याकडे विविध विषयाशी संबंधित पुरेशी माहिती असेल. लोकांच्या या अपेक्षाच्या कसोटीला उतरण्यासाठी मीडिया जगताशी संबंधीत लोक नेहमी नवनवीन विषयांची माहिती मिळवीत असतात. त्यासाठी चांगली पुस्तके वाचत असतात.पत्रकारितेच्या क्षेत्रात तुम्हाला नाव कमवायचे असेल तर संस्था निवडण्याआधी हे निश्चित करा की त्यांच्याकडे पुरेशा संख्येत पुस्तके, महत्वाची वृत्तपत्रे आदींचा संग्रह आहे की नाही.
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम
मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता
जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.
अतिशय महत्वाचे...
विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...