आगामी स्पर्धापरीक्षांची तयारी ...
सरत्या वर्षांच्या अखेरीस आपण कुठला ना कुठला तरी संकल्प धरतो आणि हा संकल्प नवीन वर्षांत पूर्ण कसा करता येईल, याचा विचारही करतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी आगामी वर्षांत उत्तम करिअर करू अथवा उत्तम ...नोकरी मिळवू, अशा आशयाचा संकल्प नक्कीच केला असणार. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणेही अत्यावश्यक ठरते.
एखादे ध्येय समोर ठेवून त्या दिशेने वाटचाल व्हायला हवी. या वर्षी आपण ठरवल्यानुसार कितपत पल्ला गाठू शकलो? जे ध्येय ठरवले होते, ते साध्य करण्याच्या दृष्टीने खरोखरीच प्रयत्न केले का, याचे स्वत:च अवलोकन करायला हवे. आपण ठरवलेले ध्येय साध्य करता आले नसेल तरीही खचून जाऊ नका. आगामी वर्षांत भरपूर संधी येणार आहेत, त्यांचा लाभ घ्या आणि आपल्या करिअरची वाटचाल योग्य दिशेने करा. समजा, या वर्षी ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नात कसूर केली असेल तर ती चूक नव्या वर्षांत होऊ देऊ नका. स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर वर्षभराचे वेळापत्रक आखून अभ्यासाचे नियोजन करा.
स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम ध्येय निश्चित करा त्या दिशेने प्रयत्नांची सुरुवात केलीत की, आपल्या पंखांना बळ मिळते ते भरारी घेण्यासाठी.
या वर्षांत बँकिंग परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल झाला. शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी (६०%) ऐवजी पदवीधर अशी करण्यात आली. संगणकाचेच युग आहे हे निश्चितपणे पक्के झाले. परीक्षापद्धतीही ऑनलाइन झाल्याने, एमपीएससी पूर्वपरीक्षेमध्ये यूपीएससी परीक्षेसारखाच अभ्यासक्रम आणून आयोगाने एक पाऊल पुढेच टाकले आहे.
बँक, रेल्वे, प्रॉव्हिडंट फंड, यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणाऱ्या भरती तसेच विविध पदांसाठी विविध खात्यांमार्फत निघणारे विविध अर्ज या सर्व बाबींवर लक्ष ठेवून असायला हवे. हे परीक्षेचे अर्ज निघाल्यावर परीक्षेची तयारी करणे हे यश मिळवण्यासाठी पुरेसे नसते.
स्पर्धापरीक्षांचे अर्ज निघण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायला हवा आणि त्याचा चांगला परिणाम तुम्ही अनुभवालच.
या येणाऱ्या नवीन वर्षांत कोणकोणत्या नवीन पदांसाठी अर्ज निघणार आहेत याची अंदाजित माहिती या लेखासोबत देत आहोत. त्यामुळे आगामी वर्षांत आपल्याला कोणत्या परीक्षा देता येतील आणि त्याच्या तयारीला प्रारंभ करायला हवा, याचा एक ठोकताळा तुम्हांला मनाशी बांधता येईल आणि ठरविलेले ध्येय साध्य करता येईल.
स्पर्धा परीक्षांची तयारी पुरेशा गांभीर्याने आणि परीक्षापद्धती लक्षात घेऊन केली तर ती योग्य दिशेने सुरू राहते. अभ्यास करताना संबंधित परीक्षा देणाऱ्या इतर परीक्षार्थीशी संपर्कात राहिल्यानेही प्रयत्नांना जोर चढतो आणि अभ्यासविषयक चर्चामधून आपण कितपत पाण्यात आहोत, याचाही अंदाज स्वत:ला येतो.
परीक्षा जवळ आली की, याआधीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा आणि ज्या विषयांमध्ये आपण कमी पडतो, त्याची तयारी अधिक उत्तम रीतीने कशी करता येईल, याकडेही पुरेसे लक्ष द्यायला हवे. याआधीही संबंधित स्पर्धा परीक्षा दिलेल्या आणि त्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी अपयशाची कारणे पडताळून पाहायला हवीत आणि नव्या दमाने स्पर्धापरीक्षेची तयारी करायला हवी.
सोबत दिलेल्या स्पर्धापरीक्षांचे संभाव्य वेळापत्रक लक्षात घेत अभ्यासाची मोट बांधा आणि योग्य दिशेने प्रयत्न करा.. यश तुमचेच आहे.
संस्था/आयोगाचे नाव
*इंटेलिजन्स ब्युरो एसीआयओ परीक्षा अर्जाची मुदत -एप्रिल/मे-२०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा, परीक्षा अर्जाची मुदत- साधारणपणे जाने-फेब्रु. र०१३ परीक्षा दिनांक - ७ एप्रिल २०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग पीएसआय (ढ.र.क.), परीक्षा अर्जाची मुदत- फेब्रु-२०१३ परीक्षा दिनांक- २१.४.२०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग एसटीआय (र.ळ.क.) मार्च-२०१३ परीक्षा दिनांक- १२.५.२०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग असिस्टंट (अररळ) एप्रिल-२०१३ परीक्षा दिनांक- १६.६.२०१३
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक टंकलेखक, जुलै-२०१३ परीक्षा दिनांक- १७.११.२०१३
* स्टाफ सिलेक्शन कमिशन कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल-क
(उॅछए) १९.१.२०१३ ते १५.२.२०१३,परीक्षा दिनांक- २१.४.२०१३
* स्टाफ सिलेक्शन कमिशन कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल (उऌछरए) ६.७.२०१३ ते २.८.२०१३ २०.१०.२०१३ आणि २७.१०.२०१३ आणि ३.११.२०१३
* स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टिटास्किंगस्टाफ (टळर) ७.९.२०१३ ते ४.१०.२०१३ २२.१२.२०१३ आणि २९.१२.२०१३ आणि ५.०१.२०१३
* आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर साधारणपणे जाने. फेब्रु-२०१३, ऑक्टोबर २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* आयबीपीएस क्लार्क साधारणपणे एप्रिल - मे २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* आयबीपीएस रिजनल रुरल बँक साधारणपणे एप्रिल - मे २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* एसबीआय क्लार्क साधारणपणे फेब्रु- मार्च २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
* एसबीआय ऑफिसर मार्च - एप्रिल २०१३ परीक्षा दिनांक- जाहिरातीनंतर दोन महिन्यांनी
By :- प्रा. संजय मोरे.