Loksatta
जबाबदार इंटरनेट नागरिक होण्यासाठी.....
* हे करा..
० सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीला 'फ्रेंड' बनवताना ती व्यक्ती ओळखीची आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.
० एखाद्या सामाजिक किंवा राजकीय विषयावर आपली मते मांडताना त्या विषयाची पूर्ण माहिती करून घ्या. अर्धवट माहिती नेहमीच मारक ठरते.
० संविधानाने अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले असले, तरी व्यक्त होताना दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाहीत, याचीही खबरदारी घ्या.

० फेसबुकवरील कमेंट म्हणजे एक सार्वजनिक विधान असल्याने कोणतीही कमेंट करताना सामाजिक आणि नैतिक भान बाळगा.
० कोणत्याही भारतीय नागरिकाने कोणताही फोटो शेअर करताना त्यात आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान होणार नाही, याचे भान बाळगणे आवश्यक आहे.
० कोणत्याही लिंक शेअर किंवा उघडण्यापूर्वी ती 'स्पॅम' आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
० फेसबुक या साइटला आयटी कायदा लागू होत असल्याने त्या कायद्याचे उल्लंघन होईल, अशी कोणतीही गोष्ट करणे टाळा.
० तुमचे अकाऊंट हॅक झाल्याचा संशय असल्यास ते डिलीट करा किंवा त्याबाबत रीतसर सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार नोंदवा.
* हे करू नका..
० कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी विधाने करू नका.
० आपल्या मित्राने केलेल्या एखाद्या विधानाला 'लाइक' करणे, म्हणजे त्या विधानाला सहमती देणे. त्यामुळे पूर्ण विचार केल्याशिवाय एखाद्या विधानाला सहमती देऊ नका.
० अश्लील फोटो किंवा मजकूर असलेली पेजेस किंवा लिंक्स उघडू नका.
० नकली अकाऊंट उघडून त्याद्वारे कोणतीही कमेंट किंवा फोटो शेअर करू नका. अकाऊंटवर नाव तुमचे नसले, तरी पोलिसांना तुमच्यापर्यंत पोहोचणे सहजशक्य आहे.
० एखाद्या वादग्रस्त फोटोमध्ये विनाकारण कोणालाही टॅग करू नका.
० अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट स्वीकारू नका. ती कदाचित नकली अकाउंट्स असू शकतात.
० स्वतचे फोटो शेअर करतानाही ते सर्वाना पाहता येतील, असा पर्याय निवडू नका. ते फक्त आपल्या मित्र-मैत्रिणींपुरतेच मर्यादित ठेवा.
० फेसबुक किंवा यासारख्या साइट्सवर आपला दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक टाकू नका.
अल्पवयीन मुलांनी फेसबुकवर कोणतीही कमेंट किंवा लाइक करताना काळजी घेणे आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पाल्याने कोणतेही वादग्रस्त विधान फेसबुकसारख्या साइटवर केले, तर त्या मुलाची आणि पर्यायाने त्याच्या कृत्याची जबाबदारी ही पालकांवरही आहे.
* पालकांनो, हे करा-
० तुम्हाला आवडो अगर न आवडो, फेसबुकवर अकाऊंट उघडा आणि सर्वप्रथम आपल्या पाल्याला 'फ्रेंड' बनवा.
० फेसबुकवर 'फ्रेंड' असलेला आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्यक्ष आयुष्यातही तुमच्याबरोबर तेच नाते शेअर करेल, याची काळजी घ्या.
० मुलगा फेसबुकवर कोणाला मित्र बनवतोय, काय कमेंट करतोय, याकडे लक्ष ठेवा.
० फेसबुकवर तुमच्या पाल्याने केलेली एखादी गोष्ट तुम्हाला आक्षेपार्ह वाटली, तर तिथेच कमेंट न करता त्याच्याशी खासगीत बोलून तुमची मते मांडा.
० मुलाच्या मित्रांनाही फेसबुकवर तुमचे मित्र बनवून घ्या. त्यामुळे त्याचे मित्र कसे आहेत, याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल.
० आयटी कायदा समजून घेऊन आपल्या मुलालाही त्याची जाणीव करून द्या.
* पालकांनो, हे करू नका..
० फेसबुकवर अकाऊंट उघडल्यावर पाल्यावर नजर ठेवण्याऐवजी स्वत:च कोणतीही वादग्रस्त विधाने करू नका.
० आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत शिकत असेल, तर शक्यतो त्याच्यासमोर सामाजिक किंवा राजकीय विषयांवर चर्चा करताना जहाल मते व्यक्त करू नका. अशा मतांचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो.
० स्वत:च्या मुलाच्या फेसबुक अकाऊंटवर लक्ष ठेवताना तुम्ही अवास्तव नाक खुपसत आहात, असे मुलाला वाटू देऊ नका. त्यामुळे तो तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे.
० मुलाला मित्र बनवताना पालक आणि पाल्य या नात्यातील आदर कमी होऊ देऊ नका.
० आपल्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे अवास्तव चौकशी करू नका. शालेय किंवा महाविद्यालयीन वयात पालकांपेक्षा मित्र जवळचे असतात, असा अनुभव असल्याने तुम्ही काय विचारत होतात, हे तुमच्या मुलापर्यंत लगेचच पोहोचण्याची शक्यता असते.
० मुलगा चुकत असेल, तर त्याला दमदाटी करू नका. गोष्टीचे गांभीर्य पटवून देऊन त्याच्या कलाने घेऊन त्याला समजवा.
* मुक्तपणे आपली मतं, चर्चा, माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि ध्वनिफिती आपल्याला हव्या त्या व्यक्तींसोबत किंवा जगासोबत शेअर करण्यासाठी इंटरनेटवरील ज्या संकेतस्थळांचा वापर होतो त्यांना 'सोशल मीडिया' असे संबोधतात. व्यक्तिगत किंवा सार्वजनिक पातळीवर संवाद साधण्यासाठी ही संकेतस्थळं मोठय़ा प्रमाणात तयार करण्यात येत आहेत. फेसबुक, िलक्डइन, मायस्पेस, ट्विटर, यूटय़ूब, फ्लिकर, वर्ड प्रेस, ब्लॉगर, टाइपपॅड, लाइव्ह जर्नल, विकिपीडिया, वेटपेन्ट, विकिडॉट, सेकंड लाइफ ही काही सर्वश्रुत सोशल मीडिया संकेतस्थळं आहेत.
* भारतातील फेसबुक वापरावरील आकडय़ावर नजर टाकल्यास याचा वाढता प्रभाव थक्क करणारा आहे. फेसबुक वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागत असून फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ६०६२०६२० इतकी आहे. भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या एकूण लोकसंख्येपकी ७४.८४% लोकसंख्या फेसबुकचा वापर करते. तर १८-२४ वर्षे वयोगटातील फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २९०९७८९८ आहे. भारतात एकूण फेसबुक वापरणाऱ्यांपकी ७४% पुरुष आणि २६% महिला आहेत. http://goo.gl/cEt76