विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील
अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नवीन वर्षाच्या निमित्ताने 'जॉब्स मराठी'चे नवीन उपक्रम

मागील वर्षी (२०१३) नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉब्स मराठीने ग्रुप सुरु केला होता

जॉब्स मराठी ग्रुप यावर्षी 'जॉब्स मराठी'चा अनेक नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

या ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी मिळून आपल्या बरोबर येणाऱ्या सगळ्यांना सहकार्य करायचे आहे.
नवीन व्यवसायाबद्दल माहिती देऊन बाकीच्या युवकांना प्रोस्ताहन करू शकता.
ग्रुप उद्देश - ह्या समुदायाचा उद्देश हा तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा.
आपले थोडेसे कष्ट एखाद्या उमेदवाराचे आयुष्य घडवु शकतॆ.
लक्षात ठेवा आपले अस्तीत्व टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती ओलांडून आपल्याला एकत्र यावेच लागेल.
कधी कुठे कुणाचा उपयोग होईल सांगता येत नाही.

MPSC Prelim 2013- नव्या पॅटर्न ची तयारी


एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने नुकताच त्यांच्या प्रीलियमचा पॅटर्न बदललाय. हा पॅटर्न ब‍-याच अंशी यूपीएससीसारखा आहे. फेब्रुवारी महिन्यातील प्रस्तावित राज्यसेवा पूर्व परीक्षा या नव्या पॅटर्ननुसार होईल. या नव्या पॅटर्नबद्दल थोडंसं.

एमपीएससीने प्रीलियमच्या अभ्यासक्रमाबाबत गेल्या महिन्यात अचानक बदल केले आहेत. या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे युपीएससीच्या प्रीलियमच्या अभ्यासक्रमाची कॉपी, पेस्ट आवृत्ती आहे. त्यात भर फक्त महाराष्ट्र या शब्दाची आहे. अभ्यासक्रमात ज्या ज्या ठिकाणी देश वा भारत आहे तेथे राज्य व महाराष्ट्र हे शब्द अॅड केले आहेत. बाकी अभ्यासक्रम सेम टू सेम. पण या अचानक बदलाविरुद्ध कुठेच दाद मागण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीप्रमाणे परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.

पेपर- १ (गुण २००- २ तास)

राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.
भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.

महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था ,पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन ,लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता ,हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान

जुन्या अभ्यासक्रमाशी तुलना

पेपर -१ मध्ये जुन्या प्रीलियमच्या तुलनेत बरेच बदल आहेत. आर्ट‍्समधली इतिहास ,भूगोल व राज्य व्यवस्था यावर स्वतंत्र तीन विभाग केलेत. त्याचा अभ्यासही विस्तारलाय. भूगोलामध्ये महाराष्ट्राबरोबरीनेच भारत व जगाचाही अंतर्भाव आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांची कार्ये हा विषयही गाळलाय. वाणिज्य आणि अर्थव्यवस्था घटकांमध्ये सामाजिक विकासाला जास्त महत्त्व दिलंय. कृषि घटक तर पार बादच केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाऐवजी सामान्य विज्ञानाचा समावेश केलाय. या विषयातील तपशील दिलेला नाही. बुध्दिमापन विषयक प्रश्नांचा अंतर्भाव पेपर २ मध्ये केलाय.
नवीन अभ्यासक्रमासाठी अभ्यास कसा कराल

पेपर १ साठी

1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल. उदा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायमूर्ती कोण होत ?

2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न

आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या. उदा. भारतीय राज्यघटनेने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला ही वस्तुनिष्ठ माहिती आहे. मात्र संसदीय लोकशाही म्हणजे काय ? हा संकल्पनेवर आधारीत प्रश्न आहे.

3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न

नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. उदा. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची कमाल संख्या किती असू शकते? यामध्ये ९१ व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या कनिष्ठ सभागृहाच्या एकूण संख्येच्या १५ % इतकीच असते. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २८८ आहे. त्याच्या १५ टक्के म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्र्यांची कमाल संख्या ४३ असू शकते.
4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र , विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा.

पेपर- २ (गुण २००-२ तास)

आकलन (कॉम्प्रिहेन्शन)

इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)
तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)
निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)
बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)
इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)

कॉम्प्रिहेन्शन :

यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उता‍ऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.

लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी

यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत.

डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग :

प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य , अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील.

जनरल मेंटल एबिलिटी :

आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग ,डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.

बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन :

यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान ,प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती ,ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं. कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल.

इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) :

सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी ,अधिकारी , कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात.

पेपर २ च्या अभ्यासासाठी युपीएससीच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहणे उपयुक्त ठरेल.

अतिशय महत्वाचे...

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...